रसलिंबू

Submitted by मॅगी on 4 August, 2015 - 10:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो गूळ
५-६ टीस्पू मोहरी
२-३ टीस्पू मेथी दाणे
१०-१२ काळी मिरी दाणे
१ छोटा तुकडा दालचिनी
१ टेस्पू तेल
४ टीस्पू लाल तिखट
१ टीस्पू हळद
१ कप लिंबाचा रस

क्रमवार पाककृती: 

१. पाव किलो गूळ थोडयाश्या पाण्यात विरघळवून थोडं घट्ट सिरप करा.
२. मोहरी आणि मेथी दाणे थोडे भाजून त्यात दालचिनी, मिरी दाणे घालून अग्गदी बारीक पावडर करा.
३. एका लहान कढईत तेल गरम करुन त्यात हळद आणि तिखट घाला, लगेच गॅस बंद करा (जळू नये म्हणून)
४. एका पातेल्यात लिंबाचा रस घेउन त्यात गुळाचं सिरप नीट ढवळून मग मसाला पावडर आणि फोडणी दोन्ही हळूहळू मिसळा.
५. एक छोटी बाटली रसलिंबू तयार होईल, ते कोरडया बाटलीत भरून एक आठवडा मुरु दया.
मग काय खायला सुरूवात पोळीबरोबर किंवा बोटं चाटून.. :p
वि. सू. आईची रेसिपी आहे आणि फक्त खायचा अनुभव आहे. Lol

बात कुछ बन ही गयी!!
P_20150826_221700_1.jpg

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव...
मस्त दिसतय एकंदर प्रकरण-ए-रसलिंबु..
करण्यात येईल..तिखट जास्त टाकुन ऑफकोर्स Wink
लिंबाचं लोणच कम रस्सा .. मज्जा..
आईला पन लिंक देते याची..
ठांकु आत्मधून Happy

ईंटरेस्टींग वाटतेय ..
काचेच्या बरणीत वा एखाद्या प्लेटमध्ये थोडे घेऊन रंग कसाय ते दाखवा की..

अर्रे वा !
बेडेकरांच रसलिंबु अलिकडेच पहिल्यांदा चाखलं तेव्हापासून पाककृती शोधायचे मनात होते. तुम्ही आयते कष्ट वाचवालेत. आभारी आहे.

मस्त

चविष्ट!
कालच मैत्रिणीने घरची भरपूर लिंब दिलीयत.
आता याचं रसलिबू आणि सालांचा लिंबू सॉस करीन.(कृप्या रेस्पी विचारू नये...मी एकांकडे खाल्ला होता त्यांना विचारणार आहे :डोमा:)

आशू, मंजूडी, मीठ विसरले नाहिये, आमच्याकडे मीठ नाही घालत रसलिंबूमध्ये.. आवडीनुसार घालू शकता.. पण चवीत फरक पडेल.
ऋन्मेऽऽष, मी अजून केलं नाहिये, केल्यावर नक्की फोटो टाकणार.. Happy
रैना, क्रिश्नंत, मानुषी धन्यवाद.. नक्की करुन बघा..

आत्मधून
एक पैलीतली शंका....... सीरप करताना गूळ पाणी घालून उकळून घ्यायचं ना? त्याशिवाय कसं सीरप होणार ना ?

ओके Happy
मिठामुळे आंबट गोड तिखट चव खुलते.. पुढच्यावेळी रसलिंबात मीठ घालून चवीतला फरक बघा. मी तुम्ही लिहिलेली काळी मिरी घालून बघणार आहे.

मानुषीतै, मीपण पैलीतच आहे स्वयंपाकाबाबतीत Lol
हो, उकळलेला चांगलाच.. किंवा गरम पाणी घालून ढवळलं तरी सिरप होतं..

मीपण पैलीतच आहे स्वयंपाकाबाबतीत>>>> अगं पण मी नाही ना...वयाने ...अनुभवाने! Biggrin
ओक्के पण मी उकळूनच घेईन.

ए मी २० लिंब घेऊन आली..
प्रश्न हा :
गुळपाणी असल्यामुळे ते खराब होणार नाही ना ? की गरम करुन घेऊ ?
आणि काचेची बरणी नै माझ्याकडे Sad बोर्न्व्हिटा ची बॉटल आहे त्यात ठेऊ का ? कि वास लागेल ?

शेफांनो लवकर सांगा काय करु ते ?

जमल रे जमल..

आठवडाभर वाट पाहायची म्हणजे Sad
असो..फटू टाकतेय..

हे लिंब..हेच ते लिंब ज्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन माझी सोय केली..

हे फायनल प्रॉडक्ट..

सॉस ची कंसिस्टन्सी नै आली तेवढी..मी मेथीदाणे नै टाकले..पुड करुन..नव्हते माझ्याकडे..पण मला वाटत कि या पुड वगैरे मुळे जरा घट्ट व्हायला मदत होते..मी काळा गुळ वापरला..इथं दिल्यापेक्षा जवळपास दुप्पट लिंब होते माझ्याकडे..पण मी इतर सगळ दिडपटच वापरल..मीरे तेवढे जास्त टाकले..आणि थोडूसं मिठ पन टाकल Happy
हा पसारा Happy

टिने उरक्याची गं तू!
माझी एक मैत्रिण म्हणाली.......घेतलेल्या लिंबांच्या निम्मी लिंबं रस काढून घ्यायची आणि निम्मी बारीक फोडी करून कुकरातून शिजवून रसात घालायची.
मी केलं तेव्हा आत्मधूनच्या रेस्पीप्रमाणे नुस्ता रसच घेतला. ती जेवायला आली होती. तिला वाढल्यावर तिने वरची सजेशन दिली. पण बाकी मसाला शेमटुशेमच घेतला. अप्रतीमच चवआली.

हं ,
त्यान तो लगदा छान बनतो..माझा बी इचार आहे..घट्ट झालं नै तर..
घरी लिंबाच शिजवलेल लोणचं करत असतेच बिना तेलाच..आता बघु हे कस लागत ते..
जेवणात लोणच पाहिजेच..रोजच्या चटण्या नै करता येत. खाणारी मीच आणि स्टोअर पन नै करता येत म्हणुन..
आंब्याच करणार होती मागे पण मग आईनीच घरुन पाठवलं.. ते संपल्यापासुन चैन नै मला..
अब जा के दिल को सुकुन मिला Wink Happy

फोटो भन्नाट... मी पण करणार...

माझी एक मैत्रिण म्हणाली.......घेतलेल्या लिंबांच्या निम्मी लिंबं रस काढून घ्यायची आणि निम्मी बारीक फोडी करून कुकरातून शिजवून रसात घालायची.+++१

ही माझी रीक्षा..
http://www.maayboli.com/node/48565

आत्मधुन छान रेसिपी.

टीनाबाय कुठे आहेत तुमचे पाय. आता धरायलाच हवे. इथे कोणी रेशिपी टाकली कि टीना लगेच हजर करते सुंदर फोटोसहीत. आता इतकं कवतिक केल्यावर इलुसे तुला काढून बरणी पाठवून दे मला. Lol

Pages