छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"शिवाजीचा लुटारू असा उल्लेख" या दोन गोष्टी ज्या सटल(subtle) नजाकतीनं >>

Shivaji begs चा मराठी अर्थ काय होतो मग? माफीनामा ह्या शब्दाबद्दल काय आलाय सटलनेस?

आणि लुटारू हे, " ब्रिटिशांच्या अर्ली कोलोनियल रेकॉर्डस" मध्ये आहे.

robber.JPG

आय होप तुमच्या लक्षात आले असेल आणि कुठला तो चष्मा काढून बघाल तर पुरावाही दिसेल. कृपया भलतीकडे नेत नका जाऊ हो.

निलिमा आलमगीर ही पदवी.

पगारे, कॉंग्रेसने कलामाना दुसरी टर्म का नाकारली सांगाल का? त्यांची पहिल्या टर्ममधली कामगिरी पुरेशी चांगली नव्हती का? त्यांच्यापेक्षा प्रतिभाताईंनी जास्त चांगलं काम केलं का?

राष्ट्रपति वैगरे पद ठिक आहे,परंतु कलामांसारखी व्यक्ति हि माझ्या मते प्रधानमंत्रि पदासाठी योग्य होती.कॉग्रेसने जसे मनमोहनसिंग ह्यांच्या रुपाने एका प्रशासनातील व्यक्तिला सत्तेत आणले तसे भाजपाने कलाम ह्यांना प्रधानमंत्रि करायला हवे होते.

हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.

पुन्हा- कॉंग्रेसने कलामाना राष्ट्रपतिपद का नाकारले हे सांगू शकाल का?

<<पगारे, कॉंग्रेसने कलामाना दुसरी टर्म का नाकारली सांगाल का? त्यांची पहिल्या टर्ममधली कामगिरी पुरेशी चांगली नव्हती का? त्यांच्यापेक्षा प्रतिभाताईंनी जास्त चांगलं काम केलं का?>>

------- कलामान्ना कॉन्ग्रेसने दुसरी टर्म नाकारली ? पण भाजपाने तरी कुठे उत्साह दाखवला होता त्यान्ना दुसरी टर्म देण्याचा.

कॉन्ग्रेस तसेच भाजपा दोघान्नाही कलामाना दुसरी टर्म देण्यात उत्साह नव्हता... तसा विचारही त्यान्नी केला नाही.

फरक काहीच पडत नाही... पण कलाम यान्ना दुसरी टर्म मिळावी यासाठी साधा विचारही भाजपाने केला नव्हता...

मला कलाम या व्यक्ती आणि त्यान्च्या कार्याबद्दल बद्दल आदर आहे आणि अशा सुयोग्य व्यक्तीला दुसरी टर्म मिळाली नाही याचे वाईट वाटले.

In September 2003, in an interactive session in PGI Chandigarh, Kalam supported the need of Uniform Civil Code in India, keeping in view the population of the country.[60][61][62][63]

At the end of his term, on 20 June 2007, Kalam expressed his willingness to consider a second term in office provided there was certainty about his victory in the 2007 presidential election.[64] However, two days later, he decided not to contest the Presidential election again stating that he wanted to avoid involving Rashtrapati Bhavan from any political processes.[65] He did not have the support of the left parties, Shiv Sena and UPA constituents, to receive a renewed mandate.[66][67]

Nearing the expiry of the term of the 12th President Pratibha Patil on 24 July 2012, media reports in April claimed that Kalam was likely to be nominated for his second term.[68][69][70] After the reports, social networking sites witnessed a number of people supporting his candidature.[71][72] The BJP potentially backed his nomination, saying that the party would lend their support if the Trinamool Congress, Samajwadi Party and Indian National Congress proposed him for the 2012 presidential election.[73][74] A month ahead of the election, Mulayam Singh Yadav and Mamata Banerjee also expressed their support for Kalam.[75] Days afterwards, Mulayam Singh Yadav backed out, leaving Mamata Banerjee as the solitary supporter.[76] On 18 June 2012, Kalam declined to contest the 2012 presidential poll. He said of his decision not to do so:

विकिपेडियावरून साभार !

उदय, nda ने कलामाना दूसरी टर्म देऊ केली होती. २००७ च काय अगदी २०१२ मध्येही प्रयत्न केला होता. पण nda कड़े दोन्हीवेळी संख्याबल नव्हतं आणि एकदा कोंग्रेस साथ देणार नाही हे कळाल्यावर उगाच पराभव निश्चित असताना कलामाना निवडणूक लढवायला लावण्यात अर्थ नव्हता आणि कलामानी ते केलंच नसतं.
२००७
http://www.telegraphindia.com/1061203/asp/nation/story_7084763.asp

२०१२
http://m.ndtv.com/india-news/presidential-poll-bjp-draws-a-blank-with-ka...

सचिन पगारे,

औरंगजेब रोडला कलामांचं नाव देण्यास विरोध करणारे आहेत एमआयएमचे ओवेसी!

कलामांना राष्ट्रपतीपदाची दुसरी टर्म देण्यासाठी कोणाचा आणि कसा विरोध होता हे वरच्या पोस्टवरुन तुम्हाला समजून यावं.

एक सहज डोक्यात आलेले. थिन्किंग अलाउड. फ्लॉ असेलही यात काही.

औरंगजेबाचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. पण त्याने नाव बदलल्याचा राग येणारे सगळे मुस्लिम देशद्रोही आहेत का? तसे म्हणणे फार सोपे आहे. मोठा अशिक्षित समाज, मदरशात शिकलेले किंवा नेहमीच्या शाळेत शिकलेले पण स्वतःच्या घेटोज मधे एकतर्फी मते ऐकत मोठे झालेले १५-१६ वर्षांचे तरूण - यांच्या डोक्यात तर कर्मठ सनातनी मुस्लिम नेत्यांनी, मौलवींनी भरवून दिलेली "चांगली" इमेज असेल त्याची आणि त्यामुळे उगाचच मुस्लिम असल्याने नाव बदलले असा समज करून दिला गेला असेल तर तो तसा करणारे दोषी आहेत. पण या तरूणांना जर ते समजणारच नसेल तर मुद्दाम डिवचल्यासारखे करून त्यांना आणखी दुरावून टाकून काय फायदा आहे?

म्हणजे वागेल तसे वागू द्यायचे का? नाही. दंगे केले तर खुशाल शिक्षा व्हावी. गणपतीची मिरवणूक नेहमी ज्या मार्गाने जाते तेथे अडथळे आणले तर तेथे दयाबुद्धीने वागू नये. पण हे नाव बदलण्याचे आत्ता असे काही खास कारण नाही. तेव्हा ते आत्ता करून ज्यांचा विरोध आहे त्यांना डायरेक्ट देशद्रोही स्टॅम्प मारण्याची गरज आहे का? यातील अनेकांना जरा विचार केल्यावर, आणखी माहिती मिळवल्यावर औरंगजेब कोण होता ते कळेल, मग एवढा विरोध कदाचित राहणार नाही.

दुर्दैवाने आपल्याकडे भाजपच काय पण तथाकथित सर्वधर्मसमभावी पक्षांकडेही असा नैतिक अधिकार असलेला नेता नाही जो मुस्लिमांना याचे जस्टिफिकेशन देउन पटवू शकेल. त्यांच्यातील ज्या नेत्यांनी हे करायला हवे ते करतील असे वाटत नाही.

विरोध करणाऱ्यामध्ये विचारवंत आणि मोडतोड करणारे इतिहासकार आणि राजकारणी हैत.

* सर्वसामान्य लोकांना * काहीही फरक पडला नाहीये ... हिंदू किंवा मुसलमान. दोघांनीही बदल स्वीकारलाय. तसाही इतकेदिवस कोणास काय फरक पडत होता? औरंगजेब रोड होता म्हणून काय जाणं सोडलं होत त्या रस्त्याहून तिटकारा असलेल्या लोकांनी?

आणि अजून किती दिवस हे अशिक्षित पुराण ऐकायचं? त्यांना तशी समजूत करून दिली जाते वगैरे?
पकडले गेलेले दहशतवादी, पाकिस्तानी सोडले तर चांगले सुशिक्षित होते.

हा निर्णय चुकिचा आहे असे वाटणारे सारे औरंगजेब समर्थक किंवा देशद्रोही आहेत असे मानणे अयोग्य आहे. आपल्याला आवडत असो वा नसो औरंगजेब भारतीय इतिहासाचा एक भाग आहे आणी आतताहे नाव बदलणे उगीचच रिकामटेकडे काम आहे. त्यापेक्षा कलाम यांच्या नावाने भरीव काम करावे हे ओवेसिंचे मत योग्य आहे.

>पण या तरूणांना जर ते समजणारच नसेल तर मुद्दाम डिवचल्यासारखे करून त्यांना आणखी दुरावून टाकून काय फायदा आहे?

डिवचणे हाच तर अजेंडा आहे.

हिंदू व मुस्लिम दोन्ही शासकानी स्वतःचीच घरे भरली. हिंदूनी बदनाम मात्र मुस्लिमाना केले.

अनेक आयडी आणि त्यांच्या डुआयडींनी भारतातील विशिष्ट जाती / धर्माला टार्गेट करुन बदनाम करण्यासाठी त्यांच्याबद्दल वाईट खोटे लिहिलेले लेख पाडले / प्रतिक्रिया दिल्या,
तेव्हा कोणी आले नाही त्यांना सांगायला की "समतोल" विचार करा. तेव्हा कुजकट हसत बसले सगळा खेळ बघत.

मी समाजातील मवाळ लोकांना समाजावे या हेतुने एक वाक्य काय लिहिले तर लगेच आले धावुन "हिंदुना" अक्कल शिकवायला की समतोल विचार करा. दंगे मारामा-य करु नका / तसे होईल असे काही लिहु नका.

ईतर जण एवढे ढिगभर लेख / प्रतिक्रिया पाडत होते हिंदुविरुद्ध तेव्हा नाही आठवली समतोल विचारांची गरज?
दंगे मारामा-य न करण्याची गरज? केवळ एकाच जाती + धर्माला टार्गेट करुन बदनाम न करण्याची गरज?
हिंदु जागृत होतात असे दिसले की आले लगेच दिशाभुल करायला.

सचिन पगारेंचे लेख अत्यंत शांतता प्रस्थापित करणारे असतात हे ह्या निमित्ताने आठवले.

(अवांतराबद्दल दिलगीर)

हिंदूनी बदनाम मात्र मुस्लिमाना केले.>>>.>>> अय्यो रामा! ते इसिस का काय म्हन्त्यात ते हिन्दु लोकान्चेच पाप की वो म्हन्ते मी. ते सौदी अरेबीयावले कस्ले येडे म्हनावे, आपल्याच लोकावर हल्ले करु र्हायले.:फिदी:

अशी मराठी बोलणारे हिंदु युवक त्या नेहमीच्या ईसिसच्या कपड्यांत त्यांचा झेंडा घेऊन ईमॅजीन केले! Rofl
चला हवा येउ द्य ई. चा एक चांगला एपिसोड होईल यावर!

शोएब डॅनियल चे लेख खरेच चांगले आहेत. त्या लेखांचा मुद्देसूद प्रतिवाद वाचयला आवडेल. >>>

खरेच? Uhoh

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहे. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही.

स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. आजच नाही नेहमीच. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो. त्या दुटप्पीपणामुळेच ते ट्विट दाखवले आहे. आणि प्रतिवादही केला आहे. प्रश्न असा आहे की असे "सिलेक्टिव्ह रिडींग" तुमच्या सारख्या विचारवंताना आवडते. आणि त्यावर प्रतिवाद केला की आम्हीच मात्र डिवचणारे ! काय जमत नाही राव.

आता तुम्हाला प्रश्न. शोएबच्या लेखाला तुम्ही चांगले म्हणाला आहात. त्यात काय आणि कसे चांगले आहे ते माझ्यासारखेच पुराव्याने दाखवावे. वा तुम्ही चूक आहात, शोएबने त्याला हवे मांडून लेख लिहिला आहे हे मान्य करावे.

तुम्ही पुरावे दाखवले तर मी माझी चूक मान्य करेन. अन्यथा तुम्ही शोएब चुकीचा आहे हे इथे लिहावे. Happy

अय्यो रामा !

आमी भारतातील इतिहासाबद्दल बोलतुया तुम्ही मक्केला का पळताय ?

जगभरचे मुसलमान वेळप्रसंगी एक होतात.. खिलाफत असो , बांग्लादेशी अत्याचार असोत वा कुणाचा जनाजा असो . हिंदुंची पोटदुखी हीच आहे.

अनेक हिंदू राजे मोघलांचीच चाकरी करत होते. कित्येक राजे औरंगजेबाच्या दारात रांग लावायला जात होते.

महादजी शिंदे , पेशव्ये वगैरेनी दिल्लीत मुसलमान बादशहाच बसवला व स्वतः तनखे / चौथाई घेत बसले.

१८५७ ला बहाद्दूरशहा जफरही ( नामधारी ? ) इतरांप्रमाणे एक नेता होता . ( बहाद्दूरशहाची आई रजपूत होती. )
आणि आता हेच मोघल देशाचे शत्रू कसे झाले ?

भूसंपादन कायदा , कालच विरोध झालेला कामगार कायदा यावरील जनतेचे लक्ष उडवण्यासाठी लबाड भाजपा ही खेळी खेळत आहे.

डिवचणे हाच तर अजेंडा आहे.
<<
या लेखाबद्दल म्हणताहात ना?

इब्लिस,

अहो हा लेख त्या शोएब आणि त्याच्या सारख्या शेकडो लेखानंतर आलेला आहे. त्यालाही तुम्ही डिवचणे म्हणता आहात. हद्द आहे भाऊ.

प्रश्न हिंदू मुस्लीम नाहीये. प्रश्न आहे औरंगजेबाला महान ठरवणे. ते चुकीचे आहे. तुम्ही कितीही ओरंगजेब ग्रेट आहात असे म्हणत असला / नसला तरी.

शोएबला जाऊन म्हणा, की डिवचणारे का लिहित आहेस. मी दुसरी बाजू दाखवत आहे. कृपया लक्ष द्या हो मुद्द्याकडे.

केदार,

ते काही असो ... ते फेक रेकॉर्ड असतील ... नेहेमीप्रमाणे हिंदुत्ववाद्यांनी जिथे तिथे घुसवलेले. नवीन आलेल्या माहितीनुसार औरंगजेब हा एक संत होता.

हिंदूंनी उठाव केले, त्याचा बिमोड करतांना पैसा लागला, म्हणून जिझिया लावला होता त्याने.

पानसरे यांनी लिहिलेय की इस्लामी राज्यकर्ते फक्त त्यांच्या सीमांचे आणि राज्याचे रक्षण करत होते आणि त्यांनी असेही लिहिले की मुस्लीम सैन्यात नसायचा म्हणून लढणारे उपजीविकेसाठी लुट करायचे. मग थोडीशी लुटालूट केली तर बिघडले कुठे? आता लुटीत फुटणारच न मंदिरे मुर्त्या ... हरणाऱ्या लोकांनी असले प्रश्न विचारायचे नसतात Proud

आता हिंदूंनी मंदिर बांधून बांधून दगड संपवले तर मग औरंगजेब दगड कुठून आणणार?

Post like a Secular Wink

लोल वैद्य.

जाणकारांसाठी परत एकदा, आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर. त्यामुळेच लिहिले की आताशा त्याला महान ठरविणारे लेख येत आहेत. म्हणून मी इथे लिहिले.

शोएबला जाऊन म्हणा, की डिवचणारे का लिहित आहेस. मी दुसरी बाजू दाखवत आहे. कृपया लक्ष द्या हो मुद्द्याकडे. +१

Pages