हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा

Submitted by Rajesh Kulkarni on 23 December, 2015 - 14:37

हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा
.

दररोजच्या आयुष्यात हिंदूचे मुस्लिमांबद्दल कोणते आक्षेप असतात? यावर होत असलेल्या चर्चेत वारंवार कोणते मुद्दे आलेले दिसतात? याबाबतीतल्या माझ्या निरिक्षणावरून वारंवार पुढे येणारे पुढील मुद्दे वाटतात.

१) मुस्लिमांनी घराबाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवावा. स्कल कॅप टाळावी. दाढी वाढवू नये. वाढवलीच तर ती धार्मिक पद्धतीची नसावी.

२) मुस्लिमांनी आवर्जून स्थानिक भाषेमध्ये बोलावे. त्या भाषेत पारंगत व्हावे. हिंदीसदृश्य भाषेत बोलून आपले ‘वेगळेपण’ दाखवू नये.

३) मुस्लिम स्त्रियांनी बुरखा वापरू नये.

४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे.

आणखी कोणते मुद्दे चर्चेत असतात असे वाटते?

वरीलप्रमाणे वागणारे मुस्लिम चांगले नसतात असे मला अजिबात म्हणायचे नाही. मुस्लिमांनी देशाच्या मुख्य धारेत सहभागी होण्यासाठी काय करावे वगैरे जड भाषा मी वापरत नाही. माझ्यासाठी येथे राहणारे सगळेच भारतीय आहेत. कोणाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, आम्ही आम्हाला हवे तसेच वागणार, किंबहुना कोणाला आमच्याकडून काही अपेक्षा बाळगण्याचा अधिकार दिलाच कोणी, असेही काहींचे मत असू शकेल याचीही मला कल्पना आहे.

आता मुस्लिमांच्या नजरेतून हिंदूंबद्दल अपेक्षा कोणत्या असतील असे वाटते? अर्थात वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांच्या धर्तीवरच हिंदूंबद्दलही अनेक गोष्टी सांगता येतील.

+++++++++++++++

काही दळभद्री लोकांना या पोस्टमध्ये काही भलताच अजेंडा दिसला आहे. एकाचे उदाहरण खाली दिलेच आहे. नसलेले अजेंडे दिसणार्‍या अशा दिव्यदृष्टीच्या अशा लोकांनी येथे फिरकले नाही तरी चालेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूलभूत हक्कांवर घाला घालणाऱ्या या पोस्टचा निषेध. कुणी काय करावे, न करावे याचं पुलिसिंग करणे अत्यंत चीड आणणारी आणि हीन गोष्ट आहे.

मुद्दाम धर्माधर्मात तेढ निर्माण करणारे मुद्दे उकरून काढून त्यावर बीबी तयार करायचा कुलकर्णी यांचा अजेंडा आहे. हिंदुना काय वाटतं मग मुस्लिमांना काय वाटतं असले प्रोव्होकेटिंग प्रश्न मुद्दाम विचारायचे. अत्यंत विकृत प्रकार आहे हा.

admin यांना विनंती, यांचे सदस्यत्व स्थगित करण्यात यावे.

हे मुद्दे वेगळ्या प्रकारे मांडता आले असते. असो.
धाग्याला आज ना उद्या टाळे पडणार हे नक्की.

आता मुस्लिमांच्या नजरेतून हिंदूंबद्दल अपेक्षा कोणत्या असतील असे वाटते?
>>> असे धागे काढु नयेत. तुम्ही उल्लेख केलेल्या अपेक्षा ठेवु नयेत.

admin यांना विनंती, यांचे सदस्यत्व स्थगित करण्यात यावे.>>>>
विचार-स्वातंत्र्यावर गदा येणार असं दिसतय. Happy

मला नाही वाटत हा धागा तेढ वाढवणारा आहे. किंबहुना आपण सर्वांनी एकमेकांच्या अपेक्षा पुर्ण केल्या तर किती शांतता नांदेल या देशात कोणी विचार केला आहे का..

सर्वात बेस्ट आयडीया म्हणजे सर्व धर्म बरखास्त करत सरकारमान्य एकच भारतीय धर्म बनवावा. सरकारी पारंपारीक पोशाख, सरकारी प्रार्थनास्थळे, राष्ट्रीय सण आणि त्याच्या प्रथा कायदे कानून नुसार सर्वांना समान लागू आणि बंधनकारक करावे. कोणीही कोणत्याही देवाची पूजा न करता भारतमातेचीच पूजा करावी. ना कोणाचा काही धर्म राहणार ना कोणाची काही जात राहणार. विविधतेतून एकता शोधण्याऐवजी ती एकरूपतेतूनच मिळवावी Happy

वरीलप्रमाणे वागणारे मुस्लिम चांगले नसतात असे मला अजिबात म्हणायचे नाही.

Proud

हे जर खरे आहे तर या धाग्याला अर्थच उरत नाही.

आज दत्तजयंती व पैगंबर जन्मदिन आहे. शुभेच्छा

>>>admin यांना विनंती, यांचे सदस्यत्व स्थगित करण्यात यावे.<<<

अमितव ह्यांचे म्हणणे समजू शकतोच, पण......

पगारेंबद्दल हेच म्हणत होतो तेव्हा पगारेंना वैचारीक इंधन पुरवणारे टोळके राकुंचा धागा आला की धाग्यावर किंवा स्वयंघोषित स्वतःच्या पानावर नर्तन करताना दिसते ह्याची मज्जा येत आहे. काही आय डी तर 'आम्ही राकुंचा अनुल्लेख करतो' हेही बढाई मारल्यासारखे सांगतात ह्यातच राकुंच्या लेखणीचा दरारा आढळतो. Wink

अमितव,
तुमची नसलेली अक्कल तुमच्याजवळच ठेवून येथे पाजळली नाही तर बरे होईल. काय लिहिले आहे हे वाचण्याइतकीही तुमची समज नाही, तेव्हा ते समजण्याची अपेक्षा दूरच.
यात तेढ निर्माण करण्याचा अजेंडा तुम्हाला दिसला. तुमचे डोके एकदा तपासून घ्या आनि ताबडतोब इलाज सुरू करा. कारण नसलेले दिसणे हा फार गंभीर आजार आहे.

किती गलिच्छ भाषा वापरता कुलकर्णी तुम्ही!!! मुद्याचं सांगण्यासारख नाही राहिलं का काही?
परत एक प्रयत्न
१. टोपी, दाढी कोणी काय वापरावं हे सांगणे
२. कुठल्या भाषेत बोलावयास सांगणे
३. कपडे कोणते घाला हे सांगणे
४. कोणत्या शाळेत जा हे सांगणे, यापैकी कोणत्याही गोष्टीवर बंधन घालणे, तसे सुचवणे किंवा अपेक्षा बाळगणे हे मुलभूत हक्कांच्या विरोधी आहे.
शेवटी परत आता हिंदूबद्दलच्या अपेक्षा सांगा म्हणणे, म्हणजे दोन वेगळे गट करा आणि जाहीर उखाळ्या पाखाळ्या काढा. कशासाठी? माईंड ओन बिझनेस. दुसरा नियम मोडत नाही तर त्याने काय करायचे हे सांगायची पंचाईत कोणीही करू नये.
बाकी पर्सनल स्टफ इग्नोर.

अमितव यांना अनुमोदन. मुळात भारतीय घटनेने सर्वच नागरीकांना हवा तो पेहराव करण्याचे, हवे त्या शाळेत जाण्याचे, हव्या त्या भाषेत बोलण्याचे स्वातंत्र्य दिले असताना 'त्यांनी' काय करावे याची उठाठेव करणारा हा कोण कुलकर्णी? पैगंबर त्यांना सुबुद्धी देवो ही प्रार्थना श्री दत्तगुरुंच्या चरणी, आमेन!

१. मुस्लिमांनी त्यांचा धर्म जरूर सांभाळावा परंतु तो भारत मातेशी निष्ठावान राहून. थोडक्यात पाकडे match जिंकल्यावर त्यांनी फटाके वाजवू नयेत.
२. मुस्लिमांनी कमी मुलांना जन्म द्यावा. ज्यांना जन्माला घातलेय त्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडावी.

अमितव,
नसलेल्या गोष्टी शोधून काढण्याचा तुमचा अजेंडा दिसूनही गप्प राहता येत नाही. अाता जे लिहिलेत तेच अजेंडा वगैरे शब्द न वापरता लिहू शकला असता तुम्ही.
मी जे लिहिले आहे ते केवळ माझ्या मनचे नाही. ती मुस्लिमांबद्दल कोणतीही घाणेरडी भावना मनात न बाळगता सहज येणारी प्रतिक्रिया आहे. तुम्हाला याची काहीच कल्पना नसेल तर माझी काही हरकत नाही.
सार्वजनिक शाळा सोडून मदरशामंध्ये धार्मिक शिक्षण घेण्यात काही गैर नाही असे तुम्हाला वाटत नसेल तर तुम्हाला लखलाभ. तसेच अशा व स्थानिक भाषा सोडून आपली 'धार्मिक' भाषा बोलण्यामुळे आयलंड निर्माण होतात असेही तुम्हाला वाटत नसेल तर तेही तुम्हाला लखलाभ.
तेव्हा भलत्याच गोष्टींमध्ये मूलभूत अधिकार शोधण्याचा तुमचा प्रयत्न विचित्र आहे.
अनेक हिंदूंना मुस्लिमांबद्दल काय वाटते हे लिहिले आहे. त्याचप्रमाणे मुस्लिमांच्या द्ृष्टीकोनातून त्यांच्या हिंदूंबद्दल काय अपेक्षा आहेत असा साधा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यात तुम्हाला गटबाजी, एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याचा प्रकार दिसतो हा तुमचा प्रश्न. माझा नाही. मुस्लिमांनी स्वत: याबद्दल मोकळेपणाने सांगणे किंवा ज्या हिंदूंचे मुस्लिमांबद्दल अधिक interaction आहे, त्यांना याबाबतील काही feedback मिळत असेल तर तो शेअर होणे ही अपेक्षा आहे. अजेंडे शोधत बसण्याची नाही.
कमीत कमी इतक्या सवंगपणे अजेंडे शोधत बसणे, दुसर्‍याच्या हेतुबद्दलच शंका घेणे हे प्रकार तरी करू नका.

जे पगारेंच्या धाग्यांवर लिहायचो तेच येथेही लिहितो.

संयत भाषेत धागा आहे हे मान्य असले तरीही चर्चेला घेतलेले मुद्दे हे दोन समाजांमधील पारंपारीक वादाशी निगडीत असे मुद्दे आहेत. आपण ह्या दोन व सर्वच समाजांमधील तेढ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असलेला देश आहोत. असे मुद्दे अनियंत्रीतपणे (कोणताही शासकीय अंकुश चर्चेवर नसताना) जाहीरपणे अश्या व्यासपीठांवर चर्चेला घेणे हे घातक आहे. कुलकर्णी राग मानू नयेत, पण हा धागा तुम्ही स्वतःच प्रशासनाकडून बंद करवून घेतलेला बरा पडेल. नेहमीचे सक्रीय मायबोलीकर कितीही भांडत असले तरी मायबोलीच्या प्रेमाखातर येथील वादविवाद बाहेरच्या जगात घेऊन जात नाहीत. पण निष्क्रीय मायबोलीकर तसे करण्यास प्रवृत्त झाले तर अवघड होऊ शकेल.

ही माझी वैयक्तीक मते आहेत. बाकी मर्जी तुमची!

-'बेफिकीर'!

मी लिहितो ना राव,
अतिशय समदर्शी माणूस आहे बर्का मी Wink

१. मुस्लिमांकडे संशयित नजरेने पाहू नये.
२. केवळ मुस्लीम आहे म्हणून भेदभाव करू नये.
३. RSS सारखे संघटन करून आम्हाला घाबरवू नये.
४. universal acceptance हा हिंदू धर्माचा मूलाधार आहे. त्यामुळे आम्ही करू ते accept करून घ्यावे.

बेफिकीर,
तुम्ही कोणाकोणाला घाबरणार आहात?
सक्रिय-निष्क्रिय लोकांपैकी कोणाला जे करायचे ते करू देत. तेच उघडे पडतील. माझा हेतु खोडसाळपणाचा नाही हे मला पक्के माहित आहे.
अजेंडा वगैरे शब्दवापर सोडून अमितव यांनी दुसर्‍यांदा लिहिले, तेव्हा त्यावर कमेंट करताना हेच स्पष्ट केलेले आहे.
येथे वाद निर्माण करण्याचा प्रश्न नाहीच. ज्यांना तो निर्माण करण्याची खाज अाहे ती त्यांची जबाबदारी. वादाचे मुद्दे असले तरी शिव्या न देता, आव्हाने-प्रतिआव्हाने न देता, अस्मितांचे भांडवल न करता किती जणांना चर्चा करणे जमते हा मुद्दा आहे.

विठ्ठल,
काय लिहिले आहे ते तुम्हाला नीट वाचता यावे, वाचता अाल्यावर ते नीट समजता यावे, यासाठी तुमच्या दत्ताकडे प्रार्थना करा. माझी काळजी करू नका.

प्रत्येक धर्माचे काही रिवाज आहेत. मी स्वत: कुठलाही धर्म, जात, पन्थ मानत नसलो तरी इतर धर्मान्चा सन्मान करणे माझे कर्तव्य आहे असे समजतो. माझ्यापुरता मी मानत नाही पण तुमचा जो काही धर्म असेल त्याचा सन्मान करणे हे मला मान्य आहे.

इतरान्च्या व्यक्तीगत आणि धार्मिक स्वातन्त्र्याचा सन्मान आणि रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे असे मी मानतो. जो पर्यन्त वरिल चार मुद्दे राष्ट्रिय सुरक्षेच्या किव्वा नागरिकान्च्या कर्त्यव्याच्या कामा आड येणार नसतील तर मला आक्षेप घेण्याचे काहीच प्रयोजन नाही.

धागा मुद्देसूद करण्यासाठी एक ट्राय मारतो,

१) मुस्लिमांनी घराबाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवावा. स्कल कॅप टाळावी. दाढी वाढवू नये. वाढवलीच तर ती धार्मिक पद्धतीची नसावी.

१) हिंदूंनी मिशी ठेवून, टिळा / गंध लावून, जान्हवे घालून घराबाहेर पडू नये. घरात हरकत नसावी Happy

..

२) मुस्लिमांनी आवर्जून स्थानिक भाषेमध्ये बोलावे. त्या भाषेत पारंगत व्हावे. हिंदीसदृश्य भाषेत बोलून आपले ‘वेगळेपण’ दाखवू नये.

२) हिंदूंनी राज्यभाषेत किंवा राष्ट्रभाषेत बोलावे. मात्रुभाषा यापेक्षा वेगळी असल्यास तिचा वापर घरच्यांशी बोलण्यापुरताच करावा.

..

३) मुस्लिम स्त्रियांनी बुरखा वापरू नये.

३) हिंदू स्त्रियांनी नवारी नेसू नये. धार्मिक सौंदर्यप्रसाधने जसे की टिकली, कुंकू, हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र टाळावे.

..

४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे.

४) सर्वच धर्मीयांनी सरकारी, निमसरकारी शाळांतून शिकावे. शाळेत ऊर्दू / संस्कृत या भाषा शिकवल्या जाऊ नयेत.

.....

यात आता ईतरांनी ख्रिस्चन, बौद्ध, शीख या धर्मीयांकडून आपल्या अपेक्षा अ‍ॅडाव्यात Happy

एकमेकानी एकमेकांच्या धर्माबाबत निंदनीय उद्गार काढू नयेत ही अपेक्षा जुन्या आणि नवीन यादीत नाहीच!

<< १) हिंदूंनी मिशी ठेवून, टिळा / गंध लावून, जान्हवे घालून घराबाहेर पडू नये. घरात हरकत नसावी >>

मिशी घरात ठेवायची आणि घराबाहेर उतरवायची हे कसे काय जमवावे?

मिशी घरात ठेवायची आणि घराबाहेर उतरवायची हे कसे काय जमवावे?

गोलमाल है भई सब गोलमाल है Wink

पण हा लेख कपडे बदला,बोलीभाषा बदला या सुपर फिशीयल भौतिक मुद्द्यांवर का आहे?
मुद्दे ३ आणि ४ मॉडीफाय करुन पटतील, उदा पूर्ण चेहरा डोळे झाकणार्‍या बुरख्या ऐवजी स्कार्फ उर्फ हिजाब आणि मदरशांना व्यवस्थित शिक्षक मिळवून देऊन नॉन धार्मिक टेक्नीकल आणि इतर प्रगत विषय शिकवणे.

Pages