मला विळद घाट बघायचा आहे

Submitted by टवणे सर on 29 June, 2015 - 13:01

मला जगप्रसिद्ध विळद घाट पाहायचा आहे. कुणी माहिती देऊ शकेल काय?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे अरे रून्मेष, एकदा जा तर आधी विळद घाटला . अतिफ अस्लम एकदाच विळद घाटात आला तेव्हापासून बोम्बल्तोय - मै रंग शर्बतोंका तू मीठे घाट का पानी.

कोणीतरी विळद घाटाची स्पेलिंग ईंग्रजीत सांगा ना..
vilad ghat लिहिले की कुठल्यातरी कॉलेजच्या ईमारती येत आहेत.
घाटात कॉलेज आहे की कलेजात घाट?

हा हा यावरून एक आचरट कोटी आठवली, ती ईथे टाकायचा मोह अनावर व्हायच्या आधी कल्टी मारतो, शुभरात्री शब्बाखैर Happy

दिनेशदा - वेगळा धागा कसा काढायचा ?>>> त्याचे मार्गदर्शन आम्ही नाहि करत
आम्ही फक्त वाई ते सातारा दळण वळणाचेच दळण घालतो

मी पण विळद घाट गूगल करून पाहिला. एक कॉलेज पण आहे. अहमद नगरच्या आधी आहे घाट. इट अ‍ॅक्चुअली एक्सिस्ट्स. वॉव. ते हॉली वूड सारखे पाटी लावायचे पण फार मस्त आयडिया आहे.

बेकार तरूणा, असे सरळ चिचारून कुणीच मदत करत नाहीत, म्हणून वेगळे धागे काढावे लागतात. पण तेच माहित नसेल तर कसे व्हायचे ? तो सायकल चँप, स्वतः चमच्याने फालुदा खातो, आणि लोकांना म्हणतो Happy Happy

आता एवढ्या सगळ्यांना विळद घाट माहिती होता, पण सगळे वेगळा धागा निघायचीच वाट बघत होते ना ? का नाही कुणी लिहिले त्याबद्दल आधी ? आँ !

>>> काय चुकलेय का माझे.... <<<<
>>> नाही रे राजा, <<<<
चमच्याने खाल्ला ते नाही चूकले, खायला सुरुवात करायच्या आधी फालुद्याच्या दोनचार ठिपक्यांचे शिंतोडे बाजुला उडवले नाहीस ना म्हणुन दिनेश.भौंना वैषम्य वाटले असेल.

फालुद्यावरून हत्तीमुंगीचा एक जोक आठवला.

एकदा एक हत्ती एका मुंगीला विचारतो, तुला कोणता फालुदा आवडतो?

मुंगी म्हणते,

.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
ईज्जत का फालुदा Rofl

ह्या घाटात कोणी दळवी रोज सकाळी मॉर्निंग वॉक ला गेल्यावर तिथे शीर्षासन करीत असत म्हणून त्याचे नाव वि ळ द घाट पडले.

मंदार,

विळदघाटाच्या नावाखाली कुलंगगडाचा फटू टाकला म्हून तुमचा णिशेद! Angry तुमास्नी (तेह)रानात तडीपार कराया पायजेल.

आ.न.,
-गा.पै.

गोंधळ उडाला प्रतिसाद वाचून.
नक्की काय आहे विळद ? जर विळदघाटासहीत विदर्भ असेल तर समुद्र कसा काय तिकडे ? की विदर्भापर्यंत खाडीबिडी आहे ? पण नगरचा उल्लेख का मग ?

गोंधळ उडाला प्रतिसाद वाचून.<<< गोंधळ उडण्यासारखे काहीच नाही
जगप्रसिद्ध विळद घाट आहे तो

की विदर्भापर्यंत खाडीबिडी आहे ?<< खाडी चे माहित नाही पण बिडी नक्की मिळेल (ब्रँन्ड विचारू नका)
पण नगरचा उल्लेख का मग ? << खुष्कीच्या मार्गाने नगर मार्गे विदर्भात जाण्यासाठी विळद घाट वापरला जायचा असे कुठेतरी पुरणात वाचले आहे

विळद घाटात एलियन्स ऊतरल्याच्या चर्चेला काही वर्षांपूर्वी नगरमध्ये पूर आला होता. एलियन्स पाहिल्याचे छाती ठोकून सांगणारे शेकड्याने लोक वेशी वेशीवर घोळक्यांना त्याबद्दल ज्ञानामृत पाजत होते. आजू बाजूच्या शेतांमध्ये क्रॉप सर्कल्स साठीही शोधाशोध करून झाली. दिवे लावून ऊडवलेल्या पतंगाना एलियन्सच्या ऊडत्या तबकड्या समजून अवकाश संशोधनही करून झाले. एलियन्स दिसण्याच्या काही ठराविक वेळांना ईकडे राहूरी पर्यंत आणि तिकडे केडगाव पर्यंत गाड्यांच्या ट्राफिक जाम होत असे.
नगरच्या अप्सरा टॉकिजला 'मुर्दों की कहानी बच्चे की जुबानी' च्या प्रिमियर शोला जातांना एम नाईट श्यामलनला 'साईन्स' चित्रपटाची कथा विळद घाटातच सुचली असे म्हणतात.

विळदघाटात कॉर्नरला एक छोटुकली टपरीवजा हॉटेल आहे. त्यात चहा- कॉफी, भज्यान्चे विवीध प्रकार मिळतात, एकदम चविष्ट असतात. तसेच बाजूला बाक वगैरे न मान्डता, शेजारच्या डोन्गरातच शिडीवजा पायर्‍या खोदल्यात. त्यावर बसुन चहा-भजीचा आस्वाद घेता येतो. आणी घाटातले विहन्गम दृष्य पहाता येते.
मागच्याच आठवड्यात धुवाधार पाऊस झाल्याने घाटात धबधब्यान्ची आकर्षक माळ तयार झालीय. त्यात भिजायला लोक येत आहेत, जाम गर्दी आहे रे बाबौ! एक तास अडकलो होतो गर्दीत.:अरेरे:

Pages