मला विळद घाट बघायचा आहे

Submitted by टवणे सर on 29 June, 2015 - 13:01

मला जगप्रसिद्ध विळद घाट पाहायचा आहे. कुणी माहिती देऊ शकेल काय?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विळद घाट हा अहमदनगर च्या उत्तरेस नगरहून राहूरीला जाणार्‍या रस्त्यावर लागतो. या घाटाचे विषेश म्हणजे याला समांतर जाणारी पाईपलाईन ही दिसते. लोकांचा असा संशय आहे की ही पाईपलाईन आणि नगरमधील पाईपलाईन रोड यांचा काही तरी संबंध आहे.

विळद घाटामध्ये काही कॉलेज आणि इतर संस्था देखील आहेत.

गुगल बाबांच्या मते त्याचे स्थानः

https://www.google.com/maps/place/Vilad+Ghat,+Pimpalgaon+Malvi,+Maharash...@19.1765485,74.696019,15z/data=!3m1!4b1!4m2!3m1!1s0x3bdcbbe05e1355fb:0x1fb4e122632403d

तिकडे समुद्र करायचा विचार होता अशी अफवा उडत उडत कानावर आली होती पण बजेट नव्हते म्हणे. फ्लायओव्हर वर खुप खर्च झाला !

भौ कोंचा फ्लायोवर? तिथे देहर्‍यापासून पुढे एक टोल बूथ होता, त्याचे टोल वाले लिहून दिलेल्या कालावधीपेक्षा कित्येक जास्त दिवस (की महिने/वर्ष) लोकांकडून टोल उकळत होते. लोकांना कळल्यावर एक दिवशी मोठ्या जमावानी टोलवाल्यांना धू धू धूतला. धूतला तर धूतला टोल नाकाच उध्वस्त केला. पार तिथल्या त्या बूथांच्या आत लागलेले गज लंपास करुन भंगारात विकले. Lol
नगरात फ्लायोवर करायचा म्हणजे २-३ मंत्री लोकांच्या पुढच्या २-३ पिढ्यांना पुरेल येवढा पैसा लागतो. कोन देनार इतका पैसा? Lol थोडक्यात नगरचा विकास करणे महा कठिण काम आहे.
मध्यंतरी व्हॉट्स अ‍ॅप वर जोक आला होता. नगर मध्ये बुलेटट्रेन आणायचा प्रस्ताव आमदारांनी साफ फेटाळून लावला! का? तर म्हने गाडी फुल्ल पॅक असनार तर मावा कसा थुकायचा?नै जमनार! Lol

कोणकोणते समुद्र करायचे विचार होते बरे? तसंही भारताच्या कोकण किनाऱ्यावर एकापेक्षा जास्त समुद्र आहेत असा संशय घ्यायला वाव निर्माण झालाय. किनारपट्टीवर समुद्र (तो पण एकापेक्षा जास्त) आणि घाटात एकपण समुद्र नाय हा अन्याय आहे. वेगळ्या विळद घाटाची मागणी झाली होती त्याचे पुढे काय झाले?

त्या टोलबुथापासून जाताना लाइट्स फ्लॅश केले आणि साहेबांची गाडी आहे असं सांगितलं की टोल मागत नसत. चांगली मोठी पांढरी गाडी हवी मात्र Proud

नागपूर ते हिंगणघाट मार्गावर समुद्रगाव लागते, तिथे समुद्र होता काय याचे उत्खनन झालेच पायजेलय. त्याच रस्त्यावर डोंगर नाही पण डोंगर गाव आहे. ( नो जोक्स हा. खरीच ही गावे आहेत. )

तसंही भारताच्या कोकण किनाऱ्यावर एकापेक्षा जास्त समुद्र आहेत असा संशय घ्यायला वाव निर्माण झालाय >> Lol

विळद घाटावरून आठवले, पंप्र मोदी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देणार होते त्याचे काय झाले ?

हा घाट लागतो का? असल्यास कुठे? जवळपास आलेपाक मिळतो का, का घरून घेऊन जावा. साधारण किती न्यावा? वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. !!!

धागा विळद घाटासंदर्भात आहे तरी त्याबाबतीतच प्रश्न विचारावेत उगीच विळद घाटाच्या धाग्याला हायजॅक करू नये Lol

पंप्र मोदी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देणार होते त्याचे काय झाले ? >>>> तुम्हांला काय करायचय ? अ.सं.पु/बांना देणार नव्हते ते! अमेरिकेत बसून अशी पोलिसगिरी करणं बंद करा.. भारतातले प्रॉब्लेम्स तुम्हांला कळणार नाहीत!!

(आता फक्त एकच विषय राहिला आणायचा.. Proud )

>> भारतातले प्रॉब्लेम्स तुम्हांला कळणार नाहीत!!

पराग, ये तुम एक एन आर आय की हैसियत से बोल रहे हो या सिर्फ आय की हैसियत से? Proud

अमितव, आलेपाक नगरश्टँड वर मिळाला तर घेऊन ठेवावा. उगीच घाटात आल्यावर आठवण करू नये Lol

आता त्या विदर्भाचे साहेबांना सांगा.

पंप्र मोदी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देणार होते त्याचे काय झाले ? >>>> तुम्हाला द्यायला तुम्ही काय सोनियांचे जावई आहात का ? अधिक मास म्हणुन तुम्हाला १५ लाख द्यावेत ? Lol

विळद घाटाबद्दल बाफं असताना विळी कुठून घेऊ असे प्रश्न विचारणार्‍यांची अळीमिळीगुपचिळी बसवायला मला वाटतं पुणेकरांना बोलवावं. Lol नगरची लोकं डायरेक हाथापाईवर उतरतात! Lol

अधिक मास म्हणुन तुम्हाला १५ लाख द्यावेत ? हाहा>>>> त्यांना अजिबात आधिक मास वगैरे नाहीये हं श्री. अगदी तोळामासा तब्बेत आहे त्यांची. देऊन टाका पंधरा! Lol

Pages