गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन

Submitted by नितीनचंद्र on 4 March, 2015 - 01:01

कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.

हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.

हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.

आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.

काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.

ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.

दुसर्‍या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.

आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.

यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्ल्ड कप सेमीफायनलला ऑस्ट्रेलिया जिंकली आणि भारत हरला कारण...
ते बीफ खातात.

modi gay.jpg

वांद्रे निवडणुकीच्या वेळी राणेंच्या घरासमोर कोंबड्या उडवणे , तुडवणेअसे प्रकार झाले म्हणे..

www.youtube.com/watch?v=3SMtBYqftbM

हत्या होताना गायीना अमानुष वागणुक दिली जाते , हे कारण गोहत्याबंदी करण्यामागे आहे , असे यांचेच सरकार म्हणते. आणी हेच लोक इतर प्राण्याना क्रूर वागणुक देतात.

किती हा विरोधाभास.

http://maharashtratimes.indiatimes.com/international/beef-export-India-o...
ब्राझीलला मागे टाकले; यंदा उच्चांकी विक्रीचा अंदाज

वृत्तसंस्था, कोची

देशात काही राज्यांमध्ये गोहत्या बंदी लागू झाली असली आणि आणखी काही राज्ये हा निर्णय घेण्याच्या मार्गावर असली, तरी बीफ निर्यातीमध्ये भारत अग्रेसर झाला आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारताने बीफ निर्यातीमध्ये अग्रस्थानी असलेल्या ब्राझीलला मागे टाकले आहे. त्याच वेळी २०१५ मध्ये जगभरातील बीफ निर्यात १०.२ मेट्रिक टनाचा उच्चांक गाठेल, असा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

मुंह मे राम और बगल मे छुरी

नॅशनल डेरी डेवलपमेंट बोर्ड (एनडीडीबी)च्या ताज्या आकडेवारी नुसार , ज्या राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे तिथे दुभत्या गाईंची संख्या 19℅ पेक्षा ही कमी भरते आहे अन तो कायदा नसलेल्या राज्यांत 60℅ च्या वर आहे, आता मला प्रश्न हा पडला आहे की ह्या कायद्यातुन नेमके कसले गोसंवर्धन अपेक्षित आहे? जर दुभता गोवंशच रोडावत गेला तर देशी गाई कश्या वाढणार? ह्यावर महाराष्ट्र सरकार ची काही आकडेवारी उपलब्ध आहे काय??

देशात/राज्यात दूध उत्पादनासाठी उपयोगात येणार्‍या गायींमधे देशी आणी जर्सी/संकरीत गायींचे प्रमाण किती आहे??

>> आता देवनारच्या पशुवधगृहाच्या जागेत काय उभारणार??

डुकरासारख्या नाठाळ पशूंना कापून खाण्यासाठी कत्तलखाने.

-गा.पै.

Proud

पाकड्यांना वाकड्यात शिरायचे काय कारण होते? जर बहुसंख्य लोक गोमांस खात नाहीत तर अट्टाहासाने गोमांसाचे पुडे देण्यामागचे कारण काय? उपासमार झालेल्या भूकंपपीडिताला काय त्याचा धर्म विचारुन अन्न वाटायचे का? संकटाच्या वेळी असा हलकटपणा करण्यामागचे काय उद्देश असावा?
समजा अल्लाच्या अवकृपेने पाकिस्तानात भूकंप झाला आणि कुठल्याशा युरोपियन देशाने लाखो पोर्कची पाकिटे मदत म्हणून पाठवली तर चालेल का? माझ्या मते तसे झाले तर दंगली होतील.

पैलवान म्हणतात डुक्कर नाठाळ असल्याने कापावे.

शेळी , मेंढी , कोंबडी , बदक हेही सगळे नाठाळच असतात का ?

कुठलीतरी पवित्र देवी कुठल्या तरी सणाला दहा हजार बोकडांचा खारा नैवेद्य खाते म्हणे.

उपासमार झालेल्या भूकंपपीडिताला काय त्याचा धर्म विचारुन अन्न वाटायचे का?

.......

विश्वामित्रानी दुष्काळात कुत्रे खाल्ले होते ना ? गाय हा उपयुक्त पशु आहे , हिंदुनी मांसच काय अख्खा यवन पचवला तरी त्याचा धर्म अबाधित रहातो , हे पवित्र उद्गार कुणाचे आहेत ?

कुठल्या तरी पुराणात विश्वामित्राने कुत्र्याचे मांस खाल्ल्याचा उल्लेख आहे म्हणून आता नेपाळी लोकांनी गोमांस कबूल करावे हा तर्क अचाट आणि आचरट आहे.
कुणीतरी गाय हा पशु आहे म्हटले म्हणून आता समस्त हिंदूंनी तसे समजणे स्वीकारले आहे हा तर्क कसा लढवला हे जाणायला आवडेल.
जे स्वतः हलाल हराम खाण्याबद्दल अत्यंत काटेकोर असतात त्याने दुसर्‍याचे सोवळे ओवळे मात्र तुच्छ मानायचे हा दुटप्पीपणा कसा योग्य आहे ते समजावून सांगावे.
काही हिंदू गोमांस निर्यात करत आहे म्हणून तमाम हिंदूंनी आपले गाईला देव मानणे बंद करावे हेही अचाट आणि अतर्क्य आहे.
काही मुस्लिम पुरूष एकाच स्त्रीशी विवाह करतात म्हणून बहुपत्नीत्वाची सवलत रद्द करायची का?

>ज्या राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे तिथे दुभत्या गाईंची संख्या 19℅ पेक्षा ही कमी भरते आहे अन तो कायदा नसलेल्या राज्यांत 60℅ च्या वर आहे

हे सहजिकच आहे. समजा भारत सरकारने कायदा केला की टाटा (भारतीय) कंपनीच्या कार्स भंगारात विकता येणार नाहीत. त्या पंधरा वर्षानंतर प्रदुषणामुळे रस्त्यावर आणता येणार नाहीत. पण नंतर आणखी पंधरा वर्षे नियमीत मेंटेनंस , रजिस्ट्रेशन, रंगकाम, पेट्रोल, वगैरे खर्च मालकानेच करावा लागेल. शिवाय साध्या कारला लागेल इतके नियमित पेट्रोल भरावे लागेल व गॅरेज मधेच जाळावे लागेल. होंडा व टोयोटा कार्स मात्र पंधरा वर्षांनंतर योग्य किमतीत भंगारात विकता येतील.

कोणता शहाणा माणूस टाटा कार्स विकत घेइल ? गोवंश हत्याबंदी हाही असाच वेडगळपणा आहे. नसती कटकट नको म्हणून गवळी गाय पाळणेच बंद करतील. गोवंश हत्याबंदी करून आपण गायींचीच संख्या कमी करत आहोत हे सरकारला केव्हा समजेल ?

पाकिस्तानने बीफ पाठवणे ही एक प्रामानिक चूक असल्याचीच जास्त शक्यता आहे. एका शेजारी देशाचे विनाकारण वैर ओढवून घेण्यात पाकचा काय फायदा आहे? कट्टर एकादशी पाळणारा मित्र घरी आला तर अनवधानाने घरी केलेली मिसळ ऑफर करतोच की आपण. त्यात काय कुरापत ?

ह्यावर महाराष्ट्र सरकार ची काही आकडेवारी उपलब्ध आहे काय??

>>. महाराष्ट्र सरकार आकडेवारीवर निर्णय घेत नाही. ते सेन्टिमेन्ट्स्वर निर्णय घेते.शिवाय आकाशवाणीचे नागपूर केन्द्र आहेच

गोमांस निर्यात करत आहे म्हणून तमाम हिंदूंनी आपले गाईला देव मानणे बंद करावे हेही अचाट आणि अतर्क्य आहे.

.......

हो ना ?

हिंदु गायीला देव मानतात म्हणुन इतर धर्मियानी गाय खाणे बंद करावे हेही अचाट , अतर्क्य व लोकशाहीविरोधी आहे.

( अवांतर : हिंदुनाही एकापेक्षा जास्त बायका करायचा हक्क असायला हवा , हे माझे मत आहे. )

मी असे कुठेही म्हटलेले नाही की हिंदू खात नाहीत म्हणून बाकीच्यांनीही गोमांस खाणे थांबवावे. तसे होणारही नाही.
विषय भरकटवू नका. सध्या विषय पाकिस्तानने नेपाळला मदत म्हणून पाठवलेल्या अन्नाविषयी आहे.
लोकशाहीचे राज्य हे बहुतेक वेळा बहुमत कुणाचे आहे ह्यावर आधारित नियम बनवते. त्यामुळे बहुतेक लोक गोमांसाला नाक मुरडत असतील तर तसे नियम बनतील. जर त्याने अल्पसंख्यांकांच्या हक्कावर गदा येत असेल तर कोर्टाची पायरी चढण्याशिवाय गत्यंतर नाही.

जर पाकिस्तानची गोमांसाची मदत ही निव्वळ एक चूक असेल तर त्यांनी तातडीने माफी मागून आम्ही ह्या हलगर्जीपणाला जबाबदार असणार्‍यांची कान उघडणी करू असे म्हटले पाहिजे होते. पण ह्या शिष्टाचारभंगाबाबत आम्हाला काही माहित नाही इतकेच अधिकृतरित्या म्हटले गेले आहे. त्यामुळे ह्यामागे खोडसाळपणा असण्याची शक्यता वाटते. कदाचित सरकारी खात्यात कुणीतरी धर्मांध जिहादी अधिकारी असेल आणि जरा अद्दल घडवू म्हणून त्याने हा प्रकार केला असणे शक्य आहे. असली बेणी पाकिस्तानात गठ्ठ्याने आढळतात.

मी ते वाक्य या धाग्याच्या संदर्भातव्व भारताबाबत वापरले होते.

...............,.

पाकिस्तानने गोमांस पाठवले म्हणुन ते सर्वानी खाल्लेच पाहिजे अशी सक्ती तर नव्हती.

या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचा एका जैन संघतनेतर्फे सत्कार करण्यात आला. त्या सभेत पत्रकारासाठीच्या पहिल्या रांगेत बसलेल्या महिला पत्रकाराला मागच्या रांगेत बसवण्यात आले. कारण जैन सधुंसमोर महिला पहिल्या रांगेत बसत नाहीत.

या सरकारने आता पडदा पद्धत, नऊवारी सक्ती, महिलांना शिकायला बंदी असे निर्णय घेतले नाहीत म्हनजे मिळवली.

लोकशाहीचे राज्य हे बहुतेक वेळा बहुमत कुणाचे आहे ह्यावर आधारित नियम बनवते. त्यामुळे बहुतेक लोक गोमांसाला नाक मुरडत असतील तर तसे नियम बनतील. जर त्याने अल्पसंख्यांकांच्या हक्कावर गदा येत असेल तर कोर्टाची पायरी चढण्याशिवाय गत्यंतर नाही

......

वा ! काय सुंदर विचार आहेत ! नागपुरच्या केंद्रात फ्रेम करुन लावले असतील.

या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचा एका जैन संघतनेतर्फे सत्कार करण्यात आला. त्या सभेत पत्रकारासाठीच्या पहिल्या रांगेत बसलेल्या महिला पत्रकाराला मागच्या रांगेत बसवण्यात आले. कारण जैन सधुंसमोर महिला पहिल्या रांगेत बसत नाहीत.
या सरकारने आता पडदा पद्धत, नऊवारी सक्ती, महिलांना शिकायला बंदी असे निर्णय घेतले नाहीत म्हनजे मिळवली.
<<
<<
त्यात मुख्यमंत्री अथवा सरकारचा काय संबध? महिलांनी पहील्या तीन रांगेत बसायचे नाही ही प्रथा स्वामी नारायण मंदिरात अनेक वर्षापासून, ज्यावेळी राज्यात आणि केंद्रात कॉंग्रेजचे सरकार होते तेंव्हापासुन सुरु आहे, मग यात सध्याच्या सरकारचा काय दोष. यात दोष असेल तर तो स्वामी नारायण मंदिराच्या प्रशासनाचा किंव्हा त्या जैन साधुंचा.

महिलांनी पहील्या तीन रांगेत बसायचे नाही ही प्रथा स्वामी नारायण मंदिरात अनेक वर्षापासून, ज्यावेळी राज्यात आणि केंद्रात कॉंग्रेजचे सरकार होते तेंव्हापासुन सुरु आहे,

...............

हे प्रथमच ऐकले

हाहाहा प्रसाद., खरंतर ती म्हण आता 'डुकराची चामडी सेक्युलराला' अशी बदलली पाहिजे. तसंही पाहता डुकराची कातडी प्रत्यारोपणास उपयुक्त असतेच. Proud आणि सेक्युलरांची (कातडी हिंदुद्वेषाने) जळून गेलेली आहे. Biggrin
आ.न.,
-गा.पै.

>>वा ! काय सुंदर विचार आहेत ! नागपुरच्या केंद्रात फ्रेम करुन लावले असतील.
ही लोकशाही परंपरा आहे. अगदी अमेरिकेतही असे घडले आहे. गे लोकांच्या लग्नाला मान्यता द्यावी म्हणून कायदा करायचा प्रयत्न झाला त्यात पुरेसे लोकमत मिळाले नाही आणि ते विधेयक पराभूत झाले. पण गे लोकांनी कोर्टात जाऊन निर्णय फिरवला. स्युडो सेक्युलर लोकांना कावीळ झाली की जिथे तिथे नागपूर दिसते असे दिसते आहे!

>>पाकिस्तानने गोमांस पाठवले म्हणुन ते सर्वानी खाल्लेच पाहिजे अशी सक्ती तर नव्हती.
असे निर्लज्ज स्पष्टीकरण याबद्दल खुद्द पाकिस्ताननेही दिलेले नाही. त्यांनी निदान कानावर हात ठेवले आहेत. आपण हे निर्लज्ज समर्थन देत आहात. खुद्द पाकिस्तानातील अनेक नागरिक ह्या कृत्याला एक अक्षम्य निष्काळजीपणा असे समजत आहेत. हा काय बाटगा पाकी अस्सल पाकीपेक्षा जास्त कडवा असा काही प्रकार आहे का?

सुसंस्कृत लोक संकटात सापडलेल्या लोकांना मदत देतात तेव्हा असा माजोरडा दृष्टीकोन ठेवत नाहीत. आपले विचार ह्याबाबतीत वेगळे आहेत. तेव्हा फार काय बोलण्यासारखे नाही.

आणखी एक बाब म्हणजे सद्ध्या अनेक ठिकाणी मृतदेह सापडत आहेत. रोगराई होण्याची आणि ती पसरण्याची शक्यता दाट आहे. असं असताना बीफ सारखे उत्पादन पाठवून ते दूषित (कॉन्टॅमिनेट) होऊन इन्फेक्शनचा धोका वाढेल हे कुणाच्याच लक्षात आलं नसेल हे पटणं जरा कठी़ण आहे.

Pages