माझ्या घरात चुकून एक जास्तीचे स्वयंपाकघर झाले आहे. हल्ली तसाही पुण्यात घरी स्वयंपाक कमीच तयार होतो. त्यामुळे दोन खोल्यांत दोन ओटे हा मला जागेचा अपव्यय वाटतो. शिवाय घरात दोन दोन ओटे असून आपण किती कमी भांड्यांत स्वयंपाक करतो हा न्यूनगंड येतो. तेव्हा मी या समस्येच्या मुळावरच घाव घालायचे ठरवले आहे. घरातल्या कर्त्या स्त्रीने ओटा फोडला म्हणून स्त्रीमुक्तीच्या इतिहासात माझे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले जाणार आहे. त्याला मोत्यांची अंडरलाईन मिळावी म्हणून कृपया मला मदत करा.
१. खरंच हा ओटा फोडावा का? सध्या त्यावर इस्त्री केली जाते. हा अपमान सहन न होऊन तो काळवंडत चालला आहे.
२. तुकडे तुकडे न करता सबंध ओटा काढून मिळतो का? तसे करण्याची मजुरी अधिक असते का?
३. हा हट्टाने सबंध काढलेला ओटा नंतर "मला जागा दे" म्हणत मी ज्या कोपर्यात ठेवायला जाईन तिथे समंध बनून उभा राहील काय? तसेच त्या खाली केलेल्या कप्प्यांच्या कडप्पा पिल्लावळीचे काय?
४. त्या पिल्लातली एक दोन गोंडस पिल्लं रांगोळीसाठी वापरता येतील पण बाकी अनाथांचं काय?
५. असे नको असलेले कडाप्पे निसर्गात फेकले तर त्याची हानी होते का?
६. असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. मला जास्तीत जास्त कल्पक कल्पना सुचवून मदत करा, खरंच आभारी राहीन.
कृपया कडाप्प्याला धरून अवांतर बोला, विनोद करा पण खरोखरीचे पर्याय सुचवायला विसरू नका.
तुमच्या घरातल्या काढलेल्या कडाप्प्यांचे तुम्ही काय करता?
Submitted by आशूडी on 24 July, 2015 - 02:28
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सैपाघरात बाथटब.. भारीच.
सैपाघरात बाथटब.. भारीच.
गॅलरी असेल तर एखादा कडप्पा
गॅलरी असेल तर एखादा कडप्पा भिंतीवर बसवून कुंड्या किंवा बागकामाचे साहित्य, किंवा शोभेची वस्तु (वरून पाऊस पडण्याची शक्यता नसल्यास) ठेवायला उपयोग करता येईल.
>>>>>>
आमच्या जुन्या घरी होते असे, गॅलरीतील भिंतीत खोचलेल्या कडप्प्यावर कुंड्या. तिथून निघालेला मनीप्लांट गॅलरीच्या दुसर्या टोकापर्यंत जायचा आणि तिथल्या गुलाबाच्या झाडाला भेट द्यायचा. बाजूच्या आमच्याच दुसर्या गॅलरीत याच प्रकारे तुळस बसवली होती. या सर्वांच्या कृपेने गॅलरीच्या कठड्यावर मुंगळे-डोंगळे फिरायचे. पण कधी चावल्याचे आठवत नाही. गॅलरीत झाडे फूलझाडे अशी वरच्या लेव्हलला असल्याने तिच्या कठड्यावर रेलून उभे राहायला प्रसन्न वाटायचे..
सैपाघरात बाथटब..
सैपाघरात बाथटब.. भारीच.
>>>>
सैपाकघर म्हणून वापरतच नाही ना ते. जवळच बाथरूम आहे, त्याचे कनेक्शन मिळेल असे वॉशिंगमशीन ठेवलेय आणि हलकाफुलका बाथटब आहे, मूड आला की घेऊन बाथरूममध्ये जायचे. काम झाले की तसाच ओला तिथे परत आणून टाकायचा. त्याचे पाण्याचे ओघळ किचन सिंक की काय असतो तिथून वाहून जातात.. पुसायची गरज नाही की कोणी त्यावर घसरून पडायची भिती नाही..
काम झाले की तसाच ओला तिथे परत
काम झाले की तसाच ओला तिथे परत आणून टाकायचा. >>
आधी कळलेच नाही काय ओला तसाच टाकायचा , माणूस की टॉवेल?
मग कळलं - हलका फुलका बाथटब!
साती नै ओ, स्पष्टीकरण नको.
साती
नै ओ, स्पष्टीकरण नको. जरा गम्मत वाटली इतकंच.
(No subject)
साती अमित, मला कुठल्याही
साती
अमित, मला कुठल्याही गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायलाही गंमतच येते
अरे वा ठरल का काय करायच ते मी
अरे वा ठरल का काय करायच ते
मी पण फॉर्मल डायनिग करा हे सुचवायला आले होते नाहितर आयलॅन्ड किचन.
गॅलरी (असल्यास) कपाट करुन घेता येइल जरा जास्त उन्चीचे त्यात हर्ब्,घरगुती भाज्या लावलेल्या कुन्ड्या ठेवता येतिल.
मूड आला की एखादे फळ
मूड आला की एखादे फळ ज्यूसरमध्ये टाकायचे आणि रस पिऊनच पुढे जायचे. >>>>> हा हा हा
हल्काफ़ुल्का बाथटब बाळांचा
हल्काफ़ुल्का बाथटब बाळांचा बघितला आहे.... तुझे स्पष्टीकरण बरच काही सांगून जात.. जाता जाता
चाणाक्ष माबोकराना अधिक सांगणे न लगे 
झालं झालं ... धाकर्त्याचं
झालं झालं ... धाकर्त्याचं काम झालं आहे त्यानी ते इथे पोस्टलं पण आहे. त्यामुळे त्याना आता सल्ल्याची गरज नाही. भविषकालीन इच्छुकांसाठी धागा चालवायचा असला तर चालवा.
धाकर्त्याचं काम झालं असेल तर
धाकर्त्याचं काम झालं असेल तर त्या कामाचे फोटो येवु देत की.
ऱोबीनहूड, सल्ले झाले, लोकं
ऱोबीनहूड, सल्ले झाले, लोकं आता मसल्लत करत आहेत ..
फोटो मात्र हवेच .. बरेच दिवस झाले कडप्पे बघितले नाहीयेत.. पहिल्यासारखे कडप्पे हल्ली येतही नाहीत म्हणा
तुमच्या घरातल्या काढलेल्या
तुमच्या घरातल्या काढलेल्या कडाप्प्यांचे तुम्ही काय करता?
<<
हे मी सारखं, "तुमच्या घरातल्या काढलेल्या कपड्यांचे तुम्ही काय करता?" असं वाचतोय.
एकदा कपड्यांचे काय करता येईल
एकदा कपड्यांचे काय करता येईल समजून उपाय काय लिहून टाका, मन हलके होईल आणि शब्दभ्रम होणे आपसूक थांबेल
कडाप्पे पाहिले नाहीत बरेच
कडाप्पे पाहिले नाहीत बरेच दिवस ?



बघा मग डोळे भरून...
हा मूळचा नैसर्गिक...
हा किचनातला....
हा उखडून काढलेला...
हा देखणा....
वा, छान ! ज्याने बाहुबलीला
वा, छान !
ज्याने बाहुबलीला मारले तो पण टाका आता
तो कटाप्पा. कडाप्पा नाही
तो कटाप्पा. कडाप्पा नाही काही.
ओके मी पिक्चर पाहिला नाही तो
ओके मी पिक्चर पाहिला नाही तो जास्त
हल्काफ़ुल्का बाथटब बाळांचा
हल्काफ़ुल्का बाथटब बाळांचा बघितला आहे.... तुझे स्पष्टीकरण बरच काही सांगून जात.. जाता जाता डोळा मारा चाणाक्ष माबोकराना अधिक सांगणे न लगे >> हेच लिहिणार होते.
Pages