अ‍ॅण्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर

Submitted by टीना on 10 September, 2015 - 18:08

The famous line.. "And they lived happily ever after.."

शेवट यावरच होणार हे माहिती असते तरीही पाहण्याचा मोह टाळता येत नाही.. मलातरी अज्जिब्बात नाही..

तस तर मला इपिक, फण्टॅसी, साय-फाय असले मुव्ही आवडतात..प्रेमात कधी पडली नाहिए आणि आता वेळ नाही पण तरी रील लाईफ रोमान्स बघायला खुप आवडतो.. प्रेमासारखी हळूवार भावना तेवढ्यात तरलतेने, नजाकतीने समोर ठेवणारे चित्रपट बघायला मजा येते.. इथे इंग्रजी चित्रपटांचा धागा आहे पण त्यात सर्वच जॉनर चे चित्रपट एकातच मांडलेले आहेत. त्यातही कुठेकुठे चित्रपट कुठल्या जॉनर चे आहे तेपन लिहिलेल नसल्यामुळे फक्त आणि फक्त रोमँटीक चित्रपटांसाठी हा वेगळा धागा. तुम्ही पाहिलेले आणि तुम्हाला भावलेले असे रोमँटीक जॉनर चे चित्रपट येथे शेअर करा. त्या चित्रपटाबद्दल निदान दोन ओळी लिहाच लिहा. अगदी त्यातले कलाकार, दिग्दर्शक, कुठल्या पुस्तकावर बेतलेला आहे त्याच नाव, गाणी, कथा यापैकी काहिही..

इथे फक्त आणि फक्त बॉलीवूड व्यतिरिक्त सिनेमे मला अपेक्षित आहे ..

मी तर कित्येक फेअरी टेल्स कोळून प्यायलीए.. पण अ‍ॅनिमेटेड मुव्ही साठी हा धागा नको..भलेही सर्वात जास्त मी तेच एंजॉय करते तरीही..

मला आवडणारे काही चित्रपट येथे देते जे बहुतेकांनी पाहिलेले असेलच आणि मी एक दोन धाग्यावर दिलेले सुद्धा आहे तरी जर कुणी पाहिले नसेल आणि माहिती नसेल त्यांच्यासाठी. इतरांना उजळणी होऊ दे..

१. Pride and Prejidice :

Matthew MacFadyen आणि Keira Knightley अभिनित २००५ मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट Jane Austen यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. आर्ट्स पदवीधरांना हि कादंबरी अभ्यासात सुद्धा होती अस ऐकण्यात आहे.
कथा १८ व्या शतकात घडलेली दाखविली आहे ज्यात आपल्या पाच मुलींच्या विवाहाची काळजी असलेली आई आणि त्यामानाने निर्धास्त असलेले वडील त्यांच्यासाठी सुयोग्य, धनवान नवरा शोधण्याच्या घाईत असतात.
खुप काही बोलता येईल या चित्रपटाबद्दल पण मग ते समिक्षण होउन जायचं .. माझ्या टॉप टेन मधे सर्वात जास्त आवडता चित्रपट हा..

2. Seducing Mr. Perfect :

Daniel Henney आणि Uhm Jung-hwa अभिनित २००६ मधे प्रदर्शित झालेला हा साऊथ कोरियन चित्रपट आहे. आपल्या प्रियकराबाबत अतिशय संवेदनशील आणि समर्पित वृत्ती असणारी त्याच्यावर भरभरुन प्रेम करणारी एक मुलगी आणि नविनच आलेला सर्व गोष्टींना व्यावहारिक रित्या हॅण्डल करणारा बॉस अशा दोन व्यक्तीरेखेमधे घडणारी हि गोष्ट.
मला वाटत यावर सुद्धा मी लेख लिहेल म्हणुन इथच थांबते.. नक्की पाहावा असा चित्रपट..

3. The Proposal :

Ryan Reynolds आणि Sandra Bullock अभिनित २००९ मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉसी लेडी बॉस आणि तिच्याहाताखाली काम करणारा होतकरू, खुद्द एडीटर बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या असिस्टंट मधली केमिस्ट्री दाखवतो.
त्या दोघांमधले राग लोभ, वयाच्या १६व्या वर्षी आईवडील दुरावल्यानंतर त्या मुलीने स्वतःमधे केलेले बदल, वडिलांच्या अपेक्षा आणि स्वतःची आवड या दोहोंमधे पिचलेला मुलगा, आणि त्याच्यावर प्रचंड प्रेम करणारी त्याची आई आणि ग्रॅनी..मस्तच दाखवलय सगळ..

4. Leap Year :

Amy Adams आणि Matthew Goode मुख्य भुमिकेत असणारा २०१० मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट ४ वर्ष रिलेशनशिप मधे असुनही लग्नासाठी प्रपोज न केलेल्या प्रियकरामागे आणि लिप इयरला प्रपोज केल्यावर तुमच लग्न शेवटपर्यंत टिकत या श्रद्धे अंधश्रद्धेपायी दौर्‍यावर असलेल्या आपल्या प्रियकरामागे धावत असलेल्या तरुणीची आणि तिथ जातेवेळी स्वतःच हॉटेल वाचवण्यासाठी पैस्याची निकड असल्यामुळे तिला मदत करणार्‍या एका तरुणाची कथा दाखवतो..
हलकापुलका असलेला छान चित्रपट..

5. The Lake House :

Sandra Bullock आणि Keanu Reeves मुख्य भुमिकेत असणारा मुळ साऊथ कोरियन असलेल्या Il Mare या चित्रपटाचा रिमेक आहे.
२००४ मधे जगत असलेला एक आर्किटेक्ट आणि २००६ मधे असणारी एक डॉक्टर यांची हि प्रेमकथा. विषय जरासा साय-फाय फण्टॅसी असला तरी चित्रपट मला आवडला. कदाचित दोन्ही आवडते कलाकार असल्यामुळे सुद्धा असावं.
एका लेक हाउस मधे राहणारी ती डॉक्टर तिच्यानंतर येणार्‍या टेनंट साठी घराबाहेर असणार्‍या मेलबॉक्स मधे पत्र ठेवते आणि त्यानंतर सुरु होतो तो पत्रांचा सिलसिला..छान कहानी आहे..त्या दोघांबरोबर आपणसुद्धा ते केव्हा भेटणार यासाठी आतुर होउन जातो..

तर सद्ध्या हे पाचच देतेय. समोर टाकेलच..
चित्रपटांचे पोस्टर जालावरुन्/विकीवरुन..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Maleficent एक वेगळ्या स्वरुपातील परीकथा आहे. Sleeping Beauty मधली चेटकी म्हणजे Maleficent.

पण यात Sleeping Beauty चीच कथा वेगळ्या आणि अधिक पटणार्‍या स्वरुपात मांडली आहे. परीकथाच आहे त्यामुळे अद्भूत, चमत्कारीक घटना आहेतच पण Maleficent चेटकी का बनते, ती शाप का देते, hypocrite पर्‍या आणि राजासमोर गोंडा घोळायची वृत्ती हे सगळे बघताना खूप पटत राहते आणि परीकथा खूप मस्त एंजॉय करता येते. झोपलेल्या राजकन्येला जागी करणारा किस आणि त्यामागचे रहस्य तर अफलातून आणि अत्यंत लॉजीकल आहे. याला म्हणतात सिनेमॅटीक लिबर्टी - अत्यंत लॉजीकल मांडणी आहे. नाहीतर आपल्याकडे सिनेमॅटीक लिबर्टी याखाली राणीला लावणी करताना दाखवले जाते आणि परत सिनेमा ऐतिहासीक आहे असेही म्हटले जाते Happy

एंजेलीना मला फारशी आवडत नाही. पण या चित्रपटात तिच्या त्या अँग्यूलर चेहर्‍याचा खूप मस्त वापर करून घेतला आहे. आणि तिनेही अत्यंत सुंदर काम केले आहे.

रुढार्थाने ही प्रेमकथा अजीबात नाहीये पण तरी सुखान्त परीकथा आहे म्हणून इथे लिहिलय. Happy

एंजेलीना मला फारशी आवडत नाही. पण या चित्रपटात तिच्या त्या अँग्यूलर चेहर्‍याचा खूप मस्त वापर करून घेतला आहे. आणि तिनेही अत्यंत सुंदर काम केले आहे.>> खुप ग्रेसफुल वाटते ती यात.. मला जाम आवडली ती तिच्या गेटअप मधे..

झोपलेल्या राजकन्येला जागी करणारा किस आणि त्यामागचे रहस्य तर अफलातून आणि अत्यंत लॉजीकल आहे. याला म्हणतात सिनेमॅटीक लिबर्टी>> आय लव्हड इट टू..

बरेचदा बघीतलेला आहे..तरी मज्जा येते..
अ‍ॅनिमेशन खतरनाक आहे..
सुरुवातीची छोटूकली प्रिन्सेस (जेव्हा मॅलेफिसंट तिला कडेवर उचलून घेते ती) अँजी ची मुलगी आहे..
त्या दोघींच बाँडींग खुप क्लास दाखवलेल आहे.. Diaval सुद्धा मस्त दाखवलाय.. Happy

मी Seducing Mr. Perfect ३ वर्षाआधी पाहिला होता.प्रचंड आवडला होता.
डॅनियल हेनी my Name is kim sam soon या ड्रामा मध्ये पण आहे. doctor दाखवला आहे त्यात, second lead आहे पण very cute yaar...
काल केट अँड लिओपोल्ड पाहिला आणि ठार झाले..... काय जबरी काम केलंय त्या अॅक्टरने, मार डाला यार!!!
Crazy Little Thing Called Love पण मस्त movie आहे. Thai language जरा ऐकायला कठीण जाते पण मस्त movie आहे. माझ्या friends ला मी बळजबरीने मागे लागून पाहायला लावला. पहिली दहा मिनिटं जरा रागात होते सगळे....पण मग जो movie enjoy केला त्यांनी की बास..its a simple love story, teenage love, pan end of the movie too good!!

Crazy Little Thing Called Love >> बघावी लागेल..

काल केट अँड लिओपोल्ड पाहिला आणि ठार झाले..... काय जबरी काम केलंय त्या अॅक्टरने, मार डाला यार!!!>> नाय नाय नाय.. तो अ‍ॅक्टर नाय.. ह्यु जॅकमन.. देवा.. आय जस्ट लव्ह हिम.. तो अ‍ॅक्टर अस म्हणायच नाहीच.. ह्यु जॅकमनच... आता अस नको म्हणु कि तुला वुल्वरिन नाही माहिती..

तो अ‍ॅक्टर अस म्हणायच नाहीच.. ह्यु जॅकमनच... आता अस नको म्हणु कि तुला वुल्वरिन नाही माहिती.....

माफी सरकार!!!! पण खरंच मला माहीत नव्हता .. ह्यु जॅकमन... मग वुल्वरिन तरी कसा माहित असणार?
actually i know the name pan नेमका हाच तो आहे हे माहित नव्हतं. पण आता माहित झाला चांगलाच, आवडला पण जाम‍‍‍!!!! so thanks a lot !!!
by the way, प्रेमम नावाचा मलयाळी movie पण मस्त आहे. music पण छान आहे त्यााचे, तमिळ मध्ये पण काही चांगले movies आहेत असे ..आणि कोरियन पण आहेत काही. ...निवांत झाले की list टाकते.

crazy little thing called love पाहायचा असेल तर ही लिंक वापरा
http://www.veoh.com/watch/v2068781384ahN8bZ
http://www.dailymotion.com/video/x2smds9

त्याचा Someone like you हा सिनेमा सुद्धा बघ..मस्त आहे..
त्याच्याबद्दल काय बोलाव.. He is a complete package..

AddEmoticons04225.gif

काही दिवसांपूर्वी 'लव्ह रोझी' नावाचा चित्रपट बघीतला...
मस्ताय.. क्युट..
त्यातली रिलेशनशीप आय मीन फ्रेंड्स फेल इन लव्ह वगैरे मला पचत नाही पण त्या दोघांमधली मैत्री बहोत मस्त दाखवली आहे.. मज्जा आली बघताना.. Happy

Rom-com चित्रपट मला खूप आवडतात. इथे येण्यापूर्वी पाहिलेले आणि आवडलेले चित्रपट
27 dresses
Devil wears prada - Meryl Streep तिचा पाहिलेला हा पहिला चित्रपट. फिदा तिच्यावर.
Pretty woman - Richard Gere प्रेमात पडावा असा.
50 first dates
Runaway bride
You've Got Mail
Little Manhattan
What happens in Vegas
French Kiss

इंग्रजी चित्रपट पहायला नुकतीच सुरुवात केली होती
आता ईथे वाचून पाहिलेले चित्रपट
The proposal - किती पारायणं केली माहित नाही. खूप म्हणजे खूपच आवडला.
when harry met sally
Maleficent - माधव ने या चित्रपटाबद्दल जे लिहिले आहे ते सगळं +१
The lake house
Sleepless in Seattle
the princess diaries
The notebook
Two Weeks Notice
No strings attached - Ashton Kutcher खूप आवडला. म्हणून A lot like love पण पाहिला.
Shall we dance - again Richard Gere.
One fine day
Sweet Home Alabama
The holiday - मस्तच आहे

२ आठवड्यापूर्वी Seducing Mr. Perfect पाहिला आणि आतापर्यंत ५ पारायणं झाली. Daniel Henney एकदम कातिल दिसला आहे. शेवटची २ पारायणं त्याचे expressions (परत परत) पहाण्यासाठी पाहीला. त्याच्यासाठीच Shanghai Calling पण पाहिला. पण फार नाही आवडला.
या चित्रपटामुळे अजून २ कोरियन चित्रपट पाहिले
The Beast and the Beauty
My sassy girl.
दोन्ही आवडले.

अजूनही बरेच चित्रपट बाकी पहायचे आहेत.
Now watching - While you were sleeping

प्राचीस,
My Littke Bride हा कोरियन चित्रपट सुद्धा पाहा.. आवडेल तुला..

Locked down वाढला . सगळ्या वेबसिरीज पाहून संपवल्या असतील तर जरा मूड change करण्यासाठी ....
जनहितार्थ

सुंदर धागा टीना.....
माझ्या लिस्ट मध्ये
१.Perfect stranger-(old movie)..
मी १४-१५ ची होते त्यावेळेस...कुठे बघितला काही आठवत नाही...पण आजपर्यंत मनात घर करून आहे ती मूव्ही...कुठे सापडत पण नाहीये.
२. While you were sleeping-
सुंदर चित्रपट.

200 pounds beauty, South Korean musical romantic comedy film नक्की बघा. खूप मस्त आहे.

Pages