स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारास कारणीभूत काही कारणे नाकारण्याचा अट्टाहास

Submitted by Rajesh Kulkarni on 25 December, 2015 - 13:20

स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारास कारणीभूत काही कारणे नाकारण्याचा अट्टाहास
.

जेथे स्त्रीच्या शरीराची आदर्श मोजमापे जाहीरपणे उगाळली जातात, आदर्श (ideal) सुंदर स्त्रीच्या जवळजवळ प्रत्येक अवयवाचे उदा. बारीक कंबर, सुरईदार मान, गोलाकार मनगटे, लांबसडक बोटे, सुडौल जांघे, थोडेसे पुढे वाकलेले खांदे असे वर्णन ठरवले जाते. शयनेषु रंभा, अमुक अमुकेषु दासी अशा तिच्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात.

मात्र यासाठी फक्त पुरुषच जबाबदार आहेत का याचाही विचार केला पाहिजे.

अनेक जाहीर समारंभांमध्ये बापे थ्रीपिस सूट मध्ये दिसतात व तथाकथित सेलिब्रिटी स्त्रिया उतु जाईल एवढे अंगप्रदर्शन करण्यात आघाडीवर असतात. एवढेच नव्हे तर अनेक आधुनिक आया वस्त्रप्रावरणाच्या बाबतीत आपल्या मुलींशी स्पर्धा करताना दिसत असतात. स्त्रियांवर होणा-या अत्याचारांच्या बाबतीत कमीत कमी वस्त्रे परिधान करणे हेच जरी एकमेव कारण नसले, तरी त्यातून निर्माण होणारी अनिर्बंधतेची संस्कृती जबाबदार असते हे नजरेआड करून चालणार नाही. मुले बहकली आहेत असे आपण म्हणतो, तसे मुलींचेही आदर्श भ्रष्ट झालेले आहेत हे वास्तव का नाकारावे?

काळानुरूप स्त्रियांचा पेहराव बदलत गेला असे सांगितले जाते. तो जाणारच. विविध संस्कृतींचा एकमेकांवर परिणाम होणारच. पण इतिहासाकडे पाहून आजचे निष्कर्ष काढणे योग्य नाही. आपण कितीतरी गोष्टी इतिहासाच्या विरूद्ध करतो. याच बाबतीत कोणी काही करू शकत नाही असे म्हणत पळवाट काढू नये. कारण कधी नव्हे ते जग इतके जवळ आले आहे. दोष कपडे घालणा-याचा नव्हे तर पाहणा-याचा असतो, किंवा बलात्कार करणा-यांमध्ये अनेक बलात्कार ओळखीच्या व्यक्तीकडून होतात किंवा अंगभर कपडे घालणा-या स्त्रियांवरही बलात्कार होतात ही बराच काळ वापरलेली टेप आता निरर्थक झाली आहे.

वरील युक्तीवादाला मला आठवते त्याप्रमाणे माझ्या एका पोस्टवरील कमेंटमधून स्त्रीवर्गातीलच कोणीतरी सडेतोड उत्तर दिले होते. ती कमेंट अशी की तोकडे वा कामुक वस्त्रपरिधान करणा-या स्त्रीवरच बलात्कार होईल असे समजण्याचे कारण नाही. अशा स्त्रीच्या अशा देहाकडे पाहणा-या व्यक्तीच्या वासनेची बळी कोणी वेगळीच परिचयातील, जवळची, अनोळखी अशी कोणतीही मुलगी/स्त्री व केव्हाही होऊ शकते. तेव्हा सनी लियोनेसारख्या व्यक्तींना केवळ त्याच उद्देशाने लोकांसमोर आणण्यामुळे लोक चेकाळण्याची व त्यामुळे स्त्रियावरील अत्याचारांमध्ये वाढ होण्याचीच शक्यता असते. निव्वळ देहप्रदर्शनाने आपल्यासमोर वर्षानुवर्षे तग धरणा-या व जितके पैसे अधिक तेवढे अधिक कपडे कमी करणा-या सिनेनट्यांकडूनही वेगळे काही घडत नसते हे लक्षात घ्यायला हवे. एरवी चित्रपटातील दृश्याची मागणी असते असा लटका युक्तिवाद करणा-या अशा 'अभिनेत्री' (?) एरवी विविध मासिकांना व वर्तमानपत्रांमध्ये छापु देण्यासाठी उत्तान-कमी कपड्यांमधील छायाचित्रे का घेऊ देतात? हा एक प्रकारचा शरीरविक्रयाचा प्रकार नाही का? मग अशा व्यक्तींविरूद्ध कोणी ओरड केली की त्यांना संस्कृतीरक्षक म्हणून हिणवायचे. खरे तर अशा स्त्रियांच्या पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी त्या असे वागतात व त्याला ब-याचदा बळी पडतात समाजातल्या सामान्य मुली-स्त्रिया. पूर्वीपासूनच ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, पण आता त्यांचा इतका मारा होत आहे की मुला-मुलींचे लहानपण फारच मर्यादित झालेले आहे हे मी आधीही मांडले होते. परंतु आपण या गोष्टी इतक्या गृहित धरल्या आहेत की त्यामुळे हा धोका किती प्रमाणात वाढला आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. उलट वर म्हटल्याप्रमाणे अनिर्बंधतेचा पुरस्कार व आग्रह धरणारेच पुढे आहेत. आनि मग सोयीप्रमाणे व सवडीप्रमाणे मुलांचे बालपण हरवत चालले आहे हे आपणच म्हणायचे.

स्त्रीशरीराचे नको तेवढे प्रदर्शन या विषयावर स्त्रियांची मोठी चळवळ का उभी रहात नाही? आजकाल टीव्हीवरच्या जाहिरातीत ज्यापद्धतीने स्त्रियांचा वापर केला जातो त्यावर निव्वळ चवीपुरते बोलायचे. कृती मात्र काही करायची नाही. काही आठवड्यांपूर्वी सॅनिटरी नॅपकीन जेथे बसवतात तेथे पिसासारखी वस्तु जाऊन बसते असे दाखवणारी एक 'कल्पक' जाहिरात दाखवली गेली तेही चालवून घेतले गेले. काही दिवसात वास्तवतेच्या आग्रहापोटी निळ्याचे लाल झाले तरी आश्चर्य वाटायला नको. हे थोडे विषयांतर झाले असे वाटले, तरी जागरूक स्त्रियांची या समाजात फार कमतरता आहे हे वास्तव विसरायला नको.

मोबाईल फोनच्या कंपन्या सनि लियोने, शेर्लिन चोप्रा यांच्यासारख्याचे फोटो त्यांच्या ग्राहकांना ऑफर करतात, तेव्हा हे फोटो कोणाच्या म्हणजे कोणत्या वयोगटातल्या मुलांच्या हातात पडत असतील याबद्दल कोणाला काळजी वाटते का? परफ्युम स्प्रेसारख्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये एका पुरूषाच्या मागे अनेक तरूणी बेभान होऊन जात आहेत अशा दृश्यांमधून कोणत्यामानसिकतेला खतपाणी घातले जाते या व अशा गोष्टींबाबत कोणी आवाज उठवलेला पाहण्यात आलेले आहे का? अशी

एकीकडे ही वस्तुस्थिती तर दुसरीकडे भगवी वस्त्रे लेयलेल्यांच्या समाजशुचितेच्या व योनीशुचितेच्या भलत्याच टोकाच्या कल्पना. अर्थात त्या मात्र सर्वांनीच हाणून पाडायच्या हे नेहमीचे ठरलेले.

स्त्रीच स्त्रीची वैरीण असे म्हणण्यापेक्षा आजच्या जगात स्त्रीही स्त्रीची वैरीण आहे असे म्हटले तर वावगे वाटायला नको.

मला सांगा, उत्तानतेचे जाहिर प्रदर्शन करणे हा कायद्याने गुन्हा आहे, तरी याबाबातचा शेवटचा गुन्हा केव्हा नोंदवला गेला व त्याबद्दल कोणाला शेवटची शिक्षा झाली?

स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचार करणार्यांच्या मानसिकतेचे समर्थन करण्याचा येथे अजिबात हेतु नाही. पण समाजात जे चालले आहे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, या समस्येच्या मुळाशी जी कारणे आहेत त्यांच्यापर्यंत न पोहोचता असे अत्याचार हा जो अंतिम परिणाम दिसतो आहे व वरचेवर दिसतो आहे आहे, त्याविरूद्ध दिशाहीन आरडाओरडा करण्यात समाधान मानणार आहोत का हे आपणच ठरवायचे आहे.

परवा महिला आयोगाच्या अध्यक्षा निर्भया ज्योती सिंगच्या अल्पवयीन गुन्हेगाराला थोड्याशा शिक्षेनंतर सोडून देण्याबद्दल तावातावाने बोलत होत्या. कोणते व कसे कपडे घालावेत हे ठरवणे हा स्त्रिचाच हक्क आहे असे म्हणत आयोगाच्या त्यांच्या आधीच्या अध्यक्षाच पेहरावाबाबतच्या अशा अनिर्बंधतेचे समर्थन करत होत्या, याची नवीन अध्यक्षांना कल्पना आहे काय? तेव्हा वर मांडलेली दुसरी बाजुही त्यांच्यापर्यंत कधी पोहोचते, तिचे गांभिर्य त्यांच्या कधी लक्षात येते हे पाहू. त्यांच्याव्यतिरिक्त स्त्रियावरील अत्याचाराला जबाबदार असलेल्या अनेक कारणांपैकी काही अशा वर उल्लेख केलेल्या महत्त्वाच्या कारणांकडे कोण व केव्हा गंभीरपणे लक्ष देते का ते पाहू.

स्त्रीदेहाचे माध्यमांमधील ओंगळ व अनवश्यक दर्शन याविरूद्ध काही दमदार पावले उचलली गेली तरीदेखील या दिशेने काही योग्य होत आहे असे समजता येईल. मी वर म्हटले तसे लैंगिक अत्याचारांना आणखीही अनेक कारणे आहेत. मात्र येथे उहापोह केलेली कारणे मुळात त्यास जबाबदार नाहीच असे म्हणत हे वास्तव नाकारण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो, त्यामुळे कोणाचे कसे भले होणार आहे हा प्रश्न आहे.

++++++++++++++

काही वाचकांची माझ्या पोस्टवरून माझा अजेंडा, माझा हेतु याबद्दलच शंका उपस्थित करून उचकवण्याची खोड आहे. जे लिहिले आहे त्याबद्दल लिहिण्यापेक्षा लिहिणार्‍याबद्दल कमेंट करण्यातच हे नतद्रष्ट धन्यता मानतात.
येथे एखाद्याला ब्लॉक करण्याची सोय नसल्यामुळे अनेक टवाळखोरही त्यांचे येथे स्वागत नाही असे स्पष्टपणे सांगूनही निर्लज्जासारखे माझ्या पोस्टवर येऊन सातत्याने विषयांतर व टवाळक्या करत असतात. त्यामुळे मी येथे कोणत्याही कमेंटला काहीही प्रतिसाद देणार नाहीयाची नोंद घ्यावी. या कारणामुळे भल्या वाचकांनीही माझ्याकडून त्यांच्या कमेंटवर प्रतिसादाची अपेक्षा ठेवू नये. कारण येथे केली जात असलेल्या घाणीतून मला त्यांची सुसंबद्ध कमेंट शोधणे शक्य होत नाही. तरीही जे वाचक माझ्या पोस्ट वाचतात व विधायक व सुसंबद्ध प्रतिक्रिया देत आलेले आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यांना फकस्त प्रश्न पडतात, या एकाही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल बूड हलवण्याचेही कष्ट ते करत नसावेत.

दीमा, त्यांना फकस्त 'आपल्या' स्त्रियांवर अत्याचार होतो असं वाटतं. बुरखा घेतलेल्या स्त्रियांवर अत्याचार कधिच होत नाहि असे 'त्यांचे निरीक्षण' असावे. Proud

विधायक व सुसंबद्ध प्रतिक्रिया देत आलेले आहेत>> ते एकमेवच आहेत Wink

विठ्ठल, तुमचा कायमस्वरूपी मूर्खपणा बंद केलात आणि तुम्ही माझ्या पोस्टवर आला नाहीत तर खरोखर मेहरबानी होईल. तुमची मजल कुठपर्यंत आहे ते पुरेसे दाखवले आहे. घाण करू नका. वरचे निर्लज्ज हे संबोधन हे तुम्हाला उद्देशूनच अाहे असे खुशाल समजा.

दीड मायबोलीकर,
तुमची समज तेवढीच अाहे त्याला मी काही करू शकत नाही. आता व एकूनच तुमच्या कमेंट्सचे स्वरूप पाहता वरील निरोप आता तुम्हालादेखील. माझ्या पोस्टवर घाण करू नका.

उर्मिला मातोंडकर्,ममता कुलकर्णि,माधुरी नेने दिक्षित्,अश्विनी भावे,अजुन बर्‍याच मराठी नट्यांपासुन सुधाराची सुरवात करायला हवी असे छान-चान कपडे तथाकथित उच्चवर्णिय्,उच्चशिक्षिताच्यांच बाया-पोरी घालताना दिसतात त्यांचीच री... मध्यम वर्गिय गरिब ओढतात. खेड्या-पाड्यातल्या पोरी अजुनही अंगभर कपडे घालतात.
आणि त्यांच्यावर्च जास्त आत्याचार होतात उच्चवर्णिय्,उच्चशिक्षिताच्यांच बाया-पोरी नाही
एखाद्या ज्योती सिंग पांड्येला न्याय मिळतो तसा सगळ्यांना मिळत नाही.

<<एखाद्या ज्योती सिंग पांड्येला न्याय मिळतो तसा सगळ्यांना मिळत नाही.>>
----- न्याय ? ? कुठला न्याय मिळाला तिला ?

एक छान आयुष्य तिच्यासमोर होते, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले, दवाखन्यात हाल-हाल झाले....
आरोपी वर खटला दाखल झाला, त्याला अटक आणि शिक्षा झाली म्हणजे तिचा गेलेला जिव परत येणार आहे ?

अशा घटनात पिडीत व्यक्तीला न्याय मिळणे केवळ अशक्यच... हो अगदी तुरळक घटनात आरोपीला शिक्षा होतात पण पिडीताला न्याय मिळत नसतो.

अहो उदय मिडियात एवढी चर्चा झाली मेनबत्त्या घेऊन मोर्चे निघाले.
आरोपी पकडले गेले यालाच मी न्याय म्हणतिय ते तरी गरिबांच्या आया-बहिनीणा मिळते का?
मिडियात एका लयनिची बातमी पण नसते.

निव्वळ बातमी होणे, मिडिआत चर्चा, लाखो लोकान्नी मेणबत्ती लावणे याला न्याय म्हणता येणार नाही.... (अर्थात ते सर्वान्च्याच बाबत घडत नाही हे मान्य). १० % घटन्नान्ची नोन्द होते, आणि <१ % आरोपीन्ना शिक्षा होते म्हणुन मी काही तुरळक घटना असे वर म्हटले आहे. असो.

माझा मते आरोपीला कायद्याने कुठल्याही प्रकारची शिक्षा झाली तरी त्याने पिडित व्यक्तीला न्याय मिळत नाही... या व अशा घटनात तर नाहीच नाही.

आता बाफच्या विषयाला धरुन - स्त्रियान्चे कपडे या विषयावर येथे अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत... तोकड्या कपड्यान्चा आणि अत्याचाराचा सम्बन्ध मला मान्य नाही. मोठा प्रॉब्लेम असेल तर पुरुषान्च्या तसे समजण्याच्या मानसिकतेत आहे.

तुम्हाला आरसा दाखवला की समोरचा निर्लज्ज कां?? बाकी तुम्ही ओपन फोरम वर लिहिता आहात , तेव्हा प्रतिक्रिया येणारच. त्या नको असतील तर खुशाल आपला ब्लॉग काढा.

उदय,
तोकड्या कपड्यांमुले चालवली जाणारी मानसिकता व अत्याचार यातला संबंध नाकारता येऊ शकत नाही. अर्थात, प्रत्येकजण वेगवेगळ्या वातावरणात रहात असतो, त्यामुळे असे पाहणारा व तशी मानसिकता असलेला प्रत्येक पुरूष अत्याचार करेलच असे नाही.
वस्तुस्थिती नाकारण्याच्या मानसिकतेतूनच 'आम्ही काहीही घालू, तुमच्याच नजरेत खोट आहे' अशी टोकाची प्रतिक्रिया निर्माण होते.

विठ्ठल,
मुर्खाला हातातली काचही आरसा वाटते. तेव्हा तुमचा शहाणपणा तुमच्याजवळच ठेवा.
फोरम ओपन असल्याचाच गैरफायदा तुम्ही घेत आहात. तेव्हा वेगळा ब्लॉग काढला तर तेथे पोहोचायची तुमची लायकी नाही हे तुमच्या स्वत:च्या लक्षात आले हे बरे झाले.

वेगळा ब्लॉग काढला तर कोणी फिरकणारही नाही हे तुमच्या लक्षात आलं म्हणुन ईथे आलात होय?? आणि भाषा जरा जपुन वापरा. लायकी काढणे, निर्लज्ज संबोधणे यावरुन तुमचीच जडणघडण दिसुन येतेय.

अ‍ॅडमिन महोदय, या आयडीच्या भाषेकडे लक्ष द्यावे ही विनंती

उत्तान कपडे हे कारण खूप लोकांना द्यायला आवडते कारण ते दिले कि अत्याचाराचा दोष बाईकडे जातो, पुरुष अत्याचार करूनही नामानिराळा.

मुळात सगळा दोष आपल्या मानसिकतेचा आहे हे कधी लक्षात येणार? कित्येक देशातल्या समुद्रकिनारी अंगावर टीचभर कपडे घालून बायका फिरतात, तिथले पुरुष ती नाही मिळत तर दुसर्या मिळेल त्या अबलेला धरून अत्याचार करतात का? मग फक्त भारतीय संस्कारी पुरुषांनाच कोणी कमी कपड्यातली सुंदरी पाहिली कि समोर दिसेल ती बाई, मग ती ६ महिने ते ८० वर्षे या कुठल्याही वयोगतातली असो, धरावीशी वाटते, याचा दोष त्या नाराधमाच्या संस्कारांवर जात नाही?

कपड्यांचे लॉजिक एकदा सुरु केले कि मग ते बुरख्यापर्यंतही नेऊन पोहोचवले तरी म्हणून स्त्री सुरक्षित राहील याची काही खात्री नाही. कारण मुळात जो अत्याचार करणारा आहे त्याला गेली हजार शतके 'तुझा जन्म बाईला दाबून ठेवण्यासाठीच झालाय' याची दीक्षा दिली गेलीय. त्याचे हे शिक्षण आता बदला.

भारतातील स्त्रियांना हवे ते कपडे घालायचे स्वातंत्र्य आहे आणि ते तसेच राहू द्या. तिला कपडयांखाली दाबण्यापेक्षा पुरुषाला स्त्री सुद्धा त्याच्याइतकीच समाजाचा भाग आहे हे शिकवा.

माझी जडणघडण शोधायच्या फंदात पडू नका. आधी तुमची लायकी पहा.
माझ्या ब्लॉगवरच काय, येथेही कोणी फिरकले नाही तरी माझी हरकत नाही पण तुमच्यासारखे मूर्ख तरी नको एवढीच अपेक्षा आहे हे प्रथमपासून सांगत आलो आहे. पण तुमच्यासारख्या निर्लज्जांना कशानेच फरक पडत नाही हे दिसत आहे.
ओपन फोरम असो वा कुठला, मी तुमच्या पोस्टवर फिरकत नाही, तुम्ही माझ्या पोस्टवर येऊ नये असे सांगतो आहे, एवढी सभ्यपणाची साधी अपेक्षा आहे. माझे तुमच्यावाचून काही अडत नाही, तुमचेही माझ्यावाचून काही अडायला नको. तेवढेदेखील तुमच्या लक्षात येत नाही आणि ओपन फोरमचा व वेगळ्या ब्लॉगचा शहाणपणा मला सांगायला मात्र तयार. अाता तरी कळले का? मी मला मिळालेल्या स्पेसमध्ये लिहितो आहे. पण दुसर्‍याच्या पोस्टवर जाउन हगण्या-मुतण्याचा तुम्हाला अधिकार आहे अशी तुम्ही समजुत करून घेतली आहे ती काही माझी चूक नाही.
You are not welcome on my posts एवढे सांगितलेले सभ्य माणसाला कळते. माझ्या पोस्टवर न येण्याची मेहेरबानी करा असे सरळ सांगितलेले कळत नाही. तुमचा हे न समजण्याचाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे लिहावे लागत आहे. आता तरी कळेल अशी अपेक्षा.

साधना,
कारणे अनेक आहेत. पुरूषांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे हेही बरोबर आहे. पण येथे उल्लेख केलेले मुद्दे नाहीतच असा समज झाला तरच मग महिला आयोगाच्या आधीच्या अध्यक्षा म्हणत तसे महिलांना हवे ते कपडे घालण्याचा अधिकारच आहे असे म्हणण्यावर भर दिला जातो.
तुम्ही परदेशातले उदाहरण दिलेत, तेथे हे प्रकार होत नाही अशी स्वत:ची समजुत का करून घेत आहात?
तुम्ही उल्लेख केलेले स्वातंत्र्य आहेच. पण स्वातंत्र्याबरोबरच काय येते किंवा अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे काय होते हे सांगायची आवश्यकता नाही असे वाटते.
वर पोस्टमध्ये एका स्त्रीवाचकाचीच प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. काही फोरमवर पुरूषांनीही तसे पाहिल्यावर काय वाटते याची कबुली दिलेली दिसते. तेव्हा याबाबतीत विचार न करता आमचा हक्क, आमचे स्वातंत्र्य एवढेच म्हणत राहिले तर आपणच आपली फसवणूक करून घेतो असे होते.

राकु तुमचे कुठलेही लिखान मला लय म्हणजे लय आवडते :स्मित:, तेंव्हा तुमच्या विरुध्द काहीही लिहिणार्‍या येर्‍यागबांळ्याकडे अजिबात लक्ष न देता Wink आपले निर्भिड लिखाणाचे कार्य असेच जोमाने सुरु ठेवा. जेणेकरुन येणार्‍या कित्तेक पिढ्या तुमच्या उत्कृष्ठ लिखाणाचा आस्वाद आतंरजाल वर घेऊ शकतील.

अॅडमिन,
माझ्या पोस्टमधली माझी मते सर्वांनाच पटावी असा माझा अजिबात आग्रह नाही. ते होऊही शकत नाही. मात्र त्यावरचा प्रतिवाद माझ्याबद्दलची कोणतीही वैयक्तिक स्वरूपाची कमेंट न करता व सभ्य भाषेत असावी एवढी माझी अपेक्षा आहे. येथे अनेकजण ती मर्यादा ओलांडत आहेत. आणि तशा स्वरूपाच्या कमेंट्स करतच आहेत.मी ही एक प्रकारची माझी harassment समजतो.
येथे आपल्या पोस्टवर कोणी यायला नको असेल तर त्याला ब्लॉक करण्याची सोय नाही. त्यामुळे हे वाद होतात. हा वाद टाळण्यासाठी मला माझ्या पोस्टवर ज्यांची उपस्थिती नको आहे त्यांनी येथे फिरकू नये आणि ज्यांना त्यांच्या पोस्टवर मी यायला नको आहे तेथे मी जाऊ नये एवढा साधा नियम सर्वांनी पाळायला हवा आहे. तो पाळला जात नाही असे स्पष्ट दिसते आहे.
तरी याबाबत सर्वांना योग्य ती समज द्यावी ही अपेक्षा. मी यापूर्वीही आपल्याला याबाबत विनंती केलेली आहे.
कोणी विषयाला सोडून व पोस्टऐवजी माझ्यावर वा माझ्या हेतुवर कमेंट केली व ते तसे करत राहिले तर मात्र मी ती चालवून घेऊ शकत नाही.
माझ्या अनेक पोस्टवर या लोकांनी चालवलेला उच्छाद तुम्ही पाहून खात्री करून घेऊ शकता. या पो्स्टवरच काही जणांनी विषयाला धरून केलेली चर्चा तुम्ही पाहू शकाल आणि विषयाला धरून नसलेलीही.
धन्यवाद.

गारुडी,
तुम्ही जो प्रतिसाद हायलाईट केला त्यात नवीन असे का दिसतेय? म्हणजे याचा अर्थ तुम्ही तो पहिल्यांदाच वाचलात असे होते. जर स्क्रीनशोट आता घेतला असेल तर म्हणजे कसे समजले तुम्हाला की या नवीन मध्ये प्रसाद यांचा असा एक प्रतिसाद आहे Wink

बाकी पकडापकडी मस्त. Happy
पण धागा निव़ळला तर विषयावर लिहयाला आवडेल.

@गारुडी,
राकुंच्या माहितीपुर्ण आणि अभ्यासपूर्ण लेखांबद्दल तसा आधी माझा दृष्टीकोन/समज होता पण तो दृष्टीकोन/समज आता पुर्णपणे बदलला आहे. Wink

http://www.sherv.net/cm/emoticons/object/pen-2-smiley-emoticon-emoji.gif

In this blog the writer seems to put all the blame on women for violence against them and on not the perpetrators of that violence. Such violence occurs because generally men have not been taught to respect women usually because they have been raised giving preference by parents. Therefore they are not able to take no for an answer. In a civilised society the word no should mean no and not yes or may be.

I also feel that everyone including the writer of the blog commenting here should watch what they write. Calling names such as idiot is not done in a discussion no matter how much irritating the comment and commentator are. Just because someone writes here others should not think that the writer is or is not intelligent. I write here occassionally but no one know who I am what my educational level is. I hope everyone pays attention to my request and suggestion Thank you.

भक्त असावेत तर असे. आपल्या दैवतासारखेच थोड्या थोड्या काळाने उलटसुलट मते व्यक्त करणारे.
काय बरं म्हणतात त्याला?

आठवलं. U turn Wink

स्वत:त बदल करत जाणे ही काळाची गरज असते, आणि जे बदल करत नाहीत त्यांची अवस्था आजच्या घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी कॉंग्रेज सारखी होते. Proud त्यांच्या प्रमुख नेत्यांना आज न्यायालयातून जामीन घेऊन फिरावे लागते. Proud

Pages