Submitted by साती on 1 October, 2013 - 07:04
नर्सरीच्या अभ्यासक्रमाबद्दल सांगोपांग चर्चा इथे वाचली.
ज्युनियर आणि सिनीयर के जी च्या अभ्यासक्रमाबद्दल इथे चर्चा करूया.
आमच्या मुलाच्या शाळेत कन्नड, हिंदी मूळाक्षरे, इंग्रजी कॅपिटल , स्मॉल , करसिव रायटिंग , दोन ते पाच पाढे , एक ते शंभर आकडे एवढे सगळे लिहीणे ज्युनियर केजीत अपेक्षित आहे.
हे फारच जास्तं आहे असे आमचे मत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा हा हा. मी कालच वाचलं.. मी
हा हा हा. मी कालच वाचलं.. मी लोकांच्या कल्याणा वगैरे.. साठी बोललो

आणि इमॅजिन कशाला ? खाली लोकांनी कॉपी केलंय ते .. मी आपलं तुमच्या पोस्ट चा संदर्भ जातो म्हणून सांगितलं
वल्लरी, तुमच्या देवनागरीतल्या
वल्लरी, तुमच्या देवनागरीतल्या पोस्ट्स वाचल्या, आवडल्या.
सहा महिन्यात फ्लॅशकार्ड!
सहा महिन्यात फ्लॅशकार्ड! वल्लरीच, आय थिंक यु आर रेझिंग ए जिनियस...
मला वल्लरी यांच्या मराठीतील
मला वल्लरी यांच्या मराठीतील पोस्ट पटल्या आणि आवडल्या पण . माझी लेक इथे us ला first grade ला आहे . शाळेत पूर्ण भर वाचनावरच आहे . मुलांनी स्वताहून लिहिणे अपेक्षित आहे . ते पण छोट्या गोष्टी . spelling बरोबर पाहिजे असे काही नाही . उच्चारावरून मुल स्पेलिंग बनवतात . बराचदा त्यात एक दोन अक्षर मिसिंग पण असतात .
कालच parent teacher conference होती . ती म्हणाली फक्त first grade चे १०० spellings बरोबर असणे अपेक्षित आहे . बाकी let them write how they want to . वाचन मात्र सतत प्रोत्साहित करतात . शाळेतून खूप पुस्तकं घरी येत राहतात . reading log महिन्याचा पूर्ण झाल्यावर मुलांना छोटेसे बक्षीस मिळते . रोज वीस मिनिटे वाचन करून घ्यावे असे सांगितले आहे . आणि math फ्लाश कार्ड्स addition आणि subraction साठी दहा मिनिटे . एव्हडाच homework असतो बाकी काही नाही . शिवाय आठवड्यातून एकदा teacher math game पाठवते . तो खेळायचा मुलांसोबत .
इथे elementary (१ ते ४) जास्त होमवर्क नसतो . पण middle school पासून बराच होमवर्क असतो . पण ती मुलं मोठी असल्यामुळे manage करू शकतात . माझी मोठी मुलगी सहावीत आहे . तिला बराच होमवर्क असतो . पण ती तो manage करते . त्यांनाही अवांतर वाचन अपेक्षित आहे . त्यासाठी त्यांना वेगळे ग्रेडस मिळतात . माझ्या दोन्ही मुलीना त्यामुळे वाचनाची खूप आवड आहे . त्या दोघी कधीही bore झाले असे म्हणत नाहीत . आम्ही आठवड्यातून एकदा वाचनालयात जात असतो आणि दोघी भरपूर पुस्तकं घेवून येउन वाचतात . माझी लहानी २/३ grade लेवलची पुस्तकं पण खूप आवडीनी वाचते .
आपल्या कडे लिखाणावर खूप भर आहे त्यामुळे मुल खूप दबावाखाली येतात . मला पण वल्लरी म्हणतात त्याप्रमाणे लिखाण थोडे कमी करून वाचन आणि इतर activities कराव्यात असे वाटते .
माझ्या भारतात राहणाऱ्या बहिणीची मुलं ( वय १८ आणि १२ वर्षे ) काडीचही अवांतर वाचन करत नाहीत .
अभ्यास नाहीतर tv , video games , mobile वर असतात . या मुलांना अभ्यास व्यतिरिक्त गोष्टी कशा कळणार असा प्रश्न पडतो .
मी तरी या system वर खुश आहे . आणि मुलीही शाळा खूप एन्जोय करतात .
वल्लरी फार छान
वल्लरी फार छान पोस्टस.
rakheesiji +१
राकेशजी +१. माझ्यापण सगळ्या
राकेशजी +१.
माझ्यापण सगळ्या नातेवाईकांच्या मुलांची हीच अवस्था आहे.
@साती , rakhee,( राखी )
@साती , rakhee,( राखी ) म्हणालात तर चालेल .. ते rakhee Siji आहे .
वल्लरीच्या देवनागरी पोस्ट्स
वल्लरीच्या देवनागरी पोस्ट्स चांगल्या आहेत. लहानपणापासून पुस्तकं वाचणे हा प्रकार मायदेशात थोडा कमी पाहिला आहे. अगदी काही महिन्यांची असल्यापासून मुलांना वाचून दाखवलं तर त्याला अभ्यास म्हणायची गरज नाही पण त्यातून रंगांची ओळख, आकार, भाषा इ.चे संस्कार आपोआप होतात आणि मुलांना वाचायची गोडी लागते. माझ्या मुलांना सध्या तरी वाचून घ्यायची आवड आहे. आम्हीदेखील लहानपणापासून बोर्ड बुक्स इ. पासून सुरुवात केली आहे.
स्वत:हून वाचायच्या वयातही ती तशीच वाचतील अशी अपेक्षा.
अमेरीकेत एकंदरीत रिडिंगला महत्व दिलंय. आमच्याकडे केजीमध्ये छोटे छोटे स्पेलिंग असलेलं एक कीचेन टाइप दिलंय. त्यातले स्पेलिंग्ज महिन्याभरात वगैरे पालकांनी करून घ्यायला घरी दिलंय. आणि ते टीचरने दिलंय म्हणून बहुतेक मुलानेही आधी वाचायला आणि मग लिहायला खळखळ केली नाही. बाकी रोज वीस मिनिटे वाचा हा अभ्यास असतो.
ज्यु के मध्ये म्हणजे इथल्या प्रीके मध्ये सगळा भर शाळेत केले जाणारे प्रोजेक्टस मग त्यात बेकिंगपासून, forest walk वरून गोळा करून आणलेल्या वस्तूंचे शो पीसेस, कधी ट्रेन ट्र्~अक्स असे सगळेच प्रकार असत. तिथे रिडिंग म्हणजे रोज संध्याकाळी टीचर वाचून दाखवत असे. पण त्यातही त्यांनी मुलांना एखादा ऑथर इंट्रोड्युस करणे असंही केलं. ते मला फार आवडलं. त्यानंतर आम्ही घरी पुस्तक वाचतानाही मुलगा हे पुस्तक कुणी लिहिलंय, मग आपण हा ऑथर करूयाका वगैरे सजेस्ट करी. तर हा कन्सेप्ट त्याच्या प्रीकेने त्याला इतक्या लवकर दिला हे मला आवडलं.
वेका +१ बुक फेअर पण असतं
वेका +१
फारच भारी वाटलं.
बुक फेअर पण असतं शाळेत, मुलाने पहिलीतचं स्वतःची विशलिस्ट करुन आणली आणि मी थक्क झाले. मोठा मराठी शिकत आहे, त्याच्या बरोबर लहाना (वय वर्ष अडीच) पण बाजुला बसतो. २-३ दिवसांपुर्वी त्याला वॉलग्रीनचा ट्रक दिसला(त्यांचा लोगो उखळ आहे), मला म्हणे "ममा, उ उखळ बघ"
लहान मुलांना रंगीत पाने बघायला खुप आवडतं, ते जोपर्यंत एंजॉय करत आहेत तो पर्यंत वाचुन दाखवायला काहीच हरकत नाही. लहाना १०-१५ पुस्तकांची चवड घेऊन बसतो आणि सगळं वाचुन काढायला लावतो.
वल्लरी वर सगळे का तुटून पडत
वल्लरी वर सगळे का तुटून पडत आहे. पहिल्या अपत्याच्यावेळी पालक थोडे जास्त उत्साही असतात बरेचदा. ती वाईट तर नक्कीच काही करत नाहीये.
बर्याच पोस्ट्समध्ये असा टोन दिसतोय कि मुलांवर जास्त प्रेशर आणणारे पालक वाईट आणि आपण स्वतः "इझी गोइंग" पालक म्हणजे बेस्ट. पालक मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारे डिव्होटेड असु शकतात ना? माझी मैत्रिण आहे जिला मुलांबरोबर खेळायला येत नाही. तिने काय कराव मग?
मुलं ठरवूदेत ना त्यांना काय हवं नको ते. ती सांगतात बरोबर. मुलांना जितक कळत तितक आपल्यालाही कळत नाही. काही मुलांना स्टिम्युलेशनची गरज असते. शिकण्याची तहान असते. शिकविल्यावर शिकत असतील, आनंदी असतील ठिक आहे ना.
मला यावर माँटेसरी पद्धत फार छान वाटते. ज्यात मुलाला गती आहे, आवड आणि कल आहे त्यात मुलांना जास्त एनकरेज केल जात.
साती,
ज्युनिअर केजी आणि केजी मध्ये मुलांनी एका ठिकाणी आठ तास बसणे, रेस्टरुम वापरणे, जेवण स्वतः करुन ट्रे वगैरे व्यवस्थित परत ठेवणे, स्वतःच्या वस्तुची काळजी घेणे (उदा, कोट, बॅग पॅक इत्यादी), इतर मुलांबरोबर शेअर करणे खेळणे, रांगेत उभ राहणे, वेळ पाळणे इत्यादी गोष्टी अपेक्षित आहेत. थोडक्यात लाईफ स्किल्स शिकण्याचा भाग kG मध्ये कव्हर व्हावा ही अपेक्षा आहे.
ते तसे नसेल आणि शाळेत आपण हे चेंज घडवून आणु शकत नसू तर खरतर वरील सिच्युएशन मध्ये फारसं काही पालकांच्या हातात उरत नाही.
सीमा +१.. वल्लरीचच्या पोस्ट्स
सीमा +१.. वल्लरीचच्या पोस्ट्स मला आवडल्या. आम्ही दाखवतो/दाखवायचो ब्वॉ मुलाला फ्लॅश कार्ड्स अन बोर्ड बुक्स. त्यात काय वाईट आहे?
मी तर मला तिसरा महिना
मी तर मला तिसरा महिना लागल्यावर स्वताशीच अल्फाबेटस म्हणणे टेबल्स म्हणणे सुरु केले . म्हणजे अभीमन्यु कसा शिकलान पोटातून तसे माझे पिल्लू पण शिकेल असे वाटले.
मला दोन्ही बाजू पटत आहेत .
सातू, वाचून खूप आनंद वाटला.
सातू,
वाचून खूप आनंद वाटला. मी पण केलं होतं हे. खरं तर मी प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यावर नोकरीच सोडली, पोटातल्या बाळाला माझ्या शारिरिक आणि मानसिक दगदगीचा त्रास नको म्हणून. आधीपासूनच ठरवलं होतं आपल्याला एकच मूल हवं (बाकी तीन मोठी मुलं आहेत घरात ८५, ६० आणि ३५ वर्षाची). त्यामुळे एवढा धाडसी निर्णय घेऊ शकले. शिवाय पहिलच मूल आणि त्यातून एकच असणार माहिती असल्याने उत्साह प्रचंड होता.
पोटातल्या बाळासोबत खूप धमाल केली, सारख्या गप्पा, आता बघ तुझी आई इथे जातेय, हे करतेय, तो ड्रेस्स घालतेय, गाडीतून फिरताना हे पाहातेय, ते खातेय ते कोणी बनवलय ....... एक्दोन वेळा ट्रेनमध्ये प्रवास केला तेव्हा सुद्धा आता हे स्टेशन आलं इ. इ. ट्रेन्मध्ये माझ्या बाजूला बसलेली बाई माझ्याकडे मी वेडी आहे असं समजून सारखं पाहात होती. इंस्ट्रुमेंटल सीडीज ऐकल्या, पाढे म्हटले, श्लोक म्हटले, योगासनं केली, ओम्कार केला.. खूप छान छान पुस्तकं वाचली, गर्भसंस्कारची पुस्तकं वाचली, सीडीज ऐकल्या, क्लास केला, पेरेंटिंगचा क्लास केला, टाईमलाईफ म्हणून मुलांच्या पुस्तकांचे सेट आहेत ते विकत घेऊन वाचले त्यात मुलं विचारतात त्या प्रश्नांची उत्तरं देईल असा नॉलेज सेट आहे. मोठ्या मुलांसाठी एन्सायक्लोपिडिया आहे. ही सगळी पुस्तकं वाचली, त्यामुळेच कदाचित माझ्या मुलाला आधीच सगळं माहित असतं (त्याचं नाव सुद्धा अभिज्ञ आहे. )
एकंदरीत हा काळ आईचा आणि बाळाचा डायरेक्ट कनेक्टिव्हिटिचा काळ असतो. त्यात दुसरं कोणी मध्ये नसतं कोणाची लुड्बुड सुद्धा नसते. जरी नोकरी करत असलो तरी जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ पोटातल्या बाळाला द्यावा. त्याच्याशी गप्पा माराव्या. पुस्तकं वाचून दाखवावी. आपल्या भावना शेअर कराव्या राग आला कोणाशी भांडण झालां काही स्ट्रेस झाला तर ते बाळाला नंतर समजावून सांगावं. कारण आपण जे काही खातो, जो विचार करतो, जो आपल्या मनावर परिणाम होतो तो परिनाम आपल्या पोटातल्या बाळावर डायरेक्ट होत असतो...
*******************
कदाचित हे वेगळ्य धाग्यावर हलवायला हवं.
*****
सीमा
<<मुलं ठरवूदेत ना त्यांना काय हवं नको ते. ती सांगतात बरोबर. मुलांना जितक कळत तितक आपल्यालाही कळत नाही. काही मुलांना स्टिम्युलेशनची गरज असते. शिकण्याची तहान असते. शिकविल्यावर शिकत असतील, आनंदी असतील ठिक आहे ना.>> पूर्ण अनुमोदन. खरं तर आपल्याला मुलांबद्दल काही कळत नसतं त्यांना शी शू झाली आणि भूक लागली हे सोडलं तर. (काही पालकांना मुलांना भूक लागली की नाही हे पण कळत नाही, सारखे त्यांना खायला देतात आणी मग माझं मुल एका वेळी कसं दोनच घास खातं आणि मग त्याला सारखी सारखी कशी भूक लागते ह्याची तक्रार करत बसतात - हा एक वेगळा विषय होईल गप्पांचा)
लहान मुलांना घरी काय आणि कसं शिकवायचं हा एक नवा गप्पा विषय सुरु करूय का?
वल्लरीचच्या पोस्ट्स मला
वल्लरीचच्या पोस्ट्स मला आवडल्या.>>>> +१
वल्लरीच्या सगळ्याच पोस्ट्स
वल्लरीच्या सगळ्याच पोस्ट्स आवडाल्या
वाचनाच्या आवडीबद्दल. लेकीला ती काही महीन्यांची असल्यापासून मी पुस्तके आणत होते. अगदी रस्त्यावर मिळणारी १०-२० रुपयांची. हाताळताना ती पुस्तके फाटत पण निदान हाताळायची सवय लागली. थोडी मोठी (वाचता यायला लागल्यावर) झाल्यावर खासकरून सुट्टीत प्लॅस्टीक कोटेड पुस्तके आणली. आंघोळ करताना वाचायला. तिला ती कल्पनाच खूप आवडली.
सध्या तिच्या आवडीची पुस्तके म्हणजे अगाथा क्रिस्टी.
ती internet चा वापरही विकीपेडीया वाचण्यासाठी करते.
सि. केजी मधला माझा लेक
सि. केजी मधला माझा लेक (सव्वापाच वर्षे) अचानकगेल्या तीन दिवसापासून स्वतः स्वतः गोष्टीची पुस्तकं वाचायला लागलाय. इतकं छान वाटतं ना मुलं नव्याने वाचायला शिकतात तेव्हा मोठ्याने पुस्तक वाचतात आणि अडलेलाशब्द येऊन विचारतात.
****
काल ऑफिसच्या बसमधून घरी जाताना अनोळखी कलिग्जसोबत गप्पा मारल्या विषय हाच होता, प्लेग्रूप नर्सरीच्या मुलांचा अभ्यास. शाळा ट्री हाऊस, केम्ब्रिज (रायन) ईटरनॅशनल आणि अजून कुठली तरी.
नर्सरीच्या मुलांना वीकेण्ड्ला पाच ते सात पाने लिहायचा सराव..
शिवाय नर्सरीच्या मुलांना क्वार्टरली रायटिंगची एक्झाम आणि त्यापूर्वी प्रॅक्टिस एक्झाम सुद्धा. पंचवीस मार्काची ... आणि मग सगळ्या आई माझ्या मुलाला किती तुझ्या मुलीला किती मार्क्स ही चर्चा करणार.
प्लेग्रूपच्या मुलांना एफ ओ एक्स इज फॉक्स, सी ए टी इज कॅट हे वाचता आलेच पाहिजे, आई वडिलांनी घरी अभ्यास करून घ्यायचा.
अरे मग मुलांनी झोपायचं कधी, खेळायचं कधी, मोठ्यांकडून गोष्टी कधी ऐकून घ्यायच्या? त्यांच्या कामात लूड्बूड कधी करायची. नवनवीन गोष्टी अनुभवायच्या कधी? शिकायच्या कधी? बाहेर खेळायला फिरायला जायचं कधी? कसला सूड उगवत आहेत हे लोक या मुलांवर?
आणि बरेचसे आईवडिल (प्लेग्रूप नर्सरी ज्यु केजी च्या) अभ्यासाचं टेन्शन घेऊन मुलांना जीव नकोसा करतात. मुलांना ट्युशन क्लासेसला घालतात? शाळेच्या वेळेपलिकडे दिवसाचे तीन तास. खूप राग येतो अशा शाळांचा आणि अशा पालकांचा.
तिथे भाषा ग्रुप मध्ये फोनीक्स
तिथे भाषा ग्रुप मध्ये फोनीक्स च्या धाग्यावर विचारल होत पण उत्तर मिळाल नाहिये म्हणुन इथे परत विचारतेय.
मुलांना कितव्या वर्षापासुन फोनीक्स शिकवता येइल?
तनु, ५ व्या वर्षापासून अभ्यास
तनु,
५ व्या वर्षापासून अभ्यास म्हणून शिकवता येईल. त्या आधी साधारण २ वर्षापासून गोष्टी, गाणी या रुपात कानावर साउंड पडत राहीले तर खूप सोपे जाते. जसे की प्रत्येक अक्षराने सुरु होणारे शब्द आणि चित्रं, लॉन्ग आणि शॉर्ट वॉवेल मुळे होणारे नाद, राईम करणारे साउंड वगैरे. जेवढे हसत खेळत उच्चार अणि नाद मुलांच्या कानावर पडतील तेवढे चांगले. एकदा का पॅटर्न्स डोक्यात बसले की मग अभ्यास म्हणून सुरुवात होते तेव्हा सोपे जाते. माझ्या मुलाला कधी स्पेलिंग्ज पाठ करावी लागली नाहीत. सॅक्सन फोनिक्स मधे केजी आणि पहिलीसाठी कोडींग असायचे. त्यालाही काही प्रॉब्लेम आला नाही.
आज हैराण मोडमध्ये आहे, लोअर
आज हैराण मोडमध्ये आहे, लोअर केजी च्या अभ्यासाचे शेपुट उरले हत्ती घालवलेला आहे, पण शेपुट करायला कन्या भयंकर वैतागली आहे. चार पाने आकडे गिरवणे, दोन कर्सिव्ह अक्षरे पाच पाच ओळी, दहा बिफोर नंबर, एक पान म्हणजे बारां ओळी पॅटर्न गिरवा, ६ शब्द स्पेलिंग शिका, फोनिक शब्दांची दोन पाने शिका इतका पूर्ण दहा दिवसाच्या सुट्टीचा होमवर्क होता.म्हणजे तसा अगदी खूप जास्त नाही.बाकी सर्व पूर्ण झाले आणि फक्त तीन आकडे राहिले त्यासाठी विविध मुद्दे सांगून वाटाघाटी चालू आहेत.काम तुझं आहे, उपयोगाचं आहे, त्यासाठी तुला जादा बक्षीस,साबणाचे फुगे, चॉकलेट मिळणार नाही हे स्पष्ट करूँ झालं.
सध्या 'मला होमवर्क आवडत नाही, शाळेत नकोच जाउया, तू सर्व घरीच शिकव ई. भाषा चालू झाली.एक दणकेबाज धपाटा घालण्याचा मोह अजून आवरलेला आहे.
पाउण तास या बौद्धिक वाटाघाटी करुन आता फक्त एक नम्बराच्या पाच ओळी राहणे यावर आले आहे.
पहिलीच्या गृहपाठाच्या कल्पनेने ज़रा पोटात फुलपाखरे उड़त आहेत.पॅटर्न बुक आणि कार्सिव्ह नव्हते तेव्हा एकदम आदर्श आई बाप आणि मुलांप्रमाणे आम्ही हसत खेळत आवडीने होमवर्क पूर्ण करत होतो,सध्या कार्सिव्ह आणि एकंदर वाढीव प्रमाण यामुळे मोटिव्हेशं गंडले आहे.
(No subject)
Homework kela nahi tar
Homework kela nahi tar binasta ka? Mulila concept kalala asel tar hw sathi tras deu naka. concept kalala nasel tar patientally to samajavayla tya hw cha upyog hoil.
My kid is in 4th STD. The school give gweightage to doing hw on time. He still sometimes don't want to do its ok. It's not our study and they are doing as much as they can. Eventually they learn their responsibility.
राजसी, तुम्ही म्हणताय ते अगदी
राजसी, तुम्ही म्हणताय ते अगदी खरे आहे.
मलाही कधी कधी उगाच आटापिटा करून मुलांकडून होमवर्क करून घेणं आवडत नाही.
पण शाळेत समजण्यापेक्षा कम्प्लिशन्सवर भर असतो.
म्हणजे माझ्या मुलाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत असतील तरी त्याने ती लिहून आणली नाही तर शिक्षा होणे, त्याला भर वर्गात ह्यूमिलिएट करणे, मुख्याध्यापकांच्या रूममध्ये नेवून कान उघाडणी करणे असले प्रकार करतात.
त्यामुळे किमान वर्गात त्याचे मॉरल्स रहावेत म्हणून त्याचा सगळा होमवर्क पूर्ण झालाय की नाही बघणे हे एक कामच होऊन बसते.

कधी कधी तो होमवर्क लिहून आणायचाही कंटाळा करतो. त्यामुळे नेहमीपेक्षा कमी होमवर्क डायरीत दिसला की मी त्याच्या मैत्रिणीच्या आईला फोन करून होमवर्क लिहून घेते.
मुलगी नर्सरीत आहे. तिला सगळा मिळून दोन ते तीन पानं लिखाण असतं.
पण ती शाळेतून आली की जेवल्यावर लगेच तो करून टाकते.
कधी एकदा होमवर्क पूर्ण करतोय असं झालेलं असतं तिला.
ती एक गंमतच.
मुलगी सिनियर के जी त
मुलगी सिनियर के जी त आहे.
साधी इंग्लिश मेडियम आहे... अभ्यास असतो , पण तिला झेपेल इतका असतो.
चार पाने आकडे गिरवणे, दोन
चार पाने आकडे गिरवणे, दोन कर्सिव्ह अक्षरे पाच पाच ओळी, दहा बिफोर नंबर, एक पान म्हणजे बारां ओळी पॅटर्न गिरवा, ६ शब्द स्पेलिंग शिका, फोनिक शब्दांची दोन पाने >>> एवढा अभ्यास ???
माझ्या ज्यु. के. जीतल्या लेकीला का ही ही होमवर्क नव्हते आणि घरी अभ्यास कर सांगितले तर तिने - शाळेला सुट्टी आहे तर अभ्यास करणार नाही असे डिक्लेयर करुन टाकले.
एरवी पण एका पानापेक्षा जास्त होमवर्क नसतो - कधीतरी एकावेळी २ आकडे देतात काढायला.
पोरगी खरचं शाळा सोडुन देइल एवढा अभ्यास दिला तर
होमवर्क बद्दल शाळा कडक नाही,
होमवर्क बद्दल शाळा कडक नाही, पण आठवड्यातून दोन दा असतो आणि पॅटर्न बुक आणि कर्सिव्ह चा सगळ्याच लहान मुलांना विशेष कंटाळा आहे. नंबर चे होमवर्क, बिफोर आफ्टर नंबर, जोड्या लावा इ. आवडीने केले जातात.
मुलांपेक्षा आईबापच त्या वाढीव होमवर्क भितीत असतात.शुक्रवारी शाळेला बुट्टी मारण्याची वेळ आल्यास आम्ही टाळतो कारण मंगळ वारी 'हॉलीडे होमवर्क'२-३ पान आणि मंगळ वारचा होमवर्क १ पान करावा लागतो.
होमवर्क केला नाही तर ओरडा बसत नाही, पण २ दिवसांनी नंतर चा आणि आधीचा साठलेला असा दुप्पट लोड पूर्ण करावा लागतो.
बाकी कंसेप्ट समजण्यात काही अडचण नाही, शिक्षक पण चांगले आहेत.
दहा दिवसाचा हॉलीडे होमवर्क
दहा दिवसाचा हॉलीडे होमवर्क म्हणून इतका अभ्यास शब्दाली, एरवी शुक्रवारी २ पान, आणि मंगळवारी १ पान.
पण हे लेखन ज्यु. च्या मानाने
पण हे लेखन ज्यु. च्या मानाने जास्त वाटत नाही का ?
माझ्या मुलीला एकावेळी दोन नंबर्स किंवा दोन लेटर्स लिहायला दिली तरी एका पानावर फक्त १२ बॉक्स असतात, म्हणजे जास्तीत जास्त २४ वेळा लिहीणे होते.
ओके आले लक्षात
ओके
आले लक्षात
आमच्याकडे अजून सिनियर केजीला
आमच्याकडे अजून सिनियर केजीला पण एवढा होमवर्क कधी आलेला नाही..
मुलगी आधी एका शाळेत होती,
मुलगी आधी एका शाळेत होती, त्यात नर्सरीलाच कर्सिव्ह चा होमवर्क यायचा आठवड्याला एकदा.(शाळा 'मोठ्या शाळांच्या सिलॅबसला मुलं कॉम्पॅटिबल बनवण्यासाठी' हे सर्व करायची म्हणे.)त्यावेळी मुलं सगळीच लहान असल्याने त्या होमवर्क ला केल्यावर आई आणि मूल दोघांना ग्लास भर बोर्नव्हिटा पिण्या इतका मानसिक थकवा यायचा.मग दुसरी प्रसिद्ध शाळा घेतल्यावर पहिलीला सहा महिन्याची अडचण येत होती म्हणून त्यांनी नर्सरी रिपीट करण्याचा प्रेमळ सल्ला दिला. त्या शाळेत नर्सरीला होमवर्क नव्ह्ता. पण आता ज्यु. ला आठवड्यातून दोनदा आहे. तसा फार काही नसतो पंधरा वीस मिनीटात नीट बसून केला तर. पण या 'नीट बसून' च्या पायरीला यायला पाऊण तास लागतो.
Pages