सॅटीनच्या रिबीनीची फुलं ( बदलून)

Submitted by मनीमोहोर on 21 June, 2015 - 12:59

काही दिवसांपूर्वी मुलीकडे गेले होते. तिच्या कडे देवपूजेसाठी फुलं मिळत नाहीत आपल्याकडे मिळतात तशी. बुके मधली फुल देवाना वहायला योग्य वाटत नाहीत आणि रोज तसे करणे परवडणारे ही नाही. फुलांशिवाय देव बघणे बरे वाटत नाही. काय करता येईल म्हणून मी विचार करत होते तर नेट वर बघुन ही सॅटीनच्या रिबीनीची फुलं केली आहेत. अगदी सोपी आहेत. देठाला सेल्फ अ‍ॅडहेसिव हिरवी टेप गुंडाळली आहे आणि पानं ही त्याच टेप पासून बनवली आहेत. आकाराने छोटी असल्याने देव्हार्‍यात ठीक्क बसतात आणि आकर्षक रंगांमुळे देव्हारा ही छान दिसतो. दर आठ पंधरा दिवसानी बदलुन बदलुन घालता येतात.
याशिवाय कुठे ही ऐन वेळेला सजावटी साठी उपयोगी पडतात जसे ताटाभोवती महिरप म्हणून केक च्या बाजुला सजावट म्हणून. फुलाला टुथ पिक चे देठ करुन छान बुके ही करता येतो. एखाद छोटसं फुल गिफ्ट द्यायच्या पाकिटाला लावून पाकीट सुंदर बनवता येतं.

हा त्याचा फोटो

From mayboli

ही फुलं कशी केली त्याची ही लिंक.

https://www.youtube.com/watch?v=7ZkXi0WtYc8

आता कृती ही लिहीते.

पाऊण इंच रुंद रिबीनीचा १५ इंच लांब तुकडा घ्यावा.
दोन इंचावर ती रिबीन ९० अंशावर दुमडावी आणि थोडी गोल गोल गुंडाळावी जेणे करुन गुलाबाच्या आतला भाग तयार होईल. तो झाला की रिबीन पाकळ्यांसाठी अर्धी फोल्ड करुन गुंडाळत जावे रिबीन संपेपर्यंत. फुल न सुटण्यासाठी खाली दोरा बांधावा. (लिहीलीय मी कृती पण नाही जमलय मला नीट लिहायला तेव्हा विडिओच पहा आणि करा. )

मध्यंतरी मी अशी खूप फुल केली कुणा कुणाला देण्यासाठी. शेवटी त्या दुकानदाराने विचारली की फुल बनवण्याचा तुमचा व्यवसाय आहे का ? ( स्मित)

हा आणखी एक फोटो

From mayboli

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीने , ठांकू बर का !

मी आणि मैत्रीण , आपापल्या घरी गणपतीचे डेकोरेशन करतो - त्यामुळे आषाढ श्र्रावणापसून विचारांची देवाण घेवाण चलू होते ते पार दिवाळीच्या कंदीलापर्यन्त .

तिला दाखवली तु केलेली फुलं आणि तु पाठवलेली लिंक , आणि तीच ही हेच मत पडलं - माझ्यासारखं - की तुझी फुल त्या व्हिडिओतल्या फुलांपेक्शा गोड दिसतायेत . मस्तच .

गेल्यावर्शी मी कागदी जास्वदीची फुलं बनवली होती - पाच गणपतींसाठी.
यावेळेला अशी गुलाबाची बनवावी का हा विचार करतेय .

वेळ मिळाला पाहिजे - खरतरं त्यापेक्शा जास्त - मूड लागला पाहिजे - मग वेळ काढता येतो Happy . बघुया कितपत जमतयं ते .

स्वस्ति, तु पण ना Wink
यावेळेला अशी गुलाबाची बनवावी का हा विचार करतेय .
वेळ मिळाला पाहिजे - खरतरं त्यापेक्शा जास्त - मूड लागला पाहिजे - मग वेळ काढता येतो>> माझा पन हाच प्रॉब्लेम आहे..

अश्विनी के, तिला फुल केलीय न मी अर्पण..तिन मागावा हा बेल्ट पन देते ..

सायली, रीया..ठांकु

Pages