The famous line.. "And they lived happily ever after.."
शेवट यावरच होणार हे माहिती असते तरीही पाहण्याचा मोह टाळता येत नाही.. मलातरी अज्जिब्बात नाही..
तस तर मला इपिक, फण्टॅसी, साय-फाय असले मुव्ही आवडतात..प्रेमात कधी पडली नाहिए आणि आता वेळ नाही पण तरी रील लाईफ रोमान्स बघायला खुप आवडतो.. प्रेमासारखी हळूवार भावना तेवढ्यात तरलतेने, नजाकतीने समोर ठेवणारे चित्रपट बघायला मजा येते.. इथे इंग्रजी चित्रपटांचा धागा आहे पण त्यात सर्वच जॉनर चे चित्रपट एकातच मांडलेले आहेत. त्यातही कुठेकुठे चित्रपट कुठल्या जॉनर चे आहे तेपन लिहिलेल नसल्यामुळे फक्त आणि फक्त रोमँटीक चित्रपटांसाठी हा वेगळा धागा. तुम्ही पाहिलेले आणि तुम्हाला भावलेले असे रोमँटीक जॉनर चे चित्रपट येथे शेअर करा. त्या चित्रपटाबद्दल निदान दोन ओळी लिहाच लिहा. अगदी त्यातले कलाकार, दिग्दर्शक, कुठल्या पुस्तकावर बेतलेला आहे त्याच नाव, गाणी, कथा यापैकी काहिही..
इथे फक्त आणि फक्त बॉलीवूड व्यतिरिक्त सिनेमे मला अपेक्षित आहे ..
मी तर कित्येक फेअरी टेल्स कोळून प्यायलीए.. पण अॅनिमेटेड मुव्ही साठी हा धागा नको..भलेही सर्वात जास्त मी तेच एंजॉय करते तरीही..
मला आवडणारे काही चित्रपट येथे देते जे बहुतेकांनी पाहिलेले असेलच आणि मी एक दोन धाग्यावर दिलेले सुद्धा आहे तरी जर कुणी पाहिले नसेल आणि माहिती नसेल त्यांच्यासाठी. इतरांना उजळणी होऊ दे..
१. Pride and Prejidice :

Matthew MacFadyen आणि Keira Knightley अभिनित २००५ मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट Jane Austen यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. आर्ट्स पदवीधरांना हि कादंबरी अभ्यासात सुद्धा होती अस ऐकण्यात आहे.
कथा १८ व्या शतकात घडलेली दाखविली आहे ज्यात आपल्या पाच मुलींच्या विवाहाची काळजी असलेली आई आणि त्यामानाने निर्धास्त असलेले वडील त्यांच्यासाठी सुयोग्य, धनवान नवरा शोधण्याच्या घाईत असतात.
खुप काही बोलता येईल या चित्रपटाबद्दल पण मग ते समिक्षण होउन जायचं .. माझ्या टॉप टेन मधे सर्वात जास्त आवडता चित्रपट हा..
2. Seducing Mr. Perfect :

Daniel Henney आणि Uhm Jung-hwa अभिनित २००६ मधे प्रदर्शित झालेला हा साऊथ कोरियन चित्रपट आहे. आपल्या प्रियकराबाबत अतिशय संवेदनशील आणि समर्पित वृत्ती असणारी त्याच्यावर भरभरुन प्रेम करणारी एक मुलगी आणि नविनच आलेला सर्व गोष्टींना व्यावहारिक रित्या हॅण्डल करणारा बॉस अशा दोन व्यक्तीरेखेमधे घडणारी हि गोष्ट.
मला वाटत यावर सुद्धा मी लेख लिहेल म्हणुन इथच थांबते.. नक्की पाहावा असा चित्रपट..
3. The Proposal :

Ryan Reynolds आणि Sandra Bullock अभिनित २००९ मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉसी लेडी बॉस आणि तिच्याहाताखाली काम करणारा होतकरू, खुद्द एडीटर बनण्याचे स्वप्न पाहणार्या असिस्टंट मधली केमिस्ट्री दाखवतो.
त्या दोघांमधले राग लोभ, वयाच्या १६व्या वर्षी आईवडील दुरावल्यानंतर त्या मुलीने स्वतःमधे केलेले बदल, वडिलांच्या अपेक्षा आणि स्वतःची आवड या दोहोंमधे पिचलेला मुलगा, आणि त्याच्यावर प्रचंड प्रेम करणारी त्याची आई आणि ग्रॅनी..मस्तच दाखवलय सगळ..
4. Leap Year :

Amy Adams आणि Matthew Goode मुख्य भुमिकेत असणारा २०१० मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट ४ वर्ष रिलेशनशिप मधे असुनही लग्नासाठी प्रपोज न केलेल्या प्रियकरामागे आणि लिप इयरला प्रपोज केल्यावर तुमच लग्न शेवटपर्यंत टिकत या श्रद्धे अंधश्रद्धेपायी दौर्यावर असलेल्या आपल्या प्रियकरामागे धावत असलेल्या तरुणीची आणि तिथ जातेवेळी स्वतःच हॉटेल वाचवण्यासाठी पैस्याची निकड असल्यामुळे तिला मदत करणार्या एका तरुणाची कथा दाखवतो..
हलकापुलका असलेला छान चित्रपट..
5. The Lake House :

Sandra Bullock आणि Keanu Reeves मुख्य भुमिकेत असणारा मुळ साऊथ कोरियन असलेल्या Il Mare या चित्रपटाचा रिमेक आहे.
२००४ मधे जगत असलेला एक आर्किटेक्ट आणि २००६ मधे असणारी एक डॉक्टर यांची हि प्रेमकथा. विषय जरासा साय-फाय फण्टॅसी असला तरी चित्रपट मला आवडला. कदाचित दोन्ही आवडते कलाकार असल्यामुळे सुद्धा असावं.
एका लेक हाउस मधे राहणारी ती डॉक्टर तिच्यानंतर येणार्या टेनंट साठी घराबाहेर असणार्या मेलबॉक्स मधे पत्र ठेवते आणि त्यानंतर सुरु होतो तो पत्रांचा सिलसिला..छान कहानी आहे..त्या दोघांबरोबर आपणसुद्धा ते केव्हा भेटणार यासाठी आतुर होउन जातो..
तर सद्ध्या हे पाचच देतेय. समोर टाकेलच..
चित्रपटांचे पोस्टर जालावरुन्/विकीवरुन..
२७ ड्रेसेस : खूप मस्त पिक्चर
२७ ड्रेसेस : खूप मस्त पिक्चर आहे. >> हो खूपच सुंदर आहे,. माझा ऑल टाईम फेव्हरिट पिक्चर
तसाच आणखी एक चित्रपट आहे The Holiday.. केट विन्स्लेट आणि कॅमॅरून डियाझचा.. प्रेमभंग झालेल्या दोन तरूणी Home Exchange करतात आणि पुढे त्यांचं आयुष्य कस बदलत यावर आहे तो पिक्चर.. आवर्जून पाहण्यासारखा..
प्रीटी वुमन पण मस्त आहे.. त्या लाल ड्रेसमध्ये तर कसली जबरी दिसल्ये ज्युलिया...
You've Got Mail & Sleepless in Seattle - Tom hanks and Meg Ryan ... दोन्ही चित्रपट मस्त आणि कास्टिंग तर भारीच!
Walk in the Clouds.
btw Leap Year हा चित्रपट आपल्या इम्तियाज अलीच्या करीना-शाहिद स्टारर 'जब वी मेट' वरून घेतला आहे बरं का..!
Leap year वाल्या हिरोचाच आणखी एक चित्रपट आहे Chasing Liberty नावाचा.. हिरॉईनचं नाव विसरले पण मस्त आहे तो पिक्चर
आणखी एक मन हळवं करून
आणखी एक मन हळवं करून गेलेला चित्रपट' Ladies in Lavender' यातल्या Judi Dench व Maggie Smith यान्च्या सहजसुंदर अभिनयासाठी तरी पाहायलाच हवा . Joshua Bell ने व्हायोलिन वर वाजवलेला म्युझिकचा पीस डोळे भिजवणारा आहे.कथा न पटणारी तरी असही कधी होऊ शकत याची कल्पना आहॆ मला.
अजुन काहि romantic evergreen
अजुन काहि romantic evergreen movies
Jerry Maguire
Ma Ma Mia
Mrs Doubtfire
The Birdcage
The Bachelor (1999)
He's Just Not That Into You
Valentine's Day
Casa Blanca
City Of Angels
Jerry Maguire
Ma Ma Mia
Mrs Doubtfire
The Birdcage
The Bachelor (1999)
He's Just Not That Into You
Valentine's Day
While You Were Sleeping
मला आवडलेला... केट अँड
मला आवडलेला... केट अँड लिओपोल्ड... ह्यू जँकमन आणि मेग रायन... ह्यू अगदी परफेक्ट जंटलमेन....
स्वाती.. माझा पन खुप खुप
स्वाती..
माझा पन खुप खुप आवडता.. ह्यु माझा ऑल टाईम फेवरेट.. हॉली मधले दोन चार लिड हिरोज आहेत ज्यांमधे मी कंपेअर नै करु शकत त्यात हा पन एक..
मी मागे कुठल्यातरी धाग्यावर लिहिलेलय या चित्रपटाबद्दल..
मेग कुठ कुठ फारच विचित्र दिसलीय..त्यामानाने ह्यु चा वावर खुप सहज वाटला.. त्याच नविन न्युयॉर्क सोबत जुळवून घेताना तर लय्यच्च मज्जा येते.. स्टुअर्ट च्या डॉगी ला वॉक ला घेउन जातो तेव्हा ती पोलिसवुमन आणि याच्यातला संवाद , मेग आणि तिच्या भावाकडल्या डिनरच्या वेळेस बिचारी मेग.. 'कॅन यु प्लीज गो, कॅन यु जस्ट गो अवे' हा हा हा हा.. खुप येड लागल्यासारखी बोललीये ती..बहोत हसली मी तेव्हासुद्धा.. त्या दोघांचा शेवतचा सण्डे सुद्धा खुप छाने.. क्युट आणि एकदम हलकी फुलकी प्रेमकहाणी..
While you were sleeping...
While you were sleeping... sandra Bullock cha
टीना.. अगदी अगदी.. ह्यू
टीना.. अगदी अगदी..
ह्यू प्रत्येक फ्रेममध्ये दृष्ट लागण्याएवढा सुंदर दिसलाय.. त्यांचा तो टेरेसवरचा डिनरचा सीन मी नव-याला रिपीट दाखवला होता की शिका काहीतरी...
ह्यू जँकमन वरुन हा पण आठवला -
ह्यू जँकमन वरुन हा पण आठवला - Australia. ह्यू जँकमन आनि निकोल किड्मनचि सुन्दर प्रेम कहानि!!
1)First Love (2010 Thai
1)First Love (2010 Thai film):
The story depicts love in the eye of young people who first experience it and how it affects their lives and their inspirations.
2)Always (Korean movie):
Cheol-min, a man with a dark, mysterious past, gets hired at a part-time night job as a parking lot attendant. He sits in the tiny pay booth in the parking lot and stares at the small television. A woman named Jung-hwa walks into the booth. She offers something to Cheol-min and sits next to him. Cheol-min realizes the woman is blind and she is confusing him for the parking attendant who worked there previously. Their lives change forever from this point.
3)The Beast and the Beauty (Korean movie):
Voice actor Gu Dong-gun ( Ryoo Seung-bum ) is in a predicament as his blind girlfriend Jang Hae-ju ( Shin Min-a ) suddenly receives surgery to regain her eyesight. Having lied to Hae-ju about his appearance, the insecure Dong-gun chooses to undergo extreme measures to change his appearance, while promising Hae-ju that he will return soon after a project in Hawaii. Meanwhile, Hae-ju bumps into Tak Joon-ha ( Kim Kang-woo ) - Dong-gun's high school friend whose appearance is how Dong-gun described himself to Hae-ju - and mistakes him for Dong-gun. Hilarity ensues as Dong-gun finds himself struggling to hold onto the woman he loves
एक अजरामर प्रेमकथा - गॉन विथ
एक अजरामर प्रेमकथा - गॉन विथ द विंड!
क्लार्क गेबल आणि विविअन ली निव्वळ लाजवाब! ज्यांनी मार्गारेट मिशेलची मूळ कादंबरी वाचली आहे, त्यांनाच या सिनेमाची खरी लज्जत कळू शकेल.
इथे वाचून Leap year बघितला
इथे वाचून Leap year बघितला नेफ्लिवर.
मधेमधे बोर झाला.. ह्या पेक्षा जब वी मेटच छान आहे.
पराग +१
पराग +१
इफ ओन्ली - जेनिफर लव हेविट
इफ ओन्ली - जेनिफर लव हेविट आणि पॉल निकोल्स यांच्यावर चित्रित चित्रपट
Babylon AD ... नक्की पहा
टीना , मस्त धागा . अगोदर
टीना , मस्त धागा .
अगोदर पाहिला होता , पण आत्ता वाचून काढला :).
प्रतिसादात लोकानी दिलेली लिस्ट वर डकव ना . सारख स्क्रोल कराव लागत
मी हॉली.. मूवीज नवर्यामुळे पहायला सुरवात केली . त्याला फार आवड आहे .
त्यामुळे मोजक्याच बघितल्यात .
काही ईतरानी वर उल्लेख केलेलेल्या आहेतच .
प्रीटी वूमन : ऑटाफे
. गेल्या आठवड्यात टीव्हीवर परत पाहिला. रिचर्ड चा एडवर्ड केवळ मस्त .
त्या दोघात भांडण होत आणि ती रूम सोडून निघून जाते .
तो तिला आणायला बाहेर येतो . त्यावेळी तिला म्हणतो तु डेव्हिड मॉर्सशी बोलत होतीस मला ते आवडलं नाही.
ती म्हणते " बट वी वेअर जस्ट टॉकिंग"
तो मान डोलावत म्हणतो " बट आय डिड्न्ट लाईक ईट "
त्याच्या त्या एका वाक्याच्या टोनसाठी आणि एक्प्रेशनसाठी १०० जीव ओवाळून
आणखीही बरेच आहेत सीन्स .
प्रीटी वूमन आवडला म्हणून रिचर्ड गेरेचे आणखी काही चित्रपट शोधले .
shall we dance : एक मध्यमवयीन गृहस्थ रूटीन मधून बदल म्हणून डान्स शिकायला लागतो ( आणखीही काही कारण असतात). त्याच्या बायकोला पहिल्यान्दा वाटत की त्याच कुठेतरी विबांस आहे . म्हणून ती त्याच्यामागे डिटेक्टीव लावते. समज-गैर्समजानंतर त्यान्चे वैवाहिक आयुश्य पून्हा मार्गी लागते.
रिचर्ड गेरे आणि त्याची डान्स टीचर आपली जे.लो. दोघेही मस्त.
रिचर्ड गेरेची बदलणारी देहबोली बघायला मजा येते . पहिल्यान्दा खान्दे टाकून चालणारा ,नन्तर बसल्या जागी पाय हलवत स्टेप्स ची प्रॅक्टीस करणारा , क्लासमध्ये स्टेप्स बरोबर जमल्यावर आनंदाने उसळणारा, नंतर ताठ उभा रहाणारा .
शेवटच्या कॉम्पिटीशन्च्या अगोदर , त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जेलो त्याला परत क्लासमध्ये घेउन येते .तेन्व्हाचा त्यांचा इन्टेन्स डान्स म्हणजे डान्स प्रेमींसाठी केवळ पर्वणी आहे.
dying young : प्रेमभंग झालेली एक तरूणी , एका श्रीमंत बापाच्या एकुलत्या एक - कॅन्सरग्रस्त तरूण मुलाची - कंपानिअन बनायला तयार होते.या गोश्टीकडे केवळ जॉब म्हणून बघता बघता ती हळूहळू त्याची नर्स , मैत्रिण , एस्कॉर्ट बनते .त्याला परत माणसात आणते वगैरे .तो तिला खोटे सांगतो की आता त्याला केमोची गरज नाही , आता तो बरा आहे. दोघे कुठेतरी दूर गावात येउन रहातात - हवापालटासाठी. नंतर ते एकमेकान्च्या प्रेमात पडतात. शेवटी त्याची तब्येत परत ढासळायला लागते तेन्व्हा तिला सत्य कळत . मग चित्रपट शेवटाकडे सरकतो
. मध्ये मध्ये कंटाळा येतो पण ज्युलिया रॉबर्टस साठी पूर्ण चिकाटी ने बघितला . आवडला.
डेविल वेअर्स प्राडा : अगदी प्रेमकहाणी नाही . पण अर्थात मेरिल स्ट्रीप आहे
तिला साश्टांग नमस्कर !. अॅना हॅथवे पण फार आवडली . तिच्यात हळू हळू होणारा बदल छान टिपलाय . तिचा तो शेफ बॉयफ्रेन्ड पण आवडला . त्याचे डोळे फार मस्त आहेत . ( सायमन बेकर नाही हां , तो दूसरा ) .
6 days 7 nights : हॅरिसन फोर्ड . त्याच आणि हिरोईन्च चार्टेड प्लेन अपघातग्रस्त होउन ती लोक बेटावर अडकतात . आणि मग मार्ग काढत परत येतात .दरम्यानच्या काळात अर्थातच प्रेमात पडतात .
6 days 7 nights << हा आम्ही
6 days 7 nights << हा आम्ही ग्रॅड स्कूलला असताना थेट्रात जाऊन बघितलेला सिनेमा. सिनेमा इतका ऑब्व्हियस आहे की पकलो होतो. आणि मग इटस सो बॅड दॅट इटस गुड प्रकारात अत्यंत टाइमपास करत उरलेला सिनेमा सहन केला होता. मधे मधे फुल्टू हिंदी गाणी पेरून वगैरे.
@स्वस्ति :shall we dance ची
@स्वस्ति :shall we dance ची आठवण करून दिल्याबदल धन्स !
ईथे वाचून केट अँड लिओपोल्ड
ईथे वाचून केट अँड लिओपोल्ड बघितलाच शेवटी .
मेग रायन कै च्या कै दिसते , पण ह्यु जॅकमन चा ड्युक एकदम किलर !!!!!
कसला दिसतो , बोलतो , वागतो - एक्दम रॉयल !
त्या टेरेस वरच्या डिनर नंतरच्या सकाळी , तो आणि चार्ल्स बोलत असतात .
अरे बाब्बा ! कसला भारी दिसतोय तो ... " I am the man who loves your sister" .
ठार झाले मी .
बाकीचे चित्रपट आहेत आता लायनीत , एक एक करून बघेन , हळूहळू.
शेवट ***स्पॉइलर*** नसला तरी
शेवट ***स्पॉइलर*** नसला तरी इथे वर्णी लावलेले चित्रपट ज्यांना आवडलेत त्यांना 'अप इन द एयर' हा पण आवडेल. जॉर्ज क्लुनीसाठी तरी बघाच
Save the last dance - एकदम
Save the last dance - एकदम मस्त आहे. पहिला ओरिजिनल बघा.
ह्यातले काही मूव्हीज हल्ली
ह्यातले काही मूव्हीज हल्ली बघितले. 50 First Dates मस्त आहे. लीप ईयर पण आवडला. मॅथ्यु गूड भयंकर आवडलाय त्यात.
एकदम साधा सरळ.....Regarding
एकदम साधा सरळ.....Regarding Henry...featuring Harrison Ford
'Letters to Juliet' - Amanda
'Letters to Juliet' - Amanda Seyfried - अगदी उच्च वगैरे नाही, पण छान सिनेमा आहे. Basically I love Love sotires, मग अशी सीधीशी लवस्टोरी सुद्धा.
इटली कंट्री साइड, फार काही ताप नसलेली क्युटशी लवस्टोरी. एकदा बघायला छान वाटला.
मिस्टिक पिझा Mytic Pizza
मिस्टिक पिझा Mytic Pizza नावाचा ज्युलिया रॉबर्टस आणि अॅनाबेथ चा सिनेमा आहे. हा सिनेमा रिलिज होण्याच्यावेळी ज्युलिया 'स्टार' झालेली नव्हती. दोन बहीणी आणि त्यांची मैत्रिण या व्यक्तीरेखांवर सिनेमा आहे.
साधासा गमतीदार आहे. ज्युलिया आवडत असेल तर पाहण्यासारखा...
यातले बरेचसे बघितले सिनेमे.
यातले बरेचसे बघितले सिनेमे. पण युट्युबवर शोधण्यात खुप वेळ जातो.नसतील तर लायब्ररीतुन मागवावे लागतात. त्यामुळॅ सिनेमाच्या नावाबरोबर लिंक डकवा प्लिज.
टीना , Seducing Mr. Perfect
टीना , Seducing Mr. Perfect पाहिला .
मस्त वाटला , आवडला . हिरो - हिरॉईन दोघेही क्युट आहेत.
पूर्ण चित्रपट बघताना त्याच ईन्ग्लिश आणि तिच कोरियन बोलणं एक्दाही खटकतं नाही .
तो मध्ये मध्ये तिला काही कठिण शब्दाचे अर्थ विचारतो ते पण मजा वाटते .
शेवट जरा अ आणि अ टाईप्स आहे .
खुप दिवसांनी आली इथ.. स्वस्ति
खुप दिवसांनी आली इथ..
स्वस्ति Seducing Mr. Perfect बघितलास..आहा छान वाटलं ऐकुन..
मला त्यातल्या डॅनियल हेनी ने रंगवलेल पात्र खुप आवडलं.. संयत आहे एकदम.. आणि किती तो इग्नोरास्त्र मारतो तिच्यावर काळजी असते तरी.. एक बुक्की द्यावी वाटते कधी कधी त्याला..
तिने त्याच्यासाठी डब्बा घेउन जाणं, त्यानं बरोबर त्यातली चिठ्ठी काढून घेणं, तिला फोन करुन कुठय विचारन आणि भावासोबतच्या भांडणाचा वेगळा अर्थ घेऊन धुसफुसण आणि ते कळल्यानंतरची तिला दिलेली कॉम्प्लीमेंट.. आह.. इट्स दॅम क्युट... विशेष म्हनजे ती हिरोइन त्याच्यापेक्षा मुळात १० वर्षांनी मोठी आहे हे त्या फिल्म म्धे कुठ्ठच दिसत नै इतकी छान अवखळ येडी तिनं ती प्रेझेन्ट्सुद्धा केलीये.. वॉव.. मला एकुणएक प्रसंग आणि त्यातला त्या दोघांचा अभिनय, बॉडीलँग्वेज सगळं सगळं कै आवडलय..
काल बूक थीफ नावाचा अप्रतिम
काल बूक थीफ नावाचा अप्रतिम चित्रपट बघितला... हॅपीली एव्हर आफ्टर या शब्दांनाच उलटे सुलटे करणारा अप्रतिम चित्रपट आहे. सविस्तर लिहितोच.
लव्ह स्टोरी बघीतला.. इंग्रजी
लव्ह स्टोरी बघीतला.. इंग्रजी चित्रपट १९७० चा इरिक सेगल वाला.. ओके आहे..
त्यानंतर द लिटल प्रिन्सेस पाहिला..१९९५ चा..
याला रोमँटिक चित्रपट नै म्हणता येणार पन खुप खुप मस्त आहे हा चित्रपट सुद्धा..
पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतात आपल्या छोट्या मुलीसोबत राहणारा इंग्रज अधिकारी परत इंग्लंड ला जातो.. तत्पूर्वी तो त्याच्या मुलीला न्युयॉर्क च्या बोर्डींग स्कुल मधे ठेवतो..तिथे ती तिच्या क्लासमेट्स ला भारतातल्या गोष्टी, राम रावणाची स्टोरी सांगते.. तिच्यावर तिथे काय बितते हे सगळ दाखवलय..खुप मस्त काम केलय सगळ्याच कलाकारांनी.. नक्की बघावा असा आहे..
आज Conviction नावाचा सिनेमा
आज Conviction नावाचा सिनेमा पाहिला..
बेटी अॅनी आणि केनी या दोन भावंडांवर असलेला..
प्रेम...मग ते प्रियकर प्रेयसी मधील असो वा भावंडांमधल..इट इज अडोरेबल..
हा सिनेमा एका खर्या कथानकावर आधारलेला आहे.. बेटी चा भाऊ केनी याला एका हत्येच्या गुन्ह्यात नो पॅरोल लाईफ इंप्रिझन्मेन्ट होते.. तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्याची त्याची बहिण बेटीचा खटाटोप यात दाखविलेला आहे.. कथानकात, तिला येणार्या यशापयशात, त्या भावंडांच्या एकमेकाम्बद्दल असलेल्या प्रेमात मी सुद्धा कधी हरवुन गेली कळलच नाही.. सर्वात शेवटी कळल कि हा एक खर्या घटनेवर आधारित आहे..
काय बोलाव कळेना.. नक्की बघावा असा
Conviction कुणाला बघावासा
Conviction कुणाला बघावासा वाटला तर खाली लिंक देतेय
https://www.youtube.com/watch?v=jFrlTFV5M_4
Pages