Submitted by हर्ट on 10 November, 2009 - 12:42
नमस्कार शब्दप्रेमी मित्रांनो.. इथे आपण वर्हाडी भाषेतील जमतील तेवढ शब्द अर्थासहीत लिहुयात. वर्हाडी भाषेचा शब्दकोश मी अजून तरी कुठे पाहिला नाही. मायबोली ही बहुतेक पहिली असेल. धन्यवाद!
१) आळोंग = उदा. आळोंग फिरणे अर्थात झोपताना या कडेवरुन त्या कडेवर होणे.
२) बात = अगदी लगेच उदा. मी बातन्या बात आलोच. अर्थात मी लगेच आलो.
३) टोंगळा = गुडघा
४) वज = काळजी उदा. वज घेणे
५) हिडगा = शिष्ट
६) गंज = पातेले
७) गुंडी = चरवी
८) कोपर = परात
९) सांभार = कोथिंबीर
१०) घोळाना = कोशिंबीर
११) पुदाना पाडणे = एखादी गोष्ट नष्ट करणे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गंज = पातेले
गंज = पातेले
बीबी वाचायला मजा येतेय. लले,
बीबी वाचायला मजा येतेय.
लले, तो उपक्रम खास झाला होता.
वर्हाड़ी बोली म्हणजे सरासरी
वर्हाड़ी बोली म्हणजे सरासरी अर्ध्या वाक्याला एकदा 'अबे काबे अन काहून बे' करून बेंबटणे असा अर्थ काही मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक मंडळी चा होरा आहे असे वाटत असे, भारत गणेशपुरे ह्यांनी वर्हाड़ी ला बरेच प्रसिद्ध केले आहे, नेर चे मिर्झा रफ़ी बेग सुद्धा भारीच होते, इकडे ग्रामीण भागात हिंडल्यास रोज एक नवी चित्रपट संहिता पटकथा डोक्यात येईल असले इरसाल नमूने भरलेले आहेत, गरज आहे ती फ़क्त एक्सप्लोरेशन ची
निशाणी डावा अंगठा ही इतक्यातच
निशाणी डावा अंगठा ही इतक्यातच प्रसिद्ध असलेली रमेश इंगळे उत्रादकर ह्यांची कादंबरी सुद्धा मस्त आहे, त्यात अस्सल वर्हाड़ी बोली आहे पण त्यातही भारत गणेशपुरे सोडता बाकी पात्रे भाषे चा बाज अन लहजा पकडताना धड़पड़ताना दिसतात अगदी अशोक सराफ ते संजय नार्वेकर सगळे! भरत जाधव कडून अपेक्षाच् नाहीत
सोन्याबाप्पू खरं
सोन्याबाप्पू
खरं आहे.
त्यामानाने अरूण नलावडेंनी 'तानी' मध्ये नागपुरी बोलीचा आणि गिरीश कुलकर्णींनी 'गाभ्रीचा पाउस' मध्ये वर्हाडीचा जास्त प्रामाणिक प्रयत्न केला होता. 'डावा अंगठा' मला काही विशेष आवडला नव्हता.असो. धागा भरकटू नये म्हणून जास्त बोलत नाही.
तानी वाले दिग्दर्शक सध्या 'पिलांटू' नावाचा चित्रपट बनवत आहेत.
भारत गणेशपुरे ह्यांनी वर्हाड़ी
भारत गणेशपुरे ह्यांनी वर्हाड़ी ला बरेच प्रसिद्ध केले आहे, नेर चे मिर्झा रफ़ी बेग सुद्धा भारीच होते >> अगदी.. चहयेद्या मी फक्त भारत गणेशपुरेचा परफॉर्मन्स बघते..
मिर्झा यांच लोकमत मधल सदर वाचायला मज्जा यायची पण मग ते बंद झाल..
वर्हाडी झटका म्हणुन रमेश ठाकरे यांनी वर्हाडी गाण्यांचा अल्बम काढला होता.. खासच होता तो.. तेव्हा कॅसेटरुपात होता .. आता इतकी शोधतेय पण मिळेल तर शप्पथ..
आत्ताचा पोष्टर बॉईज मधे दाखवायला नागपुर दाखवलय पण भाषा..
एवढूशी ही नाही..
तानी मधे केतकी माटेगावकर ची भाषा अरारारा .. अरुण नलावडे चांगले होते.. तिची आईपन.
टीना, सोन्याबापू, पादविन मी
टीना, सोन्याबापू,
पादविन मी ( आम्हाला चावट शब्द आवडतात)
जळकी = अॅसिडीटी चिरंजीचे
जळकी = अॅसिडीटी
चिरंजीचे दाणे: साखरेचा काटेरी हलवा .. चिरंगीचे दाणे म्हणतो न ? आम्हीतरी..
भगुनं = डोगरं =खोलगट भांड
मच्छी = मासे
मोठं = बीफ (गायीचं मांस) .. उदा. थे लोक मोठं खाते..तिथं काई खाचं नै मा.. ( घरचे जाणते लेकरांना सल्ले देतात)
मुज्जोर = अडेलतट्टू
<<,आत्ताचा पोष्टर बॉईज मधे
<<,आत्ताचा पोष्टर बॉईज मधे दाखवायला नागपुर दाखवलय >>
????
हो का? मला तर कुठेही जाणवलंसुद्धा नाही. त्यासाठी अभ्यास पाहिजे अभ्यास !
लोकेशन्स तर भोर-वाईकडची वाटली.
आत्ताचा पोष्टर बॉईज मधे
आत्ताचा पोष्टर बॉईज मधे दाखवायला नागपुर दाखवलय>> अहो म्हणजे नागपुरमधल्या वडनेरची माणसं अस दाखवलय पण बोलण अज्जिब्बात नाही पटत अस म्हटल..
आजकाल लोकेशन बाबत अशक्य फेरफार चालते त्यामुळे त्याबाबत इथ न बोललेलच बर
मच्छी = मासे<<< हे केवळ
मच्छी = मासे<<< हे केवळ वर्हाडात नाही. कोकणत तर मच्छी हाच सर्रास शब्द वापरला जातो. मासे वगैरे कुणी म्ह्नत नाही.
बीफला "बडेका" किंवा "मोठ" हासुद्धा कोक्णात बर्यापैकी वापरला जानारा शब्द आहे.
मराठी प्राज्ञ शिव्यांचे
मराठी प्राज्ञ शिव्यांचे वर्हाड़ी अविष्कार ह्यावर एक भारी नोट होईल पण ते अश्लीलतेच्या अन सभ्य समाजातल्या सभाशास्त्राच्या सगळ्या नियमांच्या चिंध्या करेल अन माझ्यावर कोर्ट ऑफ़ इन्क्वारी लागून माझे कोर्ट मार्शल होईल संपादक मंडळा कडून म्हणुन आवरतो
(शिव्या प्रेमी फौजी) बाप्या
<त्यासाठी अभ्यास पाहिजे
<त्यासाठी अभ्यास पाहिजे अभ्यास> हे सिनेमावाल्यांना उद्देशून आहे
सोन्याबापू, जमतील तेवढ्या
सोन्याबापू, जमतील तेवढ्या लिहा!!! आम्ही उरलेल्या फुल्या समजून घेऊ!!
(रच्याकने चित्रपटांतील मस्त मगन गाणे ऐकताना मकरा रोग लगाके अशी ओळ ऐकली, तुमच्या लेखांमधला "मकरो" हा शब्दप्रयोग आठवला आणि तुफान हसू आले. )
ए. ए. वाघमारे: <वर्हाड़ी बोली
ए. ए. वाघमारे:
<वर्हाड़ी बोली म्हणजे सरासरी अर्ध्या वाक्याला एकदा 'अबे काबे अन काहून बे' करून बेंबटणे असा अर्थ काही मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक मंडळी चा होरा आहे असे वाटत असे, भारत गणेशपुरे ह्यांनी वर्हाड़ी ला बरेच प्रसिद्ध केले आहे, नेर चे मिर्झा रफ़ी बेग सुद्धा भारीच होते, इकडे ग्रामीण भागात हिंडल्यास रोज एक नवी चित्रपट संहिता पटकथा डोक्यात येईल असले इरसाल नमूने भरलेले आहेत, गरज आहे ती फ़क्त एक्सप्लोरेशन ची> +१
मेड इन ईंडीया सादर करणारे दीलीप देशपांडे
अॅड. अनंत खेळकर पण मस्त वर्हाडी लिहीतात..
हीडगी या शब्दाला समांतर शब्द 'उच्चक' आणि 'शिल्लक'
लय उच्चक/शिल्लक आय थे = (खूप आगावू आहे ती)
धतींग = तमाशा..
काय होय बे हे धतींग = (हा काय तमाशा आहे,कींवा आता हे काय नवीनच?? या अर्थाने)
डींगडींग = सारखी कुरबूर करणे..
काय लावली बे हे डींगडींग कव्वाची..
'अड्डूल' हा शब्द खास वर्हाडी.. अड्डूल = कंच्यांमधली मोठी गोटी कींवा गार (गारगोटी)
फुट्टल = फुटलेली..
लुप्पांग = पाठीचा कणा वाकलेला.. सैल असलेला.. हा शब्द खास पतंगी साठी वापरतात.
हेमट्या/हेमटी = हातचं राखून,कमी या अर्थानी..
अर्र.. काय हेमटा सैपाक केला? = (कीती कमी स्वयंपाक?)
एक बिल्लास = एक हात (लांब)
दोरी घेजो बरं बाबू एक बिल्लास भर = एव्ह्ढीशी दोरी दे.
वर्हाडात घेजो कींवा घे हा शब्द दे या अर्थाने ही वापरतात.
फुगे = पाणीपुरी ला खास वर्हाडी शब्द.
चाल.. फुगे खाउन यू..= चल.. पाणीपूरी खाउ
कान्नू बा = काय माहीती बूवा..
इचिबीन = (समोरच्या च्या भगिनीचा उध्दार..)
मायबीन = (मातोश्री आणि भगिनी चा एकत्र उध्दार)
या शिव्या वाक्या वाक्यात पेरण्यात येतात..
मायबीन तिया तं.. हे काम बी भसकलं..
भसकलं= फसलं
हीडगी या शब्दाला समांतर शब्द
हीडगी या शब्दाला समांतर शब्द 'उच्चक'
तो शब्द उच्चक नाही "इच्चक" आहे उदा बापा ते गन्याचे लेकरु निरानाम इच्चक हाय लेक
निरा/नीरानाम = निव्वळ
डोक्याने कमी काम करणाऱ्या ला = हलका, बावला, दिमागानं पैदल किंवा दिमागचोट्टा असे म्हणतात
पायीपायी = पैदल
चोरटा = चोट्टा (भुरट्या चोराला म्हणतात)
बेलन्या, इमल्या, संतरसोल्या = मुर्खा
कये न मये अन घमेले घेऊन पये = कळत काहीच नाही अन उगाच इकडे तिकडे पळपळ
घमेले = पाटी
पश्चिम महाराष्ट्रात शाळेत "मास्तर" असतात आमच्याइकडे "गुर्जी" असतात
गोटा, बंड़ा = दगड
चिपकु लाळघोट्या माणुस = टोम्या गोचिड़ (काय सायचा तो दिन्या हापिस मदी आला अन गड्या शेंभर रुपए साठी निरा टोम्या गोचिड़ावानी चिपकला अर्धा घंटा मले"
आमच्याकडे मटन ते बटाटा सगळीच भाजी म्हणवली जाते मटन उत्तम झाले असले तरी यजमानाला "पुंडलिकराव झकास झालती राजेहो भाजी मटनाची" अशी पावती देतात
शेलाटे लांब तोंड असणारे व्यक्तिमत्व असले का त्याला म्हणतात चिलमतोंडया
बेंदुर = बैल पोळा
उच्चक शब्द वापरतो आम्ही
उच्चक शब्द वापरतो आम्ही अकोल्याला.. कदाचीत इच्चक शब्द बरोबर असेल..
मजा येतेय हे वाचायला!
मजा येतेय हे वाचायला!
आम्हीपन इच्चक असच म्हणतो..
आम्हीपन इच्चक असच म्हणतो..
फक्त टीनामाय अन सोन्याबापू
फक्त टीनामाय अन सोन्याबापू अस्सल वर्हाडी आहेत. (बाकी वर्हाड्यांनी नोंद घ्यावी. )
बापू द्या हो शिव्या. म्हणजे लिहा. शेवटी शिव्यांची पण आपली एक खास भाषा असते. ती पण एक संस्कृतीच.
मला इचिभन ही समहौ खानदेशी वाटली होती.
सोहोण्याबहापु अस्सल आहात !
सोहोण्याबहापु अस्सल आहात !
केदार.. लय बेक्कार वाटन
केदार..
लय बेक्कार वाटन तुम्हाले त्या शिव्या..
टोपल्यानं (खुप) हाय ..
मला नै माहित हा वाक्प्रचार
मला नै माहित हा वाक्प्रचार इकड पण वापरतात कि नै पण नसेलच वापरत अस समजुन लिहते..
कुटसा ठिवू हे भगुन ?
अ माय सांग न व कुट ठिवु तं..सांग त का आता..
घाल गधीच्या गां*त..बहिनमायच पोट्ट मारल तं..
लेकर एखादी वस्तु कुठ ठेऊ कुठ ठेऊ अस सतत विचारत राहतात तेव्हा बरेचदा मोठे लोक असे बोलतात..
टीना आणि सोन्याबापु एकदम
टीना आणि सोन्याबापु
मराठी सिनेमात दाखवतात तसे...
एकदम असली वर्हाडी शब्द जमा केलेत.
पण बोलण्याचा तो जो टिपिकल टोन आहे, तो पण सम्जायला हवा लोकांना. कोल्हापुरी/सातारी/पुणेरी टोनमध्ये हे वाचून मजा नाही. ते म्हणजे वर्हाडी ठेच्यात कांदा-लसुण मसाला/गुळ घातल्यासारखे वाटते
तुम्हाला ऑडिओ क्लिप टाकता आली तर बघा.
मी मध्ये कुठलातरी मराठी सिनेमा अर्धवट पाहिला. बहुतेक निशाणी डावा अंगठा. त्यात लोक थोडेफार वर्हाडी शब्द तर वापरत होते पण टोन कोल्हापुरी/पुणेरी. उदा. वर्हाडी भाषेत "जा ना बे" कधीच म्हणत नाहीत, "जा नं बे" म्हणतात. त्यातही "ज" जहन्नुम मधला. वाक्याच्या शेवटी "ना" लावणे अगदी प. महाराष्ट्र स्टाइल झाली. ते मलातरी फार लाडिक/आर्जवी वाटते जे की वर्हाडीशी अगदी विसंगत आहे. ही बोली गोड-आर्जवी वगैरे बिलकुल नाही. अतिशय रफ आहे. "ठसन" इज द राइट वर्ड. समोरच्याला चिल्लर समजुन शक्यतो आज्ञार्थी बोलायचं असतं, कुणाच्या भावना-बिवना दुखावत नाहीत कारण लोकांना सवय आहे.
अहो श्रीयु माझा जन्म अमरावती
अहो श्रीयु
माझा जन्म अमरावती चा आहे पण जन्मल्याच्या तिसऱ्या दिवसा पासुन ते आजतागायत अकोल्यातच राहतोय मी
शिव्यांच्या बाबतीत आमचा एरिया विशेष प्रसिद्ध, एकदा आमच्या एका आळशी मित्र अन त्याचे वडील ह्यांच्यात झालेला हा प्रेमसंवाद
बाबा - बाबु रे बजारात जायतां काय?
बाबु- मले नाही जा ची इच्छा
बाबा- बरं मंग वावरातनी जातं काय?
बाबु- कटायलो म्या
बाबा- बाबु कमीत कमी आत्या च्या इथं जायशीन काय?
बाबु - नाई न हो आज तबीयत ख़राब हाय काही नाही करीन
बाबा - धस मंग गधीच्या गांxx
(अन त्या नंतर म्हाताऱ्याने असा काही तोंडचा पट्टा सोडला का पोरगे गुमान उठले अन काम करतो बोलु नका म्हणत शुन्य मिनिटांत गायब झाले)
नताशा बरोबर बोललात वरती
नताशा बरोबर बोललात
वरती दिलेला आमच्या आजीचा किस्सा वाचा तेच रेफ्लेकट होते !!! तिची "ये रे मावल्या सोपान्या" आजही कानात घूमते
धमाल चालू आहे
गणेशपुरे बोलतो न
गणेशपुरे बोलतो न मस्त..
वर्हाडी गाणी ऐकायची असल त रमेश ठाकरे ची ऐकाच .. आत्ता तेच ऐकत होती ..
'झिंगिनांग चिकिनांग गाण ऐकत होती आत्ता..
त्यात बरेच वर्हाडी शब्द सापडतील तुम्हाला..
जिथं वाटन तिथ लोक फसवते टांग.. बापु झिंगिनांग चिकिनांग..
जिकड तिकड आल आता जमवण्याच सिजन..
जो तो दिसते डावात आपल कुट जमते भजन बापू..
वाट सोडून माणुस चाल्ला याले सांगाव कोणं?
म्हतारपणी लगन करते घेण ना देण बापु...
असे कै कडवे आहेत यात..मस्त गाण आहे..
खुप सारे गाणे आहेत त्याचे 'वर्हाडी झटका' या अल्बम मधे..त्यात इथल्या लोकांची महती पण आहे 'माया वर्हाडामंदी' या गाण्यात ..
प्रोग्राम जमेल का ? हे
प्रोग्राम जमेल का ? हे वर्हाड़ी मधे विचारायचे झाले तर
१ मंग होते का काही विषय आज? (आज दारू प्यायची का किंवा आज पिक्चर ला जायचे काय??)
२ जमते नाही मंग तुयालं भजन (तू लावलेली सेटिंग (पोरगी ते परीक्षेत कॉपी) जमेल काय?)
३ जमले नाही मंग तुयाले हिंद्यान!!! (जिकलास रं भावा चे स्वैर वर्हाड़ी)
४ काहीतरी बेज्या इल्लम करा लागते !(काहीतरी भारी आईडिया काढायला हवीय बुआ)
काही म्हणी
१ पदवने असतीन तर चोरी चे डुकरं नोका पदवजा सोताचे पदवसान ! (अर्थ ओरिजिनल कॉन्सेप्ट बोल उगा कोणाची तरी अर्धवट ऐकून स्वतःची म्हणून खपवु नकोस , आता आधी टीना तै बोलल्या तसे पादवणे म्हणजे मारणे असते अन पदवने म्हणजे प्रचंड मेहनत करवणे होय उदा, "अरे जाय रे बापा इतक्या उनीत (उन्हात) दहिगाव ले कौन जाईन क्रिकेट खेड्याले (खेळायले) तशीच त तिथलची टीम निरा पदवते बॉल आन्याले ग्राउंडा भैर")
२ सावकाराच्या गुवात सोने थोडीच् भेटन !! (अर्थ स्पष्ट आहे)
ऑडीओ क्लिपची आयडीया चांगली
ऑडीओ क्लिपची आयडीया चांगली आहे.
मनावर घेतली आहे.
Pages