नोकरी शोधात होणारी फसवणूक

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:25

आत्ताच थोरल्याचा फोन आला की एक व्हीपीपी आली आहे, ५०० रुपये भरुन सोडवुन घ्यायला सांगत आहे, कुणा SSS Industrial Job Services कडून आली आहे, मी आत्ता पोस्टमनला परत पाठविले आहे, तुम्ही नेटवरुन माहिती काढाल का?
माहिती काढल्यावर त्या नावाच्या एक दोन साईट्स सोडता, बनावट कॉल लेटर्स/गार्बेजची व्हीपीपी पाठवुन होणार्‍या फसवणूकीच्या तक्रारींनी भरलेले गुगलचे पान नजरेस पडले. तत्काळ मुलास फोन करुन सांगितले की ती व्हीपीपी तू घेऊ नकोस, घेतलीस तर फुकाचा फसशील. जी गोष्ट "विकतची" म्हणून तू मागवलेलीच नाहीस, त्याकरता पैसे का भरतोस?
याच संदर्भात पुढील बातमी देखिल पहा
http://www.moneylife.in/article/sss-industrial-job-services-using-postal...

मायबोलीवर "गुन्हेगारी - गुन्हे" याबाबत एकही गृप नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>इथे कुंडलीवालाच प्रश्न विचारतोय हे बघून
कोणी कसला प्रश्न विचारला ? लिंबूने शिर्षक लेखात फसवणूक टाळण्याबद्दल लिहिले आहे.
उगाच भलतीच विधाने टाकून लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न आहे तुमचा.

Pages