इपुस्तके वाचण्यासाठी किंडल की आयपॅड घ्यावे?

Submitted by अश्विनीमामी on 23 July, 2015 - 06:21

संप्रति भारत देशात इ पुस्तकांचा चांगला पर्याय उपलब्ध जाहला आहे. ह्यात पुस्तके वाचून झाल्यावर
नीट ठेवायची किंवा आपल्या माघारी कोणाला तरी ती विल्हेवाट लावायला उद्युक्त करायचे अश्या जबाबदार्‍या नाहीत.

तसेच हव्या त्या मोठ्या आकाराची अक्षरे/ वाक्ये करता येतात. हे हार्ड कॉपीत करता येत नाही. इ पुस्तकसंवाद स्वरूपात ऐकता ही येते.

कागद व पर्यायाने झाडांची नासाडी ही नाही.

इतके फायदे असल्याने किंडल नावाची इ पाटी घ्यावी का? किंमत १२००० रु. आहे व इतर उपयुक्त वस्तु जसे दिवा, वेष्टन इत्यादि अजून काही हजारात आहे. पण हा खर्च केल्यावर हवी ती पुस्तके मनात येइल तेव्हा उतरवून घेता येतात. इ पुस्तके तुलनेने फारच स्वस्त आहेत. उदा. एका इंग्रजी लेखकाचे साहित्य इ पुस्तक१८९ रु. व कागदी आवृत्ती ४००० रु च्या पुढे आहे. ते ही बारीक आकाराचे लेखन. ( वाचायला त्रास होतो) .

ह्याला पर्याय फ्लिपकार्ट अ‍ॅप हे आय पॅड वर उतरवून घेतले आहे. परंतु काही ई पुस्तके अमेझॉनवरच उपलब्ध आहेत. ती वाचायची असल्यास किंडल घ्यायचा खर्च करावा का? आपला काय अनुभव आहे?
मराठी इ पुस्तके मासिके वगैरे किंडल वर उपलब्ध आहेत का? किंडल वर अजून काय काय करता येते?
म्हणजे पैसे वसूल होतील ? - गाणी पॉडकास्ट उपलब्ध असतील का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> मी सुरुवातिला असुस टॅब वर मुन रिडर वर बरिचशी पुस्तकं वाचली, त्यातल एक बेस्ट फिचर म्हणजे पान उलटतानाचं अनिमेशन, फॉन्टसचे भर्पुर ऑप्शन्स, शिवाय पेज कलर बदलता येतो (मला आवडला होता तो फिकट पिवळसर, विंटेज लुक वाला), सगळ्यात बेस्ट रात्रिच्या वाचनासाठी रिवर्स मोड आहे (काळ्या पानावर पांढरी अक्षरे), ह्यात ब्राइटनेस कमी करुन खुप वेळ वाचता येत असे. > मी स्मार्टफोनवर Aldiko रीडर वापरून पुस्तक वाचते. यातदेखील रिव्हर्स मोड आहे. दिवसा-रात्री दोन्हीवेळेस मी तोच मोड वापरते. दिवसा क्रीम रंगाची अक्षर आणि रात्री निळ्या रंगांची.

इंटरनेटचा वापर करणार असेन तेव्हाच चालू करत असते, इतरवेळी बंद असतं. त्यामुळे बॅटरी ठीकच चालते. आणि सतत Background data घेत राहणारे ऍप देखील डेटा खात रहात नाहीत.

बाकी LCD स्क्रीन वर पुस्तक वाचणे हा डोळ्यांवर अत्याचार आहे. >> ++१
<<

मायबोली काय प्रिंटाऊट काढून वाचता का आपण? किंवा गेला बाजार सगळे इ-मेल्स/ ऑनलाईन शॉपिंग/ व्हॉट्सॅप / एसेमेस इत्यादी?

स्क्रीन इज रिअ‍ॅलिटी ऑफ लाईफ नाऊ. पेपर बुक वॉज गुड, बट स्क्रीन्स आर हिअर टु स्टे.

रच्याकने.

माईलस्टोन्स नावाचा प्रकार आम्ही शिकायचो मेडिकल कालेजात. याचा अर्थ, बाळाच्या डेवलपमेंटमधील टप्पे. पालथा पडू लागणे, रांगू लागणे, पहिले पाऊल इत्यादि.

आजकाल, 'फर्स्ट इंटेलिजंट टॅप' (ऑन अ मोबाईल स्क्रीन) हा नवा माइलस्टोन ऑफिशली स्वीकारला गेलेला आहे असे ऐकून आहे.

अहो, डोळ्याला त्रास होऊ नये/ कमी व्हावा म्हणून स्क्रीनची सेटिंग कशी असावी, २०-२० व्यायाम कसा करावा यावर गणपतीत तुम्ही जे लिहिलं होतंत तेच ते लिहितायत. स्क्रीनचा ब्राईटनेस फार जास्त असतो. पुस्तक तासंतास वाचणार असल्याने इ-रीडर म्हणूनच सुसह्य होतात.

आरारा,
LCD चा वापर टाळणे अशक्यच आहे. दुसरीकडे कागदाचा चा वापर कमी व्हायलाच हवा. त्यातल्या त्यात किंडल मुळे दिवस किंवा रात्री पुस्तक वाचणे जरा सोपे वाटते. डोळ्यांना कमी त्रास होतो.

बाकी लहान मुलांचा स्क्रीन वरचा वेळ गेल्या दशकात खूपच वाढला आहेत. त्याचा चांगला वाईट परिणाम हे विषयांतर होईल.

>>स्क्रीनचा ब्राईटनेस फार जास्त असतो. पुस्तक तासंतास वाचणार असल्याने इ-रीडर म्हणूनच सुसह्य होतात.<<

तुमच्या मोबाईलमधे ब्राईटनेस कंट्रोल करायची सोय नाहिये का? किंवा तुमचा पीडीएफ रीडर तुम्हाला फाँट अन बॅकग्राउंड कलर चॉईसेस देत नाहिये का?

हे सॉफ्टवेअरचे लिमिटेशन आहे. अन त्यामागे दडून किंडलवाले तुम्हाला पैशात लुटताहेत. (लुटत आहेत)

तर, @ अमितव & चिडकू.

>> डोळ्याला त्रास होऊ नये/ कमी व्हावा म्हणून स्क्रीनची सेटिंग कशी असावी, २०-२० व्यायाम कसा करावा यावर गणपतीत तुम्ही जे लिहिलं होतंत तेच ते लिहितायत.<<

तेच म्हणतो आहे मी. कोणतीही वस्तू कशी वापरावी, याचे शिक्षण घेणे व त्याप्रकारे वागणे गरजेचे आहे.

आता अवांतर गम्मत. किंवा ऑन टॉपिक म्हणा हवं तर.

छापील पुस्तके किती साली आलीत? त्यापूर्वी लेखन किती साली आले? ते वाचताना डोळ्यांवर किती ताण पडू लागला? अन कधीपासून? अन त्यापूर्वीची माणसाची उत्क्रांती कधीपासूनची? कधीपर्यंतची? वाचायला कधीपासून लागला? (रच्याकने स्त्री व पुरुषांच्या 'नजरे'च्या उत्क्रांती अन फरकांबद्दल लय इंटरेस्टिंग माहिती उपलब्ध आहे. हंटर फोराजर असल्यापासूनच्या नजरेच्या गरजांमधला फरक त्यात आहे. भरपूर गम्मत.)

"सर स्टुआर्ट ड्यूक एल्डर'स ऑफ्थॅल्मॉलॉजी" नावाचं एक एन्शऽन्ट पुस्तक आहे. त्यात, मायोपिया उर्फ मायनस नंबर येण्याचे कारण म्हणजे "शाळेत मान खाली घालून पुस्तके वाचणे", अशीही एक थेअरी आहे, असे नोंदविलेले होते. याच्या पुष्ट्यर्थ आडवी टांगून ठेवलेली चिपांझी माकडे व समोर ठेवलेली चित्रांची पुस्तके वगैरे वाला एक प्रयोगही होता. जवळच्या अंतराकरिता नेत्रभिंग अतिरिक्त वेळ 'फोकस' केल्यामुळे ते मायनस नंबरवर 'शिफ्ट' होते, असा काहिसा सिद्धांत.

आज ८० वर्षांनंतर, व्हेरी यंग एज मायोपिया, अर्थात ३-१० वर्षांतल्या मुलांत जर असा नंबर आला, (जो मोबाईलच्या अतीवापराने येतोय, असाही रिसर्च आहे,) तर तो वाढू नये म्हणून, नेत्रभिंगाचे फोकसिंग (पॅरलाईज उर्फ) कमी / बंद करण्यासाठी जे "अ‍ॅट्रोपिन" नामक औषध वापरले जाते ते अत्यंत कमी डोसमधे ३-५ वर्षे रोज डोळ्यात टाकावे, असा सध्याचा लेटेस्ट ट्रेंड आहे.

मुद्दा हा, की पीढी दर पीढी नवे शोध येतात. नवे स्किल्स आत्मसात करावे लागतात.

पूर्वी उत्क्रांत होताना आपोआप किंवा चुकून समजून जेनेटिकली स्किल ट्रान्स्फर होत असे. आजकाल जरा टेक्निक बदललेले आहे. अन बदलाचा स्पीडही वाढलेला आहे.

नवे स्किल्स आत्मसात नाही केलेत तर नामशेष व्हावे लागेल. ते स्वीकारताना टेम्पररी डिस्कंफर्ट उर्फ रिपिटेटिव्ह स्ट्रेस इंज्यूरीज सहन करून पुढे जावे लागेल..

तेव्हा अत्याच्या आचाराचं अचार घाला, अन पुढे चला मित्रहो.

डोळ्यांवर ताण येतो तो नुसत्या किंडलने नव्हे.

१. आपण बेबीसिटींगसाठी वर्षाच्या मुलाला मोबाईल हातात देतो.
२. स्कूलमधे 'व्हाईटबोर्ड' अन मार्कर असतो, 'फाँटसाईज' तुमच्या खडू फळ्याशी कंपेअर करा.
३. पॉवर्पॉऑइंट स्लाईडमधे एका ओळीत आठ शब्द अन एका पानात ८ ओळी, हा नियम पाळला जातोय का? नसेल, तर the bloody font size is too small to see from 15 feet distance at which your child is sitting in a college class room
४. स्क्रीन इज नॉट अ‍ॅट फॉल्ट. स्क्रीन टाईम इज. तुम्ही काँपुटरवरून उठता. बस मधे मोबाईल पहाता, मग घरी टिव्ही, परत मोबाईल...? काय चाल्लंय काय?

सो, २०-२०-२०. स्वतःची गाडी जपून चालवता ना? तसं स्वतःचं शरीर जपून वापरा.

शिंपल.

रच्याकने.

"रेटिना" डिस्प्ले नामक येडी घालण्याचा iप्रकार ज्या कंपनीने सुरू केलाय, त्यात एक गम्मत समजून घ्या.

या डिस्प्लेचे रिझोल्यूशन खूऊऊऊऊप कमी असते. हे "नॉर्मल" रेटिनाला समजेल इतके असते.

आपल्याला एच्चडिअ न त्यापुढचे खपवले जातेय.

थोडा गूगल सर्च अन अभ्यास सुचवितो आहे.

ऑपरेशन करून डोळ्यात बसवण्याच्या चष्मा रिप्लेसमेंट बद्दल काय मत आहे?आमच्या टीम च्या मुलाने अमेरिकेत शिकायला जाताना जाड भिंग चशमा नको म्हणून हे ऑपरेशन केले.

आरारा झ्याक पोस्ट.

थोडा गूगल सर्च अन अभ्यास सुचवितो आहे.>>>> प्रिस्क्रीप्शन ही आवडले.

मला अजून स्मार्ट फोनचा स्क्रीन ब्राईट कॉन्ट्रास्ट वगैरे योग्य त्या सेटिंगला वाचण्यायोग्य आणणे जमलेले नाही. त्यासाठी अँप आहे का एखादे?

आरारा
तुम्ही जे सांगताय ते अगदी योग्य आहे. एकसलग वापर न करणे हाच सगळ्यात योग्य उपाय आहे. किंडल असो किंवा टॅबलेट.

पेपर प्रिंटेड पुस्तक, किंडल आणि टॅबलेट मधला फरक अकुस्टिक पियानो, यामाहा चा डिजिटल पियानो आणि मोबाइल मधलं पियानो अप्लिकेशन या सारखाच आहे.

बाकी सविस्तर वेळ मिळाल्यावर लिहितो.

टवणेसर, आयफोनमध्ये अ‍ॅक्सेसिबिलिटी सेटिंग्जमध्ये आहेत ही सेटिंग्ज. कलर मध्ये जाउन ग्रे / मोनोक्रोम ग्रेडियंट वगैरे सिलेक्ट करता येतात. अँड्रॉइडलाही आहेत सेटिंग्ज पण कुठे ते माहीत नाही.

अँड्रॉइड, ---- सेटटिंगस----डिस्प्ले----vision कलर इन्व्हर्जन मिळालं आत्ता
स्क्रीन ब्लॅक दिसतो आणि अक्षरे पांढरी, वाचायला बरे पडतंय

कलर इन्व्हर्जन मुले फोटो/FB भयाण दिसते,
सगळे फोटो, चित्र निगेटिव्ह सारखे दिसतात,

त्यामुळे तो मोड परत रिसेट केला

स्क्रीन इज नॉट अ‍ॅट फॉल्ट. स्क्रीन टाईम इज. तुम्ही काँपुटरवरून उठता. बस मधे मोबाईल पहाता, मग घरी टिव्ही, परत मोबाईल...? काय चाल्लंय काय?>> जबरदस्त अनुमोदन. पंधरावीस प्रकारच्या डोके दुख्या सहन करून मला आता हे बीपीचे हेडेक/ हे स्ट्रेसचे/ हे पित्ताचे हे/ डोळे खराब झालयचे डोके दुख णे /- जे जास्त स्क्रीन टाइम मुळेच्च आहे हे समजते त्यानुसार मी रात्री फोन वर वाचणे बंद केले. वाचलेच तर फुल दिवा लावून मग वाचन. बेड साइड कायम फेवरिट अशी हार्ड कॉपी मराठी पुस्तके ठेवलीत. हिंदू अडगळ, पाडस गौरी देशपांडे मुक्काम . !!! काय पण पॅकेज.

ग्लाउकोमा आहे का ह्या शंकेने ते पण विचारून आले. नाहीतर ऑडिओ बुक. एकाही स्काय स्क्रेपरचे रस्त्यावरचे दिवे डोळ्यात टुपणार नाहीत असे घर शोधून घेतले आहे. पूर्ण अंधार फक्त मोडेमचे चार दिवे. फार काम झाल्यास त्या दिवशी घरी आल्यावर महाभ्रिंगराज किंवा डा बर आमला असे हिरवे तेल डोक्यात चोपून झोपायचे.कसले ही विचार करायचे नाहीत. व वर लिहिल्या प्रमाणे आपले डोळे हे खरेच एक महत्वाचा रिसोर्स आहेत व ते नीट वापरले पाहिजेत. ( ते सौ चूहे खाके वगैरे......... पर उम्र बढी अकल नै पर तजुर्बा तो है. समजून घ्या)

मी गेली अडीच वर्ष किंडल वापरतोय. मला तरी मोबाईल पेक्षा तेच आवडलं.काही फायदे असे.
१. खूप महाग असलेली प्रसिद्ध पुस्तकं (इंग्लिश/मराठी) ईबुक स्वरूपात स्वस्त मिळतात. उदा पर्वा Sapiens ९९ रुपयांना मिळालं. बरीच प्रसिद्ध मराठी पुस्तकं पण आता ९९ च्या आत मिळतात. उदा व.पु., मिरासदार, वि. स. खांडेकर ई. मेहता पब्लिकेशन यात आघाडीवर आहे.
२. डोळ्यांना अजिबात त्रास होत नाही.
३. इंग्लिश पुस्तकं वाचताना डिक्शनरी आणि विकिपीडिया चा खूप उपयोग होतो.
४. बेसिक ब्राउझर आहे.
५. नीट वापरलं तर बरेच दिवस चालेल कारण सॉफ्टवेअर जुनं होण्याची भानगड नाही.

खूप महाग असलेली प्रसिद्ध पुस्तकं (इंग्लिश/मराठी) ईबुक स्वरूपात स्वस्त मिळतात. >>>+१
कालच,
छावा
ययाती
मृत्युंजय
हे प्रत्येकी ४९/- फक्त ला मिळाले. (टोटल = १४७/-, जे की छापिल १२००/- पर्यंत गेले असते)
शिवाय वाचुन झाल्यावर कुठे ठेवायचे हि काळजी ही मिटली..

Sapiens >>
२ चॅप्तर्स वाचले, interesting वाटते आहे..

जी पुस्तके अनेकदा वाचून झाली आहेत आणि तरीही संग्रही असावीच अश्यांपैकी आहेत (उदा. मृत्युंजय, ययाती इ.) यांकरता तरी किंडल अकाऊंट हवे.

सिम्बा, सिर्यसली.

कोणत्या फॉर्म्याटमधलं पुस्तक वाचताहात? अन कशात?

किंडल विषयी खूप ऐकले होते. पण कधीही ते घ्यावेसे वाटले नाही. आयपॅड वा टॅबलेट असताना लोक ते का घेत असतील असे वाटायचे.
परंतु "माझ्या मुलाला किंडल मुळे वाचनाची आवड निर्माण झाली" अशा प्रकारचे काही रिव्यू वाचले आणि काही महिन्यांपूर्वी किंडल खरेदी केले. पण घोर निराशा झाली. मुख्यत्वे त्याच्या आकारामुळे. मी घेतलेले सहा इंची स्क्रीनचे होते. भली थोरली बॉर्डर आणि त्यात हा एवढासा स्क्रीन. (यापेक्षा मोठे सात इंच स्क्रीनचे आहे पण फार वेगळा अनुभव असेलसे वाटत नाही). तरीही एक एक दोन दिवस वापरून पाहिले. वाचनाचा अनुभव सुद्धा खास नव्हता. जितकी त्याची जाहिरात करतात त्यामानाने एक टक्का सुद्धा नाही. त्यापूर्वी मी माझ्या डेस्कटॉपवर गुगल बुक्स वाचायचो ते यापेक्षा खूपच छान वाटले. इतकी किंमत देऊन हे कशासाठी घेतले असे वाटू लागले. मुलाने तर "ह्यात रंग नाहीत माझी जीरोनिमो ची पुस्तके मी काळी पांढरी वाचणार नाही" असे म्हणून एका मिनटात बाजूला ठेऊन दिले. झाले! ज्याच्यासाठी घेतले तोच हेतू साध्य होत नसेल तर इतके पैसे देऊन उपयोग नव्हता. परत देऊन टाकले. पुन्हा गुगल बुक्स कडे वळलो. हे आठवायचे कारण म्हणजे कालच मी मतकरींची दोन इ-पुस्तके गुगल बुक्स वर खरेदी केली आणि वाचली. खरी पुस्तके वाचल्याचा अनुभव मिळाला. किंडल हा ओवररेटेड ओवर हाईप प्रकार आहे असे माझे ठाम मत बनले आहे. त्यानी जाहिरातीसाठी वापरलेल्या "डिजिटल इंक" वगैरे संज्ञा वाचून तर आजकाल हसायलाच येते.

टीप: मी वरच्या प्रतिक्रिया वाचल्या नाहीत. कोणी किंडल प्रेमी असतील तर माफ करा. हा माझा व्यक्तिगत अनुभव आणि मत.

Pages