नोकरी शोधात होणारी फसवणूक

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:25

आत्ताच थोरल्याचा फोन आला की एक व्हीपीपी आली आहे, ५०० रुपये भरुन सोडवुन घ्यायला सांगत आहे, कुणा SSS Industrial Job Services कडून आली आहे, मी आत्ता पोस्टमनला परत पाठविले आहे, तुम्ही नेटवरुन माहिती काढाल का?
माहिती काढल्यावर त्या नावाच्या एक दोन साईट्स सोडता, बनावट कॉल लेटर्स/गार्बेजची व्हीपीपी पाठवुन होणार्‍या फसवणूकीच्या तक्रारींनी भरलेले गुगलचे पान नजरेस पडले. तत्काळ मुलास फोन करुन सांगितले की ती व्हीपीपी तू घेऊ नकोस, घेतलीस तर फुकाचा फसशील. जी गोष्ट "विकतची" म्हणून तू मागवलेलीच नाहीस, त्याकरता पैसे का भरतोस?
याच संदर्भात पुढील बातमी देखिल पहा
http://www.moneylife.in/article/sss-industrial-job-services-using-postal...

मायबोलीवर "गुन्हेगारी - गुन्हे" याबाबत एकही गृप नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर "गुन्हेगारी - गुन्हे" याबाबत एकही गृप नाही? Rofl
असा ग्रुप नाही म्हणून नोकरीच्या शोधात !! :हाहा::फिदी::खोखो::हाहा:

भावासाटी नोकरि शोधताना नेटवर एक जाहिरात दिसलि आनि भावाला तिकड मुलाखतिसाटी पाटवले. सरकारि कम्पनि मधे जॉब आहे. त्या प्लेसमेन्ट वाल्यानि ६००००/- भरावे लागतिल असे सान्गितले. त्या सरकारि कम्पनि चे नाव ईथे देने योग्य आहे का ते माहित नाहि. भाउ जास्त शिकलेला नाहि. त्याच्या भविश्यासाटी हा मार्ग स्विकारावा का? फसगत होन्याचि शन्का मनात येते. कुनाला या बाबतित काहि अनुभव असल्यास प्लिज मार्गदर्शन करा. प्रतिसाद देन्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुले खुप चुका आहेत. सांभालुन घ्या.

असे पैसे भरावे लागत नाहीत सहसा, पण भारतातील सरकारी नोकर्‍यांबाबत जो भ्रष्टाचार चालतो, त्यात असे होणे नवलाचे नाही. अगदी नाईलाज असलातरी, असे पैसे भरुन कुणाला त्यांनी नोकरी मिळवून दिली आहे का, त्याची चौकशी करा. त्या व्यक्तीची भेट घ्या. ( तोदेखील खरे सांगेल याची शक्यता फारच कमी आहे. )

एवढ्या पैश्यात छोटासा व्यवसाय सुरु करता येईल किंवा किमान व्यावसायिक शिक्षण तरी नक्कीच घेता येईल. तसा विचार करा. म्हणजे आपली बाजू लंगडी राहणार नाही.

पन सरकारि कम्पनि मधे अशा प्रकारे भरति होवु शकते का? माझ्या माहितिप्रमाने सरकारि भरतिचे नियम खुप कड़क केले आहेत. online procedure असते. दिनेशदा, या भ्रश्टाचार प्रकरनामुलेच मलाहि शन्का येते आहे. समजा नोकरि मिलवुन दिलि तरि ति पुढे टिकेल याचि खात्रि काय?

पन सरकारि कम्पनि मधे अशा प्रकारे भरति होवु शकते का? << हे पुर्णपणे बोगस आहे, सावध रहा.

जमल्यास पोलिसात तक्रार करा, आजुन अनेक जणांचे पैसे वाचतील

सध्या तरी बरीच वर्षे सरकारी भरती बंदच होती. सगळे कर्मचारी करारावर घेतले जात. आता जर परत सुरु केली असेल तर त्या कार्यालयाशी थेट संपर्क साधून बघा. पोलिसात तक्रार करण्यात बराच वेळ आणि पैसा खर्च होईल आणि त्यातून कुणाला शिक्षा होईल याची शक्यता नाही.

स_सा, कल्पना येणार नाही इतका भ्रष्टाचार भारतात आहे. जोपर्यंत आपला संबंध येत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही. याबाबतीत कुणीच आवाज उठवत नाही.

दर्शू, सरकारी कंपनीत अशी भरती होते. आता भरती करणारे लोक पैसे घेऊन भरती करतात की आपली त्याचवेळी निवड झालेलीच असते आणि हे लोक फायदा घेतात हे मात्र माहित नाही. व्यापम घोटाळ्या बद्दल वाचलेय ना? व्यापम प्रकार भारतभर चालतात, पण माणुस पकडला जातो तेव्हाच चोर ठरतो.

पण जाहीरात करुन असे प्रकार होत नाहीत हे नक्की. त्यामुळे नेटवर जाहिरात आली आणि त्यानंतर पैसे मागताहेत म्हणजे इथे १०० टक्के फसवणुक होणार.

माझ्या ओळखीत एकाने मिलिटरीमध्ये शिपाई म्हणुन नोकरी मिळण्यासाठी दोनदा प्रयत केले आणि दोन्ही वेळाअ तो अपयशी ठरला. तिस-या खेपेस घरच्यांनी याला न सांगता कोणी मध्यस्थ होता त्या मार्फत कोणालातरी ४५,००० रुपय्पे दिले. याची निवड झाली आणि नंतर काही दिवसांनी याला जेव्हा कळले तेव्हा याने मिलिटरीत असे काहीही होत नाही, मी माझ्या टॅलेन्टवर निवडुन आलो म्हणत घरच्यांना शिव्या घातल्या. Happy पैसे दिले म्हणुन निवड झाली यावर घरचे आजही ठाम आहेत.

मिलिटरीतही पैसे घेऊन भरती होते हे ऐकुन मला धक्का बसलेला. पण यातल्या जाणकारांनी हे असे कित्येक वर्षे होतेय, मिलिटरी, पोलिस सगळीकडे पैसे देऊन भरती होते हे ऐकवुन मला गप्प केले. Happy पण हे सगळे अनऑफिसिअल. त्यामुळे जोवर खात्रीचा इसम मिळत नाही तोवर काहीच खरे नाही. यात चिक्कार फसवणुक पण होते. आणि सगळा व्यवहार रोखीत. पोलिस तक्रार करुन काहीही फायदा नाही. त्यामुळे असल्या भानगदीत न पडलेले बरे.

जाहिरात placement वाल्यानि दिलि आहे आनि पैसेहि तेच मागत आहेत, सरकारि कम्पनि नाहि (helper च्या पोस्ट साठि, भाउ दहावि पर्यन्त शिकला आहे). हे लोक setting करुन direct job मिलवुन देनार. निवड प्रक्रिया वगेरे काहि नाहि. कम्पनिच्या site वर मला अशि जाहिरात दिसलि नाहि. आम्हि जवळ जवळ ignore केले आहे.

Just ignore it. Let him get some more vocational training and start work as an trainee somewhere.

दर्शु, तुम्ही कंपनीची साईट चेक केलीत ते बरे केलेत. हल्ली ब-याअच कंपन्या त्यांच्य साईटवर ही माहिती देतात.

असे पैसे भरून कोणीही जॉब घेऊ नये. तेच पैसे प्रोफेशनल शिक्षण अथवा उद्योग स्थापित करायला वापरावे. उद्योग कसा कराय्चा ह्याचे हव तर शिक्षण घ्यावे. .

वेल +१
कमी शिक्षण असेल तर नोकरी मधे फारच कमी पगार देतात .
त्या मानाने साधे छोटे व्यवसाय सुद्धा बरेच पैसे कमवून देऊ शकतात. उदा., योग्य जागी असलेले किराणा दुकान अथवा छोटे हॉटेल वगेरे.
अगदी fc rod ला पोहयाची गाडी पासून सुरुवात करण सुद्धा काही वाइट नाही.
धंदा करायला घाबरु नये. एकदा जम बसला कि छान जमत जात सगळ पुढे.

एकदा माझ्या मैत्रिणीला आणि त्याच दरम्यान माझ्या बहिणीला टाटा मोटर्स च्या नावाने मेल आला होता.
त्यात सायरस मिस्त्री फ़ोटो, टाटाचा लोगो वगेरे होता आणि info बरीच प्रो भाषेत लिहिलेली होती. फॉन्ट नार्मल पेक्षा जरा मोठा होता त्यामुळे शंका येत होती, आणि शेवटी एक अकाउंट नो होता त्यात १०k रु भरायला लावले होते. हा इंटरव्यू करता येण्या जाण्याला लागणारा खर्च आहे ऎसे नमूद होते. Uhoh
आम्ही टाटाच्या साइट पाहिले तिथे स्पष्ट लिहिले होते कोणीतरी आमच्या नावाने फसवणूक करत आहे, आम्ही पैसे मागत नाही अस..

मिलिटरीतही पैसे घेऊन भरती होते हे ऐकुन मला धक्का बसलेला.
या संबंधी सत्य घटना म्हणून ऐकलेली एक गोष्ट.
ऑफिसर पदासाठी केलेले सर्व अर्ज जिथे एकत्रित होतात तिथल्या एका कर्मचार्‍याशी ओळख काढून ज्यांनी अर्ज केले त्यांचे पत्ते मिळवले. त्यातले जे लहान खेडेगावातून आलेले लोक होते, त्यांना पत्रे पाठवली की मुलाखतीसाठी जेंव्हा बंगलोरला स्टेशनवर उतराल तेंव्हा मला १०, ००० रु. फक्त द्या. निवड नाही झाली तर सगळे पैसे परत जायच्या दिवशी परत. निवड झाली तरच पैसे ठेवून घेईन.
तर १०० जण असे पैसे देतात. १०० पैकी दहा जण स्वतःच्या बळावर निवडल्या जातात. त्याचा या माणसाशी काहीहि संबंध नसतो. कारण असल्या कुठल्यातरी माणसाकडून १०००० रु. लाच घेऊन निवड करणे असले प्रकार मिलिटरीत होत नाहीत.
पण मग उरलेल्या ९० लोकांचे प्रत्येकी दहा हजार इमाने इतबारे परत केले तरी दहा जणांचे मिळुन १० * १०,००० इतके रुपये, त्या माणसाला एका आठवड्यात काहीहि न करता मिळतात. शिवाय अत्यंत विश्वासू, अशी प्रसिद्धी होते.

ख. खो. दे. जा.

झक्की, ह्या अशा प्रकारे, 'हव्या त्या' कॉलेज ला अ‍ॅड्मिशन मिळवून देणारी एक व्यक्ती देखील पहाण्यात आहे (ओळखीची वगैरे नाही). पुर्वी त्याचा रेट ५००० रुपये होता. आता माहीत नाही. अ‍ॅब्सोल्यूटली काहीही न करता पैसे मिळवतात ही लोकं.

अहो असे एखादा विषय अड़कला असेल तर पैसे घेऊन सोडवून देणारे सुद्धा आहेत.
(पेपर म्हणजे अभ्यासाचा. यूनिवर्सिटी परीक्षेचा वगेरे)
मागच्या वर्षी ३०हजार एक पेपरला असा भाव होता..

फेरफटका,,, काही कारणांमूळे मला इथे फार डिटेल्स देता येत नाहीत. पण शिक्षण आणि सरकारी नोकरी या क्षेत्रात भारतात प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे. दोन्ही पार्टींचा फायदा होत असल्याने, तक्रारी होत नाहीत. आणि खरंच खुप खेद वाटतोय, हे लिहायला पण ही सर्व यंत्रणा कुठल्याही सरकारला नष्ट करणे शक्य झालेले नाही, होईल याची शक्यताही फार कमी आहे.

दिनेशदा, अगदी खरंय. सगळ्याच यंत्रणा ईतक्या पोखरलेल्या आहेत ना. आणी दुर्दैवानी त्याला काही quick fix नाहीये. माझ्या तरी काही भाबड्या अपेक्षा नाहीयेत.

मला नोक्री मिळेल का , परदेशी कॉल येइइल का असे प्रश्न घेऊन लोक कुंडलीवाल्याकडे जातात.

इथे कुंडलीवालाच प्रश्न विचारतोय हे बघून माझा बुप्रावादी , ब्रह्मद्वेष्टा , अनिसवादी , हिंदूद्वेष्टा , नक्षली , ब्रिगेडी आत्मा कळवळला !

Proud

आता काय सुरु आहे ? जॉब मिळाला का ?

पिंपरी चिंचवड मधल्या हाईवे जवळ एक सुप्रसिद्ध चौकातले एक बऱ्यापैकी हॉटेल, मालक आमचा मित्र झाला (नाना स्कॉच नेहमी टेबल वर मैत्री जोड़तो उत्तम स्कॉच पाजुन) तर स्कॉच न पचणार ह्या माणसाने उत्तम स्कॉच चे ४ पेग नाक दाबून हा हॅ हॅ युक असे करत ढोसल्यावर दिलेली माहिती खालील प्रमाणे

भाऊ ने हाटिल उघडले ते काहीतरी धंदा दिसावा म्हणुन एरवी तो सीजन मधे एडमिशन दलाली करून पैसे कमवितो म्हणजे प्रसिद्ध शिक्षण महर्षि ते सहकार सम्राट अश्या लोकांची अहमदनगर ते कोल्हापुर पट्टा मधे जितकी कॉलेज आहेत तिथे सेटिंग लावुन देतो, डोनेशन च्या २ टक्के उमेदवार अन २ टक्के कॉलेज कडून घेतो अश्याप्रकारे भाईची सीजन ची कमाई २ ते अडीच कोटी असते, आता विचार करा किती एडमिशन होत असतील अन त्या ऊपर किती फिया असतील! इतके पैसे भरून शिक्षण तरी कश्याला घ्यावे म्हणतो मी लायकी नसताना! आम्ही अशी वेळ येता आमच्या दिवट्यांस बार उघडून देऊ एक झाले!

इतके पैसे भरून शिक्षण तरी कश्याला घ्यावे म्हणतो मी लायकी नसताना! >>>> सरकारी नोकऱ्या मिळवून आपली (ना)लायकी अजुन मोठ्या प्रमाणात वापरायला .

अरारा!
हे आज वाचले! असे नको होते करायला - कायद्याच्या कचाट्यात नको होते सापडायला - कानून के हाथ लंबे होते है, वहाँ देर है, मगर अंधेर नही.
http://www.computerworld.com/article/3079224/it-careers/judge-sends-two-...

कायदेशीरपणे सुद्धा भरपूर पैसे मि़ळतात, नि फारसे कष्ट न घेता. बरेचसे भारतीय तसे इथल्या सामान्य लोकांपेक्षा जास्त शिकलेले नि जास्त अक्कल असलेले आहेत त्यामुळे बहुतेकांचे उत्तम चालू आहे. जसे भारतात भोळे, अशिक्षित लोक आहेत तसेच इथेहि.

वाईट म्हणजे इकडे आजकाल सामान्य जनता परदेशातून आलेल्या, विशेषतः मुसलमान, भारतीय, लॅटिनो यांच्यावर फार चिडले आहेत - जसे महाराष्ट्रीय लोक पूर्वी दाक्षिणात्य लोकांवर नि नंतर बिहारी लोकांवर चिडले होते -
खरे असो, खोटे असो, आपले धड चालले नसेल तर त्याचा दोष दुसर्‍या कुणावर तरी ढकलायचा ही जगातल्या सर्वांचीच वृत्ति. महाराष्ट्रात शिवसेना आली तशी इथेहि येईल, नि इथे तर सर्वांकडे गन्स, कठीण आहे.

अमेरिका का घी देखा मगर बडगा (गन) नही देखा असे नको व्हायला.

मला नोक्री मिळेल का , परदेशी कॉल येइइल का असे प्रश्न घेऊन लोक कुंडलीवाल्याकडे जातात.

इथे कुंडलीवालाच प्रश्न विचारतोय हे बघून माझा बुप्रावादी , ब्रह्मद्वेष्टा , अनिसवादी , हिंदूद्वेष्टा , नक्षली , ब्रिगेडी आत्मा कळवळला !

<<इथे कुंडलीवालाच प्रश्न विचारतोय हे बघून माझा बुप्रावादी , ब्रह्मद्वेष्टा , अनिसवादी , हिंदूद्वेष्टा , नक्षली , ब्रिगेडी आत्मा कळवळला !>>
------- (एका शब्दात मान्डायचे तर तुम्ही) कम्युनिस्ट आत्मा..

Pages