अमृततुल्य बासुंदी चहा :)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा करतात. काही लोक वेगळ्याच पद्धतीने चहा करतात. म्हणजे पाण्यात साखर घालून उकळवून त्यात एक चमचा चहा घालून झाकण घालून गॅस बंद Uhoh आणि कपात दूध आणि वरून तो कोरा चहा ओततात. तो म्हणे खरा चहा. माझ्या मते तो फळकवणी लागतो Sad

मला तर चहा एकदम दाट, गोड आणि लाईट लागतो, स्ट्राँग चहा अजिबात आवडत नाही. Sad

कोल्हापूरला 'लम्सा' नावाचा एक चहाचा स्पेशल मसाला मिळतो. बाकी चहाचे मसाले म्हणजे टिपिकल सुंठ, आलं, वेलदोडा असे माहित असलेले वास असलेले असतात. लम्सा मात्र निराळा आहे. तो वापरून मी चहा असा करते.

साहित्य (2 कप चहा) : एक कप दूध, एक कप पाणी, ६ चमचे साखर, १ सपाट चमचा लम्सा, २ सपाट चमचे सोसायटी चहा.

कृती :

प्रथम भांड्यात दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून त्यात लम्सा घाला.
1Lamasa.jpg

मग २ सपाट छोटे चमचे चहा घाला. मी नेहमी सोसायटी वापरते. चविला एकदम लाईट आहे. स्ट्राँग नाही.
2Chaha.jpg

६ चमचे साखर. हे चमचे अतिशय छोटे आहेत आणि मला साखर कमी चालत नाही. त्यामुळे ६. आजकाल साखर अजिबात गोड नसते त्यामुळे ६ घातले तरिही गोड गिट्ट होत नाही चहा.
3Sakhar.jpg

खरंतर कोणताही पदार्थ कोणत्याही क्रमाने घातला तरी चालतो, मी आपले फोटो टाकलेत त्याप्रमाणे लिहिलंय.
पण शेवटी झकास उकळायचा चहा नीट. नंतर नंतर तो उकळून छान दाटसर दिसतो.
4Ukal.jpg

मग काय, कपात ओता, दोन बिस्किटं घ्या, सोबतीला वर्तमानपत्र आणि होऊन जाऊदे तरतरीत सकाळ किंवा संध्याकाळ.
Final.jpg

विशेष टिप : चहा करताना (सुरुवातीलाच) एक चमचा साय घातल्यास अजूनच मस्त लागतो चहा. (उकळल्यावर छान तुपकट होतो. ;))

तळटिप : लम्सा पुण्यात मिळत नसल्याने आपके कोपुचे माबोकर निपो यांनी मला वर्षभराचा लम्साचा स्टॉक भेट दिला आहे. अधून मधून काही माबो मैत्रिणी येऊन तो मसाला ढापून नेतात ही गोष्ट निराळी Proud

विषय: 
प्रकार: 

लम्सा पहिल्यांदाच नाव ऐकलं! वापरून बघायला पाहिजे. पण anyway माझी चहा करण्याची कृती एकदमच वेगळी आहे. साखर नाही, साय नाही, fat free skim milk तेही अगदी कमी, पण चहा उकळलेला strong पाहिजे. अमृततुल्य बासुंदी चहा नाही आवडत Happy त्यामुळे लम्सा वापरून चवीत काय फरक पडेल ते बघायलाच पाहिजे Happy

कोपुत... साखर चमच्याने घालतात होय ? मला वाटलं मुठीने घालतात.

दक्षे, त्यापेक्षा तू तुर्की पद्धतीने चहा पी. ते दातात एक साखरेचा क्यूब धरतात, आणि कपातला चहा त्या क्यूबमधून गाळून पितात !!!

मस्त लिहिले आहेस दक्षिणा. लम्साबद्दल पहिल्यांदाच वाचले आज. पण 'बासुंदी' शब्द गाळून शीर्षक वाचले. एवढा गोड चहा कल्पनेत सुद्धा पिणे कठीण आहे.

काही लोक वेगळ्याच पद्धतीने चहा करतात. म्हणजे पाण्यात साखर घालून उकळवून त्यात एक चमचा चहा घालून झाकण घालून गॅस बंद अ ओ, आता काय करायचं आणि कपात दूध आणि वरून तो कोरा चहा ओततात. >>> मी कायम ह्याच पद्धतीने करते. फक्त कपात कोरा चहा ओतून वरुन दूध. किंवा दूध गरम करायचे नसल्यास गॅस बंद केल्यावर चहाच्याच भांड्यात दूध घालून कपात गाळून घेते.

दूधपाण्याचा चहा केल्यास त्यावर लगेच साय धरते ते आवडत नाही. वरील पद्धतीने केल्यास चहावर साय धरत नाही.

दुसर्‍यांसाठी चहा करताना जरा वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे असे हा धागा वाचून लक्षात आले Happy

अरेच्च्या इथे इंगो च्या रॅकमध्ये लम्सा १-२ वर्षा पासून पहात होतो शेवटी मित्रा कडे प्यायचा योग आला. कधी कधी चव बदल म्हणुन ठीक आहे.

साबा एका कपाला ३-४ चमचे साखर घालतात. तर लहान आकाराचे ६चमचे साखर ठिकच आहे..मी फारसा चहा घेत नाही पण घट्ट आणि गोड चहा आवडतो असा माझा समज होता तो लग्नानंतर मोडीत निघाला वर सासरी मात्र हिला फिका चहा आवडतो असे तुक मिळतात..'माझ्यासाठी चहा केलास तर तु नेहमी घालतेस त्याच्या दुप्पट साखर घातलीस तरी चालेल ' असे सांगण्यात आलंय.. Uhoh
माहेरीही फार वेगळे नाही पण तिथे चहा करण्याची वेळ जास्त आली नसल्याने तेव्हा लक्शात आले नाही... सासर कुठले ते कळले असेलच.. Proud

केरळ ट्रीप , अशा बासुंदी चहामुळे लक्षात राहिली.काही महाभाग अजून साखर हवी होती म्हणून हळहळत होते आणि आम्ही काही जण चहा बंद करण्याच्या विचारात होतो.

माझी बहिण असाच बासुंदी चहा करते आणि घरात तिला एकटीलाच तो आवडतो. तुमची गाठ घालून देते Happy

मला होल मिल्कमध्ये केलेला आटीव आणि स्ट्राँग चहा आवडतो. त्यात आलं हवंच. हा पण बासुंदी कॅटेगरीच होतो वजा साखर. दिवसातला पहिला कप या पद्धतीनं ढोसल्यावर मग साय आलेली नसली आणि दुधाचे तुपकट तवंग नसले तर कशाही पद्धतीनं केलेला आवडतो.

मला होल मिल्कमध्ये केलेला आटीव आणि स्ट्राँग चहा आवडतो. त्यात आलं हवंच. हा पण बासुंदी कॅटेगरीच होतो वजा साखर. <<+१, दुधात ऑलरेडी असलेली साखर पुरते मला

Lamsa adds nice chocolate flavour to tea. Never tried Lasa tea, but Lasa and Lamsa are easily available in any grocery shop of Hyderabad.

६ चमचे साखर. हे चमचे अतिशय छोटे आहेत आणि मला साखर कमी चालत नाही. त्यामुळे ६. आजकाल साखर अजिबात गोड नसते त्यामुळे ६ घातले तरिही गोड गिट्ट होत नाही चहा. >>

अबब ! अगं एवढी साखर? तुझ्या एका कप चहाच्या साखरेत आमच्या घरी दोन दिवसांचा चहा होतो. Happy

त्या तुझ्या चमच्याच्या अर्धा चमचा साखर घालून चहा पीत जा. सिरियसली.

Biggrin २ कपसाठी असा साहित्य मध्येच चेंज कर; नाहीतर हे माबोकर तुला इतका नको जीव करतील की तुझ्यावर "माय स्पून माय शुगर माय चॉईस" असा दिपीकास्टाईल व्हिडीयो करायची वेळ येईल! Wink

मी हैदराबादचा चॉकलेट फ्लेवर्चा चहा एकदा ट्राय केला होता, फार नाही आवडला मला.
मी पण २ चमचे साखर घालत मोठ्या मगभरून चहासाठी त्यामुळे दक्षिणाचे ३ चमचे वाचून काही अबब नाही झालं Happy

प्रत्येक चहा पिणारी व्यक्ती चहाच्या चवीबाबत फार टची असते असं माझं निरिक्षण आहे.
मध्ये ६ कुटुंब विकेंडसाठी एक्त्र गुण्यागोविंदाने राहिलो पण चहा करायच्या वेळी मी करतो/करते अशी चढाओढ होत होती दुसर्‍याच्या हातचा चहा न आवडल्याने Happy

शूम्पी, तुझ्या पोस्टचा दुसरा पॅरा याआधीही कुठेतरी लिहीला होतास तू बहुधा. वाचल्यासारखा वाटतोय.
प्रत्येक चहा पिणारी व्यक्ती चहाच्या चवीबाबत फार टची असते >>> हे अगदी खरं!

देवा..काय चहाटळ लोकं आहेत ईथली Wink

बासुंदीगत ऊकळलेल्या चहाचा भुरके मारत आस्वाद घेणार्‍यांपैकी एकाने तरी साखरेच्या चाचणीत दुधातलं फॅट ब्लेंड होवून भांड्याच्या बुडाला घट्टं चिकटल्यानंतर ते भांडं घासण्याची दर्दभरी कहाणी लिहा की.

Lol दक्षी काय उगीच दोन कोप चा करत नाही असं दिसतंय Wink

दुधदुभत्या वाहणार्‍या घरात जन्म न झाल्याचा फायदा म्हणजे इतका हेवी चा प्यायची मुदलात सवय नाही त्यामुळॅ आम्ही आपले फुळकपाणी क्लबात बरे Proud

अग दक्षिणा एका कपाला ३ चमचे पण जास्तच की, त्यानेच तर वजन वाढते. त्यापेक्षा जाड साखर टाक, ती एक चमचा पण पुरेल.:फिदी:

मी चहात दूध घालत नाही, घातले आणी साखर कमी असली तरी तो गोड मिट्ट लागतो. त्यामुळे आधी कपात गरम दूध ओतुन मग चहा गाळते त्यात. चहात आले मस्ट, नाहीतर सुन्ठ तरी हवीच.

शनीपाराजवळचे अमृततुल्य मधला वेलचीयुक्त चहा मला जाम आवडायचा, थोडा जास्त गोड असायचा. पण आता ते बन्द झाले वाट्ट.

लासा लमसा चाय हैद्राबादचा. मी ह्या चहा कंपनीच्या मालकांना भेटलेली आहे. आम्ही फ्लेवर्ड चहा साठी एक वर्क शॉप घेतले होते व हैद्राबादेतील चहा मॅन्युफॅक्चरर्स ना बोलवले होते त्यात ते ही होते.
वयस्कर, कम्युनिटीतील रिस्पेक्टेड व्यक्ती असे वाटले. ह्याचा खूप खप आहे. हैद्राबाद्चे एक दिलीप पंडीत आपले मराठी व्यक्तिमत्व, त्यांच्या ओळखीने ते आले होते. पंडित यांची पण अनेक वरशे चहाची एजन्सी होती व मोजम जाही मार्केट समोर सिल्व्हर क्लाउड नावाची बेकरी होती. अगदी राजा व्यक्तिमत्व. त्यांच्या मिसेस स्नॅकस व केक्स बनवून ठेवत असत. अंडे घालून करायचा केक त्यांनी मला शिकवला. एकदम स्वीट फॅमिली.

कमिंग टू टी हैद्राबादेत समोवर मध्ये घालून उकळवलेला चहा, खडा चमचा चाय - इतकी साखर की चमचा उभा राहतो चहात!!!! इरानी चाय, हे लमसा वगैरे खूप लोकप्रिय आहेत. चारमिनार साइडला व इतर ठिकाणी मिळतात. बरोबर उस्मानिया बिस्किट हवेच.

मला व्यक्तिशः आव्डत नाही. चहा शिजवणे पसंत नाही. रोज सोसायटी चहा. पाउण चमचा साखर घालून. हल्के उकळून थोडे दूध घालून. आणि मूड आला तर दार्जिलिंग नैतर आसाम. माकाय्बारी ऑरेंज पीको. शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेला. हपिसात आसाम टी. तरेतर्हेचे फ्लेवर घालून चहाचा चहापण नश्ट करतात लोक असे मला वाट्ते. अदरक व मसाला चाय तर आय हेट विथ पॅशन. काढाच तो.

दक्षा बेगम, इससे अच्छा तो खीर ही पी लेती?! हलके घ्या. पसंद अपनी अपनी.

इथून पुढे इथले प्रतिसाद आठवून दक्षिणाला चहा अगदी चविष्ट लागेल Wink

दक्षिणा, तुझ्या चहात तुला हवी तेवढी साखर घाल, पण मी कधी आले तुझ्याकडे तर मला एका कपाला एकच चमचा साखर. बाकी सेम तुझी पद्धत - दूध जास्त आणि पाणी कमी.
तू माझ्याकडे येशील तेव्हा रॅकवर ठेवलेला डबा काढून चहात दोन चमचे साखर वाढवेन आठवणीने.

अरे पण तिने लिहीलंय की स्पष्ट - बासुंदी चहा, मला गोडच आवडतो, दोनदाच पिते वगैरे वगैरे. तरी फुकटचे सल्ले देऊन काळजी दाखवायची एवढी का हौस? तिचे इतर डाएट रिलेटेड बाफ वाचले तर ती त्याबद्दल किती जागरूक आहे ते समजेल. तुम्ही प्या की पिठीसाखरेची फुंकर मारून तुमचा चहा. Happy

कोण काय बोलत आहे चहा बद्द्ल.......अजिबात गोड नसतो चहा दक्षीचा मी प्यायली आहे तिच्या हातचा चहा

मस्त अजुन प्यावसा वाटत आहे.. दक्षी कधी येवु ( म्हणजे ते लम्सा पाकिट पण घेइन );) Wink :डोमा::D Lol Lol

'लम्सा' -हा चहाचा मसाला आहे का फ्लेवर्ड चहा पावडर आहे .
मूळ कृतीत लम्सा + चहा पावडर असे लिहलेय
पण नंतर असे वाटतेय की फ्लेवर्ड चहा पावडर आहे

मला तरी लमसा दक्षिकडुनच कळाला आणि मिळाला पण.

मी पण तुझ्या लायणीत ग बासुंदी चहासाठी Happy

त्यामुळे मी आल्यावत तुला वेगळा चहा करावा लागत नाही Proud

Pages