सुक्या खोबरयाची झटपट चटणी

Submitted by द़क्षा on 13 August, 2015 - 00:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : किसलेले सुके खोबरे एक मोठी वाटी, चार लसूण पाकळ्या , थोडी चिंच, एक छोटा चमचा लाल तिखट , साखर आणि मिठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

कृती : हे सर्व जिन्नस कढईत खमंग भाजून मिकसर मध्ये बारीक वाटावे.चटणी तयार .

अधिक टिपा: 

ही चटणी हवाबंद डब्यात ठेवावी.तीन ,चार महिने उत्तम टिकते.

माहितीचा स्रोत: 
सौ.दक्षा मोकाशी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला फोटो ड्कवायला येत नाही.
माझ्या कडे Apple चा iPhone आहे त्यात फोटो काढता येतो पण डकवायला येत नाही डिसेंबर मध्ये मुलगी येनार आहे तेंव्हा शिकते.

फोटो का नै डकवला मग ?<<<
चटणी जशी झटपट झाली तशीच झटपट पोटात गेली. फोटो काढायला थोडातरी वेळ हवा ना.. Proud

सौ. मोकाशी, वकीली सोडून चटणी काय करत बसल्यात!!! Proud

हि चटणी नेहमी करते. पण एक वाटी खोबर्‍यात ८-१० लसूण पाकळ्या, चार चमचे लाल तिखट आणि तीन चमचे मीठ इतकंच पुरतं. पण चिमुटभर साखर (महाराष्ट्राच्या कोस्टल एलिमेंटला जागून Wink ) पण घालते.
चिंच नाय, नो, नेवर :p
मिक्सर अजिबातच वापरू नये, वरील सगळे भाजलेले पदार्थ (तिखट मिठ नाही भाजायचे हो) खलबत्त्यात चांगले कूट कूट कुटले की चटणी तैय्यार Happy

chatnee.jpg

धन्यवाद सर्वाचे
@किरु, बायकांना घरी स्वयंपाक पण करावा लागतो बाबा, पुरुषांसारखे नाही रोज आयते मिळायला तेही रोज नवनवीन पदार्थ Happy

दक्षे छान रेस्पी. माझ्या कडे सुकवलेला खोबर्‍याचा कीस आहे. त्याची करुन पाहते.
किरु, बर्‍याच दिवसांनी दिसतोयस,

ह्या पद्धतीने ही छानच आहे.

आम्ही खालील प्रमाणे करतो.
सुके खोबरे, लसुण, मिठ, सुकी मिरची किंवा मिरचीपूड एकत्र वाटायचे. मस्त झणझणीत चटणी तयार होते.

अशीच मिरची/मिरची पूड ऐवजी मिरे घालूनही करतात.

सुके खोबरे, लसुण, मिठ, सुकी मिरची किंवा मिरचीपूड एकत्र वाटायचे. मस्त झणझणीत चटणी तयार होते.

मी अशीच करते बरेचदा. कधी कधी आळशी भाजून त्यात टाकते थोडी. तीळ आणि मिरपूडपण थोडी घालते कधी कधी.

सासूबाई चिंच घालतात पण मी नाही नेहेमी घालत, क्वचित घालते आणि साखर अजिबात आमच्याकडे घालत नाहीत.

आम्ही लसणीचे तिखट म्हणतो यालाच. मी लसूण बरीच टाकते, एक वाटी खोबऱ्याबरोबर (एक गड्डा).

>>पण लसूण खोबऱ्याच्या चटणीत साखर .......<<

ते "त्या " ह्यांच्यात करतात ना तसा स्वंयपाक त्याला जागून असेल.

पण खरच , साखर म्हणजे अगदीच 'हे' हां. Proud

>>बायकांना घरी स्वयंपाक पण करावा लागतो बाबा, पुरुषांसारखे नाही रोज आयते मिळायला तेही रोज नवनवीन पदार्थ स्मित<<

ह्या असल्या विचारानेच बायकाच स्वतःच्या प्रगतीच्या आड येतात. मानसिकता..... Proud

खलबत्त्यात कुटुनच सही होते. आम्ही गावाला कुटुनच करतो पण मुंबईला फ्लॅटमध्ये कुटणे प्रशस्त वाटत नाही म्हणून मिक्सरमध्ये करते.

पण खरच , साखर म्हणजे अगदीच 'हे' हां. >>>>अजिबात नाही हां.१-२ चमचे नव्हे तर चिंचेचे बुटुक असेल तितकीच,

मी करते लसणाची चटणी, त्यात मिरचीपुड, मीठ, लसुण आणि सुक्या खोबर्याचा किस कच्चाच इतकच घेते,
मोकळी व्हायला कधी कधी त्यात थोडेसे भाजलेले शेंगदाणे - ४-५ दाणेच, टाकते.

आमटी भाताबरोबर हे तोन्डीलावणे खुप छान लागते.

आता कधीतरी अशी करुन बघेन ग.