अमृततुल्य बासुंदी चहा :)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा करतात. काही लोक वेगळ्याच पद्धतीने चहा करतात. म्हणजे पाण्यात साखर घालून उकळवून त्यात एक चमचा चहा घालून झाकण घालून गॅस बंद Uhoh आणि कपात दूध आणि वरून तो कोरा चहा ओततात. तो म्हणे खरा चहा. माझ्या मते तो फळकवणी लागतो Sad

मला तर चहा एकदम दाट, गोड आणि लाईट लागतो, स्ट्राँग चहा अजिबात आवडत नाही. Sad

कोल्हापूरला 'लम्सा' नावाचा एक चहाचा स्पेशल मसाला मिळतो. बाकी चहाचे मसाले म्हणजे टिपिकल सुंठ, आलं, वेलदोडा असे माहित असलेले वास असलेले असतात. लम्सा मात्र निराळा आहे. तो वापरून मी चहा असा करते.

साहित्य (2 कप चहा) : एक कप दूध, एक कप पाणी, ६ चमचे साखर, १ सपाट चमचा लम्सा, २ सपाट चमचे सोसायटी चहा.

कृती :

प्रथम भांड्यात दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून त्यात लम्सा घाला.
1Lamasa.jpg

मग २ सपाट छोटे चमचे चहा घाला. मी नेहमी सोसायटी वापरते. चविला एकदम लाईट आहे. स्ट्राँग नाही.
2Chaha.jpg

६ चमचे साखर. हे चमचे अतिशय छोटे आहेत आणि मला साखर कमी चालत नाही. त्यामुळे ६. आजकाल साखर अजिबात गोड नसते त्यामुळे ६ घातले तरिही गोड गिट्ट होत नाही चहा.
3Sakhar.jpg

खरंतर कोणताही पदार्थ कोणत्याही क्रमाने घातला तरी चालतो, मी आपले फोटो टाकलेत त्याप्रमाणे लिहिलंय.
पण शेवटी झकास उकळायचा चहा नीट. नंतर नंतर तो उकळून छान दाटसर दिसतो.
4Ukal.jpg

मग काय, कपात ओता, दोन बिस्किटं घ्या, सोबतीला वर्तमानपत्र आणि होऊन जाऊदे तरतरीत सकाळ किंवा संध्याकाळ.
Final.jpg

विशेष टिप : चहा करताना (सुरुवातीलाच) एक चमचा साय घातल्यास अजूनच मस्त लागतो चहा. (उकळल्यावर छान तुपकट होतो. ;))

तळटिप : लम्सा पुण्यात मिळत नसल्याने आपके कोपुचे माबोकर निपो यांनी मला वर्षभराचा लम्साचा स्टॉक भेट दिला आहे. अधून मधून काही माबो मैत्रिणी येऊन तो मसाला ढापून नेतात ही गोष्ट निराळी Proud

विषय: 
प्रकार: 

लमसा हा चहा मसाला नाहिये.
ती फ्लेव्हर्ड चहा पावडर आहे. एक चमचा ने सुध्धा फ्लेव्हर येइल म्हणुन तेवढाच घातलाय.

ओके

एकूणातच कोपुला साखर सढळ हस्ते घालतात >>>> कपाला ६ चमचे म्हणजे सढळ हस्ते नव्हे ... ढळढळ हस्ते म्हणायला पाहिजे. कल्पनेनी सुद्धा दात दुखायला लागले माझे.. Happy

चहा, चहाचे ब्रॅड आणि जाहीरातीच्या दुनियेत एक नविनच जाहीरात पाहिली. लिप्टनच्या रेड लेबल चहाची. ज्यात मुस्लीम शेजारी महिला हिंदु कुटुंबाला उभे राहुन वाट पहाण्या ऐवजी आपल्या घरी बोलाऊन चहा ऑफर करते.

सुरवातीला हिंदु कुटुंबाचा विरोध आणि मग अजुन एका चहाची मागणी.

जाहिरातीचा दर्जा , चित्रीकरण आणि विचार छान आहे. २५ कोटी समाजाने मान्य केलेला बुरखा जाहिरातीत सुध्दा जागा घेतोय. मुख्य म्हणजे २५ कोटी समाजात या जाहीरातीने ब्रॅड स्थापीत होईल हा ही विचार असेल.

थोडक्यात जाहीरातीत आजची फॅशन असते तर इथे मध्ययुगीन बुरखा जागा घेतोय.

रेड लेबल मात्र अनेक वेळा न दिसल्याने आज तो ब्रॅड कोणता हे शोधताना इंटरनेटचा आसरा घ्यावा लागला.

२५ कोटी समाजाने मान्य केलेला बुरखा जाहिरातीत सुध्दा जागा घेतोय. मुख्य म्हणजे २५ कोटी समाजात या जाहीरातीने ब्रॅड स्थापीत होईल हा ही विचार असेल.

थोडक्यात जाहीरातीत आजची फॅशन असते तर इथे मध्ययुगीन बुरखा जागा घेतोय.>>> अगं आईग्गं!!!!

आजची सुट्टी फक्त माबोवरच कामी लावायचा असा पण केला होता. प्रचंड वाचायचं राहिलं होतं. पण हाय ! पदार्पणच वर्ज्य धाग्यावर झालं. कसे काय लोक चहा पितात कोणास ठावुक. Wink
मला नवर्‍याने चहा उकळला तरी कसंसंच होतं. तरी तो अंग्रेज स्टाइल चहा करतो. फार घमघमाट पसरत नाही. काही लोकांकडे किचनमधे चहा होत असताना मी शक्य तितक्या लांब बसते. चहाचा इतका का बरं नॉशिया असेल मला? ( नवरा म्हणे गागुचका Angry )

दक्षे, मी आले होते तेव्हा तू हा चहा केला नव्हतास का? ३ चमचे साखरवाला मी पिऊच शकले नसते.
असो.. कधी आलीस माझ्याकडे तर लम्सा घेऊन ये म्हणजे तुझा बासुंदी चहा करून पाजेन तुला.

फोटोतला चहा फोटो काढायच्या नादात थंड झालेला दिसतोय. त्यावर पापुद्रा पकडलाय.

मला तर चहाची चव कशीही असो, चटका बसत नाही तोपर्यंत गिळवत नाही.

चटका इफेक्ट वाढवायला आधी काहीतरी तिखट खायचे किंवा बटाटावडा खाऊन मिरची चावायची. मग मस्त झणझणत उतरते चहा.

आयला रेसीपी कशाला लिवली झालं असेल आणि डोक दुखायला लगले असेल तर आजचा आणखी एक कोप चहा होइल अश्याने.

बासुंदी चहा हवाच असेल तर एका मैत्रीणीला नेसले मिल्क्मेड घालून चहा पिताना पाहिलेले.
बाबो, चक्कर आली पाहून. Proud बासुंदी चहाची शप्पथ; च्च्ग नको नकि, साधा चहाची शप्पथ, ते ही बिनसाखरेचा. Wink

आपली शिंपल रेशीपी: एक कप पाणी आल टाकून खळाखळा उकळले की, चहा पूड टाकून गॅस बंद व झाकण ठेवायचे. मग बाजूला शेपरेट उकलेल्या दूधात चहा टाकून वेलची पूड टाकून गॅस बंद. साय धरायच्या आत गाळून कोपात. मग घश्यात डायरेक्ट.

मंजूडे नक्की तु माझ्याकडे आलीस की साखर कमी घालणार. Happy

नी तु आलेलीस तेव्हा आठवत नाही मला आपण चहा प्यायलो की नाही ते. नेक्स्ट टाईम आलिस की नक्की तुला हवा तसा कमी साखरेचा करेन तुझ्यासाठी. Happy

असो, एका कपाला ३ चमचे साखर घालून सुद्धा मी करते तो चहा 'अति गोड' अजिबात होत नाही. शुकु, वर्षा, नयना, निपो, मामा, अमेय, इन्ना सर्वांनी प्यायलाय माझ्या हातचा चहा.

माझ्या मते तो फळकवणी लागतो >>>+१११
कैतरीच लागतो तो चहा
ला तर चहा एकदम दाट, गोड आणि लाईट लागतो, स्ट्राँग चहा अजिबात आवडत नाही>>>
सेम पिंच
कोल्हापूरला 'लम्सा' नावाचा एक चहाचा स्पेशल मसाला मिळतो>>
धन्यवाद कोल्हापूरला गेल्यावर हा मसाला नक्की घेईन . सगळीकडे मिळतो कि काही स्पेशल दुकानातच ?
गागुचका <<< हाहा

निम्मं दूध आणि निम्मं पाणी असेल तरच चहा मस्त होतो. दूध नावाला असेल, तर चहा अगदीच फुळकावणी! मला मुळीच नाही आवडत. साखर दक्षीला लागते त्यापेक्षा कमी आणि चहा पत्ती दक्षीला लागते त्यापेक्षा जास्त घातली की मेरावाला चाय रेडी! Happy
लम्सासाठी दक्षीकडे चहाला जायला हवं! Wink

कोल्हापूरात दूध तापवायची पण एक खास स्टाईल आहे. गुलाबी रंगावर तापवलेले असते. मुळात दूध सकस व त्यात असे तापवलेले, त्यामुळे त्याची चव छानच लागते.

गल्फमधे इव्हॅपोरेटेड मिल्कचे छोटे टिन्स मिळतात. त्यात वेलची आणि आले असे फ्लेव्हर्सही असतात. ते घालून केलेल्या चहाला खासच चव येते. भारतात मिळतात का ते माहीत नाही. मी दुबई एअरपोर्टवरून नेहमी शक्य तितके टिन्स घेतो.

मी आसाम, दार्जिलिंग, सिलोन... असे सगळे चहा चाखून बघितलेत.. पण मला सगळ्यात आवडतो तो केनयाचा केरिचो गोल्ड.. रंग आणि स्वाद दोन्ही बेस्ट.

Happy Happy मस्त दिसतोय चहा. प्रतिसाद एकसे एक आहेत Lol सगळ्यांची ६ चमचे साखर वाचून चहा न पिताही तोंडाला साखरेची मिठी बसल्यासारखं वाटलं !
पण दक्षिणाच्या हातचा चहा खरंच भारी असतो. दुनियेतले २-३च चहा मला आवडतात, त्यात तिच्या हातचा एक आहे.

आनंदनगरात संतोष हॉलच्या अलिकडच्या गल्लीत (गि-यांच्या गल्लीत) योजकचे दुकान आहे, त्यांच्याकडे कायम लम्सा मिळतो.

मनिमाऊ, मीही तुझ्या कॅटेगरीत. चहा करायला, प्यायला आवडत नाही, दरवळही आवडत नाही. करतानाही इतका जीवावर येऊन करते की माझ्या हातचाही प्यायला आवडत नाही कुणाला Lol
काहीतरी चमचमीत खाल्ल्यावर किंवा पावसाळी हवा असेल तर एखाद्यावेळी आवडीने पिते. मात्र दक्षिणाच्या हातचा असलं काही निमित्त नसेल तरी कायम आवडतो.

आपल्याकडे कोण एक 'चहाबाज खान 'आहेत म्हणे !
दक्षे सहा सहा चमचे साखर ? अन तिकडे वजनं कमी करायच्या गोष्टी करायच्या ? ::राग:

Just half tea spoon lamsa can enhance regular tea. Anyone in
neighborhood can get in for tea, if its lamsa! Smells awesome.

तिने स्पष्ट लिहीले की - दोन कपाला सहा चमचे... तरी चालूच्च आहे!! माबोकरांनो, अब बच्चे की जान लोगे क्या??!! Sad तरी Biggrin (- हे माबोकरांसाठी कठीण आहात अशा अर्थाने, दक्षिणा तुला नाही हसत हं!)

एक कोप तीन चमचे.......................दात चिकटत नाय काय Wink

दक्षे... टायटल वरूनच वाटलं ही तुझी असेल पा कृ म्हणून..

६ चमचे साखर काय नि तुपाळ चहा काय.. ओ एम जी!!!

हे लम्सा परकरण अजिब्बात समजलं नाई... नेक्स्ट तैम तेरे ही घर मे ट्राय करुंगी... Happy

ऋऽऽन्मेष,

>> चटका इफेक्ट वाढवायला आधी काहीतरी तिखट खायचे किंवा बटाटावडा खाऊन मिरची चावायची. मग मस्त
>> झणझणत उतरते चहा.

तुम्हाला थंड चटका अनुभवायचा असेल तर मेंथॉलची गोळी तोंडात ठेवून तिच्यावरून गरमागरम चहा प्या. एकदा तरी करून बघाच. आवडेल ना आवडेल ते वेगळं! आणि याच बाफवर येऊन सांगा कसं वाटलं ते. तुम्ही चहाचे दर्दी दिसताय म्हणून ही पेयकृती सांगितली. Happy

आ.न.,
-गा.पै.

दक्षुचा चहा राहीला बाजूला. माझ्यासकट बर्‍याच जणाना साखरेचे पडलेय.:खोखो:

वर्षु तु नुसत्या थापा मारतेस. आजतागायत दोन वेळा येते येते करत टांग मारलीस मला>>>>>> त्यामुळे मेसेज पण दोनदा आला.:दिवा:

Pages