सॅटीनच्या रिबीनीची फुलं ( बदलून)

Submitted by मनीमोहोर on 21 June, 2015 - 12:59

काही दिवसांपूर्वी मुलीकडे गेले होते. तिच्या कडे देवपूजेसाठी फुलं मिळत नाहीत आपल्याकडे मिळतात तशी. बुके मधली फुल देवाना वहायला योग्य वाटत नाहीत आणि रोज तसे करणे परवडणारे ही नाही. फुलांशिवाय देव बघणे बरे वाटत नाही. काय करता येईल म्हणून मी विचार करत होते तर नेट वर बघुन ही सॅटीनच्या रिबीनीची फुलं केली आहेत. अगदी सोपी आहेत. देठाला सेल्फ अ‍ॅडहेसिव हिरवी टेप गुंडाळली आहे आणि पानं ही त्याच टेप पासून बनवली आहेत. आकाराने छोटी असल्याने देव्हार्‍यात ठीक्क बसतात आणि आकर्षक रंगांमुळे देव्हारा ही छान दिसतो. दर आठ पंधरा दिवसानी बदलुन बदलुन घालता येतात.
याशिवाय कुठे ही ऐन वेळेला सजावटी साठी उपयोगी पडतात जसे ताटाभोवती महिरप म्हणून केक च्या बाजुला सजावट म्हणून. फुलाला टुथ पिक चे देठ करुन छान बुके ही करता येतो. एखाद छोटसं फुल गिफ्ट द्यायच्या पाकिटाला लावून पाकीट सुंदर बनवता येतं.

हा त्याचा फोटो

From mayboli

ही फुलं कशी केली त्याची ही लिंक.

https://www.youtube.com/watch?v=7ZkXi0WtYc8

आता कृती ही लिहीते.

पाऊण इंच रुंद रिबीनीचा १५ इंच लांब तुकडा घ्यावा.
दोन इंचावर ती रिबीन ९० अंशावर दुमडावी आणि थोडी गोल गोल गुंडाळावी जेणे करुन गुलाबाच्या आतला भाग तयार होईल. तो झाला की रिबीन पाकळ्यांसाठी अर्धी फोल्ड करुन गुंडाळत जावे रिबीन संपेपर्यंत. फुल न सुटण्यासाठी खाली दोरा बांधावा. (लिहीलीय मी कृती पण नाही जमलय मला नीट लिहायला तेव्हा विडिओच पहा आणि करा. )

मध्यंतरी मी अशी खूप फुल केली कुणा कुणाला देण्यासाठी. शेवटी त्या दुकानदाराने विचारली की फुल बनवण्याचा तुमचा व्यवसाय आहे का ? ( स्मित)

हा आणखी एक फोटो

From mayboli

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान ..तूम्ही केलेल्या सर्वच वस्तू खुप आवडीने आणि मनापासून केलेल्या वाटतात.
कसं केलं ते पण सांगाना प्लीज.

प्लोमा धन्यवाद.

तूम्ही केलेल्या सर्वच वस्तू खुप आवडीने आणि मनापासून केलेल्या वाटतात >> खरयं करते मी मनापासुन. यात माझा वेळ छान जातो हे महत्वाचं

मी कशी करायची ते लिहायचा प्रयत्न केलाय पण नाही नीट जमलय सांगायला तेव्हा व्हिडीओची लिन्क च बघा वर दिलेय ती.

किती सुंदर दिसतायत रंगीत गुलाब! तुमची कल्पना फार आवडली.
कापडी असल्याने धुवून स्वच्छ पण ठेवता येतील ना? की तो चिकट डिंक निघून जाईल?

धन्यवाद परत सर्वांना प्रतिसादासाठी.

आशुडी, ही फुलं धुता नाही येणार कारण ती टेप वॉशेबल नाहीये. पण ही करायला वेळ आणि खर्च दोन्ही लागत नाही.
अक्षरशः पाच मिनीटात एक होतं आणि खर्च प्रत्येकी एक रुपाया फक्त. किंवा वापरुन झाली की एका डब्यात ठेऊन द्यायची.

व्हिडियो दिलात ते बरं केलंत, एक्स्प्लनेशन जरा गोंधळून टाकणारं आहे >> पूनम घेतले दिवे. बरोबर आहे काल खरं तर मी रिबीन घेऊन बसले होते कृती लिहीण्यासाठी पण नाही जमलं म्हणून म्हटलं त्या पेक्षा व्हिडीओच बरा आहे.

सॅटिनच्या रिबीनींचे सगळेच रंग खूप सुंदर असतात म्हणून ही फुलं छान दिसतात खरं तर.

लिंक दिल्याबद्दल धन्स ममो.. Happy

आता त्या हेअर क्ल्लिप्स पण ट्राय कर
म्हंजे आपण भेटलो कि (आम्हाला) गिफ्ट मिळेल Wink Proud

पन्नास प्रतिसाद !!! प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
नितीन बरोबर आहे गुलाबी फुलं सर्वात सुंदर दिसतात आणि पीच रंगाची ही तेवढीच सुंदर दिसतात पण ह्यात ती नाहीयेत.
लिंक फॉलो करुन बघा आता अणि फोटो डकवा इथे.

ममो..केक सोबतचा प्रचि अप्रतिम ..
मीपन करणार आता भाची साठी .. जाम खुष होऊन जाणार लेकरु .. आणि मी तशी पन आवडती मावशी आणखी लाडाची होणार तिच्या ... आहा.. आणतेच आता रिबीन .. माझ्याकडे आहेत पण कमी जाडीच्या आहे.. त्या हव तसा इफेक्ट नै न देऊ शकणार ? Sad

थँक्स सर्वाना परत एकदा. तुमच्या प्रतिसादांमुळे मला फार छान वाटतयं.
टीने, पाऊण इंच रुंदीची रिबीन घे. ती फोल्ड करायला पर्फेक्ट पडते. केलीस की फोटो टाक इथे.

यिप्पी.. जमले गं जमले .. aha.gif

ये भाची के वास्ते.. हेअरपिन Wink .. जाम खुश होणार ती .. आणि म्हणुन मीपन ..
(हे सर्वात पहिल फुल बर का ममो .. काल रात्री पावसात जॅकेट घालुन बाहेर पडली रिबीन आणायला.. पाकृ मधल लायटर काही भेटल नाही.. अस्सा राग आला न त्या दुकानदाराचा.. वरुन लुक असा देतोय कि मी फुकायसाठी मागतेय.. काय एकएक लोकं असतात म्हणून सांगु.. तर मग म्हटल चला सुरुवात करुया पण काही जमल नै मनासारख म्हणुन दिल ठेवुन तसच.. आज परत तुझ्या नावाचा जप करत सुरु केला प्रोग्राम तर जमल ना Lol
आज मै उपर आसमां नीचे झाल न मला.. )

mamo satin flowers (1).jpg

आणि हे सर्व तुला dedicate करतेय मी .. रंग इन मीन चारच मिळाले म्हणुन एवढ्यावरच निभावल.. हिरवा पन नै मिळाला म्हणुन जवळ जो होता नेट चा तोच वापरला ..

mamo satin flowers (2).jpg

काय पण गर्व वगैरे होतोय मला.. चक्क कधी न जमणारी फुल मी बर्‍यापैकी फुलांसारखी दिसणारी केलीय मी तयार.. व्वा व्वा.. शाब्बास टीना.. ५०ग्रॅम वाढली मी गर्वान फुगुन Wink

अरे व्वा..... कस्ली मस्त केली आहेत... झकास... Happy आवडली. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
आता करुनच बघावी लागणार Proud (यू ट्युब दिसत नाही इथुन सबब वाचलेली कृतीच लक्षात ठेवावी लागेल)

limbutimbu , धन्यवाद..
ममो म्हणते ते खरच आहे.. एकदा का जमली तर वेड लागत त्याच.. मग त्या एका फुलाचा पाहता पाहता गुच्छ तयार होतो Wink

Pages