फणसाची भाजी... आता अगदी सोप्पी

Submitted by दिनेश. on 25 December, 2015 - 02:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
रुचिरा आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटोज. खुपच मस्त दिसतेय. हे पाकिट आणून बघायला हवं, पुण्यात कुठे मिळेल चौकशी करते आता.

माझीही अत्यंत प्रिय भाजी. मलाही नुसती खायला आवडते. दाणे घालून ओगलेआज्जींच्या पद्धतीनंच करते.

सई, कोकणात खुप फणस वाया जातात. या उत्पादनाला मागणी वाढली तर फार चांगले होईल. पुण्यात नाहीच मिळाली तर त्या नंबरवर फोन करुन विचार. खुप सोयीचे आहे हे पाकिट, पटकन होते ही भाजी.

दिनेशदा, तोंपासु. कित्ती वर्षात खाल्ली नाही. आता असं पाकिट मिळाल तर खाता येईल. Happy
कुयरी>>>>>>..दिनेशदा, कित्ती वर्षांनी हा शब्द वाचला/ऐकला. आणि अगदी फणसाचं कुयरींच्या वेगवेगळ्या आकरात लगडलेलं झाडं डोळ्यासमोर आलं. आणि तो वासही पोहोचला इथे (झाडाखाली येणारा.) Proud

सई, कोकणात खुप फणस वाया जातात. या उत्पादनाला मागणी वाढली तर फार चांगले होईल>>>>>>.खरं आहे. त्यांनाही उत्पन्नाच साधन मिळेल.

शोभा, कोकणात आता काम करायला माणसे मिळत नाहीत.. असे उद्योग चालवायचे तर माणसे हवीत. मागणी वाढली तर उत्पादकांना पण उत्साह येईल आणि मग माणसेही परत जातील कोकणात.

आता हेच पाकिट बघ, सगळ्या सुपरमार्केट मधे दिसत नाही.

आता ते पाकिटवाले नेटाने विकोत.आपल्याकडे मागणी वाढली की पुरवठा वाढवण्याऐवजी बंदच करतात.मंगळूरी लोकांच्या दुकानात असतात वाळवलेले गरे.ते गरम पा्यात भिजवून वापरतात.या भाजीचे प्रकार बरेच आहेत.तुमचाीही वेगळी आहे.फोटोही चांगले आहेत.आताच फणस आणलाय.मला कांदा लसूण घातलेल्या पदार्थांत साखर घातलेली नाही आवडत.

हो एस आर डी, अनेकदा एखादे उत्पादन शोधायला जावे तर सापडतच नाही. ( उदा. धनश्रीच्या पातळ पालेभाज्या, अंबाडी, अळू, पालक.. यांची फक्त नावे बघितलीत मी त्यांच्याच पॅकिंगवर पण कधीही ती उत्पादने बघितली नाहीत बाजारात. )

मंगलोरी लोकांची दुकाने बरीच वर्षे बघतोय मी आणि त्या लोकांचा छान सपोर्टही असतो. उगाच खोटे कशालाबोलू,, पण आपल्या लोकांचे मूळ गाव आणि भाषा लपवायचाच कल होता आपल्याकडे काही वर्षांपूर्वी पर्यंत.

माझे वडील मालवणचे असून आमच्याघरी चुकूनही कधी मालवणी बोलली गेली नाही. मालवणला जाऊन आल्यावर जर आमच्या बोलण्यात ते शब्द वा हेल आले तर उलट दटावणीच व्हायची. आता परिस्थिती बरीच बरी आहे.

भाजी मस्त दिसतेय. फणसाची टिन मधली भाजी अ़जून चाखली नाहीये.

पण हे जे ओगले आहेत ना ते माझ्या जाउबाईंचे मामेभाऊ आहेत. देवगड तालुक्यात दहिबावला त्यांची फॅक्टरी आहे . मी नवरात्रात गेले होते गावाला तेव्हा त्यांच्याकडे गेले होते. खूप काही करतायत ते ह्या क्षेत्रात फॅक्टरी पहायची इच्छा होती पण घरीच गप्पात वेळ गेला खूप . माझ्याकडे आत्ता घरी त्यांच्या फणसाच्या उकडलेल्या आठळ्या आहेत. त्या पण छान आहेत. इतर ही बरीच उप्तादन आहेत त्यांची. अशा प्रकारच्या उत्पादनांना मार्केट मिळाव आणि उत्पादन ही वाढाव म्हणून ते कार्यशील आहेत.

व्वा! मस्तच.
दिनेश असंच टिनमधेही सेम उकडलेलं मटेरियल (अर्थातच फण्सातलं) मिळ्तं. बहुतेक विजय कं.चं नाव.
याची एक अजून सोप्पी रेस्पी....मागेही एकदा दिली होती:
भरल्या (सांडगी)मिरच्या ...चांगल्या पाच सहा....तळून घ्या. बाजूला ठेवा.
त्यातल्याच थोड्या तेलात फोड्णी करून त्यात हिंग, मोहोरी, हळ्द , बारीक चि. हि. मिरच्या, कढिलिंब, भरपूर ओलं खोबरं हे सगळं घालून
टिन्मधला फणस घाला. (टिनमधे एक्स्ट्रा पाणी असल्यास ओतून द्या.)ढवळा. त्यावर बाजूला तळून ठेवलेल्या सांडगी मिरच्या छान हाताने चुरून घाला. मीठ साखर घाला.
वरून भरपूर कोथिंबीर. आणि अहाहा!!!!

विदर्भात फणसाची झाड कोकणात असतात तेवढी नसेल म्हणून आणि लोक तिखट, मसाले खात असल्यामूळे कदाचित फणसाचे गरे खाल्ल्या जात नै तेवढ्या प्रमाणात म्हणून इकड सहसा कच्च्या फणसाची भाजी , लोणचे असलेच पदार्थ बनलेले पाहिले आहेत..
अशी भाजी कुठ मिळाली तर बनवेल मी पन..
मी पन मसालेदार भाजीच बनवते फणसाची..
हवा तो पदार्थ, हवा तसा, हवा तेव्हा मिळाला कि कोण आनंद होतो .. समजु शकते मी तुमची खजिना मिळाल्याची खुशी Happy

यावरून सुचलं अमृते नावाच्या माणसाने ( कोकणातला नाहिये ) कोकणात दापोलीजवळच्या गवे गावात डोंगराळ जमीन घेऊन बरीच उत्पादने सुरू केली आहेत,वीसेक स्थानिकांना कायमचा रोजगार दिलाय.प्रत्येक फुलं प्रदर्शनात मोठा स्टॅाल असतो.

ममो, त्यांच्यापर्यंत माझी आवड नक्की कळवा, आणि त्यांची इतर उत्पादने कुठली आणि कुठे मिळतील ते पण कळवा.

मानुषी... आता नवल वाटेल पण चाळीस वर्षांपूर्वी सांडगी मिरच्याच काय कोकणातली साधी उत्पादने म्हणजे कोकम, सुके बांगडे, कुळथाचे पिठ, केससुण्या, सुप, मुटीयाल वगैरे मुंबईत मिळत नसत. चाकरमानी कोकणात गेले म्हणजे हे सगळे घेऊन यायचे. आणि मग ते वर्षभर पुरवून वापरायचे. आता कोकण बाजार वगैरे भरतो, त्यामूळे हा प्रश्न सुटला.

एस आर डी, / टीना अगदी छोट्या वस्तू असतात या, पण मानसिक समाधान देणार्‍या. ती चव बालपणीशी निगडीत असते. माझे वडील भाताच्या पेजेसाठी बेचैन व्हायचे, पण त्यासाठी मालवणचाच तांदूळ लागायचा आणि तो काही मुंबईत मिळायचा नाही. प्रवासाची साधने सुलभ नसायची, त्यामूळे वरचेवर येणेजाणे पण व्हायचे नाही.

आम्हाला त्यावेळी पेजच आवडायची नाही त्यामूळे त्यांच्या भावनाही कळायच्या नाहीत. आता कळतात.

अरे वा मस्त भाजी. कांदा आणि वाटण घालून मात्र मी अजूनही नाही खाल्ली फणसाची भाजी. सांडगी मिरच्या सुरेखच लागतात भाजीत.

कालच एका लग्नात कारवारी पद्धतीची खाल्ली फणसाची भाजी हरभरे घातलेली, छान होती तीपण. माझी आई पण हरभरे घालून करते.

हेमाताई मस्तच. बघायला हवं आणून त्याचं पाकीट. सांगते नवऱ्याला. अरे कालच दिरांचा मुक्काम इथे माझ्याकडे होता. पण मी उद्या वाचु रात्री ही फणसाची भाजी असा विचार केला. दीर दमले होते नाहीतर हेमाताईनी लिहिलेलं पण दाखवायचं होतं मला. तोंडी सांगितलं त्यांना हेमाताई आणि त्यांच्या लेखांबद्दल तसंच निसर्गाच्या गप्पांबद्दल, (sorry विषयांतर).

मानुषीताई तुमची रेसिपी पण मस्त.

दिनेशदा भाजी मस्त आहे. मला आवडली पण ही थोडी अ‍ॅनिमिक वाटते आहे असा अभिप्राय मिळाला...पारंपारीक कृतीसाठी ह्यात अजून काय अ‍ॅड करावे लागेल?

माझे वडील भाताच्या पेजेसाठी बेचैन व्हायचे, पण त्यासाठी मालवणचाच तांदूळ लागायचा >>>>>>> सुरे तांदूळ का हो? माझ्या आजोळी नदीवर पोहायला जाण्याआधी लाल तांदळाची पेज आणि गर्‍यागोट्यांची भाजी खाऊन जायचो.काही फार नसावं त्या भाजीत.पण चव झकास असे.पेज आवडत नसे,पण गिळायचो.कारण एकदम खेडे असल्यामुळे बाकी खाणे नसायचेच.मोठे होण्याच्या शापानंतर बर्‍याच गोष्टींना मुकावं लागते,त्यातली ही एक.अवांतराबद्दल क्षमस्व.

मेधा, आणखी गरम मसाला, किंवा मिरच्या घालाव्या लागतील. कांदा, खोबरे आणि गरम मसाला भाजून वाटूनही घालता येईल.

देवकी, तेच असावेत. आमच्याकडे त्यासोबत लोणचे, भाजलेला पापड ( किंवा सुका बांगडा ) ओले खोबरे असे काहितरी असातचे. ती पेज पितळी ( छोटी परात ) मधे वाढत. खुद्द त्या पेजेत मीठाशिवाय काहीच नसे.
आमच्या आताच्या पिढीत कुणी खात असेल असे वाटत नाही.

BTW bhaji mast आम्ही नेहेमी बटट्याच्या भाजिप्रमाणे कर्तो किवा कूयरी ची ठेचुन ही पद्धत नवीन दिसतेय छान

ह्या कृतीने भाजी आवडेल का त्याची शंका आहे. नेहमीची चणे घालून केलेली खूपच आवडते.

पण ह्या ओगल्यांबद्दल सांगितल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद दिनेशदा. फणसाचा खटाटोप करण्याची इच्छा नसल्याने गेल्या दोन वर्षांत केलीच नाहीये ही भाजी.

आमच्या घरी पण काळे वाटाणे घालूनच केली जात असे, पण ही कृती आता आवडते.
कमलाबाई ओगल्यांनी या कृतीलाच पारंपरीक कृती म्हंटलेले आहे. बहुतेक कोकणस्थ ब्राम्हणांची पद्धत असावी ही.
माझ्या वहिनीच्या माहेरी पण ( ते को.ब्रा ) अशीच करत असत.

मला कुठे असे निवडलेले केळफूल मिळते का ते शोधायचेय. थाई, फिलिपिनो दुकानात सुकवलेले बनाना ब्लॉसम मिळते. ती भाजी पण अशीच आवडीची पण भयंकर खटाटोपाची !!

दिनेशदा केळफूल मिळालं तर करणार तुम्ही, तुमच्या चिकाटीला खरंच ___/\___.

मला आई केळफुल साफ करायला बसवायची आम्हाला तेवढंच आठवतं, मग आम्हीच ती भाजी नकोच करायला म्हणायचो. खूप वर्षात खाल्ली नाहीये.

ह्यात वंजन म्हणून कडवे वाल मस्त लागतात. आमच्याकडे मसाला काहीच नसतो फक्त जरा जास्त फोडणी असते आणि भाजीत आणि वरूनही ओले खोबरे.

सांडगी मिरची नसेलच तर सुकी मिरची २-३ थेंब तेलावर खरपूस भाजून घ्यायची आणि त्याचे फ्लेक्स (हाताने चुरडूनच होतात) घालायचे.

फणसाची भाजी म्हटल्याबरोबर भूक खवळली.

या पाकीटातली भाजी आधीच उकडलेली असल्याने तिच्या चवीत (आणि पोषणमुल्यातही ???) काही फरक पडत नाही का?

आम्ही साधारण मिनोतीच्या या रेस्पीने करतो. मस्त होते.
http://www.vadanikavalgheta.com/2008/03/blog-post_17.html

तशीच एक अतिशय आवडणारी भाजी म्हणजे कोवळ्या उंबरांची.

एस आर डी, / टीना अगदी छोट्या वस्तू असतात या, पण मानसिक समाधान देणार्‍या. ती चव बालपणीशी निगडीत असते. माझे वडील भाताच्या पेजेसाठी बेचैन व्हायचे, पण त्यासाठी मालवणचाच तांदूळ लागायचा आणि तो काही मुंबईत मिळायचा नाही. प्रवासाची साधने सुलभ नसायची, त्यामूळे वरचेवर येणेजाणे पण व्हायचे नाही.

आम्हाला त्यावेळी पेजच आवडायची नाही त्यामूळे त्यांच्या भावनाही कळायच्या नाहीत. आता कळतात.>> अगदी अगदी. ती पेज आणि ती खोबरेल तेलावर परतलेली पालेभाजी. ते गिळणही नकोस वाटायचं आणि दुसर्‍याबाजुला आईबाबा वावा छान घरची अगदी कोवळी ताजी पालेभाजी आहे म्हणत कौतुक करत खायचे.

Pages