ऑनलाईन दिवाळी अंक २०१५

Submitted by नंदिनी on 4 November, 2015 - 13:22

आली आली दिवाळी जवळ आली!! दिवाळी अंकांच्या जाहिराती पण आल्यातच, काही अंक बाजारात येऊन दाखलसुद्धा झालेत.

इथे वेगवेग्ळ्या दिवाळी अंकांची आणि त्यामधल्या साहित्यची चर्चा करता येईल.

काही ऑनलाईन दिवाळी अंक :

http://reshakshare.blogspot.in/
http://digitalkatta.com/
http://aisiakshare.com/diwali15

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेषेवरची अक्षरे http://reshakshare.blogspot.in/

सध्या फक्त लिंक. अजून अंक वाचलेला नाही. त्यांनी पण अनुक्रमणिका सगळी प्रकाशित केलेली नाही.

एक डिजिटल नेटका अंक प्रकाशित झाला आहे त्याची लिंक मिळाली की देइन.

तो दुसरा धागा 'ऑनलाइन दिवाळी अंक' असा करता येइल का? दोन्ही वेगवेगळे असतात ना दरवर्षी?

वाट बघत होतो ह्या धाग्याची.
लिहा चांगले अंक म्हणजे मागवता येतील.

डिजिटल दिवाळी - २०१५ (एक नेट-का अंक) - http://digitalkatta.com/

संपादन आणि मांडणी – सायली राजाध्यक्ष
मुखपृष्ठ आणि हेडर चित्र – अन्वर हुसेन
पार्श्वभूमी छायाचित्र – अभिजित भाटलेकर
व्हिडिओ – प्रसाद देशपांडे

लेख
बैठकीची घरंदाज लावणी – मुकुंद कुळे
अधले-मधले दिवस – प्रवीण बर्दापूरकर
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती (सारथी!) – रूपा रेगे-नित्सुरे
जग आणि निरीश्वरवाद – मुग्धा कर्णिक
शांतलेच्या पाऊलखुणा – शेफाली वैद्य
गुजरातच्या विकासाचे गौडबंगाल – मिलिंद मुरूगकर
भगवतीची चिंच – राम जगताप
आम्ही आणि आमचा व्यापक दृष्टिकोन – उत्पल व. बा.
झाले मोकळे आकाश – इंद्रजित खांबे
गरिबीतले अनवट राग – यशोदा वाकणकर
मी, अमित आणि आमचं सहजीवन – समीर समुद्र
संतसाहित्याचे ओझे कशासाठी वाहायचे? – शाहू पाटोळे

काही याद्या मनातल्या
मला भावलेल्या भूमिका – विजय केंकरे
मराठी सिनेमा १० बाय १० – गणेश मतकरी
वाचनालयं-माझी मंदिरं – शशिकांत सावंत
महाराष्ट्रातली महत्त्वाची सामाजिक कामं – मेधा कुळकर्णी
दशदर्शने – महेंद्र दामले
मुंबईतल्या माझ्या आवडत्या आर्ट गॅल-या – शर्मिला फडके
मराठी लंडन – भरत गोठोसकर

कथा
नाकबळी – सतीश तांबे
स्वर्ग – विलास केळसकर
मी, ती, आई आणि युटेरस – आशुतोष जावडेकर
प्रतिकृती – सोनाली जोशी
ब्रूट – मृण्मयी रानडे

कादंबरीचा अंश
काळोबाची गोष्ट – कविता महाजन

कविता
प्रफुल्ल शिलेदार
अभिरूची ज्ञाते

दृक -श्राव्य फिती
कविता
गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, अरूण कोलटकर, वसंत आबाजी डहाके, नारायण सुर्वे, आरती प्रभू, इंदिरा संत, ना. घ. देशपांडे, पु. शि. रेगे, बा. सी. मर्ढेकर, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, प्रज्ञा दया पवार आणि दासू वैद्य

अभिवाचन
विजय केंकरे, अतुल परचुरे, जितेंद्र जोशी, लीना भागवत आणि चिन्मयी सुमीत

कथा अभिवाचन
आता आमोद सुनासि आले – दि. बा. मोकाशी – वाचन – जितेंद्र जोशी
फ्यू – मंगला गोडबोले – लीना भागवत
वच्छीचा मोर (सावित्री) – पु. शि. रेगे – लीना भागवत

अनुक्रमणिका वर दिलेल्या साईटवरून साभार.

इथे देणं बरोबर नसेल तर उडवता येईल. केवळ अंकाचा अंदाज यावा म्हणून अनुक्रमणिका दिली.

सिंडरेला, इथं ऑनलाईन अंकांची चर्चा चालू झालीच आहे तर दुसरा छापील दिवाळी अंकांसाठी वापरू.

डिजिटल कट्ट्याच्या अंकामधला मुग्धा कर्णिक, शेफाली वैद्य आणि मुकुंद कुळे यांचे लेख मस्त आहेत. बैठकीची लावणीबद्दल कुळे यांनी सविस्तर आणि चांगली माहिती दिली आहे.

आवर्जून वाचावा असा लेख समीर समुद्र यांचा आहे. अगदी सहज आणि प्रामाणिक्पणे लिहिलेला लेख आहे. मागे फेसबूकावर तावातवानं या विषयावर चर्चा चालू असताना समीर समुद्र यांनी शांतपणे आणी अजिबात त्रागा न करता त्यांची बाजू मांडली होती, याही लेखामधला त्यांचं लेखन थोडंसं तसंच आहे. नक्की वाचा.

अजून बाकीचे लेख वाचायचे आहेत.

योकु धन्यवाद. चांगले आहेत लेख. विजय केंकारेयांचा लेख हस्ताक्षरात स्क्यान्ड आहे. तो वाचला नाहीये अजून पण बघायला छान वाटलं.
समीर समुद्र यांचा लेख वाचला. त्रागा न करता, शांतपणे बाजू आहेच. पण फार काही नवीन समजलं नाही. फार जास्त फोटो दिलेत असाही वाटलं, पण मराठी अंकासाठी उत्तम प्रथा. गेली दोन -तीन वर्षे माहेर मध्येही जाणीवपूर्वक असे लेख दिलेले वाचलेत. आवर्जून पुढे येतायत हे आवडलं, हे ही नसे थोडके.

शुभ दिपावली!!!

जुनेच लेखन डकवले आहेत ह्या ऑनलाईन अंकामधे. फेसबुकवर वाचले आहे हे ह्यातील खूपसे साहित्य. समीर समुद्रचा लेख फेसबुकवर वाचला होता. अभिरुचीच्या कविताही वाचल्या होत्या. बाकी इतरांच्या कवितांमधे काही दम नाही वाटला. वाचन केले आहे त्याची तर लिंकच नाही दिसत.

असो.. मला वाटत आपण खूप अपेक्षा ठेवू नये दिवाळी अंकाकडून आता.. १०० दिवाळी अंक विकत घेतले तर त्यात चार दोन लेख वाचनिय असतात बाकी सगळा कचरा. आपला वेळ, पैसा आणि उर्जा सगळ काही वाया जात.

हा धागा नियमित वाचेन. त्यातून काही मेजर सापडल तर तो अंक विकत घेईनच.

समीर अमित चा लेख चांगला आहे. म्हणजे प्रांजल. लग्नाचा फोटो बघताना मुंडा सड्डा डोली चढ गया गाण्याची आठवण येते. शिवाय हे जर ग्रोन अप अ‍ॅडल्ट आहेत तर बहिणीचा भक्कम आधार कशाला लागतो? पण असतील त्यांचे चांगले काहीतरी रिलेशन्स.

यशोदा वाकणकरचा लेख प्रिटेन्शिअस आहे.

शिवाय हे जर ग्रोन अप अ‍ॅडल्ट आहेत तर बहिणीचा भक्कम आधार कशाला लागतो? पण असतील त्यांचे चांगले काहीतरी रिलेशन्स. >>>> काहीही हं अमा ! Happy सगळं जगरहाटीबरोबर असतानाही लोकांना आधार लागतो. तो अर्थातच इमोशनल असतो. इथे तर हे प्रवाहाच्या विरुद्ध काहितरी करत होते, जवळच्या मित्र मैत्रिनींना, अगदी आई वडिलांनाही मान्य नसताना. अश्यात बहिणीचा भक्कम अधार ही जमेची बाजू असणार ना त्यांच्यासाठी ?

तर बहिणीचा भक्कम आधार कशाला लागतो?<<< आपल्याला कशाला लागतो? त्याच कारणासाठी. ग्रोन अप असलो तरी प्रत्येक वेळी प्रत्येक बाबीसाठी कुणाचा आधार आपल्यालाही हवाच असतो की.

डिजिटल कट्ट्यामधला तो ड्रायवरचा लेख फार बोरिंग आहे. शांतलेच्या पाऊलखुणा हा शेफाली वैद्यांचा लेख मस्त जमलाय.

शर्मिलाचा लेख खूप माहितीपूर्ण आहे. वरवर वाचलाय पण एकदा निवांत वाचायचा आहे

अरे खूप मस्त मस्त लेख आहे त्यात. शिवाय सादरी करणाची स्टाइलही चांगली आहे. त्यांचा महिला दिनाचा अंक पण मस्त होता.

योकु, अफलातून दिसतोय तो मिपाचा रुची विशेषांक. मी मिपावर फिरकत नाही कित्येक महिन्यांत त्यामुळे माहितच नव्हता. धन्यवाद.

मिसळपावचा रुची अंक हा मिपावरच्या अनाहिता ह्या खास महिलांसाठी असलेल्या दालनातल्या सदस्यांनी काढलेला अंक आहे.
त्या आधी महिला दिनाच्या निमित्ताने http://www.misalpav.com/taxonomy/term/239 हा अंक काढला होता

डिजिटल कट्ट्यामधला तो ड्रायवरचा लेख फार बोरिंग आहे.+१०० .
बाकी अंक चाळलाय. वेळ झाल्यावर नीट वाचणार.
मुखपृष्ठावरचं चित्र मस्त!
मिपा रुची विशेषांकही छानच दिसतोय!

रूपा रेगे नित्सुरे हे नाव वाचून मोठ्या औत्सुक्याने तो लेख उघडला. कारण त्या बँक ऑफ बडोदाच्या चीफ इकॉनॉमिस्ट आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांचा आवाज अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना कानावर पडतो. म्हटलं दिवाळी अंकात चक्क इकॉनॉमिस्टचे लेखन . तर तो इथे सगळ्यांनी नावाजलेला ड्रायव्हरचा लेख निघाला. Lol

रोन अप असलो तरी प्रत्येक वेळी प्रत्येक बाबीसाठी कुणाचा आधार आपल्यालाही हवाच असतो की.
>>
+!
मुळात ग्रोन अप्स असलो म्हणून कोणाचा आधार नको ही फिलिंग/ कन्सेप्टच चुकीची आहे Happy

डिजिटल कट्ट्यामधला तो ड्रायवरचा लेख फार बोरिंग आहे. >> +!
समीर अमितचा लेख आवडला. नंदिनी म्हणतेय ती चर्च अमीही वाचलेली. खर तर तेंव्हाच इंप्रेस्ड होते मी त्यांच्यावर. भारीच एकदम Happy

हे छापील दिवाळी अंकाच्या बीबीवर जाऊ द्या. (आवाज ऑनलाईन आला असेल तर राहू द्यात)
साधनाचा दिवाळी अंक आला नाहीये का? मला सापडला नाही.

Conveying Message from editor of Marathi culture and festival Diwali Ank to maayboli

देशोदेशीच्या मराठी वाचकांसाठी ख़ास असलेला हा मराठी कल्चर आणि फेस्टिवलचा ई दिवाळी अंक अत्यंत सुंदर झालेला आहे.
ह्या अंकाच वैशिष्ट म्हणजे भारताच्या बाहेर जन्मलेल्या मंडळींनी पाठवलेले मनोगत . जरूर वाचा :
1. Percentages by Shruti Marathe
2. I was a princess by Anika Kokatay
3. Sangam of my two identities by Vivek Nimgaonkar
4. Hyphenated Life by Ruchi Chitgopkar
ललित कला काव्य अनुभव भटकंती अशा एकापेक्षा एक भन्नाट विषयांचा हां साहित्य फराळ मुद्दाम वाचावा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना त्याची लिंक पाठवून आनंद द्यावा
यंदाची दिवाळी या सर्वांगसुंदर ई दिवाळी अंकाच्या सोबत साजरी करुया. चला तर मग या साहित्य फराळाला. आणि आम्हाला कळवायला विसरु नका हं कसा झालाय आपला ई दिवाळी अंक
- Aishwarya Kokatay

ऑनलाईन दिवाळी अंकांना यावर्षी इतका उदंड वाचकवर्ग मिळतोय, ग्लॅमर मिळतय, चर्चा होताहेत. मस्त वाटतय.ऐसी अक्षरे, डिजिटल कट्टा, रेषेवरची अक्षरे.. सगळ्यांनी मेहनतीने सुंदर अंक जमवून आणलेत.
मात्र या सगळ्यात उणीव भासतेय पायोनियर ऑनलाईन अंक असलेल्या मायबोलिच्या ’हितगुज दिवाळी अंकाची’. इतकी सवय झालीय या अंकाची. काहीच कारणबिरणं न देता एकदम बंदच करुन टाकलाय. नॉट फ़ेअर.

मात्र या सगळ्यात उणीव भासतेय पायोनियर ऑनलाईन अंक असलेल्या मायबोलिच्या ’हितगुज दिवाळी अंकाची’. इतकी सवय झालीय या अंकाची. काहीच कारणबिरणं न देता एकदम बंदच करुन टाकलाय. नॉट फ़ेअर.>>>>>शर्मिला +१००००

या वर्षी मायबोलीचा काहीतरी सरप्राइझ अंक असेल असं वाटतय, म्हणजे प्रोफेशनली करून घेतलेला अंक वगैरे .. कळेलच होपफुली लवकर !

Rekhakshre chya ktha vachun zalya sglya.. Mast aahet.. Aaplya kdchya ativas yanchi pn ktha aahe Tyat.. Tyachi bhashashaili apratim aahe..

Tithe pratisad dyayche rahilet ajun, Marathi typing suru zal ki denare. Sddhya kahitri gdbd zaliye..

कालच्या महाराष्ट्र टाईम्सला मेघना भुस्कुटेचा "ऑनलाईन दिवाळी अंकां"विषयी लेख आला आहे.
'पहिला ऑनलाईन दिवाळी अंक' हे बिरूद मिरवणारा मायबोलीचा दिवाळी अंक यंदा नाही याबद्दल खिन्नता व्यक्त केली आहे.

वाईट नक्की कशाचं वाटतंय हे आत्ता शर्मिलाची पोस्ट वाचल्यावर उमगलं की, <<काहीच कारणबिरणं न देता एकदम बंदच करुन टाकलाय>>

Pages