"चिकना चिकना म्हावरा माझा..."

Submitted by जिप्सी on 12 May, 2015 - 12:40

हर्णे बंदर (दापोली) येथील मासळी बाजार. सकाळी १०-११ आणि संध्याकाळी ४:३०-५:०० नंतर दापोली येथुन अंदाजे १६ किमी अंतरावर असलेल्या हर्णे बंदरावर माशांचा बाजार भरतो. ताजी फडफडीत मासळींचा लिलाव व किरकोळ विक्री सुरू असते. Happy

प्रचि ०१
हर्णे समुद्रकिनारा

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
फत्तेहगड

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
लॉबस्टर

प्रचि ११
लॉबस्टर आणि टायगर प्रॉन्स

प्रचि १२
पापलेट

प्रचि १३
हलवा

प्रचि १४
कापरी पापलेट

प्रचि १५
कोलबी

प्रचि १६
पापलेट

प्रचि १७
पाकट

प्रचि १८
कोलबी

प्रचि १९
मांदेली Happy Happy

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
सुकट, करदी, बोंबिल

प्रचि २५
सुके बोंबिल

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक किरकोळ शंका.... "लॉबस्टर" पाहिला....दादाच दिसतोय माशांचा....पण स्थानिक भाषेत त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ? काहीतरी नाव वेगळेच ऐकल्याचे अंधुकसे आठवते.>>
ह्याला मराठीत झिंगा, शेवंड, शेवंडा अशी तीन नावे आहेत. पण झिंगा सर्वदुर परिचित आहे.

मी आधी ते "चिकना चिकना नवरा माझा..." असं वाचलं !! आणि विचारात पडलो की जिप्सीने असा बाफ का काढलाय.. Proud

'बाबा, आपण चुकीच्या बायकांबरोबर इकडे आलोय' Lol

बाकी फोटोंबद्दल काय बोलणार. मस्तच Happy

नेहमीप्रमाणेच अप्रतिम प्रचिंचा खजाना..................

पण आज हा धागा पाहून जिवाला घोर लागला ब्वा. एवढी ताजी फडफडीत मासळी आणि आम्ही इथे फोटो बघतोय. हा मासेखाऊ लोकांवर अत्याचार आहे. म्हणून णिषेढ.....;)

अशोक मामा, लॉबस्टरला स्थानिक कोळी बांधव शेवंड ह्या नावाने ओळखतात. अजुन कोणत्या नावाने ओळखत असतील तर ते जागूताईच सांगू शकेल.

मी आधी ते "चिकना चिकना नवरा माझा..." असं वाचलं !! आणि विचारात पडलो की जिप्सीने असा बाफ का काढलाय.. >>> मी तर घाईत स्क्रोल करतांना चिकना चिकना म्हातारा माझा असे वाचले. मग पहिले २-३ फोटो पाहुन पुन्हा नाव वाचले. :स्मितः

झक्कास फोटोज. प्र.चि. ९ मध्ये कोलंबीबरोबर ते लांब मासे कोणते आहेत?

जिप्स्या मला एक पण माश्याचा फोटो दिसत नाहिये. फक्त पहिला दिसतोय. मासे माझ्यासमोर यायला घाबरताहेत बहुतेक. तू नक्कीच त्यांना माझ्याबद्दल सांगितले असणार Lol

लोड झाले की नव्याने प्रतिसाद देते. पण तुझ्या फोटोंना आता प्रतिसाद द्यायला शब्द राहीले नाहीत. आता दुसर्‍या भाषेतले प्रशंसेचे शब्द शिकावे लागतील.

जिप्स्या एक शंका आहे रे.. हर्णे, दापोली की फत्तेदुर्ग किल्ला जे काय असेल ते, तिथल्या लोकांनी जर हे फोटो पाहिले तर त्यांना ओळखता येईल ना की हा आपलाच गाव आहे जो आपण रोज पाहतोय? की फोटो पाहुन तेही खुळावतील की एवढे सुंदर गाव कुठे आहे, आम्हालाही घेऊन चला तिथे म्हणुन.. >>> म्हणुन तर दर वर्षी न चुकता जातो. Happy

खर सांगायच तर दापोलीतील निसर्गाच सौदर्यं फक्त फोटोत बघुन फायदा नाही. तो आंब्या, काजूचा गंध, वाडीतल्या चाफा, मोगरा, रातराणीचा सुगंध... नारळी, पोफळीच्या वाडीतून घुमणारी समुद्राची गाज, किनार्‍यावरिल सुक्या मासळीचा उग्रवास, नागमोडी वळांवर वरुन धावणार्‍या लालडब्याच्या डिजेलचा वास त्या तांबड्या मातीत मिसळल्यावर तो ही हवाहवासा वाटतो. पण हे सगळं अनुभवायला किमान दोन तीन दिवसांचा मुक्काम हवाच.

खर सांगायच तर दापोलीतील निसर्गाच सौदर्यं फक्त फोटोत बघुन फायदा नाही. तो आंब्या, काजूचा गंध, वाडीतल्या चाफा, मोगरा, रातराणीचा सुगंध... नारळी, पोफळीच्या वाडीतून घुमणारी समुद्राची गाज, किनार्‍यावरिल सुक्या मासळीचा उग्रवास, नागमोडी वळांवर वरुन धावणार्‍या लालडब्याच्या डिजेलचा वास त्या तांबड्या मातीत मिसळल्यावर तो ही हवाहवासा वाटतो. पण हे सगळं अनुभवायला किमान दोन तीन दिवसांचा मुक्काम हवाच.>> +१००००१
क्या बात है इंद्रा!! जियो!!

परवा मी छोटे प्रॉवन्स खाल्ले. आता ओरिजिनल फोटो पाहिल्यावर वाटलं
आपण हे खाल्लं? Sad

बाकी फोटो सुरेखच आहेत एकदम. जबरदस्त फोटो काढतोस तु जिप्सी.

बी दक्षिणा मासे खात नाही. तिला मी बाटवली आहे. Lol

आत्तापर्यंत तिने फक्त सुरमईच खाल्ली. आता तिच्यात प्रगती होतेय असे दिसतेय.

Happy तुम्ही एकमेकींना भेटता हे वाचून छान वाटल. मलाही एकदा दक्षिणाच्या हातचा चहा प्यायचा आहे.

बादवे, प्रॉन्स हे मासे नाहीत. तो एक वेगळा जलचर प्राणी आहे.

.....

चिपळूणच्या "अभिषेक" हॉटेलमध्ये कुठल्या तरी माशाचे नाव घेतले अमेयने तर वेटर म्हणाला "बाराशे रुपये रेट आहे....". मला वाटले परातभर माशाचा....तसे विचारल्यावर अगदी करुण नजरेने माझ्याकडे पाहात वेटरराव उदगारले..."एकाचा...".

नाही बी दक्षिणा व मी एकदाही एकमेकींना भेटलो नाहीये. पण न भेटताही आमची मैत्री फोनवर व रेसिपीवर असते.

काय अप्रतिम फोटो आहेत.
हे गाव एवढच सुंदर आहे का ते तुमच्या नजरेतून एवढे सुंदर दिसतंय.
बाकी वासाबद्दल माझ पण असच होत . अजिबात सहन होत नाही.
त्यामुळे आमची धाव पापलेट, सुरमयी , प्रोन्स पर्यंतच आहे. ओले बोंबील पण जमतात.
पण सुकी मासळी नाहीच जमत वासामुळे

अच्छा जागू. धन्यवाद.

एका माश्याची किम्मत १२०० म्हणजे खूप झाली असे वाटते आहे. मध्यंतरी मी कोथरुड मधे जे अभिषेक रेस्ता. आहे तिथे गेलो होतो. दोन मसाला पापड मागितले तर ५०० रुपये झाले होते. काही नसत त्या मसाले पापडमधे आणि त्याची किम्मत २५० प्रति फार वाटली.

एकदा माझ्या एका मित्राने मला चहा प्यायला एका दुकानात नेले. दुपार होती म्हणून मी चहा टाळला. मोसंबीचा रस मागितली तर १९० रुपये लावले. मित्र अवाक झाला कारण बिल त्याला भरायचे होते. मला इतके वाईट वाटले की तो एक धडा होता माझ्यसाठी. कारण मला त्याला खर्चात पाडायचे नव्हते.

मध्यंतरी मी कोथरुड मधे जे अभिषेक रेस्ता. आहे तिथे गेलो होतो. दोन मसाला पापड मागितले तर ५०० रुपये झाले होते. काही नसत त्या मसाले पापडमधे आणि त्याची किम्मत २५० प्रति फार वाटली. Uhoh अभिषेक एवढे महागडे नाहीये.

बी....

१२००/- म्हटल्यावर मी चूपच बसलो होतो....खरे तर माहितीसाठी का होईना, पण नाव विचारून घ्यायला हवे होते त्या माशाचे. कदाचित मास्टर जिप्सीला माहीत असेल तो प्रकार.

दोन मसाला पापड मागितले तर ५०० रुपये झाले होते. काही नसत त्या मसाले पापडमधे आणि त्याची किम्मत २५० प्रति फार वाटली. >>>>>> बी, कोणत्याही रेस्तराँमध्ये गेल्यावर आधी मेन्युकार्ड मागवून दर पाहून घ्यावेत. आता मागाहून तक्रार करण्याचे कारण काय ब्वॉ?

नरेश हो बरोबर पण मी सहसा बाहेर जेवायला जात नाही भारतात आणि इथे सिंगापुरमधले दर मला माहिती आहेत. त्यामुळे मेनुकार्ड बघण्याची मला एकतर सवय नाही आणि मेनु कार्ड मला एक शिक्षा वाटते Happy

या चित्रांकडे केवळ माझ्यासारखेच लोक निव्वळ रसिकदृष्टीने बघू शकतात.. ( बाकिचे लाळ गाळतील का बघतील Wink )

Pages