उंदीरमामाची टोपी हरवली!

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 15:07

उंदीरमामाची टोपी हरवली

रामराम मंडळी! काय सगळे एकदम खूश ना? 'ताशाचा आवाज तररारा आला न् गणपती माझा नाचत आला'! तुम्हांला जितकी आतुरता असते बाप्पांना भेटायची तितकीच प्रतीक्षा बाप्पाही करत असतात मायबोलीवर अवतरण्याची! मी म्हटलं, "काय गणराज! तुम्हांला मायबोलीशिवाय चैन पडत नाही? हल्ली तर बघावं त्या बाफावर राजकीय मुद्द्यांवरुन लोक हमरीतुमरीवर येत असतात. काही लोक तर म्हणतात वातावरण गढूळ का कायसं झालंय".( टवकारलेत ना कान? मी उंदीरमामा, तुमच्या इथल्या गप्पाही असेच कान टवकारून ऐकत असतो.) तर एक मिश्कील हसू गालावर आणत बाप्पा मला सांगतात कसे - "अरे, ती वादावादी काय खरी नव्हे! खरी मायबोली तर या सगळ्याच्या पलीकडे आहे. गेली १४ वर्षे येतोयस माझ्याबरोबर इथे? इथले काही महत्त्वाचे, प्रसिद्ध धागे वाचलेस का? कितीतरी नवीन ज्ञानवर्धक आणि मनोरंजक माहिती मिळेल. नुसतं या भांडणांवर जाऊ नकोस, शोधलंस तर कित्तीतरी छान छान धागे सापडतील. कधीतरी बुद्धीला खाऊ मिळावा यासाठी धडपड कर!" आता प्रतिष्ठापना झाली आणि म्हटलं लगेच वाचायला चालू करू. एक मस्त धागा सापडला, तो वाचून होतोय तर आमच्या मालकांची हाक आली, आलो लगेच पळतपळत, पण... माझी टोपी पडली की हो तिकडेच कुठेतरी गडबडीत! हो, तीच ती! 'राजा भिकारी, माझी टोपी चोरली'वाली जगप्रसिद्ध टोपी माझी! आता मी काय करु? मला त्या धाग्याचं नाव, नंबर काही सांगता येणार नाही, पण तिथं काय चर्चा चालू होती ते मी आठवेल तसं सांगेन. तेवढ्यावर अस्सल मायबोलीकर मला ती टोपी शोधून देऊ शकतील का?


topee haravlee.jpg

नियम -

१. ही स्पर्धा नाही खेळ आहे.
२. उंदीरमामाची टोपी मायबोलीच्या एका धाग्यावर पडली आहे. ती शोधून द्यायची म्हणजेच त्या धाग्याचे नाव, लिंक द्यायची.
३. उंदीरमामा तुम्हांला त्या धाग्याविषयी काही खुणा, हिंट्स् देतील. थोड्या थोड्या वेळाने एक अशा प्रत्येक धाग्यासाठी पाच खुणा मिळतील.
४. पहिली खूण मिळताच मायबोलीकर शोधाशोध सुरू करून उत्तर देऊ शकतात. पण 'झब्बू'सारखंच, एक आयडी सलग उत्तरासाठी सलग दोन पोस्ट टाकू शकणार नाही.
५. उंदीरमामांसाठी मायबोली म्हणजे जणू परदेश आहे. त्यामुळे त्यांना जसं आठवेल तसे ते खुणा सांगतील. त्यांनी सांगितलेल्या खुणा कधीकधी दिशाभूल करणार्‍याही असू शकतील बरं!

पहिली टोपी
१. आज एक मस्त धागा वाचत होतो, पण तिकडे गेल्यावर मला जरा घाबरायलाच झालं. सगळेजण श्वास रोखून होते!
२. काटकोनांत निसर्ग कसा काय असेल?
३. सगळा खेळ वेगाशी आणि जीवाशी हो!
उत्तर - http://www.maayboli.com/node/9310
विजेती - मृदुला

दुसरी टोपी
१. डोक्याचा भयानक गुंता झाला. तांत्रिक भानगडींनी डोकं भंजाळलं.
२. वर-खाली, उघड-बंद काय-काय बोलणं चालू होतं - काही समजेना!
उत्तर - http://www.maayboli.com/node/13661
विजेती - विनिता.झक्कास

तिसरी टोपी
१. वरवर वाचलं. अगम्य, क्लिष्ट काहीतरी भलत्याच भाषेतलं!
२. मुख्य स्त्रोतच माहीत नाही, पण केली शेवटी लोकांनी मदत.
३. जमलं सुरेख होतं पण अंकांनी फसगत केली सर्वांची.
४. काय एकेक भेटी!
५. एकात उपहास, दुज्यात कल्पनाविलास!
उत्तर - http://www.maayboli.com/node/7713
विजेती - श्रद्धा

चौथी टोपी
१. सुरीने कापा आणि मेणाने चिकटवायला सांगत होते कुणीतरी.
उत्तर - http://www.maayboli.com/node/46736
विजेती - मामी

पाचवी टोपी
१.काल असाच हिंडत हिंडत कुठेतरी पोचलो तर तिथं इतकी मोठी लोकं एकत्र जमली होती. म्हणजे नुसती वयानं नाही हां.. त्यांचं नाव खूप वेळा ऐकलंय सगळीकडे अशी लोकं. मुसलमानांबद्दल काहीतरी बोलत होते तिथे.
२. तिथे तर कुणी प्रसिध्द नृत्यांगना नाचतही होत्या.
उत्तर - http://www.maayboli.com/node/26679
विजेती - अल्पना

सहावी टोपी
१. एक बाई चिडून वर्तमानपत्रात लेख लिहायला निघाल्या होत्या तिथे!
२. बिचारी छोटी मुलं रडताना बघून मी तर गलबलूनच गेलो.
3. बऱ्याचश्या आया आणि काही बाबा लोक तिथे जमले होते. फारच टेन्शनमध्ये दिसत होते.
४. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है.
उत्तर - http://www.maayboli.com/node/20222
विजेती - राजसी

सातवी टोपी
१. केवढी ती चर्चा! नुसती धुमाळी माजलेली.हे का ते, ते का आणखी काही? प्रत्येकजण पुराव्यासहित आपापली मते मांडत होता.
२. या 'वड्या'चं तेल वांग्यावर काढायला उरतच नाही!
उत्तर - http://www.maayboli.com/node/427337
विजेती - वेका

आठवी टोपी
१.अतिशय मुद्देसूद माहिती लिहीली होती तिथे. पण हे सारं तसं खर्चिक बरं का!
२. महत्त्वाचे मुद्दे ठळक करायची स्टाईल आवडली आपल्याला.
३. पुढे काहीही नवीन आलं तरी त्याच्या मागे जुने तुम्हीच.
उत्तर - http://www.maayboli.com/node/17057
विजेती - राजसी

नववी टोपी
१. सुरुवात, चढ-उतार आणि शेवट सगळचं कसं सुरेख!
२. भांडण ही होतं इथे पण शब्दांत नाही..
३. हा भोपळा काही टुणूक टुणूक जात नाही!
४. बॉलिवूडच्या फेमस त्रयींचा बंधु आहे. पण...
५. नाव घेतानाही कानाला हात लावावा अशी ही माणसं नि त्यांची तपश्चर्या..
उत्तर - http://www.maayboli.com/node/51724
विजेती - मैत्रेयी

दहावी टोपी
१. दोन बायकांचीच गोष्ट ती, एखाद्या सिरीअलसारखी!
२. मन मोठं असलं की सगळं काही सामावता येतं, हे घरच्या सर्वांसाठीच बरं का!
३. झाडूने केली गंमत!
४. गोष्ट ती मायबोलीतूनच, पण जरा गोड, रांगडा लहेजा!
उत्तर - http://www.maayboli.com/node/29872
विजेती - कविन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदविनायक - महड
बल्लाळेश्वर - पाली
मयुरेश्वर - मोरगांव
महागणपती - रांजणगाव.
सिध्दीविनायक - सिध्दटेक.
चिंतामणी - थेऊर.
विघ्नेश्वर- ओझर
गिरिजात्मज - लेण्याद्री.

मामा: विजेत्याचं नाव सांगू? इतकं सोपं नाहीये ते! त्यासाठी तुम्हाला हिंदी सिनेमातली गणपतीबाप्पांची तीन गाणी लिहावी लागतील!

Deva ho deva Ganapati deva tumse badhkar kaun
Aur tumhare bhaktajano me hamse badhkar kaun

देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा
ज्वाला सी जलती है आँखो मे जिसके भी
दिल मे तेरा नाम है
पर्वा ही क्या उसका आरंभ कैसा है
और कैसा परिणाम है
धरती अंबर सितारे, उसकी नज़रे उतारे
डर भी उससे डरा रे, जिसकी रखवालिया रे
करता साया तेरा हे देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा

Hey ganpati bappa moriya
Hey ganpati bappa moriya
Ho bappa moriya ho bappa moriya
Hey gazbadan ganesh ji ganesh ji
Meri vinti suniyo re
Hey gazbadan ganesh ji ganesh ji

मामा: अरे वा! आता मलाही उत्साह संचारला नाव घोषित करायला. तर विजेती आहे... सलग आठव्यांदा एक मायबोलीकर स्त्री! राजसी!! या खेळात दोनदा विजयी झाल्याबद्दल राजसी यांचं दणदणीत अभिनंदन!

2015_Gift_iPad.jpg

टोपी होती सावली यांच्या या धाग्यावर http://www.maayboli.com/node/17057
चला नाचूया!
अरे, एक दोन तीन चार
मायबोलीवरच्या पोरी हुशार!!

का फुकट ?? त्यांनी हिंदी म्हटले ना?? >>> अहो मी टाईप केले होते पण त्याधीच तुम्हि पोस्ट केलेत. म्हणुन Happy

Mama, you're giving next clue, right? Happy

Somehow mama knows things I need and getting them as a gift is just sweeter Happy

मामा, अधुन मधुन गणेशोत्सवातल्या मंडळात करतात तशी कॉमेंट्री का करतायेत म्हणे Proud

पुढची टोपी हरवा

Pages