kale पराठा आणि कोबीची चटणी

Submitted by नम्रता निकम on 1 September, 2015 - 14:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

kale पराठा

२ कप बारीक चिरलेली kale ,
२ कप गव्हाचे पीठ ,
१ कप oats बारीक केलेले,
१ उकडलेला बटाटा / avacoda गर ,
२ टी स्पून आल-लसूण -हि मिरची paste,
२ टी स्पून flax सीड्स (optional ),
२ टी स्पून chia सीड्स (optional),
ओवा , तिळ
मीठ

कोबीची चटणी

२ कप कोबी ,
१ छोटा कांदा ,
१ टोमाटो ,
१०-१२ कडीपत्ता पाने ,
३-४ लाल मिर्च्या ,
२ टी स्पून चिरलेल आलं ,
१ टी स्पून उडद डाळ ,
१ टी स्पून धणे ,
१/२ टी स्पून मेथीदाणे ,
मोहरी ,
चिंचेचा कोळ ,
गूळ ,
तेल ,
मिठ

क्रमवार पाककृती: 

पराठे :

पराठ्या साठीचे सर्व साहित्य एकत्र मिसळून पोळी ला भिजवतो तशी कणिक मळुन घेणे.
तेल / तूप लावून पराठे भाजून घेणे.

कोबीची चटणी:
१. उडीद डाळ , धणे , लाल मिर्च्या , मेथीदाणे,कडीपत्ता पाने , आलं हे सगळ कोरडच खमंग भाजून घेणे.
२. पातेल्यात तेल गरम करून , त्यात कांदा परतून घेणे .
३… कांदा साधारण गुलाबी झाला कि कोबी आणि टोमाटो घालून , एकत्र परतवणे . झाकण ठेऊन साधारण १०-१५ मि . शिजवून घ्यावे .
४. मिक्सर च्या लहान भांड्यात १ मधील जिन्नस बारीक पूड करून घेणे
५. त्यातच कोबीचे थंड झालेले मिश्रण एकत्र करणे
६. चवीनुसार चिंचेचा कोळ , गुळ , मीठ घालून पाणी न घालता चटणी वाटून घेने.
७. तयार चटणी ला , हिंग - मोहरी -कडीपत्ता पाने याची फोडणी घालावी

वाढणी/प्रमाण: 
९-१० पराठे , २ वाटी चटणी
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Intresting! करून खाते.
धन्यवाद न नि.

Intresting! करून खाते.
धन्यवाद न नि.

भाज्यांमधे केल ही भाजी अगदी पहिला नंबर लावते. तिच्यात केवढे काहीकाही घटक आहेत जे की शरिराला फायदीशीर आहेत.

नम्रता ताई, छान आहे पराठा.

अरे बापरे, भलताच हेल्दी यु नो.

एका दिवसात इतकं सर्वच ठासून भरून कमतरता भरून येणार. केल, कोबी, बटाटा, फ्लॅक्स....on route to be musical Proud

जोक्स अपार्ट, फ्लॅक्स सीड्स, केल, चिया सीड्स पोटावर ताण येइल जर सवय नसेल तर...