ज्युनियर के जी अभ्यासक्रम.

Submitted by साती on 1 October, 2013 - 07:04

नर्सरीच्या अभ्यासक्रमाबद्दल सांगोपांग चर्चा इथे वाचली.
ज्युनियर आणि सिनीयर के जी च्या अभ्यासक्रमाबद्दल इथे चर्चा करूया.
आमच्या मुलाच्या शाळेत कन्नड, हिंदी मूळाक्षरे, इंग्रजी कॅपिटल , स्मॉल , करसिव रायटिंग , दोन ते पाच पाढे , एक ते शंभर आकडे एवढे सगळे लिहीणे ज्युनियर केजीत अपेक्षित आहे.
हे फारच जास्तं आहे असे आमचे मत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग ठिक आहे.
आमचा सव्वाचार वर्षाचा आहे फक्तं. त्याला करसिव वैगेरे शिकवायचं ते पण कन्नड आणि हिंदी अक्षरे शिकवून हे जरा जास्तं होतंय.

लिहायचा उद्देश असा होता कि असे काही चुकलेच (राहुन गेले) तर नंतर दुरुस्त करता येते आणि त्याला फारसा वेळही लागत नाही. हा प्रकार आमच्या ध्यानातच आला नव्हता. इथे वाचल्यावर म्हटले कि ठिक आहे नंतर असे वाटायला नको कि हे राहुन गेले. इथे एक सर होते. त्यांनी २ दिवस सगळे स्ट्रोक्स करुन घेतले. मग ४ दिवस कॅप्स आणि स्मॉल. मग २ दिवस लेटर्स जोडणे. झालं. आता मुलगा सेंटेन्स लिहतोय. मुलीला मात्र वेळ लागतोय. तिचे कॅप्स आणि स्मॉल झालेत. लेटर्स जोडणे सुरु आहे.

सातीजी, मुलांना विचार करायला आले ना मग बाकि काहि आले नाही तर चालते. "Let them teach how to think and let us learn how to teach them how to think." या धर्तीवर आमचा प्रवास सुरु आहे. आणि विचार करणे हि गोष्ट चेन रीअ‍ॅक्शनसारखी असते. एकदा सुरवात करायचा अवकाश मुलांना बाकी काही शिकवायला लागत नाही. (मराठीत विचारशृंखला असा शब्द आहेच).

हे अगदी बरोबर आहे.
पण प्रश्न मला काय वाटते याचा नाहीचेय.
मी त्याच्या बाईंना सांगून आल्येय की लिहायचा जास्तं स्ट्रेस देऊ नका.
कन्नडची छोट्या छोट्या वळणांची अक्षरे दुरेघी वहीत काढण्याइतकी त्याची फाईन मोटर स्किल्स अजून डेवलप झाली नाहीत.
विचारशॄंखला मात्रं भलतीच डेवलप झालीय.

पण प्रश्न मला काय वाटते याचा नाहीचेय.>>> सातीजी प्रश्न तोच आहे. शाळेत एका ठराविक लेवलपर्यंत स्ट्रेस देतात त्यानंतर नाही. पण पालक त्याच्याही पुढे जावुन स्टेस देतात. त्यामुळे तुम्हाला काय वाटते हेच महत्वाचे. तुम्हाला या गोष्टी पटल्या असतील तर त्या तुमच्या बिव्हेवियर मध्ये दिसतात आणि मुलांच्या देखिल ल्क्षात येतात. मग सगला कारभार अगदी निवांत मजेदार सुरु रहातो. नाहितर पालक आणि मुले दोघांची चिड चिड होतेच होते. Happy

विचारशॄंखला मात्रं भलतीच डेवलप झालीय>>> Happy

हे मात्रं बरोबर आहे.
पोरं बरोब्बर ओळखतात.

मी त्याला सांगितलं कन्नड आणि हिंदी नाही लिहायचं तर नको लिहू.
मग दोनदा शाळेत गृहपाठ नाही म्हणून मार बसला.
एकदा स्कूलबस थांबवून ठेवून याचा राहिलेला गृहपाठ होईपर्यंत सगळ्यांनाच थांबवून ठेवले होते.
मग सरळ मीच गृहपाठ लिहायला सुरूवात केली.
अक्षर ओळखा/ जोड्या जुळवा/ एखादे अक्षर ओळखून त्याला गोल करा हे त्याला स्वतःच्या स्वतः करू देते पण पानभर कन्नड किंवा हिंदी अक्षरे लिहून आणा म्हटलं तर ते आम्ही करतो.
हे आमचं रूटीन मस्तं सेट झालंय. आणि मुलाला पण आईने अभ्यास करून घेतला यापेक्षा जास्तं काही शाळेत सांगायचे नाही हे बरोब्बर कळलेय. Wink

बापरे, खूपच जास्त अभ्यासक्रम आहे साती.

कमी अभ्यास घेणारी शाळा शोधणे खूप अवघड आहे. आमच्याकडे जु.केजी, सिकेजी नाहीये. नर्सरी, केजी आणि मग पहिली अशी पद्धत आहे. नर्सरीमध्ये ३+, केजी मध्ये ४+ आणि पहिलीत ५+ वयची मुलं असतात. माझा पोरगा ५.५ वर्षाचा आहे. केजीत आहे तो सध्या. पुढच्या वर्षी पहिलीमध्ये जाईल.

त्याला गेल्या वर्षी नर्सरी मध्ये -
हिंदी मुळाक्षरं :क ते ह - अक्षरोळ्ख
इंग्रजी - फोनेटिक्स प्रमाणे अक्षरांचे उच्चार, सगळी कॅपिटल लेटर्स लिहिणे आणि स्मॉल लेटर्सची ओळख आणि वर्षाच्या शेवटी शेवटी कर्सिव्ह लेटर्सची ओळख होती.
याशिवाय शाळेतून दर महिन्याला काही वाक्य /प्रश्न लिहून यायची ज्याची उत्तरं मुलानी देणं अपेक्षित होतं. या वाक्यांची घरी घोकमपट्टी करून घेणं अपेक्षित होतं बहूतेक पण आम्ही ते कधी केलं नाही. (ही वाक्य सहसा - what is your name, what is your father's name, who is your teacher type ची होती. )
गणित - १ ते ५० आकडे, १ ते १० ड्रॉ द वॅल्यु, आफ्टर नंबर आणि बिफोर नंबर - १ ते १० इतकं होतं.

याशिवाय महिन्यातून एकदा शो अ‍ॅड टेल अ‍ॅक्टीव्हीटी व्हायची. यासाठी दर महिन्याला वेगवेगळे विषय दिलेले असायचे. शेप /कलर, अ‍ॅनिमल, प्लांट, हेल्पर्स, फेस्टिव्हल याप्रकारचे विषय असायचे. पण यासाठी आम्हाला कधी गोकमपट्टी करावी लागली नाही. विषय सांगितल्यावर त्याप्रमाणे ५ वाक्य बोलायला पोरगा लेगेच शिकला. सोप्पी असायची वाक्य. एक दा कोणतंतरी पुस्तकं घेवून गेला होता तो. वाक्य स्वतःहून म्हणाला - this is book. this is square in shape. this is talking book. this is red color book. this is my favourite book.
अशीच वाक्य मुलांनी जुळवणं अपेक्षित होतं.

याशिवाय पोएम , स्टोरी टेलींग, ड्राइंग हे पण महिन्यातून एकदा व्हायचं. कसल्या कसल्या रेस असायच्या, बलून रेस, फ्लॅग रेस नावांच्या. शिवय दर महिन्याला एक कलर डे असायचा. त्यादिवशी पोरं युनिफॉर्म ऐवजी त्या त्या रंगाचे कपडे घालून आणि एखादी त्या रंगाची वस्तू, खेळणी घेवून शाळेत जायची.

सलाड बनवणं, फ्रुट स्टिक्स बनवणं, दर महिन्याला एखाद्या ठिकाणी व्हिजीट (बाजार, लाल किल्ला, गार्डन्स, म्युझियम्स किंवा पिकनीक व्हायच्या. दर विकेंडला लायब्ररीचं पुस्तक मिळायचं घरी वाचायला.

पण दररोज एक वहीचं पानभरून अभ्यास मिळायचा. मध्येच दोन विषयांचा अभ्यास द्यायला सुरवात केली होती. त्यावेळी शिक्षिकेशी बोलल्यावर लगेच तिने अभ्यास कमी करून एकच पान अभ्यास द्ययला सुरवात केली.

यावर्षी मात्र खूप जास्त झालाय अभ्यास. कर्सिव्ह रायटींग, हिंदी मुळाक्षरं, १ ते १०० अंक हे सगळं तर संपून गेलं. सध्या इंग्रजी तिन अक्षरी शब्द वाचणं /लिहिणं संपून चार अक्षरी शब्दांना सुरवात झालीये. हिंदीमध्ये पण तिन अक्षरी शब्द (काना-मात्रांशिवाय) झालेत. आता बहूतेक चार अक्षरी शब्द सुरु होतिल.
पण या अभ्यासाचं प्रेशर मात्र नसतं. फोनेटिक्समूळे हे शब्द त्याला आधीच वाचता येत होते. आता लिहायला पण येतात. हिंदी पण पूर्वीपासून जमायचं वाचायला. काना-मात्रा नसले तर ४-५ अक्षरी शब्द पण वाचता येतात. लिहिता पण येतात पण बाराखडी मात्र अजून लिहिता येत नाहीये. (नाहीच आली तरी काय फरक पडतो? Proud )

गणितात बहूतेक आता शाळेत बेरजा शिकवतिल. त्यापण त्याला येतात. खेळता खेळता मोजायला आणि बेरीज करायला शिकवलं होतं पूर्वी. परीक्षा , टेस्ट हे पण होतं शाळेत. आणि हो, डिक्टेशन पण होतं म्हणे हिंदी, इंग्रजीचं.

बाकी अ‍ॅक्टीव्हिटी गेल्या वर्षी प्रमाणेच आहेत शाळेत. १-२ वेळा शिक्षिकांनी मला तुम्ही त्याच्याशी घरी इंग्रजीत जास्त बोलत जा म्हणून सांगितलं होतं. पण मी मराठी आणि पंजाबी भाषा घरी बोलून त्याला शिकवतेय हे सांगितल्यावर त्यांनी इंग्रजीचा आग्रह सोडला.

त्याच्या मैत्रिणीच्या आईच्या सांगण्याप्रमाणे पुढच्या वर्षीपासून अजून स्ट्रेस वाढवतिल. पण आम्ही आपल्या पेसनी चालायचं ठरवंलंय.

यापेक्षा कमी अ भ्यास असणार्‍या १-२ शाळा आहेत आमच्या भागात पण आमचा त्या शाळांमध्ये अ‍ॅडमिशनला नंबर लागला नाही. इथे शाळेची निवड आमच्या हातात नाहीये. जिथे अ‍ॅडमिशन मिळेल तिथे मुलाला घालायचं आणि आपल्या पेसनी चालायचं इतकं आमच्या हातात आहे. Happy

(खूप लांबलचक पोस्ट झाली. पण शाळा, त्यांचा अभ्यासक्रम हे विषय निघाल्यावर थांबता येत नाही. Proud )

अल्पना तरी बरा आहे तुमचा अभ्यासक्रम.
इथे पूर्वी इंग्रजी माध्यमात सीनीयर केजीपर्यंत इंग्रजी स्मॉल आणि कॅपिटल,एक ते शंभर आकडे कन्नड अक्षर वाचन होते आणि हिंदी दुसरीपासून होते म्हणे.
आता सगळंच लिखाणासकट ज्युनियर केजीत आणलंय.
Sad

यावेळी शाळेनी सुट्टीच्या अभ्यासात खूप सारं लिखाण (प्रत्येक विषयाच्या वर्कबुकची सरासरी २०-२५ पानं) दिलं होतं. या व्यतिरिक्त गोष्टीची पुस्तकं वाचणं, स्क्रॅपबुक बनवणं, ऐतिहासिक स्थळाला भेट आणि त्याचा अल्बम बनवणं, प्राणी-पक्ष्यांची चित्रं वहीत चिटकवणं असं बरच काम होतं.

मी शिक्षिकेशी लिखित अभ्यास जास्त दिल्याबद्दल बोलले तर ती म्हणाली बाकीचे पालक म्हणत आहेत हवं तर वर्कबुकची अजून ८-१० पानं द्या लिहायला पण बाकी कुठे भेट देणं, अल्बम बनवणं, पुस्तकं वाचणं असलं काम देत जावू नका. काय करणार अशावेळी?

इथे बहूतेक शाळांमध्ये हिंदी आणि इंग्रजी अशा दोनच भाषा असतात. फक्त गुरुद्वारातर्फे चालवलेल्या किंवा इतर कोणत्या प्रदेशाच्या शाळांमध्ये रिजनल भाषा शिकवतात पण ती बहूतेक पहिली-दुसरीपासून अक्षर ओळख सुरु होते.

आयामचा या शाळेव्यतिरिक्त एका गुरुद्वाराच्या शाळेमध्ये पण नंबर आला होता पण जरी पंजाबी अक्षरओळख थोडी उशिरा सुरु होणार असली तरी एक ओंकार आणि इतर काही पठणांची घोकंपट्टी नर्सरीपासूनच सुरु होते आणि ती पालकांना करवावी लागते हे कळाल्यावर आम्ही तिथे प्रवेश घेतला नाही.

आताच आयुष्यातली पहिली पॅरेन्ट टीचर मीटींग अटेन्ड करून आले. डोस्कं फिरण्याइतकं फिरलं माझं.

एका मातेने तावातावाने मुलगा शाळेत अजिबात पाणी पित नसल्याने त्याला युरिन इन्फेक्शन झालं अणि त्याला सर्वस्वी शिक्षिका जबाबदार असल्याचं सांगितलं. शाळा चार तासांची, मग घरामधले वीस तास काय करतो हा मुलगा?

दुसर्‍या एका मातेने "रडत रडत" तक्रार केली की इंग्रजी माध्यमात घालून तिचा मुलगा अजूनपर्यंत एकही इंग्रजी वाक्य बोलत नाही. शाळा जुलैमधे चालू झाली आणि बालक एलकेजीमधे.

अजून एका मातेने मुलगा शाळेत अजिबात डबा खत नाही त्यामुळे मला रोज दुपारी शाळेत येऊन त्याला भरवून खाऊ घालू दे अशी मागणी केली.

युकेजीमधल्या एका मातेने मुलगा अज्जिब्बात तमिळ वाचत नाही, शिक्षिका तमिळमधून बोलत नाही अशी तक्रार केली.

याव्यतिरीक्त "शिक्षिका रोजच्या रोज होमवर्क चेक करत नाहीत, करेक्शन देत नाहीत. रोज पोएम्स घरी का म्हणायला सांगतात?" वगैरे तक्रारी डझनभर होत्या.

आई म्हणून मी फार नालायक असल्याचं फीलिंग आलंय सध्या!! आमचं टिल्लं रोजच्यारोज होमवर्क करत नाही आणि त्याची टीचर "शिकेल हळू हळू" असं सांगते चक्क मला!!!!!

नंदे, नालायक आई गटात स्वागत!
Wink

परवा आमच्या टिचर पॅरेंट मीटला अशीच एक बाई होमवर्क किती कमी देता म्हणून भांडत होती.
आणि आम्ही म्हणत होतो किती तो होमवर्क!

नंदिनी, ब्येश चाल्लंय तुझं. अजिबात काळजी नको.

आमची पेरेंटस टीचर मिटिंग ऑलमॉस्ट एकतर्फी होते. टिचर्स बोलतात आम्ही (त्यांची आमच्याकडून अपेक्षा असेल त्यानुसार) माना डोलावतो अथवा तोंडानं च्च् च्च् असे आवाज काढतो. कान आनंदून जातील असे क्षण कमी. काही उणीदुणी दाखवली जातात. घरी परतताना त्यावर आम्हा दोघांमध्ये तावातावानं चर्चा आणि मूड असेल तर छोटसं भांडणही होतं. बरेचदा स्ट्रॅटेजी ठरवली जाते जी लेक ऐकताक्षणी फेटाळून लावते. मग हे पेल्यातलं वादळ शमून पुन्हा सगळं 'जैसे थे' सुरू राहतं.

माझा मुलगा आता साडेचार वर्षाचा आहे. के१ मध्ये आहे. पहिले सहा महिने शाळेचा भर गाणी, गोष्टी, क्रेयान्सने पेपरवर स्क्रिबल करने, अक्षर व अंक ओळख यात इंग्रजी/ हिंदी दोन्ही (लिहिने नाही, फक्त ओळख), फळ,फुले,प्राणी ओळख,इतर प्रकारचे मोटर स्किल्स डेवलप करणे असा होता. या महिन्यापासुन लिहिने सुरु झाले. सर्व अभ्यास शाळेतच करुन घेतात. गृहपाठ प्रकार नाही. फक्त प्रत्येक आठवडयात शाळेत काय अभ्यास करुन घेतला त्याचा रिपोर्ट टिचर मेल करुन पाठवते. तसेच दर शुक्रवारी एका फोल्डरमधुन त्याने शाळेत काय काय केले त्याचे बुक्स व घरी लिहुन काढायला वर्कशीट्स देतात.

मुलगा उत्तम इंग्लिशमधुन संवाद साधतो. त्याची इंग्लिश शब्दसंपदा चांगली वाढली आहे.फक्त एकच कनसर्न आहे ते म्हणजे त्याने मराठी देखील उत्तम बोलावे. कारण आम्ही नवरा-बायको एकमेकांशी मराठीमध्येच बोलतो. पण मुलगा जेव्हापासुन नीट बोलु लागला तेव्हापासुन इंग्लिशमध्येच बोलु लागला. आम्हीदेखील एक भाषा तरी नीट बोलु दे म्हणुन त्याच्याशी इंग्लिशमध्येच बोलु लागलो. सध्या त्याच्याकडुन लहान लहान मराठी शब्द व वाक्य बोलुन व वाचुन घेते. उच्चार इंग्लिश पद्धतीने करतो. पण बघु अजुन थोडा मोठा झाल्यावर मराठी,हिंदी,इंग्लिश तिन्ही भाषा नीट बोलेल असे वाटते.

आमच्या पिटीएम फार पटकन संपतात. एकतर वन टू वन पिटीएम असतात. आम्ही आमचा टर्न येईपर्यंत बाजूला बसून रहातो आणि प्रत्येक पालकांचे शिक्षिकांशी होणारे संवाद ऐकत बसतो. फार मजेदार असतात ते. मोठ्या मुलीला या वयात हे हे येत होतं, याला अजिब्बात येत नाही, टेस्टमध्ये काय विचारणार आहेत, घरी काय अभ्यास करवून घ्यावा, एक्स्ट्रा करिकुलर अ‍ॅक्टीव्हीटीसाठी इतकी तयारी करवून घेवूनही निवड का झाली नाही, क्लासवर्क वर्गात का पूर्ण होत नाही- नेहेमी घरी का येतं अश्या टाइपचे प्रश्न असतात पालकांचे. शिक्षिका पण त्यांना बरंच काय काय सांगत असतात - अभ्यासात चांगला /चांगली आहे, खेळात उत्कृष्ट आहे, वर्गात गोंधळ घालतो... बर्‍याच तक्रारी आणि कौतूकं दोन्ही चालू असतं.

आमची वेळ आली की आम्ही लिहिलेला रिपोर्ट कार्ड वाचतो -त्यात स्वीट चाइल्ड, गुड लर्नर, स्लो असलं काही बाही लिहिलेलं असतं. मग वाचून झालं की आता अजून काय असा चेहरा करून आम्ही शिक्षिकेकडे बघतो. ती पण आय डोन्ट हॅव एनी प्रॉब्लेम विद हिम असं म्हणते. मग काहीतरी विचारायचं म्हणून मी शाळेत जेवतो का व्यवस्थित हे विचारून घेते (शाळेच्या कँटीनमधलंच जेवण कंपलसरी असल्याने किती खाल्लं हे आम्हाला कधी कळत नाही). शिक्षिका हळू हळू खातो, अर्धंच खातो.. हल्ली हल्ली सगळं संपवतो..असं सांगते. आम्ही बरं म्हणून निघायला लागलो की ती वर्गातलं काम करायला वेळ लावतो असंही सांगते. (मी मनात त्याची आई पण खायला, लिहायला वेळ लावायची हे आठवते) आणि आम्ही बरं बरं म्हणून बाहेर पडतो.

एकूण आपल्या टर्नची वाट बघायला अर्धा तास आणि अ‍ॅक्चुअल पिटीएम ला ५-६ मिनीट लागतात. Proud

याशिवाय आमच्या पिटीएम मधल्या तक्रारी फक्त हा वस्तू शाळेतच विसरून येतो या असतात. (मध्यंतरी रोज ३-४ पेन्सिली आणि इरेजर्स शाळेतच ठेवून यायचा.) आठवडाभर वाट बघून शेवटी टिचरला सांगितलं. मग तिने त्याला समजावलं की विसरलेल्या वस्तू या बॉक्समध्ये असतात. दुसर्‍या दिवशी मला मागून घेत जा. तेंव्हापासून पेन्सिली विसरल्या तरी बहूतेक वेळा दुसर्‍या दिवशी घरी येतात परत. (पाण्याची बाटली आणि स्केट्स पण विसरतो पण मग दुसर्‍या दिवशी बसमधल्या आंटीच आठवणीने आणून देतात. )

>>मग दोनदा शाळेत गृहपाठ नाही म्हणून मार बसला.
एकदा स्कूलबस थांबवून ठेवून याचा राहिलेला गृहपाठ होईपर्यंत सगळ्यांनाच थांबवून ठेवले होते.

अरे! मारतात का? अगदी हलकी चापटी जरी असली तरी अन अ‍ॅक्सेप्टेबल वाटते.

माफ करा, पण बस थांबवून चार वर्षांच्या बाळाला घरचा अभ्यास पूर्ण करायला लावणं आणि त्यासाठी त्याच्या जवळपासच्या वयाच्या मुलांना शाळेनंतर थांबवून ठेवणं शुध्द मूर्खपणा आहे.

माहित्येय मृ, महामूर्खपणा आहे.
आम्ही इतक्या छोट्या गावात रहातो की आम्हाला दुसरा ऑप्शन नाही.
किंवा मग हा जो आहे हा लेसर डेविल आहे.

साती, मुलगा अभ्यासात मागे पडला, त्याला एखादी गोष्ट आली नाही तरी आमची काही हरकत नाही. त्याला अभ्यासासाठी/ होमवर्कसाठी प्रेशराइज करू नका हे शाळेत शिक्षिकेशी बोलून बघ. बघ त्यांना समजवता येतंय का? आम्हाला प्ले ग्रूपमध्ये हे सांगण्याचा उपयोग झाला होता.

आमच्या प्ले ग्रूपमध्ये मुलांना कॅपीटल लेटर्स लिहायला शिकवायचे. १-१० आकडे पण. (मुलांची वये - अडीच -तिन). हेच घरचा अभ्यास म्हणुन पण द्यायचे. दोनदा असा अभ्यास घरी आल्यावर आम्ही मुद्दाम शाळेत जावून संगितलं त्यांना - की आमच्या नर्सरीकडून अपेक्षा त्याने आमच्या शिवाय २-३ तास त्याच्या वयाच्या मुलांमध्ये घालवावीत, स्वतःच्या हाताने जेवावे हीच आहे. तुम्ही वर्गात काही शिकत असाल -पोएम, महिन्यांची नावं, आठवड्यातले वार किंवा ए-बी सी डी तर शिकवा.पण ते त्याला यायलाच हवं यासाठी दबाव आणू नका. लिहिण्यासाठी तर अजिबात नाही. मग ते त्याला फक्त सर्कलमध्ये रंग भरणं वैगरे करायला आणि होमवर्कला द्यायचे. (त्याच्या सोबतचे बहूतेक मित्र-मैत्रिणी त्यावेली सगळे कॅपिटल लेटर्स .आकडे व्यवस्थित लिहित होते. )

हो न अल्पना, हे पहिल्यापासूनच सांगितलंय त्यांना.
आणि गंमत म्हणजे पोरगं वर्गात तिसर्या रँकवर आहे.

आता शाळा सुरू झाली की प्रिन्सिपलबाईंशीच बोलणार आहे.

मी सुनिधीला सध्या लिहिण्यासाठी अजिबात सांगत नाही. पाटी पेन्सिल देऊन रेघोट्या मारायला आवडतात तेवढंच. कलरिंगपेक्षाही तिला क्रेयॉन्स घेऊन घर रंगवायला आवडतं, त्यामुळे तेपण बिनधास्त करू देते.

शाळा शिकणे= लिखाण एवढेच अपेक्षित असलेले इतके सारे पालक बघून कसंतरी वाटलं. (मी ट्युशन्स घेत असतानादेखील मला असले पालक भेटले नव्हते.) बरं, शिक्षिकेने आपला मोबाईल नंबर दिलेला आहे. कधीही फोन केला की ती लगेच उत्तर देते, तरीदेखील शाळेच्या ट्रस्टींसमोर "ती होमवर्क चेक करत नाही," "शाळेत पाणी पित नाही, म्हणून युरिन इन्फेक्शन झाले" हे मोठमोठ्याने सांगणे मलातरी खूप विचित्र वाटले. टीचर झाल्या तरी शेवटी माणूस आहे. आपलं एकटं नमुना घरात २४ तास सांभाळताना दमछाक होते. त्यांना असली २५ नमुने सांभाळायची असतात- क्वचित डबा विसरला अथवा पेन्सिल विसरली तर फोनवरून सांगावं कींवा दुसर्‍या दिवशी शाळेत जाऊन आणावं.

सर्वात जास्त आश्चर्य मला त्या रडत बोलणार्‍या बाईचं वाटलं. (अतिशयोक्ती म्हणून नाही ती भडाभडा रडत होती, आधी मला वाटलं, मुलालाच काही झालंय की काय तिच्या...) एकही वाक्य ईम्ग्रजी बोलत नाही हे कारण देऊन शाळेची पहिली टर्म संपायच्या आत एवढा गोंधळ??

तरी नशीब, तिचं पोरगं नीट तमिळमधे बोलतंय, आमच्या ध्यानासारखं "मम्मा, आय वॉन्ट तन्नी दे प्यायला" असली भेळ तरी करत नाही.

साती, तमिळमधे. म्हणूनच मला कितीतरी वेळ समजेना की भानगड काय आहे. शेवटी शेजारी बसलेल्या बाईला विचारून घेतले.

पूर्ण मीटींग तमिळमधेच चालू होती, त्यामुळे काही विनोद आणि शिव्या मला समजल्या नाहीत Proud

सिरियस नोट, इथे अमेरीकेत सुरुवातीला काही विशेष अभ्यास नसतो ह्या वयात..(किंबहुना काहीच नसतो म्हटले तरी चालेल... पण नंतरच्या इयत्तेत तो कायच्याकाय होतो.)...>>>झ्म्पी चूक. तुम्ही कोणचा सालीची बात करताय हे माहीत नाही. हल्ली pre-K (4 year olds) na reading and writing (starting from 3 lettered words to about 6 lettered words and beyond by end of the year), writing counting 1-100. As the year progresses they also do simple arithmatic operations like "+ - / *" या शिवाय त्याना music, arts, social skill, basic science and GK curriculum madhe included asta.

कर्सिव शिकवलं तरी परीक्षेत ते वापरु देत नाहित असं मला एकांकडुन समजले होते ते खरं आहे का?>>> मुंबईतल्या एका मान्यवर शाळेने कर्सिव लिहू नका असे सांगितले होते.याचे कारण म्हाणजे दहावीचे पेपर्स तपासायला जातात,त्यावेळी कुठल्याही भागात जाऊ शकतात.तेथील शिक्षकांना कर्सिव वाचता येत नसेल तर मुलांचे मार्क्स जातात.

लेक आता सातवीत आहे पण आमचा के जी चा अनुभव मस्त होता.

मीटींग मधे चर्चा साधारणपणे डबा खाणे, गाणी, नाच इत्यादी उपक्रमात भाग घेणे या विषयांवर होत असत.

शाळेत काय अभ्यास होतो हे आम्हाला कधीच सांगत नसत. त्यांचे मत होते की एकदा आम्ही सांगीतले की ह्या वर्षी अमुक अमुक १० कविता शिकवणार की पालक लगेच मुलांच्या मागे लागतात - कविता पाठ करण्यासाठी. टीचर्स सांगत की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तूम्ही घरी शिकवा, आम्हाला जे वाटेल ते आम्ही शाळेत शिकवू.

शाळेत काय अभ्यास होतो हे आम्हाला कधीच सांगत नसत. त्यांचे मत होते की एकदा आम्ही सांगीतले की ह्या वर्षी अमुक अमुक १० कविता शिकवणार की पालक लगेच मुलांच्या मागे लागतात - कविता पाठ करण्यासाठी. टीचर्स सांगत की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तूम्ही घरी शिकवा, आम्हाला जे वाटेल ते आम्ही शाळेत शिकवू.
<<<<<<<<<

माझ्या मुलाच्या शाळेतदेखील असेच सांगितले. तरी काही काही पालक तुम्ही आम्हाला आधीच माहिती दया कि तुम्ही काय शिकवणार मग आम्ही मुलाची घरी तयारी करुन घेउ. त्यांना २-३ शिक्षिकांनी समजाउन सांगितले कि तसे करायची काही गरज नाही तरी काही पालकांनी आपला हेका सोडला नाही.

Pages