स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारास कारणीभूत काही कारणे नाकारण्याचा अट्टाहास

Submitted by Rajesh Kulkarni on 25 December, 2015 - 13:20

स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारास कारणीभूत काही कारणे नाकारण्याचा अट्टाहास
.

जेथे स्त्रीच्या शरीराची आदर्श मोजमापे जाहीरपणे उगाळली जातात, आदर्श (ideal) सुंदर स्त्रीच्या जवळजवळ प्रत्येक अवयवाचे उदा. बारीक कंबर, सुरईदार मान, गोलाकार मनगटे, लांबसडक बोटे, सुडौल जांघे, थोडेसे पुढे वाकलेले खांदे असे वर्णन ठरवले जाते. शयनेषु रंभा, अमुक अमुकेषु दासी अशा तिच्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात.

मात्र यासाठी फक्त पुरुषच जबाबदार आहेत का याचाही विचार केला पाहिजे.

अनेक जाहीर समारंभांमध्ये बापे थ्रीपिस सूट मध्ये दिसतात व तथाकथित सेलिब्रिटी स्त्रिया उतु जाईल एवढे अंगप्रदर्शन करण्यात आघाडीवर असतात. एवढेच नव्हे तर अनेक आधुनिक आया वस्त्रप्रावरणाच्या बाबतीत आपल्या मुलींशी स्पर्धा करताना दिसत असतात. स्त्रियांवर होणा-या अत्याचारांच्या बाबतीत कमीत कमी वस्त्रे परिधान करणे हेच जरी एकमेव कारण नसले, तरी त्यातून निर्माण होणारी अनिर्बंधतेची संस्कृती जबाबदार असते हे नजरेआड करून चालणार नाही. मुले बहकली आहेत असे आपण म्हणतो, तसे मुलींचेही आदर्श भ्रष्ट झालेले आहेत हे वास्तव का नाकारावे?

काळानुरूप स्त्रियांचा पेहराव बदलत गेला असे सांगितले जाते. तो जाणारच. विविध संस्कृतींचा एकमेकांवर परिणाम होणारच. पण इतिहासाकडे पाहून आजचे निष्कर्ष काढणे योग्य नाही. आपण कितीतरी गोष्टी इतिहासाच्या विरूद्ध करतो. याच बाबतीत कोणी काही करू शकत नाही असे म्हणत पळवाट काढू नये. कारण कधी नव्हे ते जग इतके जवळ आले आहे. दोष कपडे घालणा-याचा नव्हे तर पाहणा-याचा असतो, किंवा बलात्कार करणा-यांमध्ये अनेक बलात्कार ओळखीच्या व्यक्तीकडून होतात किंवा अंगभर कपडे घालणा-या स्त्रियांवरही बलात्कार होतात ही बराच काळ वापरलेली टेप आता निरर्थक झाली आहे.

वरील युक्तीवादाला मला आठवते त्याप्रमाणे माझ्या एका पोस्टवरील कमेंटमधून स्त्रीवर्गातीलच कोणीतरी सडेतोड उत्तर दिले होते. ती कमेंट अशी की तोकडे वा कामुक वस्त्रपरिधान करणा-या स्त्रीवरच बलात्कार होईल असे समजण्याचे कारण नाही. अशा स्त्रीच्या अशा देहाकडे पाहणा-या व्यक्तीच्या वासनेची बळी कोणी वेगळीच परिचयातील, जवळची, अनोळखी अशी कोणतीही मुलगी/स्त्री व केव्हाही होऊ शकते. तेव्हा सनी लियोनेसारख्या व्यक्तींना केवळ त्याच उद्देशाने लोकांसमोर आणण्यामुळे लोक चेकाळण्याची व त्यामुळे स्त्रियावरील अत्याचारांमध्ये वाढ होण्याचीच शक्यता असते. निव्वळ देहप्रदर्शनाने आपल्यासमोर वर्षानुवर्षे तग धरणा-या व जितके पैसे अधिक तेवढे अधिक कपडे कमी करणा-या सिनेनट्यांकडूनही वेगळे काही घडत नसते हे लक्षात घ्यायला हवे. एरवी चित्रपटातील दृश्याची मागणी असते असा लटका युक्तिवाद करणा-या अशा 'अभिनेत्री' (?) एरवी विविध मासिकांना व वर्तमानपत्रांमध्ये छापु देण्यासाठी उत्तान-कमी कपड्यांमधील छायाचित्रे का घेऊ देतात? हा एक प्रकारचा शरीरविक्रयाचा प्रकार नाही का? मग अशा व्यक्तींविरूद्ध कोणी ओरड केली की त्यांना संस्कृतीरक्षक म्हणून हिणवायचे. खरे तर अशा स्त्रियांच्या पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी त्या असे वागतात व त्याला ब-याचदा बळी पडतात समाजातल्या सामान्य मुली-स्त्रिया. पूर्वीपासूनच ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, पण आता त्यांचा इतका मारा होत आहे की मुला-मुलींचे लहानपण फारच मर्यादित झालेले आहे हे मी आधीही मांडले होते. परंतु आपण या गोष्टी इतक्या गृहित धरल्या आहेत की त्यामुळे हा धोका किती प्रमाणात वाढला आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. उलट वर म्हटल्याप्रमाणे अनिर्बंधतेचा पुरस्कार व आग्रह धरणारेच पुढे आहेत. आनि मग सोयीप्रमाणे व सवडीप्रमाणे मुलांचे बालपण हरवत चालले आहे हे आपणच म्हणायचे.

स्त्रीशरीराचे नको तेवढे प्रदर्शन या विषयावर स्त्रियांची मोठी चळवळ का उभी रहात नाही? आजकाल टीव्हीवरच्या जाहिरातीत ज्यापद्धतीने स्त्रियांचा वापर केला जातो त्यावर निव्वळ चवीपुरते बोलायचे. कृती मात्र काही करायची नाही. काही आठवड्यांपूर्वी सॅनिटरी नॅपकीन जेथे बसवतात तेथे पिसासारखी वस्तु जाऊन बसते असे दाखवणारी एक 'कल्पक' जाहिरात दाखवली गेली तेही चालवून घेतले गेले. काही दिवसात वास्तवतेच्या आग्रहापोटी निळ्याचे लाल झाले तरी आश्चर्य वाटायला नको. हे थोडे विषयांतर झाले असे वाटले, तरी जागरूक स्त्रियांची या समाजात फार कमतरता आहे हे वास्तव विसरायला नको.

मोबाईल फोनच्या कंपन्या सनि लियोने, शेर्लिन चोप्रा यांच्यासारख्याचे फोटो त्यांच्या ग्राहकांना ऑफर करतात, तेव्हा हे फोटो कोणाच्या म्हणजे कोणत्या वयोगटातल्या मुलांच्या हातात पडत असतील याबद्दल कोणाला काळजी वाटते का? परफ्युम स्प्रेसारख्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये एका पुरूषाच्या मागे अनेक तरूणी बेभान होऊन जात आहेत अशा दृश्यांमधून कोणत्यामानसिकतेला खतपाणी घातले जाते या व अशा गोष्टींबाबत कोणी आवाज उठवलेला पाहण्यात आलेले आहे का? अशी

एकीकडे ही वस्तुस्थिती तर दुसरीकडे भगवी वस्त्रे लेयलेल्यांच्या समाजशुचितेच्या व योनीशुचितेच्या भलत्याच टोकाच्या कल्पना. अर्थात त्या मात्र सर्वांनीच हाणून पाडायच्या हे नेहमीचे ठरलेले.

स्त्रीच स्त्रीची वैरीण असे म्हणण्यापेक्षा आजच्या जगात स्त्रीही स्त्रीची वैरीण आहे असे म्हटले तर वावगे वाटायला नको.

मला सांगा, उत्तानतेचे जाहिर प्रदर्शन करणे हा कायद्याने गुन्हा आहे, तरी याबाबातचा शेवटचा गुन्हा केव्हा नोंदवला गेला व त्याबद्दल कोणाला शेवटची शिक्षा झाली?

स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचार करणार्यांच्या मानसिकतेचे समर्थन करण्याचा येथे अजिबात हेतु नाही. पण समाजात जे चालले आहे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, या समस्येच्या मुळाशी जी कारणे आहेत त्यांच्यापर्यंत न पोहोचता असे अत्याचार हा जो अंतिम परिणाम दिसतो आहे व वरचेवर दिसतो आहे आहे, त्याविरूद्ध दिशाहीन आरडाओरडा करण्यात समाधान मानणार आहोत का हे आपणच ठरवायचे आहे.

परवा महिला आयोगाच्या अध्यक्षा निर्भया ज्योती सिंगच्या अल्पवयीन गुन्हेगाराला थोड्याशा शिक्षेनंतर सोडून देण्याबद्दल तावातावाने बोलत होत्या. कोणते व कसे कपडे घालावेत हे ठरवणे हा स्त्रिचाच हक्क आहे असे म्हणत आयोगाच्या त्यांच्या आधीच्या अध्यक्षाच पेहरावाबाबतच्या अशा अनिर्बंधतेचे समर्थन करत होत्या, याची नवीन अध्यक्षांना कल्पना आहे काय? तेव्हा वर मांडलेली दुसरी बाजुही त्यांच्यापर्यंत कधी पोहोचते, तिचे गांभिर्य त्यांच्या कधी लक्षात येते हे पाहू. त्यांच्याव्यतिरिक्त स्त्रियावरील अत्याचाराला जबाबदार असलेल्या अनेक कारणांपैकी काही अशा वर उल्लेख केलेल्या महत्त्वाच्या कारणांकडे कोण व केव्हा गंभीरपणे लक्ष देते का ते पाहू.

स्त्रीदेहाचे माध्यमांमधील ओंगळ व अनवश्यक दर्शन याविरूद्ध काही दमदार पावले उचलली गेली तरीदेखील या दिशेने काही योग्य होत आहे असे समजता येईल. मी वर म्हटले तसे लैंगिक अत्याचारांना आणखीही अनेक कारणे आहेत. मात्र येथे उहापोह केलेली कारणे मुळात त्यास जबाबदार नाहीच असे म्हणत हे वास्तव नाकारण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो, त्यामुळे कोणाचे कसे भले होणार आहे हा प्रश्न आहे.

++++++++++++++

काही वाचकांची माझ्या पोस्टवरून माझा अजेंडा, माझा हेतु याबद्दलच शंका उपस्थित करून उचकवण्याची खोड आहे. जे लिहिले आहे त्याबद्दल लिहिण्यापेक्षा लिहिणार्‍याबद्दल कमेंट करण्यातच हे नतद्रष्ट धन्यता मानतात.
येथे एखाद्याला ब्लॉक करण्याची सोय नसल्यामुळे अनेक टवाळखोरही त्यांचे येथे स्वागत नाही असे स्पष्टपणे सांगूनही निर्लज्जासारखे माझ्या पोस्टवर येऊन सातत्याने विषयांतर व टवाळक्या करत असतात. त्यामुळे मी येथे कोणत्याही कमेंटला काहीही प्रतिसाद देणार नाहीयाची नोंद घ्यावी. या कारणामुळे भल्या वाचकांनीही माझ्याकडून त्यांच्या कमेंटवर प्रतिसादाची अपेक्षा ठेवू नये. कारण येथे केली जात असलेल्या घाणीतून मला त्यांची सुसंबद्ध कमेंट शोधणे शक्य होत नाही. तरीही जे वाचक माझ्या पोस्ट वाचतात व विधायक व सुसंबद्ध प्रतिक्रिया देत आलेले आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिगोचि,
It has been already stated that there are several reasons for this mess. It has also been stated that it is not intended to justify the mentality of perverts. However, there are always two sides to every story. How some women themselves are adding to the mess is also amply illustrated. So this calls for an all out effort rather than only preaching the men to respect the women.

As for unsolicited comments from others, as mentioned I am all for opposite views, but there is no need for me entertain any personal comments. I write for myself, if someone wants to contribute or respond to it constructively I am more than willing to expand the argument. But I do not surely want to waste my time on the worthless as far as their irrelevant and personal comments are concerned. As simple as that.

सनि लिओन च्या नावाने खडे फोडणार्‍यांना सोनाली कुलकर्णी (नटरंग वाली) आणि अम्रुता खानविलकर यांचे हॉट-मादक नाचकाम व उत्तान देहाचे दर्शन घडविणारे कपडे आणि अदा पाहिल्यावर सत्संगाला गेल्याप्रमाणे संस्क्रुतिचे रक्षण वगैरे झाल्याचा साक्षात्कार होत असणार..!

अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे काय होते हे सांगायची आवश्यकता नाही असे वाटते.

>> १००% मान्य. अगदी अगदी. युगानुयुगे पुरुषांना जे अनिर्बंध स्वातंत्र्य मिळाले आहे.. त्यामुळेच आज बलात्कारासारखा गुन्हा करुनही त्यात स्त्रीचीही चूक असते असं म्हणायचं तुम्ही आणि अनेक राजकारणी मंडळी धाडस करत आहेत. हा सगळा त्या अनिर्बंध स्वातंत्र्याचाच परीणाम आहे.

धनंजय भोसले,
येथे एकीचे नाव घेतले म्हणजे इतर काय करतात यावर आक्षेप नसेल, हे तुमचे ग््रहितक आहे,व त्याआधारे तुम्ही तुमची पुढची कमेंत करत आहात. आणखी कोणाची नावे लिहिली असती तर त्यात नसलेली आणखी काही नावे तुम्हाला सुचली असती.

पियू,
जनरलायझेशन करून या मुद्द्यातल्या गांभिर्याकडे तुमचे दुर्लक्ष होत आहे असे वाटते.

त्याच त्याच त्याच त्याच विषयावर आपण किती वर्ष बोलणार आहोत देवच जाणे आणि या सगळ्या आत्ता पर्यत झालेल्या उदंड चर्चे मधून निष्कर्ष काय निघणार तर शुन्य Happy

@ Rajesh Kulkarni : तसं काही नाही हो... चालु द्या.. चालु द्या तुमचं..! Happy

हे लेखन म्हणजेच
"स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराची कारणे नाकारण्याचा अट्टाहास" वाटतोय...

चैतन्य दीक्षित,
एका ओळीच्या कमेंटऐवजी थोडे सविस्तार लिहिलेत तर तुम्ही म्हणता त्यामागची कारणमीमांसाही होऊ शकेल.

Pages