मेडिटरेनिअन सलाद आणी डिप- शाकाहारी

Submitted by वर्षू. on 18 June, 2015 - 07:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हुमुस (डिप) करता

४०० ग्राम उकडलेले छोले
४ टी स्पून ताहिनी ( भारतात सहज मिळते ही तिळाची पेस्ट)
दोन ,तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून
१ टी स्पून मीठ
६ टेबल स्पून एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईल ( मी बरतोली ब्रँड चं वापरलं, भारतात मिळणारा .'फिगारो' ब्रँड पण छान आहे.
३,साडे तीन टी स्पून लिंबाचा रस ( आवडीनुसार)
एक टी स्पून तिखट
कोथिंबीर किंवा पार्सले - बारीक चिरून

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाबा गनुश (डिप) करता

२ भरताची मिडिअम आकाराची वांगी
१/४ कप ताहिनी
१/४ कप लिंबाचा रस ( आवडीनुसार )
३ लसणाच्या कळ्या ठेचून
१/४ टी स्पून जिर्‍याची पूड ( जिरे भाजायचे नाहीयेत)
१/२ टी स्पून मीठ
२ टेबलस्पून पार्सले बारीक चिरून
१ टेबल स्पून ऑलिव्ह ऑईल ( ऐच्छिक- मी नाही वापरलेय)
-----------------------------------------------------------------------------------------------------------

तबुले सलाद करता

२ टेबल स्पून दलिया
१ कप उकळते पाणी
दोन लिंबांचा रस
१/२ टेबल स्पून ऑलिव्ह ऑईल
मीठ ( चवीनुसार)
१ कप बारीक चिरलेला पाती चा कांदा ( पातींसकट)
१ टेबलस्पून बारीक चिरलेली पुदिन्याची पाने
१ कप बारीक चिरलेली पार्सले ची पाने
१ काकडी सोलून, बारीक तुकडे करून
१ कप चेरी टोमॅटो
१ टी स्पून काळी मिरी पावडर

क्रमवार पाककृती: 

हुमुस

थोडेसे उकडलेले छोले वगळून , बाकीचे छोले, लसूण, मीठ, उकडलेल्या छोल्यातील पाणी ( हे बेताने घ्यावे. या डिप ची कंस्टीटंसी श्रीखंडा इतकी दाट असते), ताहिनी एकत्र फूड प्रोसेसर किंवा मिक्सी मधे अगदी बारीक वाटून घ्यावे. मधून मधून ऑलिव्ह ऑईल ही मिसळत राहावे. सर्व मिश्रण एक जीव झाले कि वरून सजावटीकरता वगळलेले छोले , कोथिंबीर / पार्सले , लाल तिखट भुरभुरावे .
पिटा ब्रेड आणी फलाफल वेज कबाब बरोबर हे डिप अप्रतिम लागते.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाबा गनुश डिप

वांगी छानपैकी भाजून, सालं काढून , काट्याने मॅश करा. थोडं टेक्शचर राहू द्या. थोडक्यात पार भरीत करू नका .
Proud . हे सर्व होईस्तोवर एका काचेच्या बोल मधे ताहिनी, लिंबाचा रस, मीठ, लसूण ,जिरेपूड एकत्र नीट मिसळून ठेवा. असे केल्यास त्यांचा स्वाद , सुगंध छानपैकी उतरेल डिप मधे. आता मॅश केली वांगी मिसळा.
हलक्या हाताने एकत्र करा. बारीक चिरलेली पार्सले वर सजवा . हवे असल्यास वरून ऑलिव्ह ऑईल स्प्रिंकल करा.

पिटा ब्रेड बरोबर सर्व करा.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तबुले सलाद

पाण्याला उकळी आली कि गॅस बंद करा. यात दलिया, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑईल आणी मीठ घालून एक तासभर झाकून ठेवा.
चेरी टॉमेटो दोन भागात चिरून घ्या, टोमॅटो, पार्सले, पुदिना, पातीचे कांदे, काकडी,मीठ्,मिरपूड, सर्व पाणी काढून
घट्ट पिळलेला दलिया सर्व एकत्र करा.
तबुले तयार आहे. मात्र संध्याकाळी खायचा असेल तर सकाळीच करून फ्रिज मधे ठेवा. त्याचा स्वाद अजूनच वाढेल.

वाढणी/प्रमाण: 
तिन्ही डिशेस केल्या तर बर्‍याच जणांना पुरेल ..
अधिक टिपा: 

मेडिटरेनिअन डिप्स आणी सलाद करून काही तासांनतरच सर्व करावे. त्यांचा स्वाद मुरायला जरा वेळ लागतो.
लिंबाच्या रसाचे प्रमाण आवडीनुसार घ्यावे. लेबनीज रेस्टॉरेंट्स मधे मिळणारे तबुला सलाद फारच आंबट असते, म्हणून मलातरी आवडत नाही.
ऑलिव्ह ऑईल, आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेता येईल..

माहितीचा स्रोत: 
लेबनीज मैत्रीणी आणी नेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश.. Lol

आता जर नॉन वेज वाल्यांनी ऑप्शन विचारलं तर उनको क्या जवाब दूँ Happy

अरी वा सायो.. हे ऑपशन ध्यानात नव्हतं आलं... ह्म्म्म छानच लागेल आलूपराठ्या बरोबर Happy

मस्त! नक्की करून बघणार.
आणि वर्षू मी ताहिनी पेस्ट घरीच केली होती. हमस(आम्ही हमसच म्हणतो.)साठी तीळ भाजून घेतले. आधी कोरडेच फिरवले मिक्सरमधून नंतर थोडं थोडं पाणी घालत गेले.
हे तबुले(बबुले :फिदी:) पहिल्यांदाच ऐकतेय. तरी करीनच. दलियाचा छान वापर आहे.
आणि ते चेरी टोमॅटो आमच्या नगरात नाय बॉ मिळणार. साधेच वापरीन.

मस्त. हमस आणि बाबा गनूश दोन्ही फारच आवडते.
पुण्याच्या मरकेश मध्ये गरमागरम झत्तार नान मिळतात त्याबरोबर ही दोन्ही डिप्स खाणे म्हणजे आहाहा मोमेंट Happy

वॉव.. मानुषी.. घरीच बनवलीस ताहिनी.. अ‍ॅक्चुली सोपीये रेसिपी पण इतकी गुळगुळीत , स्मूथ होईल कि नाही अशी शंका आली म्हणून विकतच आणली Happy

अगो.. क्या याद दिलाई तूने... झत्तार मसाला स्प्रिंकल केलेले नान म्हंजे ..आहाहा..

कुणी दुबई हून येत असल्यास झत्तार मसाला मागवायचा नाहीतर घरी सुद्धा अतिशय छान होतो हा मसाला...

मानु.. मोठ्या टॉमेटो ज ना छोट्टुकलच, फळांचे लहान लहान डेकोरेटिव्ह गोळे कोरायचा स्कूप वापर..

मस्त रेसिपी नि फोटो! Happy
उसगाव ऑफिस पार्टीत पहिल्यांदा हमस बघितलं .. नावावरुन नॉन व्हेज वाटायचं मला.. तेव्हा एका मॅनेजरने रेसिपी सांगितली.. मगच खाल्लं मी Proud

फारच मस्तं....
तो शेवटचा पदार्थ तर मी ऐकलाही नव्हता. नवीनच छान पदार्थ कळला.....
फोटो पण एक नंबर!

वा, मस्त रेसिपीज.

हमस मी एरवीही करते. बाबा गनुश आणि तबुले सलाड करुन बघणार. दलियाच्या रेसिपीज अनिटाइम वेलकम.

वर्षू झत्तार मसाल्याची घरगुती रेसिपी सांग ना.

मस्त पाकृ, बाबागनुश बनवायचं आहे एक्दा.
माझ्याकडे खुप झत्तार मसाला आहे, एक्दा चिकन बार्बेक्यु बन्वलेलं पण अजून ही भरपूर आहे, काय करता येईल अजून?

झत्तार मसाल्याची घरगुती रेसिपी..

dried thyme,oregano and toasted sesame seeds ,two tablespoon each with one tablespoon of crushed sumac ( replace sumac with हळिव , in india), lightly roast and crush dried mint leaves, dried basil leaves ,dried kothimbir leaves and dried green chilli powder.all mix together .add salt.
zattar is ready..

वर्षू, मस्त. थॅन्क्स. झत्तारकरता बाकी सगळं आहे फक्त पुदीना, कोथिंबीर, बेसिलची पूड करायला ती खडखडीत वाळवायला मुंबईत सध्या स्कोप नाही. पाने कोरडी शेकवून घेतली तर स्वाद टिकेल का? तसं असेल तर लगेच करतेच.

काल मुलीने फॅब इं. मधून बाबा गनुश डीप आणलेय. मस्तच आहे. फक्त ते तू लिहिलेस तसं टेक्स्चर्ड नाही. अगदी गुळगुळीत आहे.

Pages