तुमच्या घरातल्या काढलेल्या कडाप्प्यांचे तुम्ही काय करता?

Submitted by आशूडी on 24 July, 2015 - 02:28

माझ्या घरात चुकून एक जास्तीचे स्वयंपाकघर झाले आहे. हल्ली तसाही पुण्यात घरी स्वयंपाक कमीच तयार होतो. त्यामुळे दोन खोल्यांत दोन ओटे हा मला जागेचा अपव्यय वाटतो. शिवाय घरात दोन दोन ओटे असून आपण किती कमी भांड्यांत स्वयंपाक करतो हा न्यूनगंड येतो. तेव्हा मी या समस्येच्या मुळावरच घाव घालायचे ठरवले आहे. घरातल्या कर्त्या स्त्रीने ओटा फोडला म्हणून स्त्रीमुक्तीच्या इतिहासात माझे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले जाणार आहे. त्याला मोत्यांची अंडरलाईन मिळावी म्हणून कृपया मला मदत करा.
१. खरंच हा ओटा फोडावा का? सध्या त्यावर इस्त्री केली जाते. हा अपमान सहन न होऊन तो काळवंडत चालला आहे.
२. तुकडे तुकडे न करता सबंध ओटा काढून मिळतो का? तसे करण्याची मजुरी अधिक असते का?
३. हा हट्टाने सबंध काढलेला ओटा नंतर "मला जागा दे" म्हणत मी ज्या कोपर्यात ठेवायला जाईन तिथे समंध बनून उभा राहील काय? तसेच त्या खाली केलेल्या कप्प्यांच्या कडप्पा पिल्लावळीचे काय?
४. त्या पिल्लातली एक दोन गोंडस पिल्लं रांगोळीसाठी वापरता येतील पण बाकी अनाथांचं काय?
५. असे नको असलेले कडाप्पे निसर्गात फेकले तर त्याची हानी होते का?
६. असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. मला जास्तीत जास्त कल्पक कल्पना सुचवून मदत करा, खरंच आभारी राहीन. Happy
कृपया कडाप्प्याला धरून अवांतर बोला, विनोद करा पण खरोखरीचे पर्याय सुचवायला विसरू नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी. पण मी आधी 'तुमच्या घरातल्या काढलेल्या कपड्यांचे तुम्ही काय करता?' असं वाचलं. Happy

इस्त्री टेबल सारखा उपयोग होतोय तर बरंच आहे की.

आशुडी, मांडणी करून घे कडप्याची आणि झाकून टाक पीव्हीसी किंवा लाकडी शटर / दरवाजे लावून..आणि कोंब त्यात पाहिजे ते...

सस्मित, जेमतेम अर्धा तास लागणार्या इस्त्रीसाठी (सर्वांना) एवढी जागा वाया घालवायला नको वाटते हो. तसाच तीन वर्षं वापरला.
नी, दोन वेगळ्या खोल्या आहेत गं. दोन कनेक्टेड flat म्हणून दोन स्वयंपाकघरं.
स्नू, मांडणी आहे! त्याच खोलीत ती तशीच बंद करून घेणारे.
वणदेवी, अंगण नाहीये ना.

सिरिअस उत्तर - किचन रिनोव्हेट करतांना सगळे कडाप्पे सलग काढण्याची काँट्रॅक्टरला विनंती केली होती. जे काही सलग निघाले ते सगळे आमच्या कामवाल्या मुली घेऊन गेल्यात.
एकीने स्वयंपाक घरात ओटा लावला. दुसरीने बाथरुममध्ये कप्पे बनवुन घेतले.

अजुन काही कल्पना :
अंगणात बसण्यासाठी बाक करता येईल,
घरात फ्रेंच विंडो असेल तर त्याजवळ बसण्यासाठी कडप्पा बसवुन घ्यायचा, त्यावर एक छ्होटीशी गादी, एक पुस्तक... सुंदर चित्र
फेकले तरी निसर्गाची हानी होणार नाही ... सो काहीच उप्योग होणार नसेल तर फेकुन देणे

ऊप्स अंगण नाही हे आता वाचले

त्या खोलीला युटि लिटी रूम बनवता येइल. कपड्याचे मशीन ठेवले तर पूर्ण कपडे धुण्याचा उद्योग तिथे करता येइल धुणे वाळवणे इस्त्री करणे. इतकीजास्तीची स्पेस आहे तर सो लक्की यू आर.
तिथे कपाटे असतील तर त्यात युटिलिटी सामान जसे स्कॄ डायवर्स चा सेट, जास्तीचे दिवे, टेप,
स्टेशनरी असे सामान ठेवता येइल आर्ट क्राफ्ट चे सामान वगिरे

मार्था स्टिवार्ट बेस्ट ह्याबाबतीत. खालील लिंक बघा उगीच तोडफोड करायच्या आधी आहे त्यातून
काही क्रिएटिव्ह सोल्युशन निघते आहे का त्यावर २० दिवस विचार करा.

http://www.marthastewart.com/search/results?keys=diy%20utility%20room

आख्खा ओटा काढता येतो. तो दगड तसाच दुसरीकडे वापरता येतो. स्नू म्हणतेय तसं ओटा न काढता त्याला दरवाजे करून कोंबकोंबीला वापरता येईल.
ती जागा वाया जातेय असं वाटत असेल तर तो ओटा काढून घरात ज्या ठिकाणी कपाटाची गरज आहे तिथे दगडी कपाट बनवण्यासाठी वापरता येवू शकतो. शटर्स /दरवाजे नसलेले नुसतेच कप्प्या कप्प्यांचे कपाट (कपडे किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी... आडव्या ओट्या ऐवजी उभ्या कपाटात जागा वाचते) किंवा स्लायडींग दरवाजे असलेला झक्कास वॉर्डरोब.

OMG you really can make a walk in wardrobe there for yourself. check the wardrobe in sex & the city movie where carrie gets married

ती किचन खोली सध्या काय म्हणून वापरणारेस. स्टडी/ ऑफिस/ लायब्ररी किंवा तत्सम म्हणून वापरणार असलीस तर वरचा ओटा तसाच ठेव. नळाची फिटिंग्ज काढून टाक. ओट्याच्या खालती कप्पे करायला लावलेले कडाप्पे असतील त्यातला एक काढून सिंकची जागाही बंद करून टाक. म्हणजे सलग टेबल स्पेस झाली. बाकीचे उरलेले कडाप्पे कापून घेऊन घरामधे वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्नर रॅक्स करून घे. लावता काढता येण्यासारखी. ती उपयोगीच पडतात. जिथे कुठे लाकडाच्या फळ्यांची रॅक्स घालायची असतील तिथे तिथे कडाप्पे वापर ते. Happy

आमच्या शेजार्यांनी असाच एक्स्ट्रा ओट्या चा बेड बनवला होता गाद्या वैगरे टाकून आणि खाली दार लावून स्टोरेज.
ओट्याची हाईट कमी केली होती.

आशूडी,

ओटा अर्धाच कापून एखादी छोटीसं पाकपटल (=प्यांट्री) बनवा म्हणून सुचवणार होतो. पण ज्याअर्थी डब्बल फ्ल्याटमुळे डब्बल किचन झालंय त्याअर्थी दोन्ही पाकशाळा जवळजवळ असाव्यात. त्यामुळे त्याच जागी स्वतंत्र पाकपटल उभारणं निरर्थक वाटतं. मात्र घराच्या एका टोकाला स्वयंपाकघर असेल तर लांबच्या टोकाला पाकपटल उभारण्याची कल्पना बघा कशी वाटते.

आ.न.,
-गा.पै.

प्रिंसेस, देऊन टाकण्याचा पर्याय शेवटचा असेलच.
अमा, घर अॉलेरडी सेट आहे. त्यामुळे मशीन, युटिलीटी वगैरेच्या जागा ठरलेल्या आहेत. जिकडे तिकडे कपाटं, दारं आहेत. त्यामुळे गेली तीन वर्षं तशीच चालढकल केली. पण आता जरा पैसे गाठीशी आल्याने छोटीशी सुधारणा करावीशी वाटते आहे. Happy ओट्याला लागून खिडकी आहे. त्यामुळे सध्या तिथे डायनिंग टेबल लावायचा विचार आहे. म्हणजे त्या शोकेस कम मांडणीतल्या क्रोकरी लाही शो मिळेल.
अल्पना, कडाप्पे काढून कपाट करायची आयडिया भारी आहे. कुठे करायचं त्याचा विचार करावा लागेल कारण ते फिक्स होईल ना!

नी इज राइट. आधी त्या खोलीचा काय म्हणून वापर करायचाय हे ठरवा. स्टडी /ऑफिस्/लायब्ररी, पिल्लाची खोली, युटिलिटी रुम हे काही ऑप्शन्स.. तुमच्या खोलीच्या वापरावर त्या ओट्याचं काय करायचं हे ठरवता येईल.

आम्ही खोलीची युटिलिटि केली. मावे, ज्येनाचं पोर्टेबल वाचनटेबल, देवघर, खालच्या कप्प्यांमधे जास्तीचं सामान, रिकाया जागेत वॉ. मशीन वगैरे...

हिम्स, तसं काहीच ठरलं नाहीये. तू तर पाहिलंयस की.
दोन किचन एकमेकांना जोडून आहेत. त्यामुळे मलाही आधी वाटलं होतं तसं तिथे स्टडी वगैरे करून मूड लागणार नाही. किचनच्या शेजारीच किड्सरूम पण काहीतरीच वाटतेय. त्यामुळे त्यातली अर्धी जागा डायनिंगसाठी वापरावी असंच वाटायला लागलंय कारण ते टेबलही ६ माणसांचं जंगी आणि सुंदर आहे.
कॉर्नर साठी वापरणे लक्षात ठेवते, पण तेही मेले आहेतच हवे तिथे.

ओट्याला लागून खिडकी आहे. त्यामुळे सध्या तिथे डायनिंग टेबल लावायचा विचार आहे. म्हणजे त्या शोकेस कम मांडणीतल्या क्रोकरी लाही शो मिळेल.>>
मग कड्प्प्याची शोकेस करा व त्याला काचेची दारे बसवा. Happy स्टोरेज ची जागा वाढली की उगाच वापर नसलेले (पुजेचे साहीत्य टाईप) अडगळीचे सामानही वाढते.

घरात फ्रेंच विंडो असेल तर त्याजवळ बसण्यासाठी कडप्पा बसवुन घ्यायचा, त्यावर एक छोटीशी गादी, एक पुस्तक... सुंदर चित्र>> आहाहा..
अनायासे खिडकी आहेच ओट्याला लागून तर करूनच टाका हे.. पिल्लु कडाप्प्यांना दरवाजे बसवून मस्तं बूकशेल्फ पण होईल. Happy
मध्यरात्रीपर्यंत वाचत बसायचं आणि मिडनाइट स्नॅक्स साठी शेजारीच किचन आहेच की Wink

वरती भरपुर चांगल्या चांगल्या सूचना आल्या आहेत.
फक्त काही झाले तरी हा खर्चिकच कारभार आहे. असा कारभार मी माझा मी स्वतः केला, फेसबुकवर फोटोही आहेत. आख्ख स्वयंपाकघरच हलवले, त्यात ओटाही आला, डिस्मेन्टल केला, अन परत उभारला. एक रॅक होती ती देखिल परत बांधली. जास्तीचे कडप्पे ठेउन दिलेत अंगणात. आमच्याइथले व्यायमपटू "बेंचप्रेस" मारायला त्याचा वापर करतात.
मागे असेच केलेले तेव्हा ७/८ फुटी लाम्ब रॅकचे कडप्पे लिम्बीच्या गावातल्या घरी दिले.

१) वाइन सेलर, - फुल्ली फ्लेज्ड बार
२) होम ऑफिस
३) मेडिटेशन/ योगा व्यायामाची खोली
४) प्ले रूम
५) लायब्ररी
६) संगीताची खोली
७) आर्ट रूम. ह्या काही सजेशन्स.

एक जास्तीची खोली म्हणजे काय सूख वाटते मुंबईकराला, आप नही समझोगे महेश बाबू.

नी, नॉट दुष्ट गं. खूप कुटाणा झालाय डोक्याला. हमे खाजा खाना भी है और रखना भी है. Proud
रिडींग रूम/ किड्स रूम साठी त्यापेक्षा सुंदर खोली आहे उपलब्ध. टीव्ही, किचनच्या गोंगाटापासून लांब. म्हणून मी तो पर्याय नाहीच ठेवणार.
केपी, तिथेच कडाप्प्याचे शेल्फ आहे! नवीन नाही करावे लागणारे.
वॉर्डरोब व कॉर्नरसाठी वापरणे हे नोंदवले आहे.

एक जास्तीची खोली म्हणजे काय सूख वाटते मुंबईकराला, आप नही समझोगे महेश बाबू.>> +१११११११११११११११११

ते ही त्या खोलीचा वापर कशासाठी करायचा हे ही ठरत नाहीये. Happy

आशुडी, कडप्पा (ग्रॅनाइट नाही ना), चा प्रती स्के. फुटाचा दर पाहिलास तर काढून देउन टाकायला दु:ख होणार नाही. शिवाय तो वापराय्चा हे एक व्यवधान ठेउन त्या जागेचा पुनर्वापर करण्यापेक्षा , मोडीत काढ. तो ओटा. कडप्प्यासहिइत.

Pages