"चिकना चिकना म्हावरा माझा..."

Submitted by जिप्सी on 12 May, 2015 - 12:40

हर्णे बंदर (दापोली) येथील मासळी बाजार. सकाळी १०-११ आणि संध्याकाळी ४:३०-५:०० नंतर दापोली येथुन अंदाजे १६ किमी अंतरावर असलेल्या हर्णे बंदरावर माशांचा बाजार भरतो. ताजी फडफडीत मासळींचा लिलाव व किरकोळ विक्री सुरू असते. Happy

प्रचि ०१
हर्णे समुद्रकिनारा

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
फत्तेहगड

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
लॉबस्टर

प्रचि ११
लॉबस्टर आणि टायगर प्रॉन्स

प्रचि १२
पापलेट

प्रचि १३
हलवा

प्रचि १४
कापरी पापलेट

प्रचि १५
कोलबी

प्रचि १६
पापलेट

प्रचि १७
पाकट

प्रचि १८
कोलबी

प्रचि १९
मांदेली Happy Happy

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
सुकट, करदी, बोंबिल

प्रचि २५
सुके बोंबिल

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोक मामा, माश्यांचे अनेक प्रकार असतात आणि त्याच्या प्रतवारीनुसार आणि हॉटेलच्या दर्ज्यानुसार दरात फरक असु शकतो. त्यामुळे त्या माश्याचे नाव तिथे आधी कोणी गेलं असेल तीच व्यक्ती सांगू शकेल तेसुध्दा त्यांनी त्या माश्याची विचारणा केली असेल तरच..........

मस्त फोटो.
आम्हिपण या उन्हाळ्यात कोकण ट्रिप केली.पण असे फोटो तुम्हिच काढु जाणे! Happy

त्या पापलेट आणि हलव्यातला फरका कसा ओळ्खायचा आमच्यासारख्या नवख्यांनी?

त्या पापलेट आणि हलव्यातला फरका कसा ओळ्खायचा आमच्यासारख्या नवख्यांनी?>>>> सोप्पयं नुसत्या डोळ्यांनी बघुन सुध्दा पापलेट आणि हलव्यातला फरक सहज लक्षात येतो. पापलेट चंदेरी आणि चमकदार असतात त्यावर खवले नसतात. हलवा थोडासा काळपट असतो आणि त्यावर खवले असतात.

ते string ray च आहे. माकूळ नाही.>>>>>पाकट आहे ना?>>
हो त्यालाच पाकट पण म्हणतात. आमच्याइकडे त्याला वागळी म्हणतात. त्याच्या शेपटीचा काटा अतिविषारी असतो.

शीर्षक बघुन येणार नव्हते पण जिप्सीने काढलेत फोटो म्हणून आलेच.

म्हावरयांचे नाही बघितले पण आधीचे फोटो सुंदर.

Nidhii

वागळी तयार करून २ दिवस तशीच ठेऊन द्यायची अस म्हणतात, मसाला चांगला मुरतो.
मी खात नाही पण माझा काका एकदाच करून पाच-सहा दिवस खात राहतो.

अशोकमामा,

>> "लॉबस्टर" पाहिला....दादाच दिसतोय माशांचा....पण स्थानिक भाषेत त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

जिप्सीने लॉबस्टर म्हंटलंय खरं, पण अचूक नाव स्पायनी लॉबस्टर (spiney lobster) आहे. कारण की साधारणत: लॉबस्टर यास खेकड्याप्रमाणे दोन नांग्या असतात. मात्र जिप्सीच्या प्रकाशचित्रातल्या जलचरास नांग्या नाहीत.

अधिक माहितीसाठी : http://en.wikipedia.org/wiki/Shrimp#Classification

आ.न.,
-गा.पै.

मस्त प्रचि. माशांची सिमेट्री आणि रंगीबेरंगी होड्या झक्कास.
त्या माशांना सद्गती मिळो ही प्रार्थना! (कुणा माबोकराच्या पाकृ मध्ये) Lol

कोथरुड मधे जे अभिषेक रेस्ता. आहे तिथे गेलो होतो. दोन मसाला पापड मागितले तर ५०० रुपये झाले होते. काही नसत त्या मसाले पापडमधे आणि त्याची किम्मत २५० प्रति फार वाटली. >>
बी एकतर सगळ्या धाग्यावर माझं घोडं जाऊद्या पुढे करायच्या नादात काहीही खपवत आहेस. एकतर त्या मसाला पापडासोबत जे थंडगार येते त्याचीही किंमत एवढी नसते. Proud तरी तू म्हणत असशील तर मी मेन्युकार्डाचा फोटो काढुन इथे डकवायला तयार आहे.

कोथरुड मधे जे अभिषेक रेस्ता. आहे तिथे गेलो होतो. दोन मसाला पापड मागितले तर ५०० रुपये झाले होते. काही नसत त्या मसाले पापडमधे आणि त्याची किम्मत २५० प्रति फार वाटली. >>

२५० प्रति पापड? काहीही फेकू नका. तुम्ही प्रति क्विंटलचा भाव विचारला असेल Proud

फोटोत आहे ( लॉबस्टर ) त्याला मराठीत शेवंड म्हणतात. आकाराने मोठा दिसतोय पण त्यात खाण्याजोगा भाग फार कमी असतो.

गामा, तूम्ही म्हणताय नांग्यावाला तो क्रे फिश ना ? तसा भारतात नाही बघितला मी.

गामा पैलवान.....

छान लिंक आहे.... योगायोगाने तिथे श्रीम्प्सही माहिती मिळाली. शेवंड या नामा विषयीही इथे चर्चा झाली आहेच.

माहितीत भर पडली या निमित्ताने. धन्यवाद.

भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

मी ऑफिसातल्या एका कोळी कलिगला विचारले आणि त्यानेही लॉबस्टरला शेवंड हेच नाव सांगितलं. Happy
हा अजुन एक फोटो ३५० ग्रॅमचा लॉबस्टरचा Happy


(पूर्वप्रकाशित)

जिप्सी,

वरील चित्रात शेवंडास नांग्या दिसताहेत, पण त्या फार किरकोळ आहेत. म्हणून त्याला नुसतं लॉबस्टर न म्हणता स्पायनी लॉबस्टर म्हणायला पाहिजे. युरोपात जो मिळतो त्या क्लॉड (clawed) लॉबस्टरला खेकड्यासारख्या भल्यादांडग्या नांग्या (=claws) असतात.

जेव्हा इंग्रजांनी शेवंड बघितलं तेव्हा त्यांना ते लॉबस्टरसारखं वाटलं. म्हणून त्याला तसं म्हणायला सुरुवात केली. मात्र कालांतराने दोहोंमधला फरक स्पष्ट होत गेला. ज्याप्रमाणे 'तिबेटन मास्टिफ' नामे कुत्रा हा मास्टिफ जातीचा नसतो, त्याप्रमाणे शेवंड हे नुसतं लॉबस्टर नसून स्पायनी लॉबस्टर आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

दिनेशदा,

>> गामा, तूम्ही म्हणताय नांग्यावाला तो क्रे फिश ना ? तसा भारतात नाही बघितला मी.

क्रेफिश मला माहीत नाही. Sad

आ.न.,
-गा.पै.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! Happy

आम्ही कड्यावरच्या गणपतीला जाताना रस्ता चुकलो आणि हर्णै गावात शिरलो. >>>>>दापोलीहुन आंजर्लेला जाताना पाळंदे गावाच्या शेवटी, एक रस्ता उजवीकडे वळतो तेथुनच कड्यावरच्या गणपतीला, केळशीला जाणारा रस्ता आहे. वरून हर्णेचा समुद्रकिनारा, पाजपांढरी गाव यांचे विहंगम दृष्य दिसते. हर्णे गावातुनही आंजर्लेला जाणारा रस्ता आहे पण चिंचोळा रस्ता आणि त्यातुनच एखादी एसटी आली कि ट्राफिक जॅम होते. या रस्त्याने जाताना सुक्या मासळीचा गंध दरवळत असतो. Happy

'बाबा, आपण चुकीच्या बायकांबरोबर इकडे आलोय' >>>>>>:हहगलो:

मंजूताई, जिप्सी - पुण्याहून कळशी ते हर्णे असा प्रवास करायचा असेल तर कसे जायचे?>>>> बी, पुण्याहुन पौड-मुळशी-ताम्हीणी घाट-माणगाव-वीर (दापोली फाटा)-आंबेत-पालगड तिठा-दापोली-हर्णे-केळशी असा प्रवास करता येतो.

आशुचॅम्प>>>> अगदी अगदी रे Happy

क्या बात है इंद्रा, मस्त वर्णन.

गा.पै. माहितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद!!! Happy

जिप्स्या... सही रे...
माझ्यच् गावचे फोटो इतके सहीच रे.... खर हे गाव कुठे असा प्रश्न पडलाय...
हर्णे आजोळ रे आणि आंजर्ल्यात तर घर आहे खालिओ पाखाडित...

जिप्सी अप्रतिम फोटो. अजून एक सेरीज. ते फते(ह)दुर्ग आहे हरणे नाही. हर्ण्यच्य चौकडीतला हा किल्ला. आता तिथे कोळ्यांची वस्ती आहे.
बी रस्ता जीप्स्या ने सांगितला आहेच. सकाळी यष्टी आहे ६ ची स्वारगेट - केळशी - आंजर्ल Wink
बाकी हरण्याच्या बाजारात आता कोळीणी कायच्या काय भाव सांगतात. घासाघीस केली कि निम्म्यावर येतात. त्यपेक्ष 'भरडखोळ' (दिवेअगर-हरिहरेश्वर मधल) तिथला माझा अनुभव चांगला आहे. ३ वेळा जाऊन आलोय तिथे तिन्ही वेळा मासे मस्त दरात मिळाले फार घासाघीस न करता !
इंद्राचा मेसेज बघून वाटल कि रवींद्र पिंग्याचं कोकानावरच पुस्तक तर वाचत नाहीये न Wink

Pages