मायबोली गणेशोत्सव २०१५ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by webmaster on 30 August, 2015 - 22:04

या गणेशोत्सवात मायबोलीला १९ वर्षे पूर्ण होतील.
मायबोली गणेशोत्सव २०१५ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळाकडे वेळ फारच थोडा आहे तरी यंदा सर्वच लोकांनी सांभाळून घेऊया.>> +१००.

संयोजक मंडळाला शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!

वा! मंडळ आलं का? संयोजकांना खूप शुभेच्छा! कधीही काही मदत हवी असेल तर नक्की हाक मारा. मुशो, कंटेंटसाठी किंवा इतरही कुठल्या कामासाठी.
गणपतीबाप्पा मोरया!! Happy

संयोजकांना खुप खुप शुभेच्छा Happy

मंडळाकडे वेळ फारच थोडा आहे तरी यंदा सर्वच लोकांनी सांभाळून घेऊया.>> +१००००००००

जितकी काही आणि जी काही मदत लागेल ती करण्यात येईल Happy

आशू, मागच्या वर्षीचे ठरवलेल्यांपैकी २ उपक्रम खुप मस्त होते जे आपल्याला घेता आले नाहीत. ते या वेळेला घेता आले तर बघ Happy मज्जा येईल Happy

उत्साह द्विगुणित करणारा पाठिंबा आहे! धन्यवाद ! सर्वांना आनंद देण्याचा यथाशक्ती प्रयत्न संयोजक मंडळ करेलच. लंबोदर गणपतीबाप्पांना घेऊन जायचं काम इवलासा उंदीर करतो तसं आहे हे सबंध मायबोलीच्या गणेशोत्सवाचा रथ मोजक्या लोकांनी ओढणं! उंदीरमामा की जय! Lol

संयोजनाची आवड नाही.
पण जे ते करतील त्यांना ते भारी जमून जावे आणि खूप धमाल यावी असे मनापासून वाटते.
उपक्रमांमध्ये मात्र सहभाग घरचा गणपती असल्यासारखे नोंदवणार यात शंका नाही.
शुभेच्छा Happy

या गणेशोत्सवात माझ्याकडून जमेल तितकी मदत नक्की करेन.
एखाद्या स्तोत्राचा अनुवाद, शुद्धलेखन तपासणी, हवे असल्यास बासरीवादन अशी सेवा करू शकतो.
हक्काने सांगा काही लागलं तर.
बाप्पा सांभाळून घेतो हां अनुभव आहे.
मंडळास खूप शुभेच्छा !

Pages