तवशाचे लोणचे

Submitted by माधव on 7 September, 2015 - 07:14
tavashi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तवशाचे तुकडे - २ वाट्या
लाल मोहरीची पूड - २-३ चमचे
ऊकळून गार केलेले पाणी - अर्धी ते पाऊण वाटी
पोपटी मिरच्यांची भरड - १ टे. स्पून
मीठ - चवीनुसार

फोडणी:
तेल - ४-५ टी. स्पून
मोहरी
हिंग
हळद

क्रमवार पाककृती: 

१. तवशाची साल आणि बिया काढून त्याचे १ से.मी. चे क्यूब्स करावे
२. पोपटी मिरच्या भरड वाटाव्यात. दगडी खलबत्त्यात वाटल्यास मिरचीहून हिरवे. नाहीतर मिक्सर आहेच.
३. मोहरीची बारीक पूड पाण्यात घालून फेटून घ्यावी
४. त्यातच मिठ घालून घ्यावे
५. हे पाणी, तवशाचे तुकडे, मिरचीचा ठेचा एकत्र करून चांगले ढवळावे
६. गार झालेली फोडणी घालावी

वाढणी/प्रमाण: 
एका माणसाला तीन दिवस पुरू शकते
अधिक टिपा: 

१. तवशे हे माशांशी र्‍हाइमींग असले तरी ते मासे नव्हेत Happy याला श्रावण काकडी असेही म्हणतात.
२. तवशाबद्दल अधिक माहिती गजाने दिली होती. बाफ सापडल्यास लिंक देण्यात येईल.
३. आम्हाला तिखट मिरच्याच लागतात - असे म्हणून लवंगी अथवा काळसर हिरव्या मिरच्या वापरू नयेत. यातली मिरची फक्त स्वादाला आहे. तिखटपणाला नाही.
४. तुमच्या भागात लाल मोहरी मिळत नाही? Import करा. पण काळी मोहरी वापरू नका.
५. मोहरी फेटताना आधी आपल्या क्षमतेचा अंदाज घ्या. चढलेली मोहरी नाकात मस्त झिणझिण्या आणते.
६. फोडी करकरीत असतानाच या लोणच्याची मजा असते. त्यामुळे ४ दिवसांच्या वर ठेऊ नये. फ्रिजमध्येच ठेवावे.
७. लोणचे बनवताना मिठ ठसठशीत असावे. दुसर्‍या दिवशी ते नॉर्मल होते.
८. घेताना नुसतेच किंवा दह्यासोबत खावे आणि भाजीच्या प्रमाणात खावे Happy

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसलेल्या मोहोरीमुळे डोळे कपाळात चढलेत असं वाटलं नाही तर तो फाऊल समजावा खुश्शाल! Proud Wink

आई मस्त करते हे लोणचं. ते खाऊन माझी मैत्रीण पहिल्या घासातच आऊट झाली होती. नाक झिणझिणतंय म्हणून कुरबुरत बसली होती. Wink

Pages