अंबाडीची भाजी (विदर्भातल्या पद्धतीने)

Submitted by सायु on 31 August, 2015 - 04:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ की. आंबाडीची पाने खुडलेली.
१२/ १५ लसुणं पाकळळ्या
४ सुक्या मिरच्या.
चण्याच्या डाळीचे पीठ १/२ वाटी / किंवा ज्वारीचे पीठ
तेल आणि फोडणीचे साहित्य अंदाजे

क्रमवार पाककृती: 

पावसाळ्याची आंबाडीची भाजी छानच मिळते, हिरवी गार आणि पौष्टीक.. तर कृती कडे वळु यात..

प्रथम आंबाडीची पाने खुडुन स्वच्छा पाण्यानी धुवुन.. सुती कापडावर पसरवुन घ्या,आता बारिक चीरुन घ्या.
एका मोठ्या गंजात / पातेल्यात एक तांब्या पाणी घालुन त्यात ही चीरलेली पाने घालुन १० मी. शिजवुन घ्या..
आंबाडी मुळात खुप आंबट असते त्यामुळे असे करणे गरजेचे आहे. आता पाणी उपसुन, ही उकडलेली पाने मिक्सर मधुन गिरवुन घ्या, जरा सैलसर लगदा करुन घ्या..
हा असा...
ambadi1.jpg
कढईत एक पळी तेल घालुन मोहरी तडतडली की ७ , ८ लसुण पाकळ्या (चिरलेल्या) घाला, मग सुक्या मिरच्या, लगेच हळद आणि तिखट घालुन हा लगदा त्यात घाला.. मीठ घाला आणी झाकण ठेवुन ५, ७ मी. शीजु द्या.. १/२ वाटी डाळीचे पीठ / ज्वारीचे पीठ पेरा. जास्त कोरडी नको व्हायला, छान आसट आणि लुसलुशीत झाली पाहिजे . परत ५/७ मी.झाकण ठेवुन दणदणीत वाफ काढा...झाली भाजी तय्यार.

वरुन कढवलेलं तेल सोडुन पानात वाढा.. (कढवलेल्या तेलात, मोहरी, हिंग, उरलेल्या लसण्याच्या पाकळ्या , दोन सुक्या मिरच्या ई. घाला )

आंबाडीची भाजी, भाकरी / पोळी, हिरवी चटणी, भात असा मस्त बेत करा. Happy

ambadi_1.jpg

वाढणी/प्रमाण: 
३ जणांना सहज पुरते.
अधिक टिपा: 

भाजी आसटच असावी त्यानुसार पीठ कमी जास्त करावे, कढवलेलं तेल आवर्जुन घाला, त्या शिवाय मजा नाही.
डा़ळीच्या पीठा एवजी ज्वारीच्या कण्या लावुन ही भाजी करायची एकडे विदर्भात पद्धत आहे..

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा..देअर यु गो..
मला खुप खुप खुप खुप खुप आवडते..
आंबाडीची भाकरी पन..
पावसाळ्यात आप्पाच्या शेतात चक्कर होत असते वरचेवर तेव्हा मस्त कोवळे कोवळे पान खुडून आणायचे आणि करायची..घरी बेसन किंवा पिठ टाकुन नै करत..पूर्ण कृती हिच..बेसन पिठ न टाकल्यानं ती एक दोन दिवस टिकते..चटणी म्हणुन खातो..खुप सारे लसणं + हिरव्या मिरच्या..आई ग्गं..
आता शोधते इकडं कुठ मिळाली तर.. बोंडांची चटणी पन कातील लागते..
तू ती पाकृ सुद्धा दिलीये ना सायली. मस्तच..

माझी आठवण निघाली Wink धन्यवाद Happy

छान वेगळा प्रकार.

अंबाडीची भाजी जास्त नाही आवडत आणि जास्त केलीही जात नाही.

ह्या भाजीची माहेरची आठवण म्हणजे, गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण केलं की, आई त्यादिवशी झुणका, भाकर, अंबाडीची भाजी हा बेत करायची.

फक्त त्या दिवशीच आमच्याकडे ही भाजी व्हायची. आई कण्या घालून ही भाजी करायची आणि लसणीची फोडणी करायची या भाजीला. त्यादिवशी प्रसादाची ही भाजी खूप आवडायची. पण एरवी नाही.

त्यामुळे अंबाडीची भाजी म्हटली की, मला गजानन महाराजांची पोथी पारायण आठवतं. Happy

रश्मी, लबाड कोल्हा आभार.
साती, आमची पद्धत आवडली वाचुन खुप आनंद झाला
मयी खुप सोपी आणी चविष्ट भाजी आहे, एकदा जरुर करुन बघ.
टीना, धन्स ग.
मृण्मयी धन्स.
अन्जु ताई छानच.

Pages