अ‍ॅण्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर

Submitted by टीना on 10 September, 2015 - 18:08

The famous line.. "And they lived happily ever after.."

शेवट यावरच होणार हे माहिती असते तरीही पाहण्याचा मोह टाळता येत नाही.. मलातरी अज्जिब्बात नाही..

तस तर मला इपिक, फण्टॅसी, साय-फाय असले मुव्ही आवडतात..प्रेमात कधी पडली नाहिए आणि आता वेळ नाही पण तरी रील लाईफ रोमान्स बघायला खुप आवडतो.. प्रेमासारखी हळूवार भावना तेवढ्यात तरलतेने, नजाकतीने समोर ठेवणारे चित्रपट बघायला मजा येते.. इथे इंग्रजी चित्रपटांचा धागा आहे पण त्यात सर्वच जॉनर चे चित्रपट एकातच मांडलेले आहेत. त्यातही कुठेकुठे चित्रपट कुठल्या जॉनर चे आहे तेपन लिहिलेल नसल्यामुळे फक्त आणि फक्त रोमँटीक चित्रपटांसाठी हा वेगळा धागा. तुम्ही पाहिलेले आणि तुम्हाला भावलेले असे रोमँटीक जॉनर चे चित्रपट येथे शेअर करा. त्या चित्रपटाबद्दल निदान दोन ओळी लिहाच लिहा. अगदी त्यातले कलाकार, दिग्दर्शक, कुठल्या पुस्तकावर बेतलेला आहे त्याच नाव, गाणी, कथा यापैकी काहिही..

इथे फक्त आणि फक्त बॉलीवूड व्यतिरिक्त सिनेमे मला अपेक्षित आहे ..

मी तर कित्येक फेअरी टेल्स कोळून प्यायलीए.. पण अ‍ॅनिमेटेड मुव्ही साठी हा धागा नको..भलेही सर्वात जास्त मी तेच एंजॉय करते तरीही..

मला आवडणारे काही चित्रपट येथे देते जे बहुतेकांनी पाहिलेले असेलच आणि मी एक दोन धाग्यावर दिलेले सुद्धा आहे तरी जर कुणी पाहिले नसेल आणि माहिती नसेल त्यांच्यासाठी. इतरांना उजळणी होऊ दे..

१. Pride and Prejidice :

Matthew MacFadyen आणि Keira Knightley अभिनित २००५ मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट Jane Austen यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. आर्ट्स पदवीधरांना हि कादंबरी अभ्यासात सुद्धा होती अस ऐकण्यात आहे.
कथा १८ व्या शतकात घडलेली दाखविली आहे ज्यात आपल्या पाच मुलींच्या विवाहाची काळजी असलेली आई आणि त्यामानाने निर्धास्त असलेले वडील त्यांच्यासाठी सुयोग्य, धनवान नवरा शोधण्याच्या घाईत असतात.
खुप काही बोलता येईल या चित्रपटाबद्दल पण मग ते समिक्षण होउन जायचं .. माझ्या टॉप टेन मधे सर्वात जास्त आवडता चित्रपट हा..

2. Seducing Mr. Perfect :

Daniel Henney आणि Uhm Jung-hwa अभिनित २००६ मधे प्रदर्शित झालेला हा साऊथ कोरियन चित्रपट आहे. आपल्या प्रियकराबाबत अतिशय संवेदनशील आणि समर्पित वृत्ती असणारी त्याच्यावर भरभरुन प्रेम करणारी एक मुलगी आणि नविनच आलेला सर्व गोष्टींना व्यावहारिक रित्या हॅण्डल करणारा बॉस अशा दोन व्यक्तीरेखेमधे घडणारी हि गोष्ट.
मला वाटत यावर सुद्धा मी लेख लिहेल म्हणुन इथच थांबते.. नक्की पाहावा असा चित्रपट..

3. The Proposal :

Ryan Reynolds आणि Sandra Bullock अभिनित २००९ मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉसी लेडी बॉस आणि तिच्याहाताखाली काम करणारा होतकरू, खुद्द एडीटर बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या असिस्टंट मधली केमिस्ट्री दाखवतो.
त्या दोघांमधले राग लोभ, वयाच्या १६व्या वर्षी आईवडील दुरावल्यानंतर त्या मुलीने स्वतःमधे केलेले बदल, वडिलांच्या अपेक्षा आणि स्वतःची आवड या दोहोंमधे पिचलेला मुलगा, आणि त्याच्यावर प्रचंड प्रेम करणारी त्याची आई आणि ग्रॅनी..मस्तच दाखवलय सगळ..

4. Leap Year :

Amy Adams आणि Matthew Goode मुख्य भुमिकेत असणारा २०१० मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट ४ वर्ष रिलेशनशिप मधे असुनही लग्नासाठी प्रपोज न केलेल्या प्रियकरामागे आणि लिप इयरला प्रपोज केल्यावर तुमच लग्न शेवटपर्यंत टिकत या श्रद्धे अंधश्रद्धेपायी दौर्‍यावर असलेल्या आपल्या प्रियकरामागे धावत असलेल्या तरुणीची आणि तिथ जातेवेळी स्वतःच हॉटेल वाचवण्यासाठी पैस्याची निकड असल्यामुळे तिला मदत करणार्‍या एका तरुणाची कथा दाखवतो..
हलकापुलका असलेला छान चित्रपट..

5. The Lake House :

Sandra Bullock आणि Keanu Reeves मुख्य भुमिकेत असणारा मुळ साऊथ कोरियन असलेल्या Il Mare या चित्रपटाचा रिमेक आहे.
२००४ मधे जगत असलेला एक आर्किटेक्ट आणि २००६ मधे असणारी एक डॉक्टर यांची हि प्रेमकथा. विषय जरासा साय-फाय फण्टॅसी असला तरी चित्रपट मला आवडला. कदाचित दोन्ही आवडते कलाकार असल्यामुळे सुद्धा असावं.
एका लेक हाउस मधे राहणारी ती डॉक्टर तिच्यानंतर येणार्‍या टेनंट साठी घराबाहेर असणार्‍या मेलबॉक्स मधे पत्र ठेवते आणि त्यानंतर सुरु होतो तो पत्रांचा सिलसिला..छान कहानी आहे..त्या दोघांबरोबर आपणसुद्धा ते केव्हा भेटणार यासाठी आतुर होउन जातो..

तर सद्ध्या हे पाचच देतेय. समोर टाकेलच..
चित्रपटांचे पोस्टर जालावरुन्/विकीवरुन..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्ट धागा Happy

कभी हा कभी ना.
चाकोरी बाहेरची लव्ह स्टोरी.
हिरोईन साईडहिरोला मिळते.
हिरोबद्दल आपल्याला त्या क्षणी वाईटच वाटते, अगदी हिरोईनचे मन पलटून तिने हिरोच्या प्रेमात पडावे असे वाटते.
पण त्यानंतर शेवटच्या द्रुश्यात पाहुणी कलाकार बरोबर हिरो जसा वागतो ते बघून आपल्या चेहर्यावर नकळत हास्य फुलते.. वाटते, अरे हा बंदा सहीच आहे, याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायची गरज नाही, हा आपल्या लाईफमध्ये हॅप्पी होईलच Happy

हे विश्वासार्ह वाटावे असे ते कॅरेक्टर उभारले गेलेय यातच या चित्रपटाचे यश लपलेय. जिथे शाहरूखला पर्यायच नाही अश्या चित्रपटांपैकी एक म्हणून त्याच्या प्रेमपटातील माझा सर्वाधिक आवडता चित्रपट !

ऋन्मेऽऽष मित्रा,

सगळी कडे शाखा आणण्याची काही गरज आहे का ? Sad
प्रतिसाद टाकायची आणि शाखा ला आणण्याची इतकी घाई आहे तुला की टीना ने बोल्ड मधे टाकलेली इथे फक्त आणि फक्त बॉलीवूड व्यतिरिक्त सिनेमे मला अपेक्षित आहे .. ही लाईन ही दिसु नये ?

**प्रेमात कधी पडली नाहिए आणि आता वेळ नाही ***
ठीक आहे.

रोमन हॅालिडे लिस्टमध्ये बसेल काय?
( they died happily ever after नावाचा मात्र मृत्यु संबंधी होता)

50 First Dates - एक सुंदर पण जगावेगळी लव्ह स्टोरी - जरुर जरुर पहाणे - एका अपघातात शॉर्ट मेमरी लॉस (anterograde amnesia ) झालेल्या मुलीची कहाणी

ब्लाईंड डेटिंग - ही पण एक अति तरल पद्धतीने मांडलेली लव्ह स्टोरी - एक अंध मुलगा आणि भारतीय मुलगी

Little Manhattan - एका किशोरवयीन मुलाची प्रेमकथा - अगदी वेगळ्या पद्धतीची मांडणी ...

You have got a mail!

Teena, if you like pride and prejudice then do watch 1995 bbc series of P&P with Colin Firth. It's a mini series of six 1 hour long episodes and does justice to the book.

माझी ऑल टाईम मोस्ट फेव मूवी,' The Bridges of Madison County' मोस्ट हँडसम ,क्लिंट ईस्टवुड आणी मोस्ट पॉवरफुल अ‍ॅक्टर ,' मेरिल स्ट्रीप'
लेखक Robert James Waller.च्या कादंबरी वर आधारित आहे हा सिनेमा.

प्रेम हरवलेल्या लग्नात अडकून बसलेल्या एका गृहिणी च्या जीवनात एका भटक्या फोटोग्राफर चा अपघाती प्रवेश होतो.
ते चार दिवस ,तिला जन्मभर पुरतील असे निखळ प्रेमाचे क्षण देऊन जातात.
अ मस्ट वॉच!!

व्हॉट हॅपन्स इन व्हेगास : मी केवळ अ‍ॅश्टन कचरसाठी बघते

२७ ड्रेसेस : खूप मस्त पिक्चर आहे.

ब्रेजेट जोन्स डायरी: हा एक कधीही पाहण्यासारखा पिक्चर. ह्यु ग्रांट आहे.

नॉटींग हिल : यातही तोच आहे पाहण्यासारखा. याचा शेवट मला फार आवडतो. प्रेस कॉनमध्ये तो तिच्याशी बोलतो तो प्रसंग. \

इटर्नल सनशाईन ऑफ अ स्पॉटलेस माईण्डः काय आणि किती लिहिणर जिम कॅरी केवल अफलातून

मेड इन मॅनहॅटनः जेनिफर आणि राल्फ फिन्स काय मस्त काम करतात.

प्रिन्सेस डायरीजः यात जुली अँड्रूजचं काम कसलं भारी आहे. मी हा पिक्चर कितीहीवेळा बघेन. अ‍ॅना हॅथवेचं काम पं चांगलं आहे, पण विनर ज्युलीच.

पेनेलोपे : हा माझा आवडता पिक्चर आहे.

अमेरिकास स्वीटहार्ट्स: याची कथा तर मस्त आहेच पण कास्टिंग अफलातून आहे.

(अजून आठवतील तसे)

मस्त संकलन! फक्त lived happily ever after लिहीयचेत का? की इतरही रोमांटिक चालतील? Pride and Prejudice आणि The Praposal ... सुपर्ब आहेत! तसाच मनापासून आवडलेला The Notebook!

पुरंदरे शशांक +१

50 First Dates खरच सुरेख आहे!

500 days of summer - एका मुलाने समर (summer) नावाच्या मुलीबरोबर घालवलेल्या ५०० दिवसांची कहाणी. कुठेही अतिरंजित प्रसंग नाही, माकडचाळे नाही तरीही नर्म विनोद आणि प्रत्येकाला आवडेल अशा पद्धतीने केलेली प्रेमकथेची मांडणी!

Annie Hall - एक डिरेक्टरने आपल्या लीड अ‍ॅक्ट्रेसबरोबर आपलं रिलेशन का पुढे सरकत नाही याचा घेतलेला मागोवा! बेस्ट वूडी अ‍ॅलन फिल्म, इनफ सेड!

Silver Linings Playbook - एक नुकताच सायकॅट्रिक ट्रीटमेंटमधून सावरलेला तरुण आपल्या बायकोबरोबर जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. एक विधवा तरुणी त्याला यात मदत करेल जर त्याने तिच्याबरोबर एका नृत्यस्पर्धेत भाग घेतला तर. जेनिफर लॉरेन्ससाठी तरी बघावाच! आणि टीना तुला बघायाल ब्रॅडले कूपर हे कारणही पुरेसे ठरावे Happy

अजून कोणी रिचर्ड गिअरच्या फिल्म्सविषयी कसकाय नाही लिहिलंय? Officer and Gentleman, Preety Woman, Autumn in New York हे खास आवडलेले आणि कैक इतर Happy

प्रीटी वूमनबद्दल लिहत होते. Proud आता पोस्ट एडीट न करता इथंच लिहिते.

अत्यंत आवडती प्रेमकहाणी आहे. मॉडर्न स्टाईल असली तरी हिचा आत्मा फेअरीटेल्सचाच आहे, म्हणूनच उलट फार आवडते. यामध्ये रीचर्ड गीअरपेक्षा ज्युलिया फार आवडली आहे.

च्यामारी हे जॉनर कधीच पहिले नाही मी अगदी झोप येत नसे तेव्हा सुद्धा! (कृपया हलके घेणे)

तरीही काही सेलेक्टिव लव स्टोरी आवडल्या त्यात

१ कासाब्लांका
२ टाइटेनिक
३ मिस्टर एंड मिसेस स्मिथ
४ तुम्ही इथे एनिमेटेड जॉनर नको म्हणालात खऱ्या पण एक उल्लेख द्यायचा मोह टाळता येत नाहीये ते म्हणजे एनिमेटेड चित्रपट "अप" मधील कार्ल अन एली ची लव स्टोरी!! ५ मिनट मधे एनीमेशन वापरून जी काही लव स्टोरी आहे (कार्ल अन एली शेंबड़ी पोरे असणे ते एली च्या वृद्धापकाळा ने झालेल्या मृत्यु न मोड़कळी ला आलेला अन तुसडा कार्ल) अक्षरशः निरलस प्रेम personified आहे! अन ५ मिनिटांची क्लिप भल्या भल्या मेनस्ट्रीम रोमॅंटिक सिनेमांस मुस्काड़ीत मारल इतक्या प्रेमाने अन डिटेल्ड बनवलेली आहे!.

ब्रेक्फास्ट अ‍ॅट टिफनीज ( ऑड्री हेपबर्न ! ही असेल तर आपलीच तिच्याबरोबर लव्ह स्टोरी सुरू होते Wink )
रोमन हॉलीडे
हौ टू स्टील अ मिलियन
चराड ( हे सर्व ऑड्री)
वॉक इन द क्लाउड

माझे आवडते जॉनर.

द नोटबुक

रोमन हॉलिडे - त्याच्याच घरात ती त्याला 'यू हॅव माय परमिशन टू विथ्ड्रॉ!' सांगते.. कमाल. द ऑड्री हेपबर्न आणि द ग्रेगरी पेक. अजून काय सांगणार.

डेव्हिल वेअर्स प्राडा - मेरील स्ट्रीप.. बस नाम ही काफी है

डर्टी डान्सिंग - हा बघितलेला नसेल तर काय पाह्यलं आयुष्यात. Wink

मुलँ रूश

लीगली ब्लाँड - दोन्ही. पण पहिल्यात जास्त मजा आहे.

सध्या पटकन एवढेच आठवतायत.

नायक आणि नायिकेचे "चला...आता सारे काही ठीक झाले...राहतील सुखाने" अशी सुप्त इच्छा रसिकाच्या मनी असतेच पण आपल्या भारतीय मनाला त्या दोघांचे मिलन याचा अर्थ शेवटी शुभमंगल सावधान झाले असा सूर ध्वनीत होणे फार भावत असल्यामुळे "अ‍ॅन्ड दे....." ची व्याख्या अगदी तशीच केली जाते. पण इंग्रजी चित्रपटाच्या दृष्टीने "शेवटी ते सुखाने राहू लागले..." याचा अर्थ अनेक प्रकारे होऊ शकतो. "रोमन हॉलिडे" मधील राजकन्या त्या वार्ताहरावर प्रेम करते हे दाखविले आहेच पण तिला हेही चांगलेच ठाऊक आहे की पहाटेपूर्वी आपल्याला राजवड्यात परतायला हवे...कायमचे. त्यालाही आपली मर्यादा माहीत असल्याने तो तर तिला राहाण्याचा आग्रहही करू शकत नाही....होतात दूर मग परिस्थितीनुसार....ती आपल्या परंपरेच्या मार्गाने जाते तर हा आपल्या दैनंदिन कामाकडे वळतो....पण दोघेही दु:खी अजिबात नाहीत...हुरहूर लागत राहाणर ताटातुटीची हे नक्की....पण त्यात सुख मानतील ती जोडी....यालाच "....and they lived happily thereafter" असेच म्हणावे लागेल.

२. अ‍ॅनी हॉल....वुडी अ‍ॅलन आणि डायना कीटन यांचा हा चित्रपट अशाच जवळकीचे आणि नंतर मिलन होत नसले परिस्थितीनुसार तर दूर राहूनही आपण एकमेकावर प्रेम करू शकतो याची जाणिव झाल्याने ही जोडीही शेवटी सुखात राहते असे हे कथानक. "सर्वोत्कृष्ट चित्रपट.....सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक....सर्वोत्कृष्ट अभिनेत्री" असे ऑस्कर्स मिळविणारा हा चित्रपट प्रेक्षकांना सांगतो की दूर होण्याची वेळ जरी आली तरी पर्स्परांविषयी कटुता निर्माण न होता आपण एकमेकाविषयी सौहार्दाची भावना मनी ठेवू शकतो....स्त्री पुरुषांचे नाते कितीही गुंतागुंतीचे... प्रसंगी क्लेश देणारे असले तरीही त्याची आपल्याला गरज भासतेच...चित्रपटाचा हा संदेश तसे पाहिले तर सुखाकडेच नेणारा होता. अतिशय गाजलेला चित्रपट.

३. फार फ्रॉम मॅडिंग क्राऊड ~ खास ज्युली ख्रिस्तीच्या अभिनयाचा गौरव करण्यासाठीचा हा चित्रपट. म्हटला तर सुखांत शेवट आहे, तरीही त्याच्या मागे दु:खाची तीव्र झालर आहेच. स्वतः शेतकरी बनून गावातील शेती करून गुजराण करणारी एक तरुणी (ज्युली ख्रिस्ती) आणि तिच्या आयुष्यात एका मागोमाग आलेले तीन तरुण... तिच्या मनाची घालमेल आणि गावातील वातावरण....यामध्ये ती जवळपास उद्ध्वस्त होते तरीही शेवटी प्रेमात जो सर्वात शांत राहिलेला असतो त्याच्यासोबत ती सुखाने राहाण्याचा निर्णय घेते.

सध्या इतकेच.

Indecent Proposal - All time best.. especially the last drive where Robert Redford lets Demi Moore go back to her life!!

Ghost - Again Demi Moore

Two Weeks Notice

वरचे सगळेच मस्त आहेत

वन फाईन डे (क्लूनी, मिशेल फायफर)
म्युझिक अँड लिरिक्स (ह्यू ग्रांट, ड्रयू बॅरीमोर)
नाईन मंथ्स ( ह्यू , जूलियन मूर)

हे आता आठवत आहेत

इथे फक्त आणि फक्त बॉलीवूड व्यतिरिक्त सिनेमे मला अपेक्षित आहे ..
>>>
उप्स हे वाचण्यात आले नव्हते, लिस्टमध्ये सारेच ईंग्रजी चित्रपट बघून पुर्ण हेडर वाचणे झाले नाही. इनफॅक्ट तरीच मी विचार केला होता की सारेच चित्रपट ईंग्रजीच का म्हणून Happy
असो, क्षमस्व

The mirror has two faces
Intolerable cruelty
Entrapment
A lot like love
Deja vu
The next three days
Knight and Day
Dragonfly
वेडिंग प्लानर
How to loose a guy in 10 days

Apart from what has written up Happy

Pages