अंबाडीची भाजी (विदर्भातल्या पद्धतीने)

Submitted by सायु on 31 August, 2015 - 04:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ की. आंबाडीची पाने खुडलेली.
१२/ १५ लसुणं पाकळळ्या
४ सुक्या मिरच्या.
चण्याच्या डाळीचे पीठ १/२ वाटी / किंवा ज्वारीचे पीठ
तेल आणि फोडणीचे साहित्य अंदाजे

क्रमवार पाककृती: 

पावसाळ्याची आंबाडीची भाजी छानच मिळते, हिरवी गार आणि पौष्टीक.. तर कृती कडे वळु यात..

प्रथम आंबाडीची पाने खुडुन स्वच्छा पाण्यानी धुवुन.. सुती कापडावर पसरवुन घ्या,आता बारिक चीरुन घ्या.
एका मोठ्या गंजात / पातेल्यात एक तांब्या पाणी घालुन त्यात ही चीरलेली पाने घालुन १० मी. शिजवुन घ्या..
आंबाडी मुळात खुप आंबट असते त्यामुळे असे करणे गरजेचे आहे. आता पाणी उपसुन, ही उकडलेली पाने मिक्सर मधुन गिरवुन घ्या, जरा सैलसर लगदा करुन घ्या..
हा असा...
ambadi1.jpg
कढईत एक पळी तेल घालुन मोहरी तडतडली की ७ , ८ लसुण पाकळ्या (चिरलेल्या) घाला, मग सुक्या मिरच्या, लगेच हळद आणि तिखट घालुन हा लगदा त्यात घाला.. मीठ घाला आणी झाकण ठेवुन ५, ७ मी. शीजु द्या.. १/२ वाटी डाळीचे पीठ / ज्वारीचे पीठ पेरा. जास्त कोरडी नको व्हायला, छान आसट आणि लुसलुशीत झाली पाहिजे . परत ५/७ मी.झाकण ठेवुन दणदणीत वाफ काढा...झाली भाजी तय्यार.

वरुन कढवलेलं तेल सोडुन पानात वाढा.. (कढवलेल्या तेलात, मोहरी, हिंग, उरलेल्या लसण्याच्या पाकळ्या , दोन सुक्या मिरच्या ई. घाला )

आंबाडीची भाजी, भाकरी / पोळी, हिरवी चटणी, भात असा मस्त बेत करा. Happy

ambadi_1.jpg

वाढणी/प्रमाण: 
३ जणांना सहज पुरते.
अधिक टिपा: 

भाजी आसटच असावी त्यानुसार पीठ कमी जास्त करावे, कढवलेलं तेल आवर्जुन घाला, त्या शिवाय मजा नाही.
डा़ळीच्या पीठा एवजी ज्वारीच्या कण्या लावुन ही भाजी करायची एकडे विदर्भात पद्धत आहे..

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायलि - उरलेल्या पाण्याच्या भाकरी करतात. म्हणजे ते पाणी भाकरीला वापरले तर भाकरी छान आंबट होतात आणि भाकरीला हिरवा रंग येतो.

जागु, साती खुप खुप धन्यवाद..
बी , टीना नी नाही मी टाकलीय रेसिपी... तीच्या इतक छान नाही लिहिता येत मला.. Happy
निधी, विदर्भीय पा.कृ. = टीना असे समीकरणच झाले आहे आता मा.बो. बर Happy
प्रसन्ना, अगदी बरोबर, तांदळाच्या कण्या पण लावतात...

वरून टाकलेल्या कढवलेल्या तेलाला आधुनिक मराठीत (!) तडका असे म्हणतात.
Wink

आम्ही अंबाडी/ मुद्दीपल्ल्या- (पालक आंबट्चुका मिश्र भाजी) यांच्यावरच्या तेलात तीळ टाकतो.

येस्स्स !!

आई नागपूर ला गेलो की आवर्जुन करते ही भाजी माझ्यासाठी Happy
तोंडाले पानी सुटुन ह्रायलं ना !!

ऑफिस ला जाताना भाकरी बरोबर ही भाजी आणि एका छोट्या डबीत फोडणी. मग डबा उघडल्यावर सर्वाच्या समोर ती फोडणी हळू हळू भाजीत घालायची. मित्र-मंडळी पहातच राहिले पाहिजेत हा काय प्रकार आहे ते. मग एकेकाला भाजीची चव द्यायची.

Mast, majhee favorite bhaajee, maajhaa ek lekhahee aahe ithe. Luckily hi bhajee gulf aaNi afriketahee miLate.

सायली , मस्त रेसिपी. माझी आवडती . पण आम्ही तांवुळाच्या कण्या आणि शेंगदाणे घालुन करतो.

या भाजीवर बरुन लसणाची फोडणी पाहीजेच त्याशिवाय मजा नाही.

बी Happy
सायलि - उरलेल्या पाण्याच्या भाकरी करतात. म्हणजे ते पाणी भाकरीला वापरले तर भाकरी छान आंबट होतात आणि भाकरीला हिरवा रंग येतो.+++१००
साती, तीळाचे वेरीयेशन छानच.
स.सा Happy
दिनेश दा, माझी सुद्धा आवडीची भाजी.
हेमाताई, शेंगदाणे, भिजवुन घालायचे काय?
मृणाल , आंबाडी वेगळी असते
ही बघ..
IMG_5053.JPG
(प्र.ची. अंतरजालाहुन सभार)

मस्त! मी वाटत नाही. बेसन कधी तर तुरीची डाळ व त्यात थोडे तांदुळ व दाणे टाकून शिजवून भाजीला लावते. ह्या भाजीला वरुन लसणीची फोडणी मस्टच...

कोंकणात असेपर्यंत अंबाडी म्हणजे गरीबांची भाजी वाटायची.
'टाकळा आणि अंबाडीची भाजी खाऊन दिवस काढलेत' ही दारिद्र्याची परिसीमा.

पण इकडे साऊथमध्ये ही सगळ्यांची आवडती भाजी.
आम्ही 'पुंडीपल्ल्या' म्हणतो आणि बाजूला तेलंगणात 'गोंगुरा'
आणि इतके लाड या भाजीचे की विचारू नका!
आंध्र, तेलंगणावाले तर जास्तच करतात.

गोंगुरा पिकल काय, गोंगुरा चटणी काय, लाल बोंडांचे लोणचे काय!मला सगळे प्रकार खूप आवडतात.

इकडे कर्नाटकात अमावस्येला आणि सोमवारी तसेच सणाच्या दिवशी अंबाडी करत नाहीत.
आंध्रा/ तेलंगणात लग्नाच्या मेन्यूतही अंबाडीची आंबटगोड चटणी असते.

आंबाडी एकदम लाडकी भाजी. पण मी तांदळाच्या कण्या आणि तुरीची डाळ लावुन करते. भरपुर गुळ आणि वरुन लसणीची फोडणी हवीच हवी.

मंजु ताई , एकदा वाटुन पण करुन बघ.

साती इथे सुद्धा आंबाडी खाउन दिवस काढलेत... ऐकीवात आहे.
माझी एक तेलगु मैत्रीण होती, ती पण सांगायची आंध्रा मधे खुप आवडीनी करतात ही भाजी..
आरती मस्त पद्धत आहे तुझी..

सायली मस्त पाकृ. माझी आई व साबा ह्या भाजीत वरुन पण लसणाची चरचरीत फोडणी घालतात. आम्ही ही भाजी शिजवताना तान्दळाच्या कण्या घालतो.

भाजी घरात होती म्हणून आजच करून पाहिली.
मस्तंच झालीय.
अशी भाजी करता येऊ शकेल हेच कधी डोक्यात आले नाही.
आता आमच्या पद्धतीपेक्षाही ही पद्धत भारी वाटत्येय.
अंबाडीचा झुणका.

आपल्याला जमणार नाही आणि कदाचीत आवडणार नाही म्हणुन कधीच केली नाही. यापूर्वी कधी खाल्लीही नाही. इथे बघून एकदा करून बघावी वाटतेय.

Pages