मी पाककॄती ह्या सदरात काही लिहीतेय ह्याच मलाच खरतर जाम हसू येतय .
त्यातही हा पदार्थ कोकणातला फार खटाटोपाचा. मुद्दम इथे लिहितेय कारण एक हाती पाऊण तासात बनवून उत्तम ( आजीची आठवण झाली वगैरे कॉम्पीमेंट्स मिळवण्याइतका ) झाला .
दसर्याला सहसा बासुंदी करतात आमच्या घरी. ह्यावेळी वेगळ काही कराव म्हणून हा घाट घातला . ( घाट घातला म्हणजे कसं भारदस्त , खूप कठीण पदार्थ जन्माला घातल्याचा फील येतो ) माझ्या स्वैपाकघरातल्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असल्यानी , आयत्यावेळी श्रिखंड आणायच मनात योजून ठेवल होतं . आता नमनाला घडाभर तेल झाल्यावर मुळ विषयाकडे वळू.
आजची रांगोळी दुर्गेची काढून , दसर्याची सुरवात केली
कोकणातल्या लोकाना हा पदार्थ माहित असेल , बाकिच्यांसाठी थोडाक्यात वर्णन म्हणजे , तांदळाच्या उकडीच्या शेवया अन नारळाचा गुळ घालून रस.
लागणार साहित्य - शिरवळ्यांसाठी/ शेवयांसाठी
१) तांदळाच पिठ, - ५ वाट्या
२) उकडीसाठी पाणी - ५ वाट्या
३) तेल -४ चमचे
४) चवी पुरत मिठ.
५) सगळ्यात महत्वाचा तो शेवगा उर्फ मोठा सोर्या.
साहित्य - रसासाठी
१) कोकोनट मिल्क पावडर ( इथे मॅगीची मिळते)/ तयार नारळाच दुध .
२) कनक गुळाची पावडर
३) वेलची / जायफळ वगैरे जो स्वाद आवडत असेल त्याप्रमाणे.
तांदळाच्या पिठाएवढ पाणी काटेकोर मोजून जाड बुडाच्या पातेल्यात तेल अन मिठ घालून उकळायला ठेवायच. त्यात मोजलेले तांदळाच पिठ घालून वरून झाकण ठेवायच. सुगरणींना सुचना दोन वाफा काढायच्या. पण आपण त्या क्याट्याग्रीत नसल्यानी अन वाफा दोनदा कश्या मोजायच्या ते न कळत असल्यानी , दहा मिनिटानी उकड झाल्याच जाहिर करायच. हवतर त्या मधे दोन दा झाक ण उघडून पहायच , वाफ बाहेर येते. दोनदा.
ही झालेली उकड साधारण अशी दिसते.
हे झाल की सोर्या उर्फ शेवगा असेंबल करून घ्यायचा. खास बेळगाव हून बाबां नी आणलाय. सुरेख पितळी कास्टींग आहे. नट बोल्ट अन पाना सगळ किट अगदी देखणं.
असेंबल करून असा दिसतो .
हे सगळ करेपर्यंत सोर्यात बसतील अश्या आकाराचे उकडीचे लांबट गोळे करून ठेवायचे.
ते साधारण असे दिसतात.
मग एका पोठ्या पातेल्यात पाणी ककळत ठेउन त्यात हे गोळे सोडायचे. परत सुगरण लोकं हे वाफवून घेतात मोदक पात्रात. पण परत आपण त्या गटात मोडतच नसल्यानी अन वाफ मापक यंत्र नसल्यानी दोन वाफा चार वाफा मोजत बसण्या पेक्षा गटांगळ्या खाणारे गोळे जमतात. हे बुडाला बसलेले गोळे तरंगायला लागले की झाले अस समजायच.
पहिल्यांदा करताना, उकळून पाणी गढूळ पांढर होउन , बुडाशी दिसणारे गोळे , दिसेनासे होतात.
अरेरे हुकल बहुतेक, आम्रखंडाचे डबे आणायला पाठवाव का ? कशाला नसते उद्योग ओढवून घेते मी ? वगैरे सैर करून आपण येइपर्यंत पहिला गोळा तरंगायला लागतो.
झालेला गोळा असा तुकतुकीत दिसतो.
हुश्श ! म्हणून एका ताटात काढायचे. इथून पुढचा कार्यक्रम फास्ट होतो. चला , पानं वाढलीत च्या हाका मारून लोक स्थानापन्न होईपर्यंत आपण पहिला गोळा शेवग्यात घालायचा. दुसर्या वेळी बनवता तेव्हा हा गटांगळ्या वेळ रस करायला सत्कारणी लावायचा . तयार नारळाच्या रसाच पाकिट मिळतं अथवा पावडर मिळते. पावडरीच्या खोक्यावर पाणी किती त्याच प्रमाण लिहिलेल असतं . अश्या बनवलेल्या रसात आपल्या चवी प्रमाणे गुळ घालायच. मी कनक गुळाची पावडर वापरते . खडे विरघळायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात गुळ विरघळून रस तयार होतो. मी कोणताही वेगळा स्वाद ह्यात घालत नाही पण वेलदोडा/ जायफळ पारंपारिक कृतीप्रमाणे घालता येइल. ( दालचिनी जर्रा कंटेंपररी )
तर अश्या रितीने तयारी पुर्ण झाल्यावर , शेवग्यातून प्रॉडक्शन सुरु करायच. मग ऑस्ट्रेलियन शेफ च्या कार्यक्रमात कॉन्टेस्टंटा नी पेश करावेत अश्या थाटात आपण शिरवळ्यांची डिश समोर करायची. समोरचेही स्वतः मोठे ज्युरी असल्याच्या थाटातच बसलेले असतात . पण शिरवळ्या अन रसाचा पहिल्या घासाबरोबर नानी याद आती है. ह्या शेवग्यातून शिरवळ्यांचे घाणे काढणे अक्षरशः बच्चोंका खेल आहे. त्याना तो खेळू द्यावा.
माझ्या लहानपणी आजी , उन्हाळ्याच्या सुटीत सगळा गोतावळा जमला की हा घाट घालायची. तेव्हा लाकडी शेवगा होता अन त्यातून शिरवळ्या करने हे मजबूत खांदे असलेल्यांच काम असायच. अन नारळाचा रस देखिल नारळ खवून , वाटून , गाळून वगैरे लांबलचक क्लिष्ट अन वेळखाउ कार्यक्रम होता. मागणी अन पुरवठा ह्यात तारांबळ व्हावी इतका गोतावळा असायचा . शेवग्या चे खूर धरायला एक , गोळे घालायला एक अन शिरवळ्या करायला एक, रस करणारी आजी ( बाकीचे सगळे पातळ पुळकावनी करतात अस वाटायच तिला. ) गप्पा, गाणी , चिडवाचिडवी , अन खाउन तुडूंब आहोत तिथेच आडवे व्हावे इतक आग्रहानी खायला घालणारी आज्जी. एक सुरेख अन फुलफिलिंग ( पोट अन मन दोन्ही) कार्यक्रम !
कालच्या शिरवळ्या सोप्प्या होत्या , चव सेम!! फक्त वातावरण निर्मिती करायला गोतावळा नव्हता एवढीच खंत. पोटं भरल पण मनासाठी आठवणीच फक्त.
भारी पाकृ आहे. शेवगा खास
भारी पाकृ आहे. शेवगा खास दिसतोय.
वॉव..इन्ना.. मस्तं गा.. क्या
वॉव..इन्ना.. मस्तं गा.. क्या स्टोरी है, क्या हीरो (सोर्या) है.. वाह!!!
वाफेबद्दल.. +१०० .. आणी वाफ मोजायचं यंत्र.. कल्पकतेची कमाल आहे
(पण असं खरंच ईजाद झालं तर मी बी घ्येईन
)
लास्ट पॅरा हायलैट है!!! मस्तं मस्तं मस्तं !!!!
मस्त फोटो आणि लिहिलसही छान!.
मस्त फोटो आणि लिहिलसही छान!. शेवटच्या परिच्छेदानी गोतावळ्यासकट खानापूरच घर डोळ्यासमोर आल.रस ताजा का नाही केला? बाई खोबर किसून देते.मिक्सरमध्ये वाटायला किती वेळ लागतो.
व्वा इन्ना मस्त लिहिले
व्वा इन्ना मस्त लिहिले आहेस... तुझा उत्साह भारिच आहे .. मस्तच...
बाई खोबर किसून
बाई खोबर किसून देते.मिक्सरमध्ये वाटायला किती वेळ लागतो.>>>>
काही गोष्टी कधीच बदलत नाहीत हे खरं!!!!!
आमच्याकडे आज ब्रेकफास्टला इन्स्टंट इडीअप्पम आणि स्ट्यु केला होता.
माते , दसर्याला सुट्टी घेते
माते , दसर्याला सुट्टी घेते बै. आणि सोप्पी ( रिड आळ्शयाची) करायची होती ना रेसिपी .
पब्लिक मधे कान पकडायला च पैजे का
_/\_
_/\_
काही गोष्टी कधीच बदलत नाहीत
काही गोष्टी कधीच बदलत नाहीत हे खरं!!!!!
आणि बदलूही नये हीच प्रार्थना
पब्लिक मधे कान पकडायला च पैजे
पब्लिक मधे कान पकडायला च पैजे का>>>>>>>>..आई थोर तुझे उपकार!
छानच! मी खूपदा तमिळांचा
छानच!
मी खूपदा तमिळांचा ईडीअप्पम खाल्ला आहे. हा पदार्थ तसाच वाटतो आहे.
इन्ना
इन्ना
बाई खोबर किसून
बाई खोबर किसून देते.मिक्सरमध्ये वाटायला किती वेळ लागतो.>>>>>>>>>>>>टिपिकल "माता" कमेन्ट!
शोभनाताईं मधली माता योग्य
शोभनाताईं मधली माता योग्य वेळी प्रगटली
रसाची authentic पा कृ दे ना इन्ना! हम एक तो बनाते नही लेकिन जब बनाते तब वर्जिनल रेसिपी से बनाते
बाई तुझा सोर्या उर्फ शेवगा
बाई तुझा सोर्या उर्फ शेवगा इतका देखणा आहे न कि तो बघायला मी दोन वेळा इथ येवून गेले .
इतका कि ते भोंडल्याच गाण आहे ना .
इतका सोर्या सुरेख बाई शिरवळ्यां त्या कराव्या .
आमचा हिरो फेमस झाला की.
आमचा हिरो फेमस झाला की.
ब्रास फाउंड्री वाले कामत आहेत. नंबर सापडलाय. ज्याना हवाय त्यानी मेल करा मला .
नंदिनि,मानुषी,वत्सला गन्मत
नंदिनि,मानुषी,वत्सला गन्मत केलि तिची. अशी जहिर गम्मत कराय्ला नको होती.तिला महिती आहे.तिची माता तिच्यापेक्षा शॉट्कट मारणारी आहे.'आळशी करेल ते ब्रम्हज्ञानी करणार नाही' अस म्हणतात.विविध व्याप सांभाळत तिच्या अस काही करायच डोक्यात कस येत अस मला वाटत.
शोभनाताई, टेन्शन नै. आमच्या
शोभनाताई, टेन्शन नै. आमच्या मातोश्री यदाकदाचित इथे प्रकटल्या तर अशाच कमेंट करतील याची पूर्ण खात्री आहे. गमतीजमती चालतच राहतात. तरच मज्जा असते.
रच्याकने, मंगलोरला आमच्या समोरच्या राव आंटी या शेवयांचा चित्रान्ना टाईप एक प्रकार करायच्या, तो असला सही लागायचा!!! मी दोन तीनदा करायचा प्रयत्न केला, पण वो बात जमी नही.!!!
अशी जहिर गम्मत कराय्ला नको
अशी जहिर गम्मत कराय्ला नको होती>>>>>> अर्रर्रर्रर्र शोभनाताई असं काही नाही हो..... आम्हीही अगदी लाइटलीच केल्या कमेन्ट्स.......मी माझ्या लेकीची अशीच गम्मत करते. कधी कधी जाहीरही! त्यातच गम्मत! मायलेकीचं नातंच तस आहे ना!
फिकर नॉट माताश्री, हम
फिकर नॉट माताश्री, हम सुधरनेवाले नही 
नंदिनी आणि मानुषी +१ मला
नंदिनी आणि मानुषी +१
मला एव्हढं हसु यायच कारण म्हणजे आज माझ्याकडे एक छोटा कार्यक्रम होता. काल आईला बाबांकरवी (ते हल्ली whatsapp वापरायला शिकलेत) अशा अमुक अमुक कार्यक्रमाला काय काय करतात अस विचारल होतं. त्यावर हे हे हे आणि जमल तर हे ही कर, असे तिचे उत्तर होते. तिचे उत्तर अर्थातच मी कार्यक्रम आटोपल्यावर बघितले. त्यातील हे हे हे मी केले होते पण शेवटचे हे काही केले नव्हते. ते न केल्याने आई काही रागावणार नव्हती. पण तरी आता ती काय म्हणेल असा विचार करत असतानाच तुमची पोस्ट वाचली आणि मला मजा वाटली.
खर तर इन्ना नेहमीच काही न काही वेगळ करत असते याबद्दल आणि एकूणच तिचे कार्यबाहुल्य बघुन (वाचुन) मला तिच खुप कौतुक वाटतं!
इन्नाची धमालच.....प्रतिसाद
इन्नाची धमालच.....प्रतिसाद वाचून तिलाही शेवयांना भलताच नखरेबाज रंग चढलेला आहे असे वाटत असेल आता.
तरीही तिच्या मातेने "....बाई खोबर किसून देते.मिक्सरमध्ये वाटायला किती वेळ लागतो..." दिलेली अशी शाबासकी तिला गुदगुल्या करून गेली असणार.
इन्ना, शोभना ताई , अगा
इन्ना, शोभना ताई
, अगा कित्ती गोड वाटलं वाचून, आई ची आठवण करून दिलीस तीव्रतेने.. 
झकास लिहिलं आहेस इन्ना!! कधीच
झकास लिहिलं आहेस इन्ना!!
कधीच खाल्ला/ पाहिला नाही हा पदार्थ.
सोर्या किती सुंदर आणि सुबक आहे.
रैना मी आहार अन पाककृती
रैना मी आहार अन पाककृती विभागात , माकाचु व्यतिरिक्त काही लिहु शकले ह्याच मला अजून जाम हसू येतय.
इन्ना, फोटो आणि रेसिपी मस्तच.
इन्ना, फोटो आणि रेसिपी मस्तच.
सामी, साधना, पितळेचा शेवयांचा साचा, से. १७ मधील वल्ली स्टोरमध्ये मिळतो. माटुंग्याला ही अॅल्युमिनियमचा / पितळेचा मिळतो. हा कर्नाटकातील फेमस प्रकार.
तमिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा तितकाच फेमस आहे.
माझा झब्बू देते.

![P01-01-14_05.14[1].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u36943/P01-01-14_05.14%5B1%5D.jpg)

![P01-01-14_05.15[2].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u36943/P01-01-14_05.15%5B2%5D.jpg)
आरती , मस्तच ग!. धन्यवाद ग...
आरती , मस्तच ग!. धन्यवाद ग... उद्या बघते सेक्टए १७ ला....नाही मिळाल्यास इन्ना कढून डीटेल्स घेईन.
खोबर खोवण्याची जरूरी नाही.
खोबर खोवण्याची जरूरी नाही. माझ्या अम्माने शिकवलेली टीप देते. खोबर्याचे छोटे तुकडे ( १ इंचाचे) करुन घ्या. मिक्सरमध्ये पाणी आणि खोबर्याचे तुकडे घालून फिरवून घ्या. जर गोड रस करायचा असेल तर त्यातच चिमूटभर हळद, जिर घालून बारीक वाटा. हे वाटण कॉटनच्या पांढर्या शुभ्र रुमालात घेऊन हाताने दाबून घ्या. मस्त घट्ट रस निघतो. उरलेल्या खोबर्यामध्ये पुन्हा थोड पाणी घालून फिरवून घ्या. हीच प्रोसेस अजून एकदा करा. एका नारळाचा फक्त एका मोठ्या लिंबाएवढा चोथा शिल्लक राहतो. ह्या नारळाच्या दुधात किसलेला गूळ किंवा गूळ पावडर विरघळून घ्या आणि वे.पा., जा.पा. घाला. सध्या रसाचा फोटो नाही आहे.
नाचणीच्या पिठाचे ही छान लागतात.
माझ्याकडे शेवगेचा स्टॅन्ड नाही आहे. मी पण अंजलीच्या सोर्यात करते. बारीक शेवची जाळी वापरून. मी गोळे पिठात उकळवत नाही. तांदूळाच्या पिठाची उकड काढते आणि त्याचे लांब गोळे करून त्याची शेव ईडली पात्राच्या भांड्यावर काढते. ईडली पात्रातील शेव १५ मि. वाफवते.
सामी, ही त्यांची वेब साईट.
सामी, ही त्यांची वेब साईट. डेली प्रोडक्ट्स होम डिलिव्हरीसुद्धा करतात. shrivallisupermarket.com. पितळेचा मी त्यांच्याच कडे बघितला होता. से. ९ मध्ये दोन केरला स्टोअर्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा मिळेल. पण ह्याची ऑर्डर दिली के ते आणून देतात.
वरच्या फोटोतील शेवगे स्टॅन्ड पप्पांनी मांटुगावरून घेतला आहे.
परवा कोकणातल्या आमच्या घरी
परवा कोकणातल्या आमच्या घरी गेले होते . तिथे हा माझ्या आजेसासुबाईंचा त्यांच्या माहेरून आणलेला शेवगा पाहिला. लगेहाथ शिरवळ्या कार्यक्रामही झाला. पण हे प्रक्रण फारच कष्टाच आहे. मी एकहाती हा कार्यक्रम आटोपला माझ्या घरी , ह्याच अपार कौतुक का झाल ह्याच कारण समजल
अरे वॉव. इन्ना, मस्तच भारी
अरे वॉव. इन्ना, मस्तच भारी ग.
आरती तुझा झब्बू मस्त. आत्ता बघितला.
Pages