"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ९

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:08

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"खाद्ययात्रा"

झब्बू म्हणून कुठल्याही खाद्यपदार्थाचे छायाचित्र अपेक्षित आहे. कोलाज अपेक्षित नाही.

jhabbu_khadyapadarth.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Puran_poli.jpg

अरे व्वा!
पण माझ्याकडे लगेच उपलब्ध आहे ते सगळे नॉनव्हेज आहे, इथे टाकावेसे वाटत नाही Sad
कम्पनीच्या प्रत्येक पार्टीत, त्या त्या हॉटेलने केलेली मान्डामान्ड, भरलेल्या थाळ्या यान्चे फोटो आवर्जुन काढलेत त्या त्या वेळेस Happy पण पार्टी म्हणल्यावर?????? Wink
तेव्हा तुमचे चालूद्यात, जमल तर देतोच शाकाहारी झब्बू! Happy
यानिमित्ताने क्यान्टिनच्या थाळीचा झब्बू द्यावा काय? Proud

हा माझा

DSC03918.JPG

हा माझा

OAAAAKCIXjV8hVVaAg_KHBMo8IjmzvkiQ3SLPQXcpVcxT4Ag-YSh-Cuu2s2rHdEBticY9bYbAxWl7d3qAPl8zXj0TF0Am1T1UKrvXEvLlgYrVW4c8M9Zy74KEJZJ.jpg

Ethiopean restaurant मधली डिश. एक जाळीदार पण मऊ डोसा (इंजरा) आणि त्यावर वाढलेल्या भाज्या, कोशिम्बीरी, उसळी. वाडग्यात मसुराची तिखट उसळ आहे. बाजूला गुंडाळी केलेले डोसेच आहेत.

ethio.JPG

हा माझ्याकडुन बप्पाचा नैवेद्य...

Copy of IMG_1147.JPG

सिंडे, अनारसे सहिच...
अनेक वर्षात खल्ली नाहियेत Sad आता व्हर्चुअल खाते Happy

छे छे!! फारच त्रास होतोय हे पदार्थ बघून सगळे. Wink
झोपते आता. गुडनाईट. पुढचा झब्बू उद्या.

kelvan.jpg

हा घ्या माझा झब्बु. पालकची कढी, मसाले भात, मटकीची उसळ, काकडीची कोशींबीर, मुगभजी,गुलाबजाम Happy रिकामी डिश दिसत्येस बिचारी त्यात होत आम्रखंड ते वाढायच्या आधीच फोटो काढला नेमका Proud

अरेरे काल माहीत असतं तर... काल एका मोठ्या हाटेलात बुफे डिनर घेतलं तिथली मांडामांड आणि सगळे प्रकार मस्त होते. फोटू काढले असते तिथे.
आज आता घरात काहीतरी स्पेशल केलं पाहीजे फोटू काढायला किंवा काही स्पेशल खादाडी साठी परत बाहेर गेलं पाहीजे... Happy
सिंडे तुझ्या ढोकळ्याच्या प्लेटसारखं सेम डिझाइन असलेल्या चिनीमातीच्या प्लेटांचा सेट आहे माझ्या पुण्याच्या घरात. आईने जमवलेला.

सगळे झब्बू छान आहेत. किट्टुचा आणि झकासचा झब्बू सही!
झकास, चमचा कुठे आहे प्लेटमध्ये? की मिसळ अशीच हाताने भुरके मारून खायची?;-)
मिसळीचा कट पाहून कोल्हापुरातल्या चोरग्यांची मिसळ आठवली. च्यायला, नुसत्या आठवणीने तोंडात त्सुनामी!!!! Happy

व्वा! काय विषय आहे!! आज घरी काहितरी स्पेशल केल्याविना राहावणारच नाही...

हे घ्या, कुठला डोनट हवाय तुम्हाला,

Pages