माझ्या घरात चुकून एक जास्तीचे स्वयंपाकघर झाले आहे. हल्ली तसाही पुण्यात घरी स्वयंपाक कमीच तयार होतो. त्यामुळे दोन खोल्यांत दोन ओटे हा मला जागेचा अपव्यय वाटतो. शिवाय घरात दोन दोन ओटे असून आपण किती कमी भांड्यांत स्वयंपाक करतो हा न्यूनगंड येतो. तेव्हा मी या समस्येच्या मुळावरच घाव घालायचे ठरवले आहे. घरातल्या कर्त्या स्त्रीने ओटा फोडला म्हणून स्त्रीमुक्तीच्या इतिहासात माझे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले जाणार आहे. त्याला मोत्यांची अंडरलाईन मिळावी म्हणून कृपया मला मदत करा.
१. खरंच हा ओटा फोडावा का? सध्या त्यावर इस्त्री केली जाते. हा अपमान सहन न होऊन तो काळवंडत चालला आहे.
२. तुकडे तुकडे न करता सबंध ओटा काढून मिळतो का? तसे करण्याची मजुरी अधिक असते का?
३. हा हट्टाने सबंध काढलेला ओटा नंतर "मला जागा दे" म्हणत मी ज्या कोपर्यात ठेवायला जाईन तिथे समंध बनून उभा राहील काय? तसेच त्या खाली केलेल्या कप्प्यांच्या कडप्पा पिल्लावळीचे काय?
४. त्या पिल्लातली एक दोन गोंडस पिल्लं रांगोळीसाठी वापरता येतील पण बाकी अनाथांचं काय?
५. असे नको असलेले कडाप्पे निसर्गात फेकले तर त्याची हानी होते का?
६. असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. मला जास्तीत जास्त कल्पक कल्पना सुचवून मदत करा, खरंच आभारी राहीन.
कृपया कडाप्प्याला धरून अवांतर बोला, विनोद करा पण खरोखरीचे पर्याय सुचवायला विसरू नका.
तुमच्या घरातल्या काढलेल्या कडाप्प्यांचे तुम्ही काय करता?
Submitted by आशूडी on 24 July, 2015 - 02:28
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे देवा फार उंचावर नाही
अरे देवा
फार उंचावर नाही गं, समोरच्या बाजूला, नळाच्या वर. भरता येईल.
बाल्कनी नाहीये मी नताशा.
मावे आणि सफाई वस्तूंसाठी चांगले पर्याय आहेत,.सावली, शब्दाली.
सगले प्रतिसाद वाचले
सगले प्रतिसाद वाचले नाहीत.
दोन कनेक्टेड flat म्हणून दोन स्वयंपाकघरं. >> माझ्याकडेही सेम आहे. सरळ खाली दरवाजे केलेत. आणि सिंकवर झाकायला काळ्या फोर्मायका लावलेले प्लायवूड. त्या प्लायवुडला मधे एक होल आहे, ते झाकण काढायचे असेल तेव्हा वापरता येते. सिंक एक्दम कोरडे करुन ठेवलेले आहे. आणि नळ पुर्ण पॅक करुन घतला आहे. गेली १३-१४ वर्षे हे असेच आहे. स्टोअर रुम म्हणुन वापर करतो त्याचा. वर कोठ्या वगैरे ठेवता येतात.
फार उंचावर नाही गं, समोरच्या
फार उंचावर नाही गं, समोरच्या बाजूला, नळाच्या वर. भरता येईल>>>>>>>>>>>>+१. माझ्याकडे आहे असं. ग्रेनाइट बसवुन घेतलाय. त्यावर तांब्याचं मडकं ठेवते भरुन.
बाल्कनी नाहीये मी नताशा. <<
बाल्कनी नाहीये मी नताशा. << तू बाल्कनी नाहीचेस. तू बाईमाणूस आहेस.
तोवर त्याला फिट बसवण्यासाठी
तोवर त्याला फिट बसवण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा.
>> एम सील ने बसेल.
वर्षा., स्टोरेज चिकार आहे.
वर्षा., स्टोरेज चिकार आहे. नको आता.
नी,
मंजूडी, ग्रॅनाईट ग्लु मिळते
मंजूडी, ग्रॅनाईट ग्लु मिळते ते आणुन वापर.
दोन किचन एकमेकांना जोडून आहेत
दोन किचन एकमेकांना जोडून आहेत >> केदारचीच आयडिया डोक्यात आली होती. पण कायदेशीर अडचणी असतील तर सर्व्हिंग विंडो ची आयडिया चांगली आहे..
एखादा चांगला इंटीरियर डिझायनर शोध आणि त्याचा/तिचा सल्ला घे. त्यांच्याकडं बर्याच आयडिया असतात ज्या फीजिबलपण असतात..
उपयुक्त चर्चा आणि
उपयुक्त चर्चा आणि सल्ले!
आशुडी..सगळे सल्ले आणि त्यावरील तुमची उत्तरे वाचुन मला असे वाटले की मी तुमच्या घरात फ़िरुन आले.
आता माझाही या विषयीचा अनुभव- तर आमच्या कडे ओट्याच्या कडप्पा बदलला. आधीचा एका ठिकाणी तुटला होता म्हणुन. तर जुन्या कडप्प्याचे गॅलरी मधे रॅक केले वरती कुंड्या ठेवल्या आणि खाली कोठी, सटर फ़टर सामान जे असले की अडगळ आणि नसले की अडते असे. अगदी साधा उपयोग आहे हा. पण बघा यावरुन काही सुचते का.
मनीष, इंटेरियर म्हटले की तो
मनीष, इंटेरियर म्हटले की तो सगळ्या खोल्या एका दमात घेईल. जे सध्या शक्य नाही.
पण सल्ला विचारायला हरकत नाही. एवढंसं ठुसकं काय विचारायचं असं वाटतं.
निरा, चांगला उपयोग आहे.
बाथरूम्समध्ये फरशी असेल तर
बाथरूम्समध्ये फरशी असेल तर कडाप्प्याचा तुकडा बादल्या पालथ्या घालण्यासाठी वापरलेला पाहिला आहे. कचराकुंडी ठेवायलाही क. तु. वापरलेला पाहिला आहे. कडाप्प्याच्या फडताळात तेलाची बरणी ठेवायलाही काहीजण असे तुकडे वापरतात. तेवढा तुकडा साफ केला की झाले. मूळ कडाप्प्याचा भाग तेलकट होत नाही. कडाप्प्याला पाय बसवून बाथस्टूल केलेलेही पाहिले आहे.
रच्याकने, इथे काही इंटरेस्टिंग कल्पना आहेत.
https://www.pinterest.com/restorekc/granite-remnants/
बत्त्याने कुट आणि एका
बत्त्याने कुट आणि एका इंचापेक्षा मोठे आणि चार इंचापेक्षा लहान असे जे तुकडे होतील ते मला दे.
आंध्रामधे कडाप्पा नावाचे गाव
आंध्रामधे कडाप्पा नावाचे गाव आहे. तिथे हे तूकडे घराला ( अंगणाला ) कुंपण म्हणून वापरलेले बघितलेत.
सावलीने दिलेल्या हाफ विंडोची
सावलीने दिलेल्या हाफ विंडोची कल्पना ही भारी आहे
आमच्या मोठ्या किचनमध्ये करून पहाता येईल
आशुडी, ते स्पेअर किचन
आशुडी,
ते स्पेअर किचन बदलून त्याची प्लेरूम बनवता येईल.
कडाप्पा न काढता त्यावर आणि भोवती मऊ पातळसर गादीचा थर देता येईल. त्यावर सुरेख प्रिंटचं कापड घेऊन गादी बनवायची. कडाप्प्याच्या खाली ओपन शेल्वज आणि बास्केट्स ठेवायला जागा होईल. एखादं छोटसं पुस्तकांचं शेल्फ बनवता येईल. छोटं टेबल, खुर्ची टाकून लेकीला तिची हक्काची खोली बनवून दे. दाराला फळी घालता येईल अशी सोय करून घे.
http://www.healthqu.com/10430/cute-play-rooms-ideas.html/19-cute-play-ro...
स्टोरेज चिकार आहे म्हणत्येस
स्टोरेज चिकार आहे म्हणत्येस ... तर पाय दाखव
घरात दोघांचं एकमेव गोष्टीवर एकमत म्हणजे इतस्तत: पसरलेल्या वस्तू ठेवायला योग्य स्टोरेज स्पेस करायला हव्येय. ही रडकथा १ बेडरूम घरापासून कितीही ऐसपैस ठिकाणी कायम ठेवतो आम्ही.
बऱ्याच युक्त्या आहेत दिलेल्या, काहीच न करता कडप्पा बाहेर ठेवलास तरी लोकं घेऊन जातात, सो फुकट जात नाही. तो महाजड दगड उचलून कसा नेतील असे प्रश्न असतील तर वरून ग्याल्रीतून बघत बसायचं, वेळही मस्त जातो. स्वानुभव.
माझ्याकडेही असंच सेम डबल
माझ्याकडेही असंच सेम डबल फ्लॅट असल्यानं स्पेअर किचन आहे. अर्थात भाड्याचं घर असल्याने बदल करता येत नाहीयेत. पण करता येत असता तर मी तिथे डायनिंग रुम बनवली असती.
बिल्डिंगमध्ये असे डबल फ्लॅट असलेल्या मंडळींनी वेगवेग़ळ्या प्रकारे ती रूम उपयोगात आणली आहे. पूजाघर कम मेडिटेशन रूम, हॉबी रूम (एक जण शास्त्रीय संगित गाते त्यामुळे ती तिची संगिताची खोली आहे. एकजण त्या रूममध्ये पेंटिंग करते), लायब्ररी, ऑफिसरूम, पेटसरूम वगैरे.
हाफ विंडो ची कल्पना सुरेखच
हाफ विंडो ची कल्पना सुरेखच आहे. पण त्या करता आतले किचन एकदम साफसूफ, चकाचक, अद्ययावत वगैरे असले पाहिजे. शिवाय स्टीलच्या भांड्यांची आदळआपट जर त्या विंडोमधून बाहेर ऐकू येणार असेल तर काय उपेग?
आशुडी, माझेही चार पैसे.... १.
आशुडी, माझेही चार पैसे....
१. केदारनी सुचवल्याप्रमाणे , तुमच्या वापरत्या किचनमधेच "आयलंड" म्हणून कडाप्प्याचं टॉप लावलेलं टेबल बनवून वापरता येईल. (मी माझ्या पुण्यातल्या घरी असं बनवून घेतलं आहे.) ह्या टेबलाची रुंदी ओट्याच्या रुंदीएवढी होत नाही. चारही बाजू इव्हन करण्यासाठी कापाकापी करावी लागते.
२. याचा उपयोग भाज्या निवडणे, कापणे, लॅपटॉप/र्रेडिओ/सीडी प्लेअर ठेवणे, मुलांचे अभ्यास, इ. अनेक कारणांसाठी होतो. आकार बराच आटोपशीर होतो. जड असले तरी वेळप्रसंगी हलवता येते. असे टेबल करुन वापरायला सुरवात केली की त्याची उपयुक्तता जाणवेल व वाढेलही.
३. जे "बाळ कडाप्पे " निघतील त्यांचीही अशीच छोटी छोटी कॉफी टेबल, एन्ड टेबल करता येतील, जी तुम्ही लिव्हींग/बेडरुम मधे अनंत कारणांसाठी वापरु शकता.
तुमच्या घरातल्या काढलेल्या
तुमच्या घरातल्या काढलेल्या कडाप्प्यांचे तुम्ही काय करता?
>>
डोक्यात हाणून घेतो आम्ही स्वतःच्याच . किंवा डोके आपटतो त्यावर आपले. काय पण प्रश्न विचारतात लोक इथे.
रॉहू, माझ्याच प्रश्नावर काहून
रॉहू, माझ्याच प्रश्नावर काहून आदळआपट?
आणि तू लिहीलेस ते बरोबर आहे, हाफ विंडो आणि रिडींगला अँबियन्स नको का तसा. खिडकीतून दिसणार समोरच्या बिल्डींगची भिंत किंवा किचनच्या खिडक्या. ओगलेआजींचं पुस्तकच वाचायला बरा मूड लागेल. 

शुगोल, अहो डायनिंग टेबल मोठे आहे आणि एल शेपमधे मोठा ऐसपैस ओटा खालच्या कपाटांसह आहे. त्यामुळे आणखी टेबल नको.
मामी, प्लेरूम वगैरे ठीके पण माझी लेक तसं सगळं वापरायला अजून चार पाच वर्षं तरी लागतील. तोवर असा मांड मांडून मलाच बसावं लागेल तिथं!
अमित, अरे खरंच, जितकं लपवायची जागा करू तितकं सामान वाढत जातं असं मला वाटतं. ओपन स्पेसमधे शक्यतो आपण कमीच गोष्टी ठेवतो. आज कपाटं केली तर सहा महिन्यात गच्च होतात का नाही बघ. इकडचे दोन रिकामे लॉफ्टही असेच भरून गेलेत. नकोच त्यामुळे आणखी स्टोरेज.
>>तुमच्या घरातल्या काढलेल्या
>>तुमच्या घरातल्या काढलेल्या कडाप्प्यांचे तुम्ही काय करता?
योग्य प्रश्न आहे. आधी काढायचो तेव्हा लगोर्या, टिक्करबिल्ले आणि फळे करून विकायचो. तो धंदा बुडल्यापासून गेल्या २ वर्षांपासून कडाप्पा रीयूज अँड रीसायकल सेंटरला द्यायला सुरुवात केली आहे.
सिरियसली, फार विचार न करता एखाद्या गरजूला देऊन मोकळ्या जागेचा हवा तसा छान उपयोग करून घेता येईल. ठाण्यात आजूबाजूचे २ फ्लॅट्स जोडून १ मोठा फ्लॅट करून घेतलेल्या ओळखीतल्या २ कुटुंबांनी हेच केलेलं दिसलं. एकांनी तिथे फॉर्मल डायनिंग एरिया केला आहे. दुसर्या कुटुंबानं मल्टिपर्पज रूम केली आहे. छोटा ब्रेकफास्ट नूक, एंटरटेनमेंट सेंटर आणि पुस्तकांची कपाटं ठेवल्याचं आठवतंय.
आशूडी, एक चांगला पर्याय,
आशूडी, एक चांगला पर्याय, जरासा अवांतर वाटेल असा सुचवायचा आहे पण धरायला कडाप्पाच नाही घरात. कडाप्पा न धरता लिहीले तर चालेल का?
तुमच्या घरातल्या काढलेल्या
तुमच्या घरातल्या काढलेल्या कडाप्प्यांचे तुम्ही काय करता?
>> शीरषकावरून आम्ही रोज, गेला बाजार दर आठवड्याला कडाप्पे उखडून काढीत असलो पाहिजे आणि त्याचे डिस्पोजल करीत अस्लो पाहिजे हे गृहीत धरले आहे. जसे भाजी निवडल्यानन्तर त्याच्या डेखांचे तुम्ही काय करता. अथवा शेंगा खाऊन झाल्यावर त्याच्या टरफलांचे काय करता असे. ::फिदी:
( लेखिकेनेच उपोद् घातात विनोद करण्याची परवानगी दिली आहे त्या वराचा फायदा घेऊन)
तुमच्या घरातल्या काढलेल्या
तुमच्या घरातल्या काढलेल्या कडाप्प्यांचे तुम्ही काय करता?
आम्ही आमच्या कलप्पाला बाहुबलीला मारायला पाठवतो.
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र सॉरी हा कडप्पा तो कलप्पा.
पूर्वी आमचा बुडाप्पा नावाचा
पूर्वी आमचा बुडाप्पा नावाचा एक ड्रायव्हर होता.
<<
पुढे बुढाप्प्याने गेला की काय तो?
मृण्मयी, सीमंतीनी, रॉहू, दीड
मृण्मयी, सीमंतीनी, रॉहू, दीड मायबोलीकर

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद. इथे बर्याच जणांनी लिहील्याप्रमाणे त्या जागेची युटीलिटी जास्त असल्याने आज ओटा काढणार आहे व तिथे डायनिंग एरिया करणार आहे. तो सजवण्यासाठीही इथले सल्ले उपयोगात येतील. काढलेले कडाप्पे दोन तीन जागी व वरखालच्या दोनतीन घरी वापरले जाणार अाहेत. उरलेले रियूजसाठी पाठवणार आहे.
हा प्रश्न विचारताना मलाही गंमतच वाटली होती. पण बघता बघता कितीतरी पर्याय समोर आले. शिवाय, आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे हे खुंटा हलवून बळकट झाले. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे खूप आभार.
आशूडी, before and after असे
आशूडी, before and after असे फोटो टाक इथे.
सगळे प्रतिसाद वाचले नाहीयेत.
सगळे प्रतिसाद वाचले नाहीयेत. त्यामुळे हा उपाय कुणी सुचविला असल्यास माहीत नाही.
गॅलरी असेल तर एखादा कडप्पा भिंतीवर बसवून कुंड्या किंवा बागकामाचे साहित्य, किंवा शोभेची वस्तु (वरून पाऊस पडण्याची शक्यता नसल्यास) ठेवायला उपयोग करता येईल.
दारासमोरील पॅसेज मध्ये किंवा जिन्यात सेम प्रकारे वापरता येईल. ज्या झाडांना जास्त ऊन लागत नाही ती ठेवता येतील
सही आम्ही पण दोन घरे, दोन
सही
आम्ही पण दोन घरे, दोन किचनवाले.
आम्ही एका किचन मधील बिल्डरने दिलेला ओटा ट्रॉली वगैरे लावत आमच्या हिशोबाने करून घेतला.
दुसर्या किचनमधील ओट्याला फक्त दरवाजे लावत ड्रॉवर बनवला.
त्या नॉनकिचन ओट्याचा वर पाण्याचा माठ, मिक्सर / ज्यूसर ठेवतो, तसेच काही नेहमीच्या वापरातल्या वस्तू वा फळे वगैरे उबवत पडलेले असतात. मूड आला की एखादे फळ ज्यूसरमध्ये टाकायचे आणि रस पिऊनच पुढे जायचे.
मेन किचनमध्ये फ्रिज, ओवन, वॉटर प्युरीफायर वगैरे किचनशी संबंधित गोष्टी आहेत,
तर दुसर्यामध्ये वॉशिंगमशीन, गोदरेजचे मोठे कपाट, एक छोटे कपाट, बाथटब, ईत्यादी गोष्टी आहेत, जेणेकरून बेडरूम / बाथरूमवरचा लोड कमी होईल.
आयुष्य खूप सिंपल आहे, ईंटरीयवर जास्त खर्चा करून त्याला कॉम्प्लीकेटेड नाही करायचे.
Pages