इपुस्तके वाचण्यासाठी किंडल की आयपॅड घ्यावे?

Submitted by अश्विनीमामी on 23 July, 2015 - 06:21

संप्रति भारत देशात इ पुस्तकांचा चांगला पर्याय उपलब्ध जाहला आहे. ह्यात पुस्तके वाचून झाल्यावर
नीट ठेवायची किंवा आपल्या माघारी कोणाला तरी ती विल्हेवाट लावायला उद्युक्त करायचे अश्या जबाबदार्‍या नाहीत.

तसेच हव्या त्या मोठ्या आकाराची अक्षरे/ वाक्ये करता येतात. हे हार्ड कॉपीत करता येत नाही. इ पुस्तकसंवाद स्वरूपात ऐकता ही येते.

कागद व पर्यायाने झाडांची नासाडी ही नाही.

इतके फायदे असल्याने किंडल नावाची इ पाटी घ्यावी का? किंमत १२००० रु. आहे व इतर उपयुक्त वस्तु जसे दिवा, वेष्टन इत्यादि अजून काही हजारात आहे. पण हा खर्च केल्यावर हवी ती पुस्तके मनात येइल तेव्हा उतरवून घेता येतात. इ पुस्तके तुलनेने फारच स्वस्त आहेत. उदा. एका इंग्रजी लेखकाचे साहित्य इ पुस्तक१८९ रु. व कागदी आवृत्ती ४००० रु च्या पुढे आहे. ते ही बारीक आकाराचे लेखन. ( वाचायला त्रास होतो) .

ह्याला पर्याय फ्लिपकार्ट अ‍ॅप हे आय पॅड वर उतरवून घेतले आहे. परंतु काही ई पुस्तके अमेझॉनवरच उपलब्ध आहेत. ती वाचायची असल्यास किंडल घ्यायचा खर्च करावा का? आपला काय अनुभव आहे?
मराठी इ पुस्तके मासिके वगैरे किंडल वर उपलब्ध आहेत का? किंडल वर अजून काय काय करता येते?
म्हणजे पैसे वसूल होतील ? - गाणी पॉडकास्ट उपलब्ध असतील का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(इतक्या वर्षांनंतर) मी नुकतंच किंडल घेण्याचं ठरवलंय. सोप्पं, सुटसुटीत. जी पुस्तकं संग्रही बाळगण्याची गरज नाही अशी पुस्तकं आता किंडलवर वाचायचं ठरवलंय.

मासिकांची वर्गणी भरून ती किंडलवर वाचता येतात का? याचं उत्तर मलाही हवंय.

अगं लॉरेन्स सँडर्स ची अतिशय टाइम पास आणि एल ओ एल पुस्तके आहेत. क्राइम सीरीज मॅकनेली सीरीज वगैरे. ते मी वाच वाच वाचणार आणि हसणार. पण नंतर त्याची अडगळच होणार आहे. त्यात हार्ड कॉपी म्हणजे धूळ , फंगस हे सर्व आले. शिवाय रात्री अपरात्री बारका दिवा लावून हवे तितके वाचले मग परत झोपून टाकले हे मला सोयीचे वाट्ते . हार्ड बाउम्ड पुस्तक एक तर इंपोर्ट करायचे!!!
एक वाचायचे तर बाकिच्यांचे ओझे वागवत वाचायला लागते( चार पुस्तके एकात वगैरे. ) फारच जड आहे. घोस्ट फ्लीट हे नवे पुस्तक पण इ बुक स्वस्त पर्यायात आहे. पूर्वी टॉम क्लॅन्सीची बाडे वाचत असे.
म्हणजे बॅक इन द एटीज!!!

आणि इतके दिवस छापिल पुस्तकंच कशी वाचायला छान छान वाटतात वगैरे वाटायचं. पण आता लक्षात आलंय की नाहीतरी आपण स्क्रीनवर माबो वगैरे वाचत असतोच मग उगाच पुस्तकांच्या बाबतीत फुकाचा सोवळेपणा कशाला करायचा? त्यामुळे आता किंडल घेणारच आहे.

मी किंडल घ्यायचा अगदी निग्रह केला होता पण तितक्यात मला फ्लिपकार्ट इ बूक अ‍ॅप सापडलं.
माझ्या अँड्रॉइड फोनवर ईन्स्टॉल केलं. सगळ्या फॉरमॅट मधली इ बूक्स वाचता येतात अगदी फोनमध्ये स्टोअर केलेली सुद्धा!! Happy

जर किंडल कि आयपॅड हाच चॉइस असेल तर वाचनासाठी किंडलच बेस्ट आहे. कारण त्यात इ- ईंक आहे ( पुस्तक वाचल्याचा फील), ग्लेअर नाही, फॉन्ट चांगले दिसतात, वजनाला खूपच हलके आहे, बॅटरी चार्जिंग जवळ जवळ १ ते ११/२ महिने आरामात टिकते.

किंडल नावाचे उपकरण असते ह्यापलीकडे किंडलविषयी फारशी माहिती नाही. ह्या धाग्यावर खालील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला आवडतील.
१. ऑनलाईन सर्च दिल्यास किंमतीत बरीच रेंज दिसली. ती कशामुळे आहे ?
२. त्यात पुस्तकवाचनाव्यतिरिक्त अजून काय सोयी असतात ? त्यामुळे किंमत बदलते का ? ( इंटरनेट असणार नाहीतर पुस्तकं विकत कशी घेता येतील. )
३. किंडल आवृत्तीसाठी मराठी पुस्तकं किती प्रमाणात उपलब्ध आहेत ? ( इंग्लिश पुस्तके बहुतांशी असतीलच )
४. पहिल्या किंडल खरेदीबरोबर साधारण किती पुस्तकं मोफत मिळतात ?
५. पुस्तकातली चित्रं वगैरे हार्डकॉपी सारखीच दिसतात का ?
किंडल पुस्तकांच्या किंमती नेटवर थोड्याफार पाहिल्या. त्यामुळे त्यांचा थोडाफार अंदाज बांधला.

अमांनी धागा योग्य वेळी काढलाय. मीही अजून किंडलबद्दल काही रिसर्च केला नाहीये. आता आपसूकच माहिती मिळेलच. Proud

अगो, चांगले प्रश्न विचारलेस.

अमा - फक्त पुस्तकेच वाचायची असतील तर किंडल उत्तम पण पुस्तके वाचण्याखेरीज अजून खूप काही पर्याय हवे असतील तर मग आयपॅड घ्यावे.

१. ऑनलाईन सर्च दिल्यास किंमतीत बरीच रेंज दिसली. ती कशामुळे आहे ?

कीमती screen size, रंगीत/ black & white, 3G or only Wi-Fi, screen saver मध्ये advertise ह्या सगळ्या गोष्टीमुळे बदलतात.

मुलीला paper white किंडल घेउन दिला जो वाचनासाठी सगळ्यात चांगला आहे. पण त्यात चित्र निट दिसत नाही

२. त्यात पुस्तकवाचनाव्यतिरिक्त अजून काय सोयी असतात ? त्यामुळे किंमत बदलते का ? ( इंटरनेट असणार नाहीतर पुस्तकं विकत कशी घेता येतील. )

प्रत्येक किंडल मध्ये Wi-Fi असते जे तुम्हाला पुस्तक download करायला मदत करते. काही किंडल मध्ये ३G असते पण त्याबद्दल मला जास्त माहिती नाही. किंडल paper white हा वाचनासाठीच आहे. किंदल कलर हा आयपॉड सारखा आहे.

३. किंडल आवृत्तीसाठी मराठी पुस्तकं किती प्रमाणात उपलब्ध आहेत ? ( इंग्लिश पुस्तके बहुतांशी असतीलच )

मराठी पुस्तके कमी आहेत. पण जर मराठी pdf document असेल तर ते किंडल वर copy करुन वाचता येईल.

४. पहिल्या किंडल खरेदीबरोबर साधारण किती पुस्तकं मोफत मिळतात ?
जी पुस्तके इंटरनेट वर मोफर्त आहेत ती तुम्ही download करुन वाचु शकता बरीच मराठी पुस्तके मोफत आहेत ज्याची माहीती मायबोली वर आहे.
काही वाचनालये किंडल वर पण पुस्तके लोन वर देतात. भारतात कदाचित British Library देत असावी.

५. पुस्तकातली चित्रं वगैरे हार्डकॉपी सारखीच दिसतात का ?
paper white वर नीट दिसत नाहीत. कलर वर दिसतात पण वाचनाचा फिल येत नाही.
वाचनासाठी किंडल तर फोटो बघायला आयपॅड वापरवा.

मला पण किंडल घ्यायचे आहे. पण मध्यंतरी याहूवर एक पोस्ट होते. किंडल वापरताना लोळणे वगैरे होते. सहज उपलब्ध असल्याने जास्त वेळ ते वाचले जाते. त्यामूळे मानेची, डोळ्याची दुखणी होऊ शकतात. अर्थात आपला आपण कंट्रोल ठेवला तर हे नाही व्हायचे..

माझा एक विचित्र अनुभव लिहावासा वाटतोय. लहानपणी असेच एक छान पुस्तक वाचत होतो. तेवढ्यात लाईट गेले. मग मेणबत्ती लावून वाचू लागलो आणि अर्थातच मान खाली करून वाचावे लागत होते ( अपुरा प्रकाश ) त्यात मी एवढा हरवलो कि माझ्या कपाळावरचे केस जळायला लागले तरी लक्षात आले नाही.. जळका वास यायला लागला तेव्हा कळाले.

निव्वळ वाचन करायचे असेल तर किंडल. किंडलचा एक फायदा म्हणजे ते बारीक पुस्तक हातात घेऊन वाचल्यासारखे वाटते.

आणि इतर गोष्टीही करायच्या असतील तर आयपॅड. शिवाय आयपॅडवर किंडल हे अ‍ॅप म्हणूनही उपलब्ध आहेच.

किमती ह्या व्हर्जननुसार कमी जास्त होतात. ( ३ जी/ कलर / पेपर व्हाईट)

किंडलवर मराठी पुस्तकं मिळणे थोडे अवघड आहे.

किंडल खरेदीबरोबर नाही पण अ‍ॅमेझॉन वर फ्रि इ बुक्स आहेत त्यातून ते डाउनलोड करता येतात. हे इबुक्स किंडल अ‍ॅप (आयपॅड) वर ही चालतात. किंडल्च असावे असे काही नाही. मोस्टली खूप क्लासिक्स हे फ्री आहेत.

पुस्तकातली चित्रं वगैरे हार्डकॉपी सारखीच पूर्वीच्या व्हर्जन्स मध्ये दिसत नसत पण आता पेपर व्हाईट मध्येही दिसतात.

एका किंडलची पुस्तक दुसर्‍यावर पण नेता येतात.

इ बुक्स हे किरायाने अमेरिकन लायब्ररी मध्ये मिळतात. अजून भारतातील कुठल्या लायब्ररीत पाहिले नाही.

मी दोन्ही (रादर तिन्ही) किंडल / आयपॅड आणि आयपॅडवर किंडल असे वापरले आहे.

>>मराठी पुस्तके कमी आहेत. पण जर मराठी pdf document असेल तर ते किंडल वर copy करुन वाचता येईल. <<
म्हणजे बुक रिडर किंडल पण पुस्तके आपल्याला हवी ती. मग ती मराठी असो वा इंग्रजी. असे शक्य आहे का?
समजा एखाद्या मराठी प्रकाशनाने ठरवले की आमची सर्व पुस्तके ईबुक रीडरव र कॉम्पॅटबल आहेत तर तस करता येतील का?
ई बुक रीडर चा फील हा अगदी खरोखरच्या पुस्तका इतका असतो का? म्हणजे थुका लावून पाने उलटणे वगैरे सारखा.

मग ती मराठी असो वा इंग्रजी. असे शक्य आहे का? >> मराठी पुस्तके इ बुक मध्ये अजून आणण्याच्या प्रघात पडलेला नाहीये. त्यामुळे सध्यातरी ते कमी आहेत.

समजा एखाद्या मराठी प्रकाशनाने ठरवले की आमची सर्व पुस्तके ईबुक रीडरव र कॉम्पॅटबल आहेत तर तस करता येतील का? >> इ बुक केले की ते कुठेही वाचता येते. किंडल / आयपॅड हे पिडीफ पण सपोर्ट करतात. पण पिडीफ म्हणजे इ बुक नव्हे. सध्याची मराठी पुस्तके ही पिडीफ मध्ये आहेत.

ई बुक रीडर चा फील हा अगदी खरोखरच्या पुस्तका इतका असतो का? >> नसतो. ब्लॅक कॉफी पिण्यासारखीच टेस्ट डेव्हलप करावी लागेल. पण गोडी लागली तर आवडेल. ठेवायला सोपे / प्रवासात सोपे. टेस्ट डेवलप झाली नाही तर मग ते पडूनच राहील.

<<ई बुक रीडर चा फील हा अगदी खरोखरच्या पुस्तका इतका असतो का? म्हणजे थुका लावून पाने उलटणे वगैरे सारखा.>> पान उलटण्याचे अ‍ॅनिमेशन आहे किंडल वर. थुंकी लावून बघू शकता (आपल्या जबाबदारीवर) :p

कॅलिबर नावाचे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही एका फॉर्मेट मधून दुसऱ्या मधे सहज बदलू शकता. कॅलिबर हे मुक्त सॉफ्टवेअर आहे. म्हणजे चकटफु.
पीडीएफ च्या इपब किंवा मोबी फाइल्स करणं एकदमच सोप्प.

इ-पुस्तकांबद्दल कोणालाही काहीही शंका असतील तर नक्की विचारा. इकडून तिकडून शोधाशोध करून उत्तर द्यायचा प्रयत्न करेन

मला ईपुस्तकांचा हा एक तोटा वाटतो की ती कुणाला देता येत नाही नैतिक पातळीवर विचार केला तर. कारण, ते ई-पुस्तक मग अनेक जणांपर्यंत पोहचून ज्या कुणाचा तो व्यवसाय आहे त्याच्यावर आपण अन्याय करत असतो. आणि फक्त जवळच्या काही मित्रांना ते देणे काहींना न देणे हेही मला स्वतःला पटत नाही. त्यापेक्षा हार्डकॉपी बरी वाटते. पुस्तक वाचून संपले की ते ग्रंथालयाला देता येतं. तो फायदा ईपुस्तकांमधे नाही आहे.

जर डोळ्यांना कमी दिसत असेल तर अशावेळी फॉन्ट मोठे करायची सोय मात्र इथे आहे ती सोय छापिल पुस्तकांमधे नसते.

पण फॉंट मोठा करण्यासाठी भिंग वापरायचे की. फारच लहान असेल तर दुर्बिण वापरा.
पुस्तकाच्या पानाचा फोटो काढून 'झूम बराबर झूम' हे गाणे केवळ आपल्याचसाठी आणि याच प्रसंगासाठी बनवले गेले आहे हे स्मरून वाचा. खूप मस्त वेळ जाईल शिवाय आपणही टेकी असल्याचा फील येईल. सवयीने हे फोटो व्हॉट्सपवर न टाकता त्यांना निर्घृण डिलीट करा.
Light 1 (याच्या उजेडात पुस्तके नाही तरी मायबोली नक्की वाचता येते. )

bookganga.com नावाच्या साईटवर दिवसागणिक नवीन मराठी पुस्तकं प्रकाशित होत असतात, जी Kindle वर विकत घेऊन वाचता येतात.. याशिवाय मराठी दिवाळी अंक पण असतात. अश्या अजून काही साईट आहेत..
हवे तेवढे वाचा.... आपल्या माबोकर 'गौतमी' यांची ती साईट आहे..

कुणी विकत घेत नसलं तरी माझी दोन्ही पुस्तकं आहेत तिथे... Proud

आशू! Wink

प्युअर रिडिंग करणार असाल तर बेसिक किंडलही वापरता येईल मात्र ६०००/- किंमत आहे.
बाकी फोटो, मूव्हीज, म्युझिक, यूट्यूब, वेब ब्राऊजिंग हे ही सगळं हवं असेल तर मग आयपॅड बेस्ट. अर्थात किंमतही मोजावी लागेलच.

कमी किंमतीत हेच सगळे पर्याय हवे असतील तर अ‍ॅन्ड्रॉईड टॅबलेट्स आहेतच.

Happy

इंटरेस्टिंग माहिती Happy
मध्यंतरी किंडल-पेपर व्हाईट घ्यायचा प्लॅन ऑलमोस्ट पक्का केला होता. अ‍ॅमेझॉनवर बरंच स्वस्तात मिळत होतं. पण सध्या घरात येऊन पडलेली आणि अजून न वाचलेली पुस्तकं वाचून पूर्ण करू आणि मग किंडल-बिंडल बघू असं स्वतःच स्वतःला बजावलं आणि शेवटच्या क्षणी प्लॅन रद्द केला Lol
पण इथे मिळणारी माहिती नोंदवून ठेवणार.

किंडलवर मायबोली वाचता येणार नाही.

फॅब्लेट टाईपचे ५-६ इन्च स्क्रीन साईजचे अँड्रॉईड फोन पुस्तकं वाचायला छान, असे माझे वै.म.

त्यामुळे, वाचाय्ला किंडल, गाणी ऐकायला एम्पीथ्रीप्लेयर, फोन करायला फोन, सर्फिंगसाठी वायफाय असेल तेव्हा आयपॅड, असली सगळी जनता एकाच वस्तूत बसते, कॅरी करायला सोपे जाते.

किंडल लेंडिंग लायब्ररी नामक प्रकार आहे . प्राइम मेम्बरशिप असल्यास किंडल डिव्हाइसवर बरीच पुस्तके बॉरो करता येतात. पण किंडल अ‍ॅप असेल तर हा प्रकार चालत नाही.

किंडल फायर वरती पुस्तके वाचण्याव्यतिरिक्त इतर अ‍ॅप्स पण चाल्तात.

दूर राहणाय्रांना किंडल वरदानच म्हटले पाहिजे.

सध्या फुकट मिळणारी इंग्रजी ,मराठी पुस्तके ( pdf ,zip )नेटपॅकची मुदत संपायला आली की उरलेला डेटा वसुल करण्याच्या हेतुने मोबाइलवर भरमसाठ डाउनलोड केली.आता फक्त वाचायची आहेत.तो कंटाळा दूर केला वाचणाय्रा (pdf अथवा काहीही लेखन)अॅपसनी.विंडोजवर दोनतीन चांगली आहेत .एक अॅप 'bookviser' वापरून पाने देखील पलटण्याची गंमत आहे आणि साडेचार इंची स्क्रिनला लेखन योग्य करून येते पण फक्त zip फाइल साठी आहे.इंग्रजी वाचण्याचा ( अगदी रोजचे पेपरसुद्धा) प्रश्न सुटला.आता मराठी ( देवनागरी )वाचणारे अॅप निघाले की मज्जा.सर्व अॅप फ्री आहेत आणि ओफलाइन चालतात. प्रवासात आता चार्जिंगचाही प्रश्न सुटला आहे

आयपॅड ऑलरेडी असेल तर त्यात फ्री किंडल अ‍ॅप टाकून काम भागेल.
माझ्याकडे किंडल फायर टॅब्लेट व आयपॅड दोन्ही आहे. कधीकधी असं वाटते की किंडल फक्त रिडर घ्यायला हवा होता. पण किंडल फायर घेताना मुलासाठी 'फ्रीटाईम' हे फीचर आवडले( प्राईम असेल तर अनलिमिटेड लहान मुलांची पुस्तकं व अ‍ॅप्स) म्हणून किंडल फायर घेतले.
तरीही त्यावर पुस्तकं वाचायला चांगले वाटते. क्वचित कधीकधी उन्हात स्क्रीन धरली की नीट दिसत नाही (जो प्रॉब्लेम किंडल पेपरव्हाईट किंवा तत्सम रिडर्सना नाहीये असं वाचले आहे व आयपॅडला थोडा जास्त प्रमाणात आहे.) ह्या कारणानेच पुढेमागे किंडल रिडर घेणार आहे मी. मेबी आयपॅड चालेनासा झाला की. (हे होण्याची मी गेले वर्षभर वाट पाहात आहे. पण अजुन चालतोच आहे तो) Proud

मी मिनि आय पॅड वर किंडल अ‍ॅप वापरते. मला फक्त पुस्तके वाचण्या व्यतिरिक्त अजुनही बर्‍याच गोष्टी करायला आवडतात/ करायच्या असतात.
ऑडियो बुक्स/ मुव्हीज असे काही मूड नुसार करत असाल तर आयपॅड्+किंडल हे बरे राहिल. फक्त पुस्तके वाचण्यासाठी मात्र किंडल इज बेस्ट.

Pages