छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी. >>> खरं तर हा धागादेखिल काढण्याची गरज नसावी. ती तुम्हाला भासली याचे आश्चर्य वाटले. पण शेवटची दोन वाक्ये पाहुन खेदही वाटला. धाग्याच्या भवितव्याशी आपणही परीचीत असालचं. शुभेच्छा स्विकाराव्यात.

केदार,

१. कृपया वादग्रस्त ट्वीट काढावेत अशी विनंती
२. सं ब्रि हा उल्लेख टाळावात अशी विनंती

ह्या फक्त 'विनंत्या' आहेत. चु भु द्या घ्या.

शिवाय, ह्या विषयावर तुमचे स्वतःचे म्हणणे काय आहे?

'गनीम' हा शब्द मराठी नाही. 'गनिमी कावा' हा शब्द मराठ्यांच्या युद्धप्रणालीसाठी वापरला जात असला तरी प्रत्यक्षात गनीम म्हणजे शत्रूच!

औरंगजेब रोड नावाचा रोड असू शकतो हेच आधी विचित्र आहे. जसे एल्फिन्स्टन रोड! उद्या याकूब रोडही निघायचा!

अब्दुल कलाम अख्ख्या जगासाठी आदरणीय व्यक्ती होती. त्यांचे नांव एका रस्त्याला(च) दिले जाणे आणि ते(ही) चर्चेत येणे हेच मजेशीर आहे.

पुन्हा

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

औरंगजेब किती ग्रेट होता आणि त्याने शहाजहाननी रिकामा केलेला खजीना (ताजमहालसाठी) कसा भरला आणि वायव्य सीमांचे कसे रक्षण केले आदी अर्थाचेपण लेख वाचलेत. बहुतेक लेखांमध्ये गैरमुस्लिम लोकांच्या सततच्या बंडाळीमुळे सतत युद्ध झालीत आणि त्यामुळे त्याला जिझिया लावावा लागला असाही सुर होता Wink

आणि नवीन हाती आलेल्या कागदपत्रानुसार औरंगजेब त्याच्या राज्याच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात आला होता हेही वाचले.

आणि तो दारू पीत नव्हता त्याबद्दल त्याचे कौतिकपण Happy

पण शेवटची दोन वाक्ये पाहुन खेदही वाटला >>

कृपया वादग्रस्त ट्वीट काढावेत अशी विनंती
२. सं ब्रि हा उल्लेख टाळावात अशी विनंती

>>

बेफीकिर आणि विठ्ठल,

कुणी काहीही लिहू शकते आणि कुणाला लिहिलेले कसेही इंट्रप्रिट करू शकते. त्यामुळे मारिओ ह्यांनी तसे लिहिने हा त्यांचा हक्क आहे. त्या आधी पण शिवाजी महाराजांना लुटारू म्हणून अनेकांनी संबोधले आहे

आपण विरोधी मत समजावून घेऊ शकतोच की.

सं बि चा उल्लेख केला म्हणजे धागा रसातळालाच जायला हवा का?

हा धागा हिंदू व्हर्सेस मुस्लिम नाही हे भान प्रतिसाददात्यांनी ठेवणे आवश्यक आहे.

इतिहास इंटरप्रिट कसा केला जातो आणि कुठल्या प्रकारे ह्याच उदाहरण म्हणून धागा काढला.

एक हे ट्विट ज्यावर धागा निघाला
दुसरे प्राध्यापक कलबुर्गी यांच्या हत्येनंतरचे एकाने केलेले ट्विट ज्यावर इथल्या काहींना काहीच बोलावेसे वाटले नाही अर्थात त्यावर कोणी बोलणार नाही.

बाकी सगळे समजुतदार आहे असे समजतो

मला वाटते ते ट्विट असु द्यावे.
देश्द्रोह आणि विशिष्ट जाती / धर्माला टार्गेट करण्या-यांची मजल कुठपर्यंत गेली आहे आणि त्यांचा भारताला नव्या पाकिस्तानात कन्वर्ट करण्याचा मुळ उद्देश सगळ्यांना कळेल.
अर्थात हेमावैम.

हा धागा एका ट्विटवर नाही. तर अश्या अनेक लेखांवर आहे.

प्राध्यापक कलबुर्गी आणि इतर पुरोगामी ह्यांच्या हत्या मलाही तितक्यात वेदनादायक आहेत जितक्या तुम्हाला.

परत एकदा कोणत्या रस्त्याला कुणी काय नाव द्यायलाच पाहिजे असाही विषय नाही.

शिवाय, ह्या विषयावर तुमचे स्वतःचे म्हणणे काय आहे? >>> माझे स्वतःचे म्हणणे काहीच नाही.

इतिहास इंटरप्रिट कसा केला जातो आणि कुठल्या प्रकारे ह्याच उदाहरण म्हणून धागा काढला. >> धन्यवाद हे आता आता चालू झाले आहे. हे जाणत असाल.

दुसरे प्राध्यापक कलबुर्गी यांच्या हत्येनंतरचे एकाने केलेले ट्विट ज्यावर इथल्या काहींना काहीच बोलावेसे वाटले नाही अर्थात त्यावर कोणी बोलणार नाही.
>>
आपल्या मुळ आयडीने पगारेंना धागा काढुन कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध करावासा वाटला नाही याचा निषेध.
पगारें नक्की कोणाचे समर्थक आहेत असा प्रश्न ईथे पडतो.

शिवाजी महाराजांनी जे काही केले ते येथील भूमीत जन्मलेल्यांच्या भल्यासाठी केले. त्यांच्याबद्दल कोणी एखादा काहीतरी लिहितो ह्याचा नुसता उल्लेख पुरेसा आहेच की! ते पुराव्यानिशी दाखवून काय साधले जात आहे?

केदार,

>>>कुणी काहीही लिहू शकते आणि कुणाला लिहिलेले कसेही इंट्रप्रिट करू शकते. त्यामुळे मारिओ ह्यांनी तसे लिहिने हा त्यांचा हक्क आहे. त्या आधी पण शिवाजी महाराजांना लुटारू म्हणून अनेकांनी संबोधले आहे<<<

हे फक्त शब्दांत मांडता येणे शक्य आहेच की!

>>>आपण विरोधी मत समजावून घेऊ शकतोच की.<<<

हो, पण ते मत वाचून तळपायाची आग मस्तकाला पोचणार असेल तर त्या मताचे चित्र देणे हे काडी लावण्यासारखे नाही का होणार?

>>>सं बि चा उल्लेख केला म्हणजे धागा रसातळालाच जायला हवा का?<<<

धागा एका बाजूला! संकेतस्थळावर ह्याचे काही परिणाम होऊ शकतात हे नाही का पटत?

>>>हा धागा हिंदू व्हर्सेस मुस्लिम नाही हे भान प्रतिसाददात्यांनी ठेवणे आवश्यक आहे.<<<

अगदीच!

>>>इतिहास इंटरप्रिट कसा केला जातो आणि कुठल्या प्रकारे ह्याच उदाहरण म्हणून धागा काढला.<<<

नाही. इतिहास इंटरप्रिट कसा केला जातो ह्यावरील धाग्यात तुमची स्वतःची काही अभ्यासू मते समाविष्ट झाली असती. कोणा एका गटाला 'आता बॉल तुमच्या कोर्टात आहे' असे आव्हान दिले गेले नसते. (हे माझे अ‍ॅझंप्शन). ज्याला हवा तसा तो इतिहास लिहितो, वाचतो, सांगतो हे ठीक आहे. पण जाहीररीत्या लिहिताना संवेदनशीलपणे लिहिले जायला हवे असे मला वाटते.

पुन्हा

चु भु द्या घ्या

स्पॉक या आयडीला कारण सानियाला खेलरत्न दिले जाउ नये पासून तिने खेलरत्न घेण्यासाठी स्वतःचे लग्न मोडून यावे इतपर बेअक्कलपणा बोलले होते

'आता बॉल तुमच्या कोर्टात आहे' असे आव्हान दिले गेले नसते. (हे माझे अ‍ॅझंप्शन). >>

तुमचे बरोबर आहे. ही चूक / ओव्हरलुक माझ्याकडून झाली. ते तेवढे वाक्य मी काढले.

इनफॅक्ट तो लेख ह्या ट्विटपेक्षा मनोरंजक आहे. असे अनेक लेख गेल काही दिवस वाचन्यात आले. पण त्या सर्वांवर इथे लिहिले नाही. Happy

रस्ताच्या नावावरून ते पण औरंगजेब बदलले म्हणून खूप गदारोळ नक्कीच झाला आहे. / होत आहे.

ते पुराव्यानिशी दाखवून काय साधले जात आहे?
>>
ईथे माबोवरच काही आयडी अशा मताचे आहेत की "ते पाकी" पण आपल्यासारखेच फॅमिलीवाले. कशाला त्यांना युद्धात मारायचे. दहशदवाद्याला कशाला फाशी द्यायची ई.
अशांसारख्यांना पुरावे देणे आवश्यक आहे.

स्पॉक,

तुमच्या म्हणण्यातील तीव्रता नक्कीच समजते. पण 'असे असे म्हंटले गेले आहे' हे पुरेसे आहे ना? 'कसे म्हंटले गेले आहे' हे दाखवून देण्यातून भावनिक उचंबळ जागृत होतात.

सुरुवात हे छटाकभरवाले करतात . नंतर उत्तर मिळाल्यावर बोंबलत बसतात.
तरी केदार यांच्या विनंतीला मान देऊन असल्या आयडींना उत्तर देणे बंद

हे दाखवून देण्यातून भावनिक उचंबळ जागृत होतात. >> तेच हवे आहे. तसे झाल्यशिवाय समाजातील मवाळ आणि दयाळु जनतेचे मतपरिवर्तन कसे होईल?

अर्थात हे तुमचे मत आहे त्याचा आदर आहेच आणि निर्णय केदार यांचा राहिल हे ही मान्य आहे.

तेच हवे आहे. तसे झाल्यशिवाय समाजातील मवाळ आणि दयाळु जनतेचे मतपरिवर्तन कसे होईल?
<<
मवाळ व दयाळू जनतेला भडकवून हाणामार्‍या करायला भाग पाडले पाहिजे, सर्वत्र दंगे माजले पाहिजेत अशा मताचे आपण आहात काय?

*

इतिहासाचा अभ्यास इतिहास म्हणून करावा, त्यातील चुकांपासून बोध घ्यावा, पुढील वाटचाल शांततेकडे व सौहार्दाकडे करावी हे बेसिक आहे.

इतिहास मांडताना कुणी कोणती घटना कोणत्या चष्म्यातून कशी पाहतो याबद्दलची अ‍ॅकॅडेमिक चर्चा इतिहासाचे गाढे अभ्यासक केदार यांनी इथे मांडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या धाग्याचे इंटरप्रिटेशन कसे होणार व पुढे काय मज्जा येणार हे जाणवून मलाही "खूप गम्मत वाटली."

जाताजाता,

गनिमी कावा म्हणजे असा माफिनामा देऊन स्वतःची सुटका झाल्यावर एकदा दगडाखालचा हात निघाला, की मग तो दगड फोडण्याचा उद्योग हाती घेणे असा होतो ना? की माफिनामा दिल्यावर बादशहाची जागीर भोगत गुपचुप आराम करणे असा होतो?

महाराजांनी पेन्शन भोगली नाही, म्हणून तो माफिनामा गनिमी कावा आहे हे आपोआप सिद्ध होते, हे ४थी ५वी चे इतिहासाचे पुस्तक वाचणार्‍यास समजते. शेंडाबुडख्याशिवायची ट्वीट सोशल मेडियावर विखार पसरवण्याकरताच असते, ही साधी बाब आहे.

रस्त्यांची/गावांची नावं बदलणं हे superficial political tactic वाटतं. शिवछत्रपती हे अवघ्या महाराष्ट्राचे राजे. डॉ कलाम हे आधुनिक भारतातील आदरणीय प्रेसिडन्ट. पण दोघांचं या देशासाठी असलेलं व्हिजन साकार करणं हे रस्त्याचं नाव बदलण्यापेक्षा जास्त महत्वाचं नाही का? शिवाजी महाराजांना त्रास देणारा आणि सम्भाजी महाराजांची अमानुष हत्या करणारा औरंगजेब वाईटच होता. पण त्याचं नाव बदलून काय मिळणार कळत नाही. आधी छत्रपतींची आणि कलामांची व्हिजन साकार करा मग नंतर निवान्तपणे नावं बदलत बसा.

बाकी कलामांच्या नावाला विरोध होण्यात काहीच आश्चर्य नाही. २००७ मध्ये पहिली टर्म संपल्यावर दुसरी टर्म स्वीकारण्यासाठी कलाम तयार होते-जर मेजोरिटी सपोर्ट असेल तर. Considering he was active till his last breath in २०१५, he was certainly fit to work as president till २०१२ and could have done more good, strategic work for the country. परन्तु त्यावेळी यूपीएची सत्ता होती, कोंग्रेसला कलाम नको होते. त्यांनी कोंग्रेस राजकारणी प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती घोषित केलं.
असो आता भाजपकड़े इतकं मोठं बहुमत आहे तर त्यांनी नवीन मोठ्या स्ट्रेटेजिक प्रॉजेक्ट्स व योजनांना डॉ कलाम यांचं नाव द्यावे पण मुख्य म्हणजे कलामांच्या विचारांचा प्रसार करावा, त्यांच्या साधेपणातून शिकावं, त्यांची पुस्तकं वाचून त्यातून त्यांची स्वप्नं समजून घेऊन पूर्ण करावीत. भावनिक राजकारणासाठी महापुरुषांचा वापर करू नका बास आता कंटाळा आला.

>>>शिवछत्रपती हे अवघ्या महाराष्ट्राचे राजे. डॉ कलाम हे आधुनिक भारतातील आदरणीय प्रेसिडन्ट. पण दोघांचं या देशासाठी असलेलं व्हिजन साकार करणं हे रस्त्याचं नाव बदलण्यापेक्षा जास्त महत्वाचं नाही का? <<<

एक्झॅक्टली

पण दोघांचं या देशासाठी असलेलं व्हिजन साकार करणं हे रस्त्याचं नाव बदलण्यापेक्षा जास्त महत्वाचं नाही का? >>

बरोबर पण आताचे सत्ताधारी हे करण्यापेक्षा दिखाव्यावर जास्त देणारे असल्याने असले थातुरमातूर कार्य करून शाबासकी मिळवून पाहत आहे

कलाम तोंडी लावायला आहेत, cnw. कलामांच्या नावात दंगे पेटवायचं अन मतांचं ध्रुविकरण करण्याचं पोटेन्शिअल अजून नाही. सध्या तरी ते फक्त 'आम्हाला मान्य असलेले देशभक्त मुसलमान' आहेत.

थोरल्या महाराजांचं नाव घेऊन पब्लिकला उल्लू बनवायचं काम भरपूर व सर्वपक्षीय लोकांनी केलं. आता त्यासोबत औरंगजेबाचं नाव काढून पुन्हा अस्मिता भडकवणं सुरू आहे. "केवळ मुसलमान म्हणून औरंगजेबाचा द्वेष सुर्ये ब्रंका!" असल्या वावड्या पिकवत भांडणं वाढवणार्‍यांना शोधून चांगलं हाडं नरम होईतो बमकावलं पाहिजेच.

अन त्यांच्यासोबतच "बघाबघा, कसे हे मुसलमान! औरंगजेबाचीही बाजू घेताहेत.." असा टाहो फोडून दुफळी माजवणार्‍यांना, व त्यांच्या हाती कोलीत देणारे असले फडतूस नामांतर इश्यूज पुढे आणणार्‍यांनाही चौकात ओल्या धोतराच्या पिळ्याने बडवलं पाहिजे मस्त.

अवांतर.

कालच पगारेंच्या लेखनातली 'सट्लटी' कमी झाल्याचं मी म्हटलो होतो.

लग्गेच, आज "माफिनामा" अन "शिवाजीचा लुटारू असा उल्लेख" या दोन गोष्टी ज्या सटल(subtle) नजाकतीनं या धाग्यात पेश केल्या गेल्या आहेत, त्या केवळ लाजवाब! अक्षरशः गळ्यातला मोत्यांचा कंठा काढून द्यावासा वाटतोय Wink

फक्त माहितीसाठी...
औरंगजेब हे खरे तर नाव नसुन पदवी होती .
सॉरी आलमगीर म्हणजे सिंह (औरंगजेब चा अर्थ नक्की माहित नाही).

<<
>>>शिवछत्रपती हे अवघ्या महाराष्ट्राचे राजे. डॉ कलाम हे आधुनिक भारतातील आदरणीय प्रेसिडन्ट. पण दोघांचं या देशासाठी असलेलं व्हिजन साकार करणं हे रस्त्याचं नाव बदलण्यापेक्षा जास्त महत्वाचं नाही का? <<<
>>

प्लिज! इतक्या लवकर इतके बरोबर पोस्ट योग्य नाही. जरा १०-१२ पानं उलटू देत! Wink

Pages