"चिकना चिकना म्हावरा माझा..."

Submitted by जिप्सी on 12 May, 2015 - 12:40

हर्णे बंदर (दापोली) येथील मासळी बाजार. सकाळी १०-११ आणि संध्याकाळी ४:३०-५:०० नंतर दापोली येथुन अंदाजे १६ किमी अंतरावर असलेल्या हर्णे बंदरावर माशांचा बाजार भरतो. ताजी फडफडीत मासळींचा लिलाव व किरकोळ विक्री सुरू असते. Happy

प्रचि ०१
हर्णे समुद्रकिनारा

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
फत्तेहगड

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
लॉबस्टर

प्रचि ११
लॉबस्टर आणि टायगर प्रॉन्स

प्रचि १२
पापलेट

प्रचि १३
हलवा

प्रचि १४
कापरी पापलेट

प्रचि १५
कोलबी

प्रचि १६
पापलेट

प्रचि १७
पाकट

प्रचि १८
कोलबी

प्रचि १९
मांदेली Happy Happy

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
सुकट, करदी, बोंबिल

प्रचि २५
सुके बोंबिल

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आलेत फोटो..

मी आधी ते "चिकना चिकना नवरा माझा..." असं वाचलं !! आणि विचारात पडलो की जिप्सीने असा बाफ का काढलाय.. Proud

ह्याला बडवा रे कोणी तरी, ताजे फडफडीत मासे दाखवतोय. Happy

विकु १७ वे माकुळ आहे. string ray सारखे असते.
९ बहुतेकोले बोंबिल आहेत बहुतेक.
२३,२४,२५ सुके बोंबिल, करंदी
बाकी पापलेट बरीच दिसली.

काय मासे आहेत यार !!
मागच्या महिन्यात मुबईत होतो तेव्हा स्पेशली गोमांतक मध्ये जाउन मासे खाउन आलो होतो... आता परत त्याची आठवणं झाली.

प्रचि ०५ - अरे जिप्स्या ते हर्णे गाव नाही...तो फत्तेदुर्ग किल्ला आहे. गावाच्या लोकांनी तो बळकाऊन पार धुळीस मिळवलाय...आता वरती गेल्यानंतर फक्त दोन चौथरे दिसतात. तेवढीच किल्ल्याची खूण....

लायकी नाहीये आपल्या लोकांची वारसा सांभाळायची.

आत्यंतिक दूष्टंपणा... ताज्या फडफडित माशांचे फोटो.. कुठे फेडाल रे ही पापं...
जिप्सी... केवळ अप्रतिम आहेत फोटो... कश्शा रंगेबिरंगी आहेत होड्या... मासेमारही ..
फार फार सुरेख आलेत फोटो.

मंजूताई, जिप्सी - पुण्याहून कळशी ते हर्णे असा प्रवास करायचा असेल तर कसे जायचे?

सगळे फोटो छान आहेत. कोकंण म्हणजे सी फुड भाग दिसतो.

टु बी प्रामाणिक - मेलेले मास पाहूण खेद वाटला आणि त्याहून अधिक खेद लोकांना मेलेले मासे बघून तोपासु वाटले त्याचे. थोडे शाकाहारी पदार्थ सुद्धा टिपायचे असते हो.

पराग Rofl

काही नावे अपडेट केली आहेत. बाकीची नावे जागू सांगेलच Proud

१७ वे माकुळ आहे. string ray सारखे असते.>>
ते string ray च आहे. माकूळ नाही.>>>>>पाकट आहे ना?

पहिला फोटो भन्नाट... बाकी होड्या, समुद्राचे फोटोही मस्त आलेत नेहमीप्रमाणेच.
मासळीचे फोटो मी नाक दाबून पाहिले.

आम्ही कड्यावरच्या गणपतीला जाताना रस्ता चुकलो आणि हर्णै गावात शिरलो. त्या अख्ख्या गावालाच मासळीचा वास येतो की काय कोण जाणे... रस्ता विचारत विचारत जायचं म्हणून गाडीच्या खिडक्या उघडाव्या लागल्या. आणि साबा आणि माझा चेहरा कसानुसा झाला, हात रूमालांसकट नाकावर गेले. तेव्हा माझी लेक म्हणते, 'बाबा, आपण चुकीच्या बायकांबरोबर इकडे आलोय' Lol

मस्त फोटो!!

हर्णे आंब्यांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. त्याचेही फोटो टाका.

बाकी,
क्र. २६: सुकी सुरमई
क्र. २१-२२: पाकट्या
क्र. २३: सुक्या पाकट्या

मस्त फोटो..

पण जिप्स्या एक शंका आहे रे.. हर्णे, दापोली की फत्तेदुर्ग किल्ला जे काय असेल ते, तिथल्या लोकांनी जर हे फोटो पाहिले तर त्यांना ओळखता येईल ना की हा आपलाच गाव आहे जो आपण रोज पाहतोय? की फोटो पाहुन तेही खुळावतील की एवढे सुंदर गाव कुठे आहे, आम्हालाही घेऊन चला तिथे म्हणुन... Happy

तेव्हा माझी लेक म्हणते, 'बाबा, आपण चुकीच्या बायकांबरोबर इकडे आलोय'

म्हणजे तुम्ही दोघी नसता तर ते दोघे उतरले असते नक्कीच गाडीतुन.. Happy

जिप्सी....

एक किरकोळ शंका.... "लॉबस्टर" पाहिला....दादाच दिसतोय माशांचा....पण स्थानिक भाषेत त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ? काहीतरी नाव वेगळेच ऐकल्याचे अंधुकसे आठवते.

जिप्सी तुमच्या फोटोज ना शब्दच नाहीत दाद द्यायला .............. अतिशय नयनरम्य गाव ,अप्रतिम क्लिक ,,,,,,,, जिभेवर पाणी आणणारे मास्यांचे फोटोज ,,,, आणकी एक गोष्ट म्हणजे , अमी मित्र मित्र जेव्हा काशीद बीच ला ट्रीप साठी गेलो होतो त्यावेळी अमी पण हरणे च्या बंदरावर मासे खरेदीला गेलो होतो .........
अतिशय फ्रेश आणि वाजवी दरात मासे मिळाले होते आमाला.

Pages