अमेरीका टुर

Submitted by madevi on 21 April, 2015 - 05:51

आम्हाला २१ दिवसाची अमेरीका टुर करायची आहे.मला जाणकार लोकाकडुन माहिती ह्वी आहे.
१) २१ दिवस पुरतील का?
२) महत्वाची स्थळे (नेट वर माहिती मिळेल पण इथे अगदि खरी माहिती मिळ्ते)
३) सगळ्यात महत्वाचे टुर पॅकेज घ्यावे का स्वत; करावी.( इथेच गाड आडतय)
४) लहान मुले आहेत दोन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान माहिती मिळतेय.
मोकीमी तुम्ही टुर बुक केली होती की ओन टुर केलीत.
कस्टमाइस टुरसाठी कुठली टुर चांगली आहे.
गोगा डीस्नेसाठी ६/७ दिवस वेगळे ठेवलेत.
भारतीय खाणेच हवय असे काही नाही उलट चायनीज्,इटालीयन,पिझा म्हणजे मुलांची मजाच आहे.

डिस्नेसाठी ओरलँडोला जा.. खूप मोठ्ठाले पार्क आहेत. मजा कराल.
भारतीय खाण्याबद्दल माहिती सगळ्यानाच उपयोगी पडेल म्हणून इथे दिली..

साधारण फ्रेम वर्क केले आहे ते असे
प्रथम LA then LV then SF
प्रश्न अस आहे की LA to LV to SF कसे जावे बाय ट्रेन की ड्राइव्ह की फ्लाइट
SF to yosemite to napa vally to lake thoe असा प्रोग्राम बनवावा का? किंवा अशी एखादी टूर आहे का ? असल्यास कुठली?
सेवेन्टीन कोस्ट माइल ड्राइव्हसाठी टूर्स आहेत का?
yellowstone साठी दिड दिवस पुरेल का? (जॅक्सन एयरपोर्ट पासुन पुढे)
न्युयार्क ते डिसी ट्रेन घ्यावी का?

न्यूयॉर्क ते डीसी ट्रेनने जाण्याची कल्पना चांगली आहे.. आधी आरक्षण केल्यास उत्तम.
yellowstone साठी दिड दिवस पुरेल का? <<< अगदी काठोकाठ.. yellowstone खूप मोठ्ठा पार्क आहे. त्यात बर्‍याच ठिकाणी गरम पाण्याचे झरे बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पोहोचल्यावर २ दिवस राहता आहे तर बरे.

बाकी तिकडचे लोक सांगतीलच..

गोगा म्हणत आहेत ते बरोबर आहे. पिवळा खडक करता २ पूर्ण दिवस पण कमी पडतील पण तरिही चालून जाईल. मॅमथ जर सुरू नसेल तर तिकडे जाऊच नका म्हणजे आर्धा दिवस वाचेल. ओल्ड फेथफूल आणि कॅनियन नक्की बघा. बाकी सुद्धा थोडे वाचून आणि नकाशा बघुन मुक्कामाचे ठिकाण नीट ठरवून दीड दिवसांत करता येईल. (थोडी घाई होईलच)

चायनीज्,इटालीयन,पिझा म्हणजे मुलांची मजाच आहे >> भारतातले चायनीज आणि बाहेरचे चायनीज यात फरक आहे. तशी मनाची तयारी करून ठेवा Happy इटालियनबद्दल काही प्रॉब्लेम नाही येणार.

उलट चायनीज्,इटालीयन,पिझा म्हणजे मुलांची मजाच आहे >>

माझ्या ओळखीतली ३-१५ वर्षांची मुलं भारतातून इथे फिरायला आली तेंव्हा बहुतेक वेळा तरी इथलं चायनीझ, इटालियन, पिझ्झा, इतकंच काय इंडियन रेस्टॉमधील जेवण सुद्धा आवडलं नाही.

पिझ्झा बेस आवडत नाही, मोझ्झरेला चीझ आवडत नाही, टॉमेटो केचप आव्॑डत नाही, ग्रिल्ड चिकन सॅण्डविच पुरेसं मसालेदार नसतं, आइसक्रीम अगोड लागतं, सॅलड खायचि सवय नसते, पार्मेझान चीझ, अल्फ्रेडो सॉस आवडत नाही,,,

एक दोन मुलांना मलेशियन किंवा बरमीझ प्रकार त्यातल्या त्यात बरे वाटले आहेत.

माझ्याकडे आले असता मी शक्यतो बाहेर जेवायला नेत नाही. माझ्याकडुन प्रवासाला निघणार असतील तर मी पराठे, इडली चटणी, चटणी सँडविच, दही भात , खाखरा, असं देते १-२ दिवसांपुरते तरी.

मेधा माझ्याकडे उलटे आहे.... टाको बेल, ईतालीयन, चायनीज भारतातून आलेल्या मुलाना इतकं आवडतं, की कुठेही नेलं की तेच खायला बघतात.. पिझ्झा, केएफ्सी, टाको बेल.. आत्ताच एका पाहुण्याना डीसीला नेऊन आणलं. असलं खाणं खूप आवडलं त्यांच्या मुलाला (वय १६ वर्षे)..

अमेरिकेत चायनीज्,इटालीयन बरोबर मॅक्सिकन, लेबनिज, मोरक्कन पण बरेच option असतात. त्याची चव भारतिय जेवणाशी मिळतीजुळती आहे. आणि त्यात शाकाहारी पण मिळते.

अमेरिकेत चायनीज्,इटालीयन बरोबर मॅक्सिकन, लेबनिज,>> हे सर्व प्रकार आता भारतात पण सहज मिळतात (गुरगावात) Happy

मादेवी.. यलोस्टोन दिड दिवसात बघायचे आहे असे म्हणालात..

गोष्टीगावाचे त्यांच्या पहिल्याच पोस्टीत म्हणाले तसे नुसते भोज्जा करुन यायचे असेल तरी दिड दिवस यलोस्टोनला पुरणार नाहीत असे मला वाटते.

यलोस्टोनच्या आत राहणार आहात का बाहेर? आत असलेल्या ३-४ चांगल्या लॉजमधे वर्ष वर्ष आधी बुकिंग करायला लागते. पार्कच्या बाहेर वेस्ट यलोस्टोन व गार्डीनर ही दोन ठिकाणे आहेत. तिथेही आयत्या वेळेला राहायला मोटेल मिळेल की नाही याची शाश्वती नाही. आधीच चौकशी करुन ठेवा नाहीतर राहायची पंचाइत होउ शकते तिथे.

तिथे तुम्ही स्वतः गाडी चालवणे आवश्यक आहे. त्या पार्कची व्याप्ती खुप मोठी आहे. पुर्व पश्चिम २५ मैल व उत्तर दक्षिण साधारण ५० माइल्स. आतला रस्ता इंग्लिश नंबर ८ सारखा आहे.. अप्पर लुप व लोवर लुप. घाइघाइत जरी केले तरी एक लुप करायला एक दिवस लागेल. तुम्हाला जर प्राणी बघायचे असतील तर हेडन व्हॅली व लमार व्हॅलीमधे पहाटे पहाटे जावे लागते. अगदी पहाटे पहाटे फायरहोल रिव्हर मधुन येणारी वाफ व नॉरिस गैझर बेसिन मधल्या असंख्य गैझर्स मधुन येणारी वाफ धुक्यासारखी सबंध आसमंतात पसरलेली दिसते. ते पहाटेचे विहंगम द्रुष्य आउट ऑफ धिस वर्ल्ड असे असते. आणी पहाटेच्या सुर्योदयाच्या बॅकग्राउंडवर तिथे मोकळे फिरत असलेले बायसन व व यलोस्टोन रिव्हरच्या आजुबाजुला जर मुस व अस्वले जर दिसली तर अजुनच मजा येते.

ओल्ड फेथफुल हा गैझर दर ७० मिनिटांनी इरप्ट होतोच होतो! तसेच तिथले मड व्होल्कॅनो, फ्युमरोल्स व असंख्य गैझर्स सुद्धा बघण्यासारखे असतात. आणी तिथल्या असंख्य वॉटरफॉलबद्दल काय सांगावे? अहाहा!.. गिबन फॉल, टॉवर फॉल, कॅस्केड फॉल व यलोस्टोन रिव्हरवरचे अप्पर व लोअर फॉल्स! ते बघत असताना तिथुन पायच निघत नाही. तसेच आर्टिस्ट पॉइंट वरुन दिसणारा नजारा तर औरच! लोवर फॉलला जायला १ मैलाची स्टीप हाइक आहे.. अगदी फॉलच्या बाजुला नेतो तो रस्ता. वर गाडी पार्क करुन खाली जायला लागते त्यासाठी .. आपल्या बाजुला चार फुटावरुनच.. कठड्याच्या पलीकडे.. प्रचंड मोठी.. खळखळणारी यलोस्टोन नदी.. धाड धाड खाली कोसळत असते.. इट्स वर्थ टउ डु दॅट हाइक!

बर हे झाल थोडक्यात वर्णन!.. यलोस्टोन पार्कचे.

त्याच्याच ५० मैल दक्षिणेला.. जॅक्सनहोलला.. अजुन एक जेम ऑफ अ पार्क आहे.. ग्रँड टिटॉन नॅशनल पार्क!तिथली सुंदरता अजुन काही औरच आहे! त्या टिटॉन रेंजमधल्या डोंगरांची सुंदरता शब्दात सांगणे कठीण आहे.. तिथले लेक जेनी व लेक जॅक्सन व तिथली स्नेक रिव्हर व तिकडे मुक्तपणे फिरणारी हरणे व एल्क्स.. तो अनुभव सुद्धा वेड लावणारा! लेक जेनी वर जर सकाळी ८ च्या आत गेलात तर पहिल्या २५ जणांना तिथला रेंजर निळाभोर प्रिस्टिन जेनी लेक बोटीने पार करुन प्रत्यक्ष टिटॉन माउंटनच्या पायथ्याशी घेउन जातो व तिथुन अडिच मैलाची हाइक.. हिडन फॉल्स पर्यंत.. तो आपल्याबरोबर करतो. ती हाइक करत असताना तिथल्या जिऑलॉजीची इत्यंभुत माहीती देतो.. खळखळणार्‍या हिडन क्रिकच्या बाजुबाजुने जाणारी ती हाइक व तो हीडन फॉल व तिथुन दिसणारा निळाभोर लेक जेनी... व खुद्द टिटॉन माउंटनचे अगदी जवळुन सानिध्य! अहाहा.. हेच शब्द तोंडातुन निघतात ते आठ्वले की..

आता सांगा.. हे सगळे करायला दिड दिवस कसे पुरतील? Happy

वॉव मुकुंद, काय मस्त लिहिलय ! ग्रँड टिटॉन बद्दल अजून कोणाकडून ऐकले होते तेंव्हाच लिस्ट मधे टाकले होते, आत्ता तर नक्कीच.

मुकुंद अगदी परफेक्ट वर्णन. मागच्या उन्हाळ्यात यलोस्टोन आणि टेटॉन केले. आम्ही १० दिवस होतो तरीही भोज्जा केला असेच वाटले. अफाट सुंदर आहेत हे दोन्ही पार्क्स.

yellowstone साठी दिड दिवस पुरेल का? >>> नक्कीच नाही. आम्हाला २ आठवडेही कमीच वाटले.
अफाट सुंदर आहेत हे दोन्ही पार्क्स. >>> +१

आम्हीपण २च वर्षापुर्वी १० दिवस केले टीटान व यलोस्टोन... तरी कमीच वाटले. मुकुंदनी लिहिलेले अप्रतिम वर्णन वाचुन पुन्हा लगेच जावेसे वाटत आहे.

unbelievably beautiful!!!

वरच्या सगळ्यांनां यलोस्टोन + टिटॉन करता +१ ..

भारतातून येणार्‍यांकरता मात्र तेव्हढे दिवस असतीलच सुटीत ह्याची शाश्वती नाही ह्याची जाणीव आहे ..

इथे काही अजून फोटो इंटरेस्ट असेल त्यांच्याकरता .. Happy

मी पण दोन वर्षापुर्वी टीटान व यलोस्टोन कॅम्पींग केलं होतं.....१२ दिवसं .. आणि मला पण बारा दिवस कमिचं वाटले होते.

यलोस्टोन जवळ "अस्वलदंन्त मार्ग" (Beartooth Highway) आहे, एक दिवस फक्त याला दिला होता. आवर्जून करण्या सारखा.
http://beartoothhighway.com/

यलोस्टोन मध्ये आकाश निरभ्र असेल तर नाईट स्काय नक्की बघा, आकाशगंगा(मिल्की वे) दिसते.
समर मध्येपण रात्री उणे तापमान असतं, त्याची तयारी करुन जा.

यल्लोस्टोन व ग्रँट टिटॉन ला अगदी अगदी, मुकुंद! २-३ गेलोय तरीही कधीही परत जायची तयारी असते.
ही माझी रिक्षा : http://www.maayboli.com/node/46019

तन्मय, बेअरटूथ हायवे बद्दल माहिती नव्हतं - धन्यवाद! पुढच्या वेळी नक्की!

जे कोणी आपल्या पालकांना चायनीज टुरबरोबर पाठवायच्या विचारात असतील त्यांनी विपु करून थोडी अधिक माहीती करून घ्यावी.

Pages