अ‍ॅण्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर

Submitted by टीना on 10 September, 2015 - 18:08

The famous line.. "And they lived happily ever after.."

शेवट यावरच होणार हे माहिती असते तरीही पाहण्याचा मोह टाळता येत नाही.. मलातरी अज्जिब्बात नाही..

तस तर मला इपिक, फण्टॅसी, साय-फाय असले मुव्ही आवडतात..प्रेमात कधी पडली नाहिए आणि आता वेळ नाही पण तरी रील लाईफ रोमान्स बघायला खुप आवडतो.. प्रेमासारखी हळूवार भावना तेवढ्यात तरलतेने, नजाकतीने समोर ठेवणारे चित्रपट बघायला मजा येते.. इथे इंग्रजी चित्रपटांचा धागा आहे पण त्यात सर्वच जॉनर चे चित्रपट एकातच मांडलेले आहेत. त्यातही कुठेकुठे चित्रपट कुठल्या जॉनर चे आहे तेपन लिहिलेल नसल्यामुळे फक्त आणि फक्त रोमँटीक चित्रपटांसाठी हा वेगळा धागा. तुम्ही पाहिलेले आणि तुम्हाला भावलेले असे रोमँटीक जॉनर चे चित्रपट येथे शेअर करा. त्या चित्रपटाबद्दल निदान दोन ओळी लिहाच लिहा. अगदी त्यातले कलाकार, दिग्दर्शक, कुठल्या पुस्तकावर बेतलेला आहे त्याच नाव, गाणी, कथा यापैकी काहिही..

इथे फक्त आणि फक्त बॉलीवूड व्यतिरिक्त सिनेमे मला अपेक्षित आहे ..

मी तर कित्येक फेअरी टेल्स कोळून प्यायलीए.. पण अ‍ॅनिमेटेड मुव्ही साठी हा धागा नको..भलेही सर्वात जास्त मी तेच एंजॉय करते तरीही..

मला आवडणारे काही चित्रपट येथे देते जे बहुतेकांनी पाहिलेले असेलच आणि मी एक दोन धाग्यावर दिलेले सुद्धा आहे तरी जर कुणी पाहिले नसेल आणि माहिती नसेल त्यांच्यासाठी. इतरांना उजळणी होऊ दे..

१. Pride and Prejidice :

Matthew MacFadyen आणि Keira Knightley अभिनित २००५ मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट Jane Austen यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. आर्ट्स पदवीधरांना हि कादंबरी अभ्यासात सुद्धा होती अस ऐकण्यात आहे.
कथा १८ व्या शतकात घडलेली दाखविली आहे ज्यात आपल्या पाच मुलींच्या विवाहाची काळजी असलेली आई आणि त्यामानाने निर्धास्त असलेले वडील त्यांच्यासाठी सुयोग्य, धनवान नवरा शोधण्याच्या घाईत असतात.
खुप काही बोलता येईल या चित्रपटाबद्दल पण मग ते समिक्षण होउन जायचं .. माझ्या टॉप टेन मधे सर्वात जास्त आवडता चित्रपट हा..

2. Seducing Mr. Perfect :

Daniel Henney आणि Uhm Jung-hwa अभिनित २००६ मधे प्रदर्शित झालेला हा साऊथ कोरियन चित्रपट आहे. आपल्या प्रियकराबाबत अतिशय संवेदनशील आणि समर्पित वृत्ती असणारी त्याच्यावर भरभरुन प्रेम करणारी एक मुलगी आणि नविनच आलेला सर्व गोष्टींना व्यावहारिक रित्या हॅण्डल करणारा बॉस अशा दोन व्यक्तीरेखेमधे घडणारी हि गोष्ट.
मला वाटत यावर सुद्धा मी लेख लिहेल म्हणुन इथच थांबते.. नक्की पाहावा असा चित्रपट..

3. The Proposal :

Ryan Reynolds आणि Sandra Bullock अभिनित २००९ मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉसी लेडी बॉस आणि तिच्याहाताखाली काम करणारा होतकरू, खुद्द एडीटर बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या असिस्टंट मधली केमिस्ट्री दाखवतो.
त्या दोघांमधले राग लोभ, वयाच्या १६व्या वर्षी आईवडील दुरावल्यानंतर त्या मुलीने स्वतःमधे केलेले बदल, वडिलांच्या अपेक्षा आणि स्वतःची आवड या दोहोंमधे पिचलेला मुलगा, आणि त्याच्यावर प्रचंड प्रेम करणारी त्याची आई आणि ग्रॅनी..मस्तच दाखवलय सगळ..

4. Leap Year :

Amy Adams आणि Matthew Goode मुख्य भुमिकेत असणारा २०१० मधे प्रदर्शित झालेला हा चित्रपट ४ वर्ष रिलेशनशिप मधे असुनही लग्नासाठी प्रपोज न केलेल्या प्रियकरामागे आणि लिप इयरला प्रपोज केल्यावर तुमच लग्न शेवटपर्यंत टिकत या श्रद्धे अंधश्रद्धेपायी दौर्‍यावर असलेल्या आपल्या प्रियकरामागे धावत असलेल्या तरुणीची आणि तिथ जातेवेळी स्वतःच हॉटेल वाचवण्यासाठी पैस्याची निकड असल्यामुळे तिला मदत करणार्‍या एका तरुणाची कथा दाखवतो..
हलकापुलका असलेला छान चित्रपट..

5. The Lake House :

Sandra Bullock आणि Keanu Reeves मुख्य भुमिकेत असणारा मुळ साऊथ कोरियन असलेल्या Il Mare या चित्रपटाचा रिमेक आहे.
२००४ मधे जगत असलेला एक आर्किटेक्ट आणि २००६ मधे असणारी एक डॉक्टर यांची हि प्रेमकथा. विषय जरासा साय-फाय फण्टॅसी असला तरी चित्रपट मला आवडला. कदाचित दोन्ही आवडते कलाकार असल्यामुळे सुद्धा असावं.
एका लेक हाउस मधे राहणारी ती डॉक्टर तिच्यानंतर येणार्‍या टेनंट साठी घराबाहेर असणार्‍या मेलबॉक्स मधे पत्र ठेवते आणि त्यानंतर सुरु होतो तो पत्रांचा सिलसिला..छान कहानी आहे..त्या दोघांबरोबर आपणसुद्धा ते केव्हा भेटणार यासाठी आतुर होउन जातो..

तर सद्ध्या हे पाचच देतेय. समोर टाकेलच..
चित्रपटांचे पोस्टर जालावरुन्/विकीवरुन..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मेरा इंग्रजी.. करते बदल..

यातले प्रतिसादातले भरपूर बघितले आहे..
ब बघितलेल्यांची नोंड करुन ठेवते..

Eternal Sunshine of the Spotless Mind :

यात केट पेक्षा मलापन जिमच जास्त आवडला.. त्याला इतक्या संयत रुपात नव्हत बघितल कधी. खुप मस्त आहे त्याच काम..सुरुवातीला अ‍ॅकग्राउंड ला लता गात असते ते ऐकुन तर खुपच सुखावली होती मी Wink

Silver lIning playbook :

यात मला जे लॉरेन्स खुप आवडली. ब्रॅ. कुपर पन भारीच आहे पण ती ज्या प्रकारे त्याला साथ देते ते मस्तच. येडे दोघही Lol .. त्यांच डीनर.. त्याआधीची पहिली भेट.. डान्स प्रॅक्टीस.. ती करत असताना त्याच्या मित्राने मधे येउन तिच्यासोबत डान्स करायला सुरुवात केल्यावर ब्रॅड चे एक्स्प्रेशन अफलातुन..

द इम्पॉसिबल - थायलंडमधल्या त्सुनामीतून बचावलेले एक कुटुंब

चॉकलेट - मूळ फ्रेंच सिनेमा

सांऊड ऑफ म्यूझिक -- ( डू आय नीड टू से एनिथिंग मोअर ?? )

द सोर्स कोड - इथे फक्त लिव्ह्ड चा अर्थ फार वेगळा घ्यायचा आहे..

कास्ट अवे ऑन द मून - कोरीयन सिनेमा आहे

वन फाइन डे- जॉर्ज क्लूनीचा मिडल एज्ड खट्याळ बाप जाम आवडतो..
५० फर्स्ट डेटस- ड्रू बॅरिमोर खूप खूप गोड आहे
नॉटिंग हिल- ह्यू ग्रॅन्ट आणि ज्युलिया, कमाल आहेत दोघे..
लव्ह ऍक्चुली- खूप गोष्टी आणि सगळ्याच भारी..
स्लीपलेस इन सिएटल आणि व्हेन हॅरी मेट सॅली- ऑल टाइम फेवरिट!!

हाय स्कूल म्यूझिकल.. चे तीनही भाग.

संगीतही सुंदर आणि नाचही. सर्वच पात्रे वयाने मोठी होत जातात आणि थोडी घडतात थोडी बिघडतात.. पण शेवट गोडच.

Pride and Prejudice : BBC वर दाखवलेला सगळ्यात मस्त होता. Colin Firth आणि Jennifer Ehle ची केमिस्ट्री अफलातून होती.
Enchanted
Sweet Home Alabama
The shop around the corner
Little Women: Winona Ryder चा
Save the last dance

अजून एक वेरी क्लोज टू हार्ट.. पण हा सिनेमा नसून मिनी सीरीज आहे ८०ज ची

थॉर्न बर्डस. एक शेतकर्‍याची सुंदर मुलगी आणी तिच्यापेक्षा तीसेक वर्ष मोठा असलेला हँडसम प्रीस्ट यांची अनोखी प्रेम कहाणी ..

'स्वीट होम अलाबामा' विसरलेच होते.

डेव्ह (http://www.imdb.com/title/tt0106673/)
२ वीक्स नोटिस
लॉज ऑफ अट्रॅक्शन्स (पियर्स ब्रॉसनननं अफलातून काम केलं आहे)
फ्रेंच किस (प्यार तो होना ही था)
हिच (पार्टनर)
द हॉलिडे
गेस हु
मेड इन मॅनहॅटन

मी फार बघितले नाहीत पण काही आवडले त्यांची नावे. मी पहिला मूवी थेटरात पाहिलाय बाकी सर्व टीव्हीवर.

प्रेटी वूमन ( ज्युलियाची fan आहे मी आणि रिचर्ड आवडतो).

स्वीट होम अलाबामा.

नॉटिंग हिल्स

इंडीसेंट प्रपोजल

रन अवे ब्राईड

माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग

टायटानिक

प्रुफ ऑफ लाईफ (रसेल क्रो, मेग रायन) ही जरा वेगळी लवस्टोरी आहे, इथे बहुतेक अपेक्षित नाही.

ब्युटीफुल Mind (ही एक वेगळी स्टोरी आहे पण त्यातले दोघांचे प्रेम हे खूप वरच्या पातळीवर आहे)

चेस

अशा प्रकारात अत्यंतिक कंटाळवाणे झालेले चित्रपट म्हणजे- फेल्युअर टु लाँच, द वेडिंग डेट आणि द वेडिंग प्लॅनर, हाउ टु लुज अ गाय....

Julie Delpy आणि Ethan Hawke चा

Before Sunrise (1995)

Before Sunset (2004)

आणि Before Midnight (2013)

कुणीच नै बघीतले का ?

अरे कसली मस्त सिरीज आहे ही..
एका बैठकीत पाहिली तरी मज्जा येईल..
नुसते संवाद आहे खर तर..एखाद्याच्या निव्वळ गप्पा एन्जॉय करायच्या असतिल तर नक्की बघावे असे चित्रपट..

टीना हे मुवीज मला माहितीच नाहीयेत. विंग्रजी मूवीबद्दल माझं ज्ञान फार अल्प आहे. चला इथे वाचून कळेल तरी.

Thanx ह्या धाग्यासाठी.

बिफोर सनराइज आणि बिफोर सनसेट आवडले होते. शेवटचा मात्र नाही आवडला. (बहुधा त्यांचं लग्न झाल्यामुळे. :P)

मला त्यातल्या त्यात बिफोर सनसेट जास्त आवडला..
बिफोर सनराईज नै पाहिला मी पन...छान आहे माहिती आहे तरी नै पाहिला अजुन Sad

अन्जू, सब एकसे एक चित्रपट आहे..बघ वेळ मिळेल तसे..

रोमॅंटिक ड्रामा मध्ये : The notebook, The bridges of madison county, Jerry maguire, Notting hill Tinanic
रोमॅंटिक कॉमेडी मध्ये: The holiday, It's complicated, Something's gotta give, 50 first dates, When harry met Sally, As good as it gets, You've got mail, Midnight in paris ( This is more about Paris though) ,Sleppless in seattle

Before sunrise आणि before sunset ची पारायणं झाली आहेत..before sunset जास्ती आवडता आहे. before sunset ची शेवटची १५-२० मिनिटं भारी आहेत! Before midnight पण चांगलाय पण इतका नाही आवडला!

बिफोर सनराइज आणि बिफोर सनसेट आवडले होते. शेवटचा मात्र नाही आवडला. (बहुधा त्यांचं लग्न झाल्यामुळे. :p) >> सेम पिंच!

जस्ट लाईक हेवन - एका अपार्टमेंटमध्ये नव्यानेच शिफ्ट झालेल्या एका लँडस्केप आर्किटेक्टला त्याच्याआधी त्या अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या मुलीचा आत्मा वारंवार दिसायला लागतो. ती मुलगी कोण असते आणि त्यालाच का दिसते ह्याची उत्तरं शोधत फुलणारी प्रेमकथा. रीज विदरस्पून रॉक्स अगेन.

बाकी वरच्या लिस्टमध्ये येऊन गेलेले लिगली ब्लाँड, प्रिन्सेस डायरीज, प्रिटी वूमन, समथिंग गॉटअ गिव्ह, फिफ्टी फर्स्ट डेट्स हे सगळे ऑ टा फे

Amelie खुप आवडलेला पिक्चर.यातल अॅक्टिंग , डायरेक्शन अगदी पार्श्वसंगीतामुळेही तो मला आवडतो .frech कल्चरच एक भुलावण आहे..वॉक इन द क्लाउड,Great Expectations(1998) ,फ्रिदा पण खुप आवडलेले ....

फूल्स रश ईन हा चित्रपट पण अतीशय सूंदर आहे. सलमा हायेक आणी मॅथ्यू पेरी यांचा अभिनय लाजवाब आहे.

Pages