भक्ती आणि शक्ती संगम - धन्य झाले पुणेकर हा अविस्मरणीय सोहळा पाहून.

Submitted by गणेश पावले on 11 July, 2015 - 04:25

☼"ज्ञानोबा - तुकोबा"च्या मंत्रात "शिवाजी - संभाजी" हे दोन महामंत्र गुंजले अन धन्य झाले पुणेकर हा अविस्मरणीय सोहळा पाहून☼

संत पाऊली गोजीरी ,गंगा आली आम्हावरी
जेथे उडावी रजधुळी ,तेथे करावी अंघोळी

मित्रहो,
मान्य कि वारीत तलवारी काय कामाच्या….

वारकरी सांप्रदाय हि महाराष्ट्राची परंपरा.
अन या परंपरेला शिवकाळात अभय दिल असेल तर ते फक्त शिवाजी संभाजी या पितापुत्रांनी.

अस म्हटल जात वारीला हि छ. शिवाजी महाराज भेट देत, साधु संतांच्या दर्शनाला जात.

आणि
हि परंपरा अखंड चालू होती.
याची जाणीव समाजाला रहावी म्हणून शिवप्रतिष्ठान वढू तुळापुर व शिवतीर्थ रायगडवरून ज्वालेच्या रुपात या महाराष्ट्राच्या दोन्ही छत्रपतींना वारीत आणते. व वारकऱ्यांच्या अखंड परंपरेला वंदन करते.

अधिक आषाढ कृ० ९, शुक्रवार, शके १९३७ पुणे येथे जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन होते. वारकरी-धारकरी संगम म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम हा सोहळा
जेंव्हा परकीय आक्रमण आले होते, देश, धर्म, सांप्रदाय नष्ट होत चालले होते. या उभ्या महाराष्ट्राला संपूर्ण भारत देशाला, कोणीच वाली न्हवते तेंव्हा छत्रपती शिवाजीराजे भोसले जन्माला आले आणि त्यांनी अपार पराक्राम गाजवून, परकीयांना धूळ चारून देव, देश आणि धर्माच्या पाठीशी उभे राहून सर्वांचे रक्षण केले, साधुसंताना अभय दिले, ज्यांच्यामुळे पंढरीचा पाडुरंग, तुळजापूरची आई भवानी माता परकीय जाचातून वाचली, मुक्त झाली याच शिवरायांचा नामघोष. त्यांच्या पराक्रमाची गाथा, त्यांचा धारकरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रूपाने दिंडीत सहभागी झाला होता.

म्हणे बाप माझा वसे पंढरीत,
आई राहते नित्य तुळजापुरात,
तया दर्शनासाठी आसुसलेला,
मराठा म्हणावे अशा वाघराला

भक्ती आणि शक्ती – वारकरी धारकरी संगम म्हणजे संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची भेटच जणू. भक्ती आणि शक्तीची भेट काल पुणेकरांनी डोळे भरून पाहिली.
नामदेव, एकनाथ, सावता माळी, ज्ञानेश्वर भावभक्तीची गंगा घरोघरी पोहोचवली. नामदेवांनी महाराष्ट्र धर्माचा झेंडा अखंड भारतात रोवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची ज्योत महाराष्ट्रातच चेतवली आणि दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्राचे श्रेष्ठत्व मान्य करायला लावले.
संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ शिवशंभू या पितापुत्रांच्याच काळात रोवली गेली. वारकरी आणि धारकरी म्हणजेच भक्तीशक्ती संगम सोहळा पुणे येथे पार पडला.
हर हर महादेव गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम हे गजर रंगून गेले, अभंग, कीर्तने आणि विठूमानाचा जयघोष झाला.
"याची देही याची डोळा । धारकरी वारकरी संगम सोहळा" पुणेकरांनी मनात साठवला.

माझा भाव तुझे चरणी । तुझे रूप माझे नयनी ॥
सापडलो एकामेकां । जन्मोजन्मी नोहे सुटका ॥
त्वा मोडिली माझी माया । मी तो जडलो तुझिया पाया ॥
त्वा मज मोकलिले विदेही । मी तुज घातले हृदयी ॥
नामा म्हणे गा सुजाणा । सांग कोणे ठकविले कोणा ॥

“जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल” नामघोषात “हर हर महादेव” अशी ललकार
डोक्यावर भगवा फेटा, मुखात शिवनामाचा, विठ्ठल रखुमाई नामघोष, छाती अभिमानाने फुगलेली आणि सोबत आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींची शिस्त आणि स्वतः गुरुजी.
असा हा वारकरी आणि धारकरी असा संगम याची देही याची डोळा पहायला रस्त्यावर अमाप गर्दी लोटली
विठ्ठल नामाची दिंडी चालली, धारकरी वारकरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम.

वारकरी सांप्रदाय म्हणजे पंढरपूर. तुकोबा, ज्ञानोबांची वारी, आणि धारकरी म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान शिवाजी संभाजी रक्तगटाची ललकारी”

“भारत माता कि जय” आणि “जय जय विठ्ठल रखुमाई ।। जय जय विठ्ठल रखुमाई” हे दोन नामघोष पहिल्यांदाच एकमेकांत मिसळले होते.

हे विठ्ठला पांडूरंगा,
या देश आणि धर्मावरील संकटाला दूर कर, आम्हाला काही नको पण या हिंदुराष्ट्राच रक्षण कर, तूच माऊली तूच साऊली सकळांची, या झोपलेल्या देशाला महाराष्ट्राच्या तरुणाला पुन्हा जाग कर, हातात शिवनामाच शस्त्र आणि हृदयात शिवरायांच्या अभिमान जागव, देव, देश आणि धर्मासाठी जगायला आणि मरायला शिकव, अखंड हिंदुस्थान भगव्या झेंड्याखाली आन हेच मागणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरयांनी विठ्ठला, ज्ञानोबा, तुकोबाचरणी मागितले.

© लेखन - गणेश पावले

वारीतील काही क्षण

भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम भक्ती आणि शक्तीचा संगम

Group content visibility: 
Public - accessible to all site users