इपुस्तके वाचण्यासाठी किंडल की आयपॅड घ्यावे?

Submitted by अश्विनीमामी on 23 July, 2015 - 06:21

संप्रति भारत देशात इ पुस्तकांचा चांगला पर्याय उपलब्ध जाहला आहे. ह्यात पुस्तके वाचून झाल्यावर
नीट ठेवायची किंवा आपल्या माघारी कोणाला तरी ती विल्हेवाट लावायला उद्युक्त करायचे अश्या जबाबदार्‍या नाहीत.

तसेच हव्या त्या मोठ्या आकाराची अक्षरे/ वाक्ये करता येतात. हे हार्ड कॉपीत करता येत नाही. इ पुस्तकसंवाद स्वरूपात ऐकता ही येते.

कागद व पर्यायाने झाडांची नासाडी ही नाही.

इतके फायदे असल्याने किंडल नावाची इ पाटी घ्यावी का? किंमत १२००० रु. आहे व इतर उपयुक्त वस्तु जसे दिवा, वेष्टन इत्यादि अजून काही हजारात आहे. पण हा खर्च केल्यावर हवी ती पुस्तके मनात येइल तेव्हा उतरवून घेता येतात. इ पुस्तके तुलनेने फारच स्वस्त आहेत. उदा. एका इंग्रजी लेखकाचे साहित्य इ पुस्तक१८९ रु. व कागदी आवृत्ती ४००० रु च्या पुढे आहे. ते ही बारीक आकाराचे लेखन. ( वाचायला त्रास होतो) .

ह्याला पर्याय फ्लिपकार्ट अ‍ॅप हे आय पॅड वर उतरवून घेतले आहे. परंतु काही ई पुस्तके अमेझॉनवरच उपलब्ध आहेत. ती वाचायची असल्यास किंडल घ्यायचा खर्च करावा का? आपला काय अनुभव आहे?
मराठी इ पुस्तके मासिके वगैरे किंडल वर उपलब्ध आहेत का? किंडल वर अजून काय काय करता येते?
म्हणजे पैसे वसूल होतील ? - गाणी पॉडकास्ट उपलब्ध असतील का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुरुवतिला टॅब वर वाचत होतो 'मुन रिडर ' अ‍ॅप . त्यात डार्क बॅक ग्राउंड करायची सोय आहे, डिक्शनरी, फाँट, पेज बॅक ग्राउंड, भरपुर काही आहे. फक्त काही गोष्टी सोडल्या तर ते अप्रतिम आहे. जसं की शेवटी मोबाइल आणि टॅब वर वाचन सोडून इतर बरेच उद्योग असल्यामुळे लक्श विचलित होतं, आणि बॅटरी लाइफ कमी आहे. जास्त उजेडात वाचायला थोडं अवघड जात. (हे प्रवासात जास्त जानवतं)
किंडलची मजा वेगळी आहे उजेडातही वाचता येतं, बॅटरी लाइफ बर्यापैकि जास्त आहे. आणि नो डिस्ट्र्बन्स. आणि वजनाला हलकं आहे.

Kindle unlimited 169 rs a month - many dharap, matkari etc books are there..
Many many books actually in marathi english

Kindle is one of my best buys in life i feel, i bought in 2013.. Has been a super experience and # of books of my interest in kindle unlimited are increasing. Others i buy, so love love love it.

नानबा, अमेझॉन किंडल ऍप चांगलेच आहे.पण इथे मुख्य चर्चा 'किंडल रिडींग डिव्हाईस वेगळा विकत घेऊन त्यावर पुस्तके वाचणे पैसे वसूल आहे की नाही ' अशी आहे.

पूर्वी किंडल ऍप नसताना बहुधा किंडल बुक्स फक्त वेगळा किंडल डिव्हाईस घेऊन त्यावर वाचावी लागायची.आता कोणत्याही मोबाईल वर किंडल ऍप टाकून वाचता येतात. Pdf वेगळ्या किंडल नसलेल्या पण वाचता येतात.
किंडल ऍप पैसे वसूल आहे.

मागच्या पानावरचा माझा प्रतिसाद चोप्य-पस्ते -

बरीचशी मराठी पुस्तके किंडल एडीशन म्हणून आहेत अ‍ॅमेझॉन वर.
अ‍ॅमेझॉन वेबसाईट वर (फोन/टॅबलेट अ‍ॅप वर बुक्स पर्चेस नाही करता येत) किंडल एडिशन खरीदलं की ते पुस्तक आपोआप किंडल वर येतं (अर्थात किंडल वर त्याच इमेल अ‍ॅड्रेस नी लॉग्ड इन असायला हवं ज्यावरून तुम्ही खरेदी केलीय आणि किंडल वायफाय ला कनेक्टेड ही हवं Happy )

तुमच्याकडे काही पीडीएफ्स असतील तर ती तुमच्या किंडल ईमेल ला फॉरवर्ड केली की किंडल डिवाईस वर आपोआप येतात.
तुमचा किंडल इमेल अ‍ॅड्रेस अ‍ॅमेझॉन अकाउंट च्या इन्फो पेज वर असतो; तो आपल्याला हवा तसा एडीट करून घेताही येतो.

बाकी ठिकाणी बर्‍यापैकी स्क्रिन वापरतोच आपण (हिशोब केला तर जागे झाल्यापासून झोपेपर्यंत सर्वसाधारणपणे दर तासाला तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ आम जनता कुठली ना कुठली स्क्रीन पाहाते) सो ताकाचं भांड लपवण्यात काही हशील नाही.

माझ्या मते, जर फक्त आणि फक्त पुस्तकंच वाचायची आहेत आणि ती बहुतेक वेळी सूर्यप्रकाशात थोडक्यात आऊटडोर (प्रवास इ.) वाचायची आहेत तेव्हा किंडल बेस्ट.

जर पुस्तकंही वाचायची आहेत आणि बाकी फेबु, वेबसाईट ब्राऊझिंग इ. पण हवंआहे तर आयपॅड. अर्थात यात मग फोन सोडून सगळच मिळतं.

Harry Potter epub edition (८ mb) फोनवर घेतले. Librera app मधून वाचता/ऐकता /नाइट मोड आहे.
आणखी काय हवं? रेल्वेत चार्जिंग पॉइंट असतात आणि छान काम होते. वेगळे ग्याजेट न्यावे लागत नाही.
काही मराठी कादंबऱ्या फुटपाथवर शंभर रुपयांत मिळतात.

ओह ओके नानबा
मला वाटले तुम्ही फक्त ऍप बद्दल बोलताय.

नानबा, तुमच्या किंद्ल वर मराठी पुस्तके देवनागरी लिपीत दिसतात की रोमन लिपीत?>>
सॉरी समजला नाही प्रश्न, मराठी पुस्तक रोमन मध्ये कोन प्रकशित करनार? किंडल देवनागरीला सपोर्ट करतं,.

किंडल पेपर व्हाईट हे नक्कीच छान आहे वाचण्यासाठी. मोबाइलला किंवा पॅड वर जास्त वेळ वाचल्यास डोळ्यांना त्रास होतो तास त्रास किंडलवर मला कधीही झाला नाही. आता बरीच पुस्तके मराठी, हिंदी हे किंडल वर आहेत. तसेच ऍमेझॉन किती तरी फ्री बुक्स पण देतं वाचायला.

खूप वेळ वाचणार असाल तर किंडल नक्कीच चांगला पर्याय आहे मोबाइल किंवा पॅड पेक्षा

चार महिन्यांपूर्वी किंडल-ओअ‍ॅसिस घेतलं. भारी आहे. वाचनाचा स्क्रीन मोठा आहे. वजनाला एकदम हलकं.
पुस्तक वाचताना इतर डिस्ट्रॅक्शन्स अजिबात नाहीत.

फोन, टॅब, लॅपटॉपच्या स्क्रीन्समुळे डोळ्यांना त्रास होतो, तसा किंडल डिव्हाइसने मुळीच होत नाही.
माझ्या डोळ्यांची अशी पार वाट लागण्याच्या बेतात होती, किंडलने वाचवलं.

त्यामुळे सध्या मै और मेरा किंडल... !

लहान मुलांना रंगीत पुस्तकं वाचता येत नाहीत हा मुद्दा मात्र बरोबर आहे.
मोठ्यांसाठी तो प्रश्न नाही.

किंडल पेपर व्हाईट आहे घरी तीन चार वर्षांपूर्वी लेकीसाठी घेतलेलं.
उजेडातही वाचता येतं,
बॅटरी लाइफ खूप.
नो डिस्ट्र्बन्स. आणि
वजनाला हलकं आहे.
खूप पुस्तकं रहातात
हे फायदे आहेतच, शिवाय प्रवासात पूर्वी ती चार पाच पुस्तकं न्यायची त्याऐवजी एकच किंडल नेण सोपं आहे.
पीडीएफ पाठवल्या की वाचता येतात त्यामुळे सध्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या पीडिएफ त्यावर आहेत, अभ्यास करण सोप जातय..
स्क्रीन सुरू राहतो ,त्यामुळे बघून काही वहीत लिहून काढायला सोपं जातंय.

Pages