खग ही जाने खग की भाषा -भाग ६

Submitted by कांदापोहे on 9 July, 2015 - 03:08

गुहागरचे पक्षीनिरीक्षण

नेहेमीप्रमाणेच केलेला कंटाळा व इथे मायबोलीवर प्रकाशचित्र टाकणे हा मोठा कार्यक्रम असल्याने अनेक दिवस मनात असुनही ही प्रकाशचित्रे टाकु शकलो नाही. आज जरा उसंत मिळाल्यावर लिहुनच टाकले.

गेल्या सहा महिन्यात फक्त फोटोग्राफी करता असे गुहागरला जाणे झाले. तिथे आढललेले पक्षी इथे दाखवावे म्हणुन हा प्रपंच. सोबत थोडेफार इतरही प्राणी दिसल्याने तेही टाकुन पाणी वाढवले आहे. Happy गुहागर, चिपळुण, दापोली, वेळणेश्वर या भागात इतके पक्षी दिसतात की लिहायला घेतले तर एका दिवसत ५० जाती दिसल्या असे सहज लिहीता येईल. गेले अनेक वर्ष दापोली, दिवेआगर वगैरे परीसरात सुट्टीत जाणे झाले पण पक्षीनिरीक्षणाचा छंद नव्हता. गेल्या दोन फेरीमधे अनेक पक्षी दिसल्याने कोकणाच्या ओढीच्या कारणामधे आणखी एक भर पडली.

खाली दिलेले सर्व फोटो आधी फेसबुकावर प्रकाशित आहेत पण इथले सर्वच जण तिकडे असतीलच असे नाही. त्यामुळे इथेही ते प्रकाशित करत आहे.

पोलादपुर मार्गे कोकणात चिपळुणपाशी पोचतानाच एक गाव आहे. तिथल्या तळ्यात मगरी दिसतात असे भाच्याने सांगीतले म्हणुन तिकडे मोर्चा वळवला. तळ्याकाठी चक्क Beware Crocodile Point अस बोर्डच दिसला. बघतो तर काय खाली चांगल्या ४-५ मगरी पहूडलेल्या होत्या. आम्ही कॅमेरे परजल्यावर एकीने लगेच आम्हाला दात वेंगाडुन दाखवले. Proud

Indian Crocodile (मगर)

खरंतर आधीच्या भेटीत Brown Fish Owl दिसले होते पण समाधान होत नाही म्हणुन परत एकदा त्याच ठिकाणी गेल्यावर हे दिसलेच.
Brown Fish Owl

घुबड बघायच्या वाटेवर सुमधुर आवाजात कुठला पक्षी गातोय म्हणुन बघीतले तर हा तल्लीन होऊन गात होता.
Orange Headed Thrush

जेवतानाच अचानक हे महाशय काहीतरी टिपताना दिसल्यावर फोटो काढणे अनीर्वाय होते.
Puff Throated Babbler

बराच वेळ मला एक मित्र सांगत होता इथेच Vigor's Sunbird पण दिसतो पण मी फारसे लक्ष दिले नव्हते. जेव्हा याचे रंग बघीतले तेव्हा वेडा झालो. पुढच्या वेळी याच्याकरता आणखी वेळ द्यायच ठरवले आहे.

Vigor's Sunbird

दापोलीकडुन गुहागरला आता गाडी बोटीत टाकुन जाता येते. त्या तिरावरच हे आजोबा स्थितप्रज्ञासारखे बसलेले होते.

पावसाळ्याच्या सुरुवातीला पक्षीनिरीक्षक कोकणात जायचे मुख्य कारण म्हणजे Indian Pitta, Oriental Dwarf Kingfisher हे दोन पक्षी. यातील दोन्ही दिसल्यावर विशेष आनंद झाला होता. तसेच कोकणार दिसणारा निळ्या कानांचा खंड्याही (Blue Eared Kingfisher) दर्शन देऊन गेला.

Blue Eared Kingfisher

हा पक्षी बघणे म्हणजे खरच सुख आहे. जुन जुलै मधे घरटी बांधण्याची लगबग असल्याने हा बराच दिसतो. अगदी घराजवळ वाडीतही येतो. फक्त वातावरण फोटो काढण्यास अजिबात अनुकुल नसते.
Indian Pitta नवरंग

Black Hooded Oriole

Golden Flameback Woodpecker

वेळणेश्वर मंदीरासमोरच्या एका खराब झालेल्या झाडात दोन भोकं दिसल्यावर इथे हे महाशय असतील असा अंदाज आलाच होता. चांगले दुमजली घर असावे कारण आम्ही बघत असतानाच वरच्या मजल्यावरुन यांनी डोके बाहेर काढले.
Brown Headed Barbet

इथेच अजिबात अपेक्षा नसताना एके ठिकाणी हा पण दिसला.
Stork Billed Kingfisher

चिपळुणकडुन परत गुहागरला जाता एका झाडावर धनेश दिसल्यावर मित्र अक्षरशः ओरडला. आम्ही थांबेपर्यंत आणखी दोघे आले पण कावळा नामक पक्षी इतका त्रासदायक आहे ना की बास. त्याने दोघांना उडवुन पण लावले. काही मिनीटेच मिळाली त्यात खालील फोटो काढता आला.
Malabar Pied Hornbill

Munia

त्या फेरीतील सर्वात भारी क्षण म्हणजे Orange Breasted Green Pigeon चे दुर्मिळ दर्शन. धन्य वाटले त्याला बघुन. आपल्याकडे Yellow Footed Green Pigeon दिसतात पण हा पक्षी महाराष्ट्रात फारच क्वचीत दिसतो.

Orange Breasted Green Pigeon

यापूर्वी केलेले प्रयत्न खाली बघता येतीलच.

उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग १ इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग २ इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ३ इथे http://www.maayboli.com/node/42131 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ४ इथे http://www.maayboli.com/node/51921 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ५ इथे http://www.maayboli.com/node/53885 बघता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटोसेशन्सला बसल्यासारख्या क्लिअर पोझेस आहेत एकेक >>
तरीही काही लोकांचे फोटो बघुन मला हे फोटो ठिकठाक वाटतात. अप्रतिम डिटेल्स असतात काही फोटोग्राफर्सचे फोटो म्हणजे. अजून बरच काही शिकण्यासारखे आहे.

ग्वागरात एह्वडे भारी पक्शी असतील असे वाटले नव्हते कधी. भारीच रे भाऊ. तुम्हा पक्षीनिरिक्षकांची नजरच काही और असते

अप्रतिम सुंदर पक्षी आणि फोटो दोन्ही. धागा आला तेव्हापासून निवांत बघेन म्हणून बुकमार्क केला होता. वेळेचं अगदी सार्थक झालं. फारच छान.

फोटो अप्रतिम.कोणता कॅम्रा आणि लेन्स? पाणपक्षी बघून कंटाळा येतो तसे या रानपक्षांचे नाही.श्रीवर्धन बस डेपोत सकाळी हरिहरेश्वर बससाठी उभे होतो सात वाजता.डेपोतल्या पिंपळाच्या झाडाकडे लक्ष गेले तर पानांइतकीच हिरवी कबुतरं होती.निवळी फाटा येथे ओढ्याच्या आजुबाजुसही हे सर्व पक्षी पाहता आले होते. नवरंग( पिट्टा )दोन पक्षांची मारामारी तीस फुटांवर चाललेली पाहिली आहे. तो थ्रश आमच्यापुढे साताठ फुटांवर दिसलेला.सोनपाठी सुतार आहेतच.मालगुंड ( गणपतीपुळे पासून ३किमी )मात्र इमराल्ड डोवची जोडी,हरेवा ( गोल्ड फ्रंटिड),धनेशाचे कुटुंब दिसलं.कुडाळच्या वालावल भागात हे धनेश कावळ्यांपेक्षा जअधिक आहेत

धन्यवाद कांदापोहे. ६०० एमेम लेन्सने फारच चांगले क्लोजप मिळतात .तुमचे साइटवर अपलोड केलेले फोटोही साडेतीन चार एमबीचे आहेत आणि पक्षाचा डोळा तसेच लकबही पकडली आहे .एकदा कुडाळला (पंधरा वर्षांपुर्वी ) मजेदार घटना पाहायला मिळाली ती नंतर लिहितो.

एकदा कुडाळजवळच्या गावात मित्राच्या घरी वह्रांड्यात सकाळी दहाच्या सुमारास बसलो होतो.सहज बाजूच्या सात आठ फुटांवरच्या कट्ट्याकडे लक्ष गेले. तीन पक्षी तिथे बसून काहीतरी पकडत होते आळीपाळीने.पांढय्रा भुवईचा नर्तक( नाचरा ),टिकेलचा फ्लाइकॅचर ( मक्षिमार) आणि वर्डिटर( =हरित) फ्लाइकॅचर हे तिघेही उडणारे किटक पकडतात.प्रथम कळेना हे फरशीवर काय पकडताहेत.जरा लक्ष देऊन पाहिल्यावर कळले की फरशीला बारीक चीर होती आणि त्यातून एकेक डास बाहेर येत होता.( फरशी खाली सेप्टिक टँक होती असे मित्राकडून कळले.)गंमत अशी की नाचरा खूप कोलांट्या मारून जोकर टाइप तो डास एक फुटावर पकडत होता.त्यानंतरची बारी टिकेलची-तो एका गिरकीत चार पाच इंचावर पकडायचा.आता निळुभाउंची पाळी-तो कधी डास बाहेर पडतो तिथेच एका झटक्यात पकडून परत जागेवर यायचा ते कळायचेच नाही.हा व्हिडिओ काढता आला असता तर?

SRD भारीच की. Happy एकदा कुडाळला जायला पाहीजे.

मिळतात कसे इतके मस्त शॉट्स असंच मनात आलं !! >>
त्याकरता एकतर जागेची माहीती व अभ्यास, पक्षापर्यंत पोचायला भरपूर वेळ, शांतपणा, कपडे, एकाच जागी बसुन रहाण्याचे गरज असते. कपडे याकरता की अनेकदा तुमच्या कपड्यांच्या रंगामुळे पक्षी फटक्यत उडुन जातो.

धन्यवाद लोकहो. Happy

Pages