तवशाचे लोणचे

Submitted by माधव on 7 September, 2015 - 07:14
tavashi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तवशाचे तुकडे - २ वाट्या
लाल मोहरीची पूड - २-३ चमचे
ऊकळून गार केलेले पाणी - अर्धी ते पाऊण वाटी
पोपटी मिरच्यांची भरड - १ टे. स्पून
मीठ - चवीनुसार

फोडणी:
तेल - ४-५ टी. स्पून
मोहरी
हिंग
हळद

क्रमवार पाककृती: 

१. तवशाची साल आणि बिया काढून त्याचे १ से.मी. चे क्यूब्स करावे
२. पोपटी मिरच्या भरड वाटाव्यात. दगडी खलबत्त्यात वाटल्यास मिरचीहून हिरवे. नाहीतर मिक्सर आहेच.
३. मोहरीची बारीक पूड पाण्यात घालून फेटून घ्यावी
४. त्यातच मिठ घालून घ्यावे
५. हे पाणी, तवशाचे तुकडे, मिरचीचा ठेचा एकत्र करून चांगले ढवळावे
६. गार झालेली फोडणी घालावी

वाढणी/प्रमाण: 
एका माणसाला तीन दिवस पुरू शकते
अधिक टिपा: 

१. तवशे हे माशांशी र्‍हाइमींग असले तरी ते मासे नव्हेत Happy याला श्रावण काकडी असेही म्हणतात.
२. तवशाबद्दल अधिक माहिती गजाने दिली होती. बाफ सापडल्यास लिंक देण्यात येईल.
३. आम्हाला तिखट मिरच्याच लागतात - असे म्हणून लवंगी अथवा काळसर हिरव्या मिरच्या वापरू नयेत. यातली मिरची फक्त स्वादाला आहे. तिखटपणाला नाही.
४. तुमच्या भागात लाल मोहरी मिळत नाही? Import करा. पण काळी मोहरी वापरू नका.
५. मोहरी फेटताना आधी आपल्या क्षमतेचा अंदाज घ्या. चढलेली मोहरी नाकात मस्त झिणझिण्या आणते.
६. फोडी करकरीत असतानाच या लोणच्याची मजा असते. त्यामुळे ४ दिवसांच्या वर ठेऊ नये. फ्रिजमध्येच ठेवावे.
७. लोणचे बनवताना मिठ ठसठशीत असावे. दुसर्‍या दिवशी ते नॉर्मल होते.
८. घेताना नुसतेच किंवा दह्यासोबत खावे आणि भाजीच्या प्रमाणात खावे Happy

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तवशे हे माशांशी र्‍हाइमींग असले तरी ते मासे नव्हेत >> कधी नाव एकले नव्हते. मला माशेच वाटत होते म्हणुन मुद्दाम्हुन वाचले.

काकडीचे दोन प्रकार असतात - खिरा (पांढर्‍या सालीची) आणि गावठी (हिरव्या सालीची). तवशे मोठ्या गावठी काकडीसारखे दिसते. फूट- दीड फूट लांब असते. पुढच्या वेळेस मिळाले तर फोटो टाकतो.

आहाहा मस्तच.

आई करते असं, साध्या काकडीचंपण करते आणि कच्या पपईचंपण करते, फक्त ती किसून घेते. मला फोडीचे आवडेल जास्त. आम्ही याला रायतं म्हणतो.

नाकाला झिणझिण्या येत खाण्यातच मजा याची. Happy

मस्त रेसिपी.. मालवणला तवश्यांचे धोंडस वगैरे व्हायचे पण त्यावेळी तवश्याचा तुकडा खाल्ला तर अगदी बेचव लागायचा. पण या कृतीत मस्त चव येईल.

तवश्याचा तुकडा खाल्ला तर अगदी बेचव लागायचा >>> दिनेश, पुढच्या वेळेस तवशाला मिठात चुरडलेली हिरवी मिरची लाऊन खाऊन बघा. तवसं कधी संपेल ते कळणार नाही Happy

सूनटून्या, फोटोबद्दल धन्यवाद.

हे असे काडीचे लोणचे पहिल्यंदा खाल्ले होते,त्यावेळी मोहरीच्या ठसक्याने जीव गेला होता.
आणखी एका प्रकारची काकडी असते.फिक्या पोपटी रंगाची आणि दोडक्याप्रमाणे रेषा असलेली, तिला काय म्हणतात?

देवकी, त्याला कोल्हापूरकडे वाळूक म्हणतात. निव्वळ खाण्यापलिकडे उपयोग नाही तिचा. तशीच हिरव्या रंगाचीच ( लांब आणि बारीक ) काकडी असते, त्यावर थोडे डिझाईनही असते, ती जास्त चवदार असते. आता हे दोन्ही प्रकार मुंबईतही मिळतात.

माशाची रेसिपी म्हणुन मोठ्या आशेने पान उघडलं पण अगदीच निराशा नाही झाली. मस्त टेस्टी दिस्तय लोणचं.
ह्याला सोलापुरकडे वाळकं म्हणतात बहुतेक.

अरे वाह मस्तं रेसिपी. आमच्याकडे मिळतात अशा काकड्या ( सूनटून्या यांनी टाकलेल्या फोटोमुळे कळले.), इनफॅक्ट अशाच मिळतात. खूपच छान पाककृती. तवशा हे नाव माहीत नव्हतं.

मोहरी चढणे हा प्रकार काकडीच्या लोणच्यात अतिशय महत्त्वाचा आहे. माझ्या आजीने बनवलेल्या काकडीच्या (तवशाच्या) लोणच्यात मोहरी अशी काही चढायची की यंव रे यंव !

Pages