सॅटीनच्या रिबीनीची फुलं ( बदलून)

Submitted by मनीमोहोर on 21 June, 2015 - 12:59

काही दिवसांपूर्वी मुलीकडे गेले होते. तिच्या कडे देवपूजेसाठी फुलं मिळत नाहीत आपल्याकडे मिळतात तशी. बुके मधली फुल देवाना वहायला योग्य वाटत नाहीत आणि रोज तसे करणे परवडणारे ही नाही. फुलांशिवाय देव बघणे बरे वाटत नाही. काय करता येईल म्हणून मी विचार करत होते तर नेट वर बघुन ही सॅटीनच्या रिबीनीची फुलं केली आहेत. अगदी सोपी आहेत. देठाला सेल्फ अ‍ॅडहेसिव हिरवी टेप गुंडाळली आहे आणि पानं ही त्याच टेप पासून बनवली आहेत. आकाराने छोटी असल्याने देव्हार्‍यात ठीक्क बसतात आणि आकर्षक रंगांमुळे देव्हारा ही छान दिसतो. दर आठ पंधरा दिवसानी बदलुन बदलुन घालता येतात.
याशिवाय कुठे ही ऐन वेळेला सजावटी साठी उपयोगी पडतात जसे ताटाभोवती महिरप म्हणून केक च्या बाजुला सजावट म्हणून. फुलाला टुथ पिक चे देठ करुन छान बुके ही करता येतो. एखाद छोटसं फुल गिफ्ट द्यायच्या पाकिटाला लावून पाकीट सुंदर बनवता येतं.

हा त्याचा फोटो

From mayboli

ही फुलं कशी केली त्याची ही लिंक.

https://www.youtube.com/watch?v=7ZkXi0WtYc8

आता कृती ही लिहीते.

पाऊण इंच रुंद रिबीनीचा १५ इंच लांब तुकडा घ्यावा.
दोन इंचावर ती रिबीन ९० अंशावर दुमडावी आणि थोडी गोल गोल गुंडाळावी जेणे करुन गुलाबाच्या आतला भाग तयार होईल. तो झाला की रिबीन पाकळ्यांसाठी अर्धी फोल्ड करुन गुंडाळत जावे रिबीन संपेपर्यंत. फुल न सुटण्यासाठी खाली दोरा बांधावा. (लिहीलीय मी कृती पण नाही जमलय मला नीट लिहायला तेव्हा विडिओच पहा आणि करा. )

मध्यंतरी मी अशी खूप फुल केली कुणा कुणाला देण्यासाठी. शेवटी त्या दुकानदाराने विचारली की फुल बनवण्याचा तुमचा व्यवसाय आहे का ? ( स्मित)

हा आणखी एक फोटो

From mayboli

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना, किती छान वाटतयं ग तुझी फुलं पाहुन. खूप सुंदर दिसतायत. पाहिली ऑफिस मध्येच पण तेव्हा लिहायला वेळ नाही झाला. व्हिडीओ बघुन आपली आपण केली की खूप आनंद होतो. मला जरा कठीण जातं व्हीडीओ फॉलो करायला कारण मी डावरी आहे. आणि व्हिडीओ सगळे उजव्यांचे असतात. पण त्याची ही सवय झालीय आता.

गुरुसे चेला सवाई असं झालय. तु केलेली फुलं मी केलेल्यांहुन अधिक सुंदर झाली आहेत.

हो तु लिहीलयसं तसा नाद लागतो ही करायचा खरं आहे अगदी. मी सगळ्या परदेशी रहाणार्‍या ओळखीतल्या मुलींना डबा डबा करुन दिली आहेत. ( स्मित)

तु तर माझ्या पेक्षा अधिक टॅलंटेड आहेस तु ह्यांचा नक्कीच अधिक कल्पकतेने उपयोग करशील.

गुरुसे चेला सवाई असं झालय. तु केलेली फुलं मी केलेल्यांहुन अधिक सुंदर झाली आहेत. >> बापरे ममो प्लीजच..
मी केलेली फुल मोठ्ठाली झालीय आणि तु केलेली नीट अ‍ॅण्ड क्लीन.. मला तुझीच जास्त आवडलीय.. मी करते आणखी सराव मग बर्‍यापैकी जमायला लागतील मला.. जे केलय ते फुलांसारख दिसतय यातच जास्त मज्जा येतेय मला Wink

>>>> मी सगळ्या परदेशी रहाणार्‍या ओळखीतल्या मुलींना डबा डबा करुन दिली आहेत. ( स्मित) <<<<
काऽऽश... आप पूना मे रहती होती..... बाकी कै नै.... मी लग्गेच रिकामा डबा घेऊन आलो असतो Proud
हरकत नाही, वविला येणार असाल तर घेऊन या डबाभर फुले... Happy त्यावर आपण अत्तर लावुन सुवासिक करु अन वाटू सगळ्यांना.

धन्यवाद सर्वांना..
limbutimbu.. तुमच्या पाठीमागे मी उभी असती लाईन लावुन Lol

लिंबुभाऊ आयडिया मस्त आहे. आले ववि ला तर घेऊन येईन.़कोणीतरी हवी आहेत असं सांगितल की करण जस्टीफाय होतं ( स्मित)

टीना, आता तुला काय गरज ? तु किती मस्त करते आहेस.

ममोनं शिकवलेले हे फुल तयार करत असताना जालावर आणखी काही वेगवेगळे प्रकार बघायला शिकायला मिळाले.
त्यातला एक प्रकार भलताच आवडला..सोप्पा आहे खरा पण वेळ्खाऊ आहे वरील प्रकारापेक्षा..
याचं फायनल प्रोडक्ट खुप क्युट आहे म्हणून प्रयत्न करुन पाहिला..
ममोची ची परवानगी घेऊन टाकयेत इथं..

हि त्याची पाकृ : https://www.youtube.com/watch?v=3dBusZZq8jU

त्यात दिड इंच जाडीची रिबीन घेतलीय.. पण माझ्याजवळ १ इंचाचीच होती मग म्हटल चला पहिलंपेढाच आहे तर छोट्या रिबीनीवर ट्राय कराव..

हा प्रचि :

WP_20150625_13_59_16_Pro-001.jpg

टीना, तू क्विलिंग करतेस ना , तर या रिबीनच्या पद्धतीनेच पण क्विलींग पेपर आणि क्विलिंग टूल वापरून मस्तं गुलाब होतात.
एकदा ते ही (अजून केले नसल्यास) करून बघ.

आणि रिबीनीची टोके जाळायला लायटरच हवा असे नाही.
मेणबत्तीवर पण जाळून सील करू शकतेस.
Wink

आणि रिबीनीची टोके जाळायला लायटरच हवा असे नाही.
मेणबत्तीवर पण जाळून सील करू शकतेस. >> साती .. मसाला तोच पाहिजे ग पाकृ मधे नै त टेस्ट १९ २० होते Lol
तसपन सद्ध्या मेणबत्ती वरच भागवन चाल्लय..पण त्या सोबत गरम मेणाचा चटका.. फेंट रंगाच्या सॅटीन रिबीन्स काजळीमुळे काळ्या होणे वगैरे प्रकार एक के साथ एक मुफ्त मुफ्त मुफ्त अस चाल्लय म्हणून लायटर Wink
तसा असायचा नेहमी पण नेमक आता नाही जवळ आणि काम पडल म्हणुन जरा आग्गाऊ नखरे चाल्लेय Proud

क्विलींग साठी १०मिमी जाड पेपर लागेल ना? आणावा लागेल .. माझ्या कडे पुर्ण बॉक्स भरुन आहेत त्या ३मिमी च्या पट्ट्या पण १०मिमी च्या नाहीत..मुळात फुल मला जमलेच नाही कधी यापूर्वी पण थँक्स टू ममो.. Happy

निधि, वर्षू धन्यवाद Happy

हा आजचा राडा Wink .. ममो बघ गं ..

WP_20150625_19_10_52_Pro-001.jpg

टीना, फोटो ऑफिसमद्येच बघितले होते पण आत्ता प्रतिसाद देतेय.

टीना, काय मस्त केली आहेस ग. ती नवीन तर्‍हेची ही छानच दिसतायत. जरा कॉम्पीक्लेटेड आहे कृती पण व्हिडेओ क्लीअर आहे त्यामुळे जमेल. करुन बघते. लि़ंक दिलीस ते छान केलस.

किती ग केलीस एका दिवसात!!! नाद लागला ना ( स्मित ) सुंदरच दिसतायत. बा द वे काळे आणि निळे गुलाब ही सुपर्ब दिसतायत हं

परत परत येऊन फोटो बघतेय. जस्ट लविन इट !!

सहीयेत, लग्नाची गाडी सजावयलाही चालतील..

अवांतर - मला पहिला वाटले आपणच आहात त्या विडिओमध्ये..

काळे आणि निळे गुलाब ही सुपर्ब दिसतायत हं >> ममो त्या दोन रंगांबद्दल प्लॅन करतेय मी कि एकाचा हेअरबेल्ट करावा आणि दुसर्‍याचं नेकपीस Wink म्हणुनच तयार करुनही ती पान चिटकवली नाही मी .

आणखी ३ ४ नविन रंग मिळालेत मला रिबीन मधे.. त्याचेपन तयार केलेत फुल आणि फोटो सुद्धा काढलाय..पण सारखे सारखे प्रचि काय डकवायचे म्हणुन नाही टाकले Proud

>>>> आले ववि ला तर घेऊन येईन <<<
वविला येच्च...
येताना डबाभर फुले आणच्च...
शिवाय रिबिनीची दोनचार भेंडोळी देखिल आण म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे ते करुन बघतिल्/प्रात्यक्षिक बघतील.

मस्त जमलीत मनीमोहोर आणि टीना.
या गोष्टी करायला कला व आवड असायलाच हवी. एकदा प्रयत्न केला, क्लासला वगैरे जाऊन पण भयंकर प्रकार तयार झाले तेव्हा ही कला व चिकाटी आपल्यात नव्हे म्हणुन नाद सोडुन दिला.

ममो ताई मस्तच . कसली गोडुली दिसतायेत

टीना भन्नाट !

माझ्या चुलत सासुबाई बनवतात अशीच फुलं बर्याच प्रकारची .
त्यांच्या मुलाच्या साखरपूड्याला त्यानी अक्खे दोन बुके बनवले होते गुलाबाचे .
मस्त !

ऋन्मेष,, तुझ्या लग्नाच्या वरातीची गाडी आपण ह्याच फुलांनी सजवु या. ( स्मित)

त्या दोन रंगांबद्दल प्लॅन करतेय मी कि एकाचा हेअरबेल्ट करावा आणि दुसर्‍याचं नेकपीस >> टीना, कसलं क्रिएटिव टॅलंट आहे ग तुझं केलस की फोटो टाक नक्की.

लिंबुभाऊ, येते वविला रिबीनीच भेंडोळं घेऊन. ठेऊ या डेमो. ( स्मित)

चनस, सुनिधी करा ट्राय नक्की जमतील. व्हिडीओ चांगला आहे.

स्वस्ति, धन्स प्रतिसादासाठी.

आणखी एक नविन Happy हे पन हेअरबेल्ट साठी परफेक्ट राहील अस मला वाटतं .. बेल्ट ला लावल्यावरच कळेल म्हणा..
पहिला प्रयत्न असल्याने फिनीशिंग नाही जमल एवढ.. Sad

WP_20150627_10_48_30_Pro.jpg

हा एक नवा प्रकार..

vgewbiurig.jpg

कस बनवायच त्याची लिंक https://www.youtube.com/watch?v=HPGMFMg7pxk
एक शब्द समजेल तर शप्पथ..बघुन निव्वळ शिकली..बहिरे असण्याचा जरासा फिल आला मला Happy ..
२" ची लेस नव्हती माझ्याकडे म्हणुन यात दिलेल्या मापाच्या आधारे १" च्या लेस वर मी प्रयोग केलाय ..

या सॅटीन च्या फुलांच्या प्रेमातच पडलीये मी.. दोघातिघांचे वाढदिवसाचे गिफ्ट्स शिल्लक आहेत..
एक फ्रेम बनवायचा विचार आहे..बघु ती जमते कधी तर..

टीना, तुझे हात-पाय कुठे आहेत ?

दोघातिघांचे वाढदिवसाचे गिफ्ट्स शिल्लक आहेत..>>> तिघा-चौघांचे म्हण , माझा पण या वर्शीचा वादि शिल्लक आहे - दिवाळीनंतर आहे त्यामुळे भरपूर वेळ आहे Wink

Pages