अमेरीका टुर

Submitted by madevi on 21 April, 2015 - 05:51

आम्हाला २१ दिवसाची अमेरीका टुर करायची आहे.मला जाणकार लोकाकडुन माहिती ह्वी आहे.
१) २१ दिवस पुरतील का?
२) महत्वाची स्थळे (नेट वर माहिती मिळेल पण इथे अगदि खरी माहिती मिळ्ते)
३) सगळ्यात महत्वाचे टुर पॅकेज घ्यावे का स्वत; करावी.( इथेच गाड आडतय)
४) लहान मुले आहेत दोन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यल्लोस्टोन मध्ये कॅंपींग करण्यासाठी लागणारे गिअर्स (टेंट इ) तिथेच भाड्याने मिळतात का? विमान प्रवासात कॅंपींग साहित्य कसे न्यायचे हे कळत नाही.

सिंडरेला :
बापरे !! पण तो व्हिडीयो दिसत नाहिये मला...ट्राय अगेनचा एरर येतोय.

च्याटमचाट :
हो भाड्याने मिळत सगळं साहित्य. RV किंवा कॅपिंग ट्रेलरचा पण ऑप्शन चांगला आहे.
मी विमान प्रवासात एक मोठी बॅग चेक ईन केली होती, त्यात सगळं साहित्य मावलं. (टेंट, स्लिपिंग बॅग्स, चादरी ई)
कॅम्प मध्ये जेवण करण्यात बराच वेळ जाणार असल्याने आम्ही बाहेरचं जेवायचो.

बेअर स्प्रे : जर हायकिंक करणार असाल तर, बेअर स्प्रे आवर्जुन विकत घ्या, आणि प्रत्येका साठी एक. जिथे जालं तिथे बरोबर थेवा. लहान मुलं असतील तर त्यांना देउ नका. Safety Frist !!

तिकडे AT&T आणि T मोबाईला नेटवर्क मिळत नाही, verizon काही थिकाणी मिलतं नेटवर्क.

अवांतर :
माझ्या गाडी समोर ग्रिझली आला होता. त्यांचा श्वासोस्वास एकू येत होता ईतक्या जवळं !! गाडीच्या खिडकी पाशी येउन परत गेला, नशिब बलव्व्तर !!

खिडकी जवळ आला होता तेव्हा त्यांचा व्हिडीयो काढत होता , फोटो असता तर टाकला असता... तो व्हिडीयो जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा अंगावर काटा येतो. हा त्यांच बेअरचा फोटो.

TCS_4243-Edit.jpg

तन्मय, एक मदर बेअर आणि तिची ३ पिल्ल पार्कमध्ये आलेल्या लोकांच्या मागे लागली होती.

http://rt.com/usa/257649-black-bears-tourists-yellowstone/ इथे आहे विडिओ.

अस्वल आल्यास हात वर करून मोठ्यानं आरडाओरडा करायचा आणि त्याच्या दिशेने (असल्यास आणि सुचल्यास) छत्री उघडायची असं ऐकलं आहे.

Yellowstone is beautiful and more than just an experience, but kindly re-think, if you are smell-sensitive! Sulfer chya vasane Doka uThala hota.
But I'd strongly recommend Grand Tetons. If you are nature lover then do consider getting a cabin in the woods or camping.

सिंडरेला, थॅक्स !
जबरी व्हिडीयो आहे, बिचार्या प्राण्यांना प्रायवसीच राहिली नाही Sad

सिंड्रेला आणी तन्मय..

तुमचे बरोबर आहे.. यलोस्टोनच काय पण कुठल्याही नॅशनल पार्कमधे वन्य प्राणी मनसोक्त भटकत असतात. टुरिस्ट लोकांनी हे भान ठेवले पाहीजे की ते वन्य पशु आहेत व त्यांना डिस्टर्ब न करता सेफ डिस्टंस ठेवुन तिथले निसर्ग सौंदर्य एंजॉय करायचे असते. आजच बातमी वाचली की यलोस्टोन पार्कमधे ओल्ड फेथफुल गैझर जवळ एका कोरिअन मुलीला बायसनने जबर जखमी केले.. त्याच्या जवळुन फोटो काढुन घ्यायच्या नादात! खरच निव्वळ मुर्खपणा!

तसेच २ वर्षापुर्वी एका भारतिय टुरिस्ट फॅमिलीमधली एक ८ वर्षाच्या मुलीचा ग्रँड कॅनिअन ऑफ यलोस्टोन मधे खाली पडुन मृत्यु झाला. कठडा पार करुन वाकायला गेली!

तसेच योसेमटी नॅशनल पार्कमधे दर वर्षी १२ ते १५ लोक व्हर्नल फॉल किंवा इतर फॉलच्या अगदी जवळ कठडा पार करुन जातात व मर्सिड नदीच्या प्रवाहात पडुन मरतात.

ही नॅशनल पार्क्स अतिशय सुंदर आहेत्.... प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ती बघावी अश्या मताचा मी आहे. पण ती बघताना कॉमन सेंस जर वापरला नाही तर अस्वले, बायसन ,मूस,दर्‍या किंवा धबधबे बघताना म्रुत्यु येउ शकतो.

पण म्हणुन इतर कॉमन सेंस असलेल्या लोकांनी तिथे जाउच नये असे म्हणणे चुकीचे ठरेल.

रायगड व धनि.... तुमची रिक्शा वाचली. छान लिहीले आहे पण धनिने अगदीच थोडक्यात आटोपले..:)

सशल ..बरोबर आहे.. डस्क च्या सुमारास जर लेक्स च्या आजुबाजुला गेलीस की डासांचा त्रास खुप असतो.. पण सकाळी सकाळी व दिवसा सहसा डासांचा त्रास होत नाही तरीही वन्य जागी बग स्प्रे घेउन जाणे इष्ट!

बर.. मादेवींची २१ दिवसांची टुर झाली का करुन? त्यांचे २१ दिवसात काय काय करुन झाले हे वाचायला मी उत्सुक आहे!:)

काल पाहूणे चायनीज ट्रीप करून आले. बस चांगली होती (१० पैकी ८ मार्क). प्रवास चांगला झाला. काही ठळक गोष्टी
१. कुठे थांबायला फारसा वेळ मिळत नाही ( हे सगळ्या टूर कंपन्यांबरोबर होते).
२. जबरदस्ती टीप मागतात आणि द्यावीच लागते (त्रास आहे).
३. जेवणाला चायनीज हाटेलात नेतात (आमच्याकडे हे चालतं).
४. प्रत्येक ठिकाणची तिकीटं स्वतः काढावी लागतात (समजण्यासारखं आहे) त्यामुळे बरीच कॅश न्यावी लागते.
५. ब्रेकफास्टसाठी वेळ ठेवत नाहीत (बरोबर खाऊ घेऊन जाणे उत्तम).
६.बाथरूम ब्रेक्स घेत नाहीत.. (बरोबर सिनियर मंडळी असल्यास त्रास). पण विनंती केल्यास थांबतात...

मी अजुन गेले नाहिये. माहिती खुप छान मिळतेय.
यलोस्टोनला ओल्ड फेथफुल, कॉनियन्,ममॉथ एवढच बघायचा विचार आहे.(वेळेअभावी).

अजुन एक माहिती हवी होती.
lv to sof to la असे बाय रोड जाणे जमण्यासारखे आहे का?
सीटीत कार चालवणे सोपे पडेल का?

मॅमथ सुरू आहे का ती चौकशी करा. नाही तर उगिच खुप ड्राईव्ह करून फार काही पाहिले नाही असे वाटते, मग त्या पेक्षा ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग आणि लेक ला जास्ती वेळ द्यावा असा माझा सल्ला आहे.

मॅमथ सुरू आहे का ती चौकशी करा. नाही तर उगिच खुप ड्राईव्ह करून फार काही पाहिले नाही असे वाटते, मग त्या पेक्षा ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग आणि लेक ला जास्ती वेळ द्यावा असा माझा सल्ला आहे.

lv to sof to la असे बाय रोड जाणे जमण्यासारखे आहे का? LAS-SFO-LA<<< हो आहे... पण वेळ आणि खर्च पहाता असं करू नये. ३००/३५० मैल गाडी चालवायला भरपूर वेळ आणि पेट्रोलचा खर्च लागतो... त्यापेक्षा Multicity तिकीट घेतलेत तर त्रास वाचेल. शहरात गाडी चालवायची असेल तर भाड्याने मिळतात आणि भरपूर सोई आहेत.

आम्ही ८ दिवस यलोस्टोन आणि टिटन ट्रिप ठरवत आहे. आमच्या बरोबर मुलगी आणि आई बाबा पण असणार आहेत. हाईक वैगरे करणे त्यामुळे शक्य नाहिये.
इथे वाचुन बरीच माहिती मिळाली आहे. पण नेट वर तिथली सफारी टुर दिसली त्याबद्द्दल ट्रिप अ‍ॅडव्हाइजर वर प्रतिक्रिया पण चांगल्या दिसल्या. तुमच्या पैकी कोणी केली आहे का? असेल तर माहिती मिळेल का?

आणि ४ दिवस पार्क मध्ये बुकिंग मिळाल आहे, तिथे रुम मध्ये फ्रिज, मायक्रो काही नाहिये. त्यामुळे बरोबर जास्त काही नेता येणार नाही. तर आत किंवा लागल तर वेस्ट यलोस्टोन ला शाकाहारी पदार्थ मिळतात का? आमच्या पैकी कुणीच मांसाहारी नाही. (कोरडे पदार्थ बरोबर ठेवणार आहेच)

राईस कुकर, तांदूळ, लोणचे, पुलिओगरे मसाला ठेवा बरोबर. आमच्या बरोबर चे एक कुटूंब ही आयड्या करायचे घरचे जेवण मिळावे म्हणून.

यलोस्टोन आणि टिटान च्या सगळ्या लॉजेस च्या कॅफे मध्ये व्हेजी जेवण मिळतं .. तिथे मिळणारी व्हेजी चिली तर मस्तच असते .. (अर्थात जे आणि जशा चवीचं व्हेजी जेवण मिळेल ते गोड (की मसालेदार? :)) मानून जेवायची तयारी हवी)

हा २०११ च्या ट्रिप मधला अनुभव आहे ..

व्हेज जेवण मि ळेल पण भर समरात तिथे असलेल्या प्रचंड गर्दी मुळे रेस्टॉरंटस मध्ये बराच वेट टाईम असायचा. शिवाय ठायी- ठायी रेस्टॉरंटस नाहीयेत. लांबवर आहेत. ति. मी. च्या पुर्‍या, कोरडी चट णी ई. बरोबर ठेवा. राईस कूकर, तांदूळ आणि तयार भाज्या, डाळ ई. चे पॅक - जे गरम पाण्यात ठेवून, ओपन करून खाता येतील असे बरोबर ठेवायची कल्पना देखील चांगली आहे - रात्रीच्या जेवणाची सोय होऊ शकते.

मिळंत व्हे़ज पण ४-५ प्रकार...सॅलेड, पास्ता, पिझा, स्मॅश पोट्येटो...
कॅफे मध्ये सब-वे सारख व्हेज सॅडविच मिळंत... माझा रोजचां ब्रेकफास्ट होता हे सॅडविच Happy
ईतर वेळेस फळं... भरपुर केळी, संत्री आणी सफचंद नेली होती.

यलोस्टोनमध्ये व्हेजी जेवणाचे ऑप्शन्स बरेच कमी असतात. दोन तीन दिवसांनी तेच तेच खाऊन कंटाळा येतो.
कोरडा खाऊ आणि फळं बरोबर ठेऊ शकता, रूममध्ये काही करता येणार नाही.

आमचे टूरकर काल रात्री परत आले. त्यांना खूप खूप आवडलेल्या गोष्टी...
लास वेगासः
. Luxor Hotel
. वेगासहून CanyonTours.com वर घेतलेली West Rim Tour with Helicopter & boat ride included.
लॉस एंजलिसः
. DisneyLand Visit
. StarlineTour - LA दाखवायला केलेली बस टूर.. त्या टूरचा एक थांबा विमानतळाजवळ (LAX) आहे.

सान फँसिस्को:
. SF Comprehensive Tours - तर्फे घेतलेली नापा टूर.
. शहर पहाण्यासाठी घेतलेली BigbusTour
.Holiday Inn Fisherman's Wharf मध्यवर्ती असल्याने खाण्यापिण्या जवळ आणि फिरणार्‍यानाही सोप्पे.

सगळी आरक्षणे घरी बसून केली होती. आणि ती प्रवाश्यांना छापून हातात दिली होती.

वा मस्तच गोगा
आम्ही पण इथुनच बुक करतोय लोकल टुर्स.
फक्त वेस्ट कोस्टला मल्टीसिटी का बाय रोड इथे थोड कनफ्युजन आहे.
sfo la ३ १/२ दिवस पुरतील का?

योसोमिटी (१ दिवस)
सीटी टुर आणि १७ कोस्ट माइल
बे क्रुझ

योसेमिटीला एक दिवस जर कोणी बस ने नेणार असेल तर ठीक आहे. नाहीतर टाईट होईल. स्वतः गाडी चालवणार असाल तर पहिल्या दिवशी दुपारपर्यंत पोहोचून दुसर्‍या दिवशी दुपारी निघणे जास्त चांगले.

सॅफ्रा शहरातील ठळक गोष्टी एका दिवसात बघून होतील जर सकाळी लौकर गेलात तर. बे क्रुझ सकट.

१७ माईल ड्राइव्ह तेथून बराच लांब आहे, त्यामुळे तो वेगळ्या दिवशी करा. तेथेच माँटरे चा भाग आहे, पण सॅन फ्रा चा फिशरमन व्हार्फ जर बघितला तर हा पुन्हा नाही बघितला तरी चालेल. बरोबर लहान मुले असतील व त्यांनी आधी एखादे मोठे अ‍ॅक्वेरियम बघितले नसेल तर ३-४ तास त्याकरता ठेवा.

लास वेगास-एल ए-सॅ फ्रा हा प्रवास खूप मोठा आहे. बरोबर मुले असतील तर कंटाळवाणा होउ शकतो. त्यात आता बाहेर प्रचंड गरम असते. त्यातल्या त्यात एल ए वरून सॅफ्रा कडे येताना हायवे-५ (इंटरस्टेट) ने न येता हायवे-१०१ ने आलात तर वाटेत सीनरी चांगली आहे. मात्र "५" ने लौकर पोहोचाल.

अमेरिकेत किंवा उजवीकडून ड्रायविंग असलेल्या देशात कार चालवण्याचा अनुभव आहे का?

योसेमिटी १ डे टूर बसने.
आणि खुप विचार करुन मल्टीसिटी ऑप्शन ठरवतोय.
उजवीकडूनच ड्रायविंगचा अनुभव आहे.
अजुन एक वाजवी दरात, योग्य ठीकाणी (मध्यवर्ती) कुठली हॉटेल्स सांगीतलीत तर खुप मदत होइल.
लास वेगास्, सान फ्रॅनसिसको, बफेलो, न्युयार्क, आणि डिस्ने वर्ल्ड ला आत काही चांगले हॉटेल्स सुचवा प्लीजच

खुप प्रश्न विचारतेय का?
पण जे टुर करुन आलेत किंवा तिथे राहतात ते लोक योग्य ती माहिती देऊ शकतात. आता अजुन काही प्रश्न आहेत.

अमेरीकन एकस्टेंडेड स्टे
ग्रे लाइन टूर्स
व्हिजीट व्हिसा डिसकांऊट कुपन्स (फ्लाईट्स साठी असणारी)
ह्याबद्द्ल काही माहिती मिळेल का?

डिस्ने वर्ल्ड = डिस्नेची स्वतःची होटेल्स (तिकडे हॉटेलवरून न्यायला आणायला बस असतात).
सा. फ्रा. - वरती सांगितले आहे पण साफ्रामधे होटेल महाग आहेत.
लॉ. ए. - वरती सांगितले आहेच. पण विमानतळाजवळ बरीच चांगली आणि वाजवी होटेल आहेत. (भाड्याच्या गाड्याही योग्य भावात मिळतात).

Pages