लालबहादुर शास्त्री जयंती......

Submitted by आईची_लेक on 2 October, 2015 - 03:02

images.jpg
आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची ११० वी जयंती
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल

लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते
त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्व.लालबहादुर शास्त्रींना जयंतीदिनानिमित अभिवादन

(२ ऑक्टोंबरला(च) लालबहादुर शास्त्री यांची(ही) जयंती असते हे बहुधा शिकवलेच गेले नव्हते, आठवण तर कुणीच करुन दिली नाही... त्यामुळे तुम्ही इथे आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद Happy )

२ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती हे सहसा कुणी विसरत नाही ,
सगळ्या देशात गांधी जयंती अगदी उत्साहात साजरी केली जाते
पण ' लाल बहादूर शास्त्रीं ' ह्यांना बरेचदा विसरतात लोक म्हणून हा धागा

शास्त्रींना विसरण्याचा शाप आहे
देश त्यांना न चुकता विसरतो हे देशाचे दुर्दैव.

लालबहादूर शास्त्री यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

मनाली, तुमच्या वरील प्रतिसादाशी सहमत.

पण ' लाल बहादूर शास्त्रीं ' ह्यांना बरेचदा विसरतात लोक म्हणून हा धागा >> हे बरोबर आहे.

पण

२ ऑक्टोंबरला(च) लालबहादुर शास्त्री यांची(ही) जयंती असते हे बहुधा शिकवलेच गेले नव्हते, >>> लिंबू तू कोणत्या शाळेत होतास माहीत नाही, मी होतो ती पुण्यातील तेव्हाची अगदी प्रातिनिधिक शाळा होती, व प्रत्येक दोन ऑक्टो. ला दोन्ही फोटो शेजारी ठेवून समारंभ होत असे. त्या शाळेतील अनेक जण/जणी येथे आहेत, त्यांनाही लक्षात असेल Happy

फारेण्डा.... मी
१) नाशिकः कोणते तरी बालक मंदिर रुन्गठा हायस्कुल शेजारचे
२) पुणे: रमणबागेमागचे बालक मंदिर नाव विसरलो
३) पुणे: अभिनवचे आदर्श विद्यालय, केळकर म्युझियम समोर
४) नांदेडः पीपल्स हायस्कूल,
५) पुणे: पेरुगेट भावे हायस्कुल
६) परभणी: बाल विद्या मंदिर

तर या सहा शाळांमधे मला कधीही तू म्हणतोस तसे दृष्य दिसलेही नाही, व कुणी मुद्दामहून आवर्जुन तसे सांगितलेही नाही.
बाकी.... तू म्हणतोस ते....
>>>>>> व प्रत्येक दोन ऑक्टो. ला दोन्ही फोटो शेजारी ठेवून समारंभ होत असे. त्या शाळेतील अनेक जण/जणी येथे आहेत, त्यांनाही लक्षात असेल <<<<<
हे कसे शक्य होते? तु अन बाकी सगळे मॉनिटर/वर्गशिक्षकांच्या गळ्यातले ताईत होतात काय? कारण तेव्हाही २ ऑक्टोंबरला सुट्टीच असायची व सुट्टीचे कारण "शास्त्रींचे" कधीच सांगितले जायचे नाही. (सरकारी परिपत्रक बघितले पाहिजे सुट्ट्यांचे - त्याच्यात तरी नाव होते का ते.. !)
तर सुट्टी असताना शाळेतील "समारंभास" तुम्ही कसे काय हजर रहायचा? तुम्ही नक्कीच स्पेशल किंवा स्कॉलर स्टुडण्ट असणार....... Wink

ओके......
ह्या लिन्का बघ...
१) http://india.gov.in/calendar
या लिन्क वर जे क्यालेन्डर आहे त्यात २ ऑक्टोबरला फक्त
"Mahatma Gandhi's Birthday (G)" इतकेच लिहिले आहे.

२) ही लिन्क बघ
http://pmindia.gov.in/wp-content/uploads/2015/05/Holidays-2015-English.pdf
इथल्या पीडीएफ मधेही फक्त
"1. REPUBLIC DAY
2. INDEPENDENCE DAY
3. MAHATMA GANDHI'S BIRTHDAY
4. BUDDHA PURNIMA
5. CHRISTMAS DAY
6. DUSSEHRA (VIJAY DASHMI)
7. DIWALI (DEEPAVALI)
8. GOOD FRIDAY
9. GURU NANAK'S BIRTHDAY
to. IDU'L FITR
11. IDU'L ZUHA
12. MAHAVIR JAYANTI
13. MUHARRAM
Lt. PROPHET MOHAMMAD'S BIRTHDAY (ID-E-MILAD) " इतकेच दिले आहे.

आता तूच मला सांग की कोणत्या परिपत्रकाद्वारे शाळांमधे लालबहादुर शास्त्रींचीही जयंती साजरी होत असे, किंवा दुसर्‍या शब्दात, कोणते परिपत्रक शाळांना लालबहादुर शास्त्रींचीही जयंती साजरी करण्याची मुभा देत असे?

..........

लिम्ब्या काय मुर्खासारखे विचारत असतो रे.
महात्मा गांधी शास्त्रींपेक्षा श्रेष्ठ आहेत अर्थात तुमचे लोक मानत नसतीलच म्हणा.. पण जगभरातील लोक मानतात म्हणून गांधी जयंती जास्त साजरी होते.. यात शास्त्री यांना बाजुला कुठेच केले जात नाही. पण नतद्रष्ट्र लोक याचे भांडवल करून गावभर चड्डी पकडून बोंबलत फिरतात
उद्या कलाम यांची जयंती कुठल्या चांगली कामगिरी बजावणार्‍या वैज्ञानिकाच्या वाढदिवसाच्या वेळी येत असेल तरी लोक कलाम यांची जयंती साजरी करती.

काहींना खरडून काढण्याची खाज जास्त असते.

ओ पिंटुश की फन्टुश...... इथे वाद जयंती का साजरी होत नाही हा नसुन,
आजच्याच दिवशी त्यांचीही जयंती येते इतकेही साधे शिकवले गेले नाही/जात नाही हा मुद्दा आहे.
माझ्या पहिल्याच पोस्टमधील शेवटचे वाक्य परत नीटपणे वाचा.

शिकवले आहे. आणि शिकवले जाते.काहीजण तर नथुची जयंती देखील साजरी करा म्हणून बोंबलतात.
अश्या विचारसरणीच्या बिनडोकांकडे सरकार लक्ष देत नसते.

लिंबू - गरवारे हायस्कूल. म.ए.सो च्या सर्व शाळांत (पेरूगेट भावे स्कूल, रेणूका स्वरूप ई) हे होत असेल तेव्हा. सुटी असायची का ते लक्षात नाही (बहुधा नसे) पण समारंभ होत असे हे नक्की. उगाच नसलेल्या गोष्टी लिहून बॅलन्स्ड पोस्ट लिहायची मला काहीही गरज नाही.

जौदेरे फारेण्डा....... फार फार मागच्या दूरच्या एण्ड काळातल्या गोष्टी या.... तुला तरी कितीशा लक्षात रहात असणार?
पण माझ्या माहितीप्रमाणे आजची सुट्टी माझ्या जन्मापासूनची आहे.... व सुट्टी असल्याने शाळा नसायची. अन अर्थातच शाळा नसल्याने आदल्या दिवशी मुद्दामहुन कोणी सांगायचेही नाही क्की उद्द्या ना शास्त्रींचीही जयंती आहे....
माझ्या अनुभवातील ही फ्याक्ट मांडली इतकेच.

बाकी इथे आता विनाकारण नथ्थुला आणलच आहे.... ... तेव्हा मी रजा घेतो. Proud

लोकहो भांडू नका

@ पिंटूश
कशाला एवढे विखारी प्रतिसाद देताय , दोन दोन प्रतिसाद दिलेत पण एकाही प्रतिसादात 'लाल बहादूर शास्त्रींना ' अभिवादन नाही

लाल बहादूर शास्त्री सुद्धा खूप मोठे होते ,

ह्या धाग्यावर वाद होतील अस अजिबात वाटलं नव्हत ..:( Sad :अरेरे:......

यात विखारी काय आहे. कैच्याकै प्रश्न उकरून काढतात ते दिसत नाही. राहिले अभिवादन करायचे ते जिथे करायचे तिथे केले आहे.

लिंबाजीमहाराज, सुट्टी गांधी जंयंतीनिमित्ताने असते. कारण गांधीचे निधन (नथुरामने केलेल्या भेकड खुनी हल्ल्यामधे) आधीच झाले होते. लालबहादूर शास्रींची जयंती देखिल २ ऑक्टोबरला असते ही बाब कधिच लपविण्यात आली नव्हती.

जिथे महात्मा गांधींचा उल्लेख होतो तिथे त्यांच्या खुन्याचा देखिल होणारचं, तेव्हा तुम्ही रजा घ्याच.

लिंबूटिंबू, शाळेवर केस ठोका.

मला आठवतंय : शास्त्रींची माहिती आणि महती सांगताना हमखास 'मूर्ती लहान, कीर्ती महान' या म्हणीचा वापर व्हायचा. बाकी गेल्या ३-४ वर्षांपासून गांधींची अ‍ॅलर्जी असलेल्या अनेकांना आजच्या दिवशी हमखास शास्त्रींची आठवण येते हेही नसे थोडके. पण शास्त्री हेही गांधींचेच अनुयायी.

शाळेत असतानाच वाचलेली आणखी एक गोष्ट म्हणजे शाळेत जाण्यासाठी ते रोज नदी पाहून पार करत. एका बागेच्या रखवालदाराकडून पकडले जाण्याबाबतही एक गोष्ट होती.

नक्की कोणता देश शास्त्रींना विसरलाय माहीत नाही. आजही जेव्हा जेव्हा एखादा मोठा रेल्वे अपघात होतो, तेव्हा शास्त्रींची आठवण निघतेच. अशा अपघातानंतर नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणारे रेल्वेमंत्री म्हणून. त्यानंतरही ते नेहरूंच्या मंत्रीमंडळात गृहमंत्री होते.
अगदी गेल्या दहा वर्षांतल्या २ ऑक्टोबरच्या बातम्या पाहिल्या तर पंतप्रधान व इतर महत्त्वाच्या व्यक्तींनी गांधीजयंतीबरोबरच शास्त्रीजयंती साजरी केल्याच्या बातम्या दिसतात.

मनालीआक्का >एकाही प्रतिसादात 'लाल बहादूर शास्त्रींना ' अभिवादन नाही >> तुम्ही महात्मा गांधींना अभिवादन करायला विसरलांत की काय? याच धाग्यावर केलंत तरी चालेल, वेगळा धागा काढण्याची गरज नाही. Wink तसंही आपण अभिवादन केलं म्हणुन शास्त्रीजी-गांधीजी मोठे होत नाहीत. अगदी गांधीजींची गणना 'ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी' अशी केली तरी त्यांची अशी संभावना करणार्‍याची विकृत बाळबुद्धीच त्यातुन दिसते.

शास्त्रींची माहिती आणि महती सांगताना हमखास 'मूर्ती लहान, कीर्ती महान' या म्हणीचा वापर व्हायचा. >>> हो ते नदी पोहून जाणे वगैरेही. 'फाटका, पण स्वच्छ सदरा' हे ही एक कायम लक्षात राहिलेले. बाकी लोक विसरले ला मी बरोबर म्हंटलो ते सर्वसाधारण मीडिया मधे फार येत नाही/नसे म्हणून. शाळेत वगैरे कमी मह्त्त्व दिले असे मलाही वाटत नाही.

जय जवान जय किसान ही बर्‍याच दिवसांनी वाचले. अजून एक लक्षात राहणारी आठवण म्हणजे ६५ साली 'इट का जवाब पत्थर से दे' हे पाक च्या हल्ल्यावर दिलेले उत्तर असलेली व्हिडीओ क्लिप.

स्मृतीस अभिवादन.
आमच्याही शाळेत भाषणे व्हायची तेव्हा गांधी जयंती आणि शास्त्री जयंती दोन्ही उल्लेख व्हायचे. फा म्हणतोय तसे दोन फोटो ही असायचे. वर लिहिलेले सगळे प्रसंग, ६५च्या युद्धात घेतलेली भूमिका, 'जय जवान जय किसान' इ. चा उल्लेख हमखास व्हायचा.
बाकी प्रत्येक पंतप्रधानाच्या जयंतीची सुट्टी नसतेच, त्यामुळे सुट्टी ही गांधी जयंतीचीच.

लिंब्या , शाळेला सुट्टी असली तरी त्या आठवड्यात नंतर कधीतरी कार्यक्रम घेऊन भाषणे ठेवली जातात.

आता तुला तुझ्याच शाळेचे नाव आठवत नाही तर हे कसे आठवणार नै का ?

केवळ सुट्टी दिली म्हणजेच आठवण ठेवणे का ? सुट्टी गांधी जयंतेचीच असते. पण दोघांचे फोटो एक्त्र ठेउन कार्यक्रम होतात.

शास्त्रिजिंना अभिवादन.सारा देश शास्त्रिजिंना अभिवादन करतोय पण मोदींना मात्र वेळ नाही.

शास्त्रींच्या समाधीस्थळी मोदी गेलेच नाहीत!

http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=49193818&section=desh

Can anyone suggest a comprehensive biography on Shastrijee?
Which contains both his part in independence movement, his PM and other ministerial term, personal life along with the mystery surrounding his death.

असू द्या हो पगारेजी.
आपण तो फोटो ७जुलै २०१५ लाच पाहिला तरी बाळाजीपंत आत्ताच पहातायत ना!

खरं तर त्यांची काही चूक नाही.
एका इन्डिया डॉट कॉम नावाच्या साईटवरच कुणी भक्ताने हा मजकूर टाकलाय.

Happy

Pages